बाबा आमटे यांची संपूर्ण माहिती Baba Amte Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Baba Amte Information In Marathi समाजसेवा करणे हे काही सोपे काम नाही ते करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि मोठा त्याग आवश्यक असतो. आज केवळ फोटो काढण्यापूर्ती समाजसेवा करणारे लोक खूप झालेले आहेत,  मात्र सच्चा मनाने  समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यागणारे आणि समाज हेच आपले कुटुंब म्हणत जगणारे फार कमी व्यक्ती या जगामध्ये असतात. तसेच एक भारतीय समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे बाबा आमटे यांनी केलेले कार्य फार मोठे असून मुख्यतः त्यांनी कुष्ठरोग झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाकरिता व त्यांचे सशक्तिकरण करण्याकरिता मोठे कार्य केलेले आहे.

Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे यांची संपूर्ण माहिती Baba Amte Information In Marathi

ज्या काळामध्ये कुष्ठरोगी व्यक्तींजवळ कोणी जाणे देखील पसंत करत नव्हते त्या काळामध्ये त्यांनी या रुग्णांची सेवा करत फार मोठे कार्य केलेले आहे. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणारे बाबा आमटे रबींद्रानाथ टागोर आणि महात्मा गांधी यांना आपला आदर्श मानत असत आणि त्यांनाच अनुसरून समाजसेवेचे धडे गिरवत असतात.

अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले बाबा आमटे प्रसिद्धीपासून फार दूर होते. त्यांना केवळ चांगल्या मनाने समाजसेवा करणे एवढेच काय ते ठाऊक होते. या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नीने देखील मोलाची साथ दिलेली आहे. या कार्यासाठी बाबा आमटे यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत, यामध्ये पद्मविभूषण, गांधी पीस पुरस्कार, टेम्पलटण पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार यांसारख्या उत्कृष्ट दर्जाच्या पुरस्कारांचा समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण या बाबा आमटे यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत व त्यांचे जीवनचरित्र जाणून घेणार आहोत.

नावबाबा आमटे
खरे व पूर्ण नावमुरलीधर देविदास आमटे
जन्म दिनांक२६ डिसेंबर १९१४
जन्म ठिकाण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट
वास्तव्यचंद्रपूर मधील आनंदवन
वडीलदेविदास
मुलेविकास व प्रकाश
पत्नीसाधना ताई
शैक्षणिक उपलब्धीबी ए एल एल बी
मृत्यु दिनांक९ फेब्रुवारी २००८

बाबा आमटे यांचे प्रारंभिक आयुष्य:

महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यामध्ये वसलेल्या हिंगणघाट या छोट्याशा गावी बाबा आमटे अर्थात मुरलीधर देवीदास आमटे यांचा जन्म झाला. ती दिनांक २६ डिसेंबर १९१४ ही होती. देविदास आमटे आणि लक्ष्मीबाई आमटे यांच्या पोटी बाबा आमटे यांच्या रूपाने एक हिराच जन्मला होता.

ब्रिटिश शासनामध्ये नोकर असलेले त्यांचे वडील अतिशय शिस्तीचे होते त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाकरिता त्यांचा आग्रह असे, परिणामी बाबा आमटे उच्चशिक्षित होण्यास मदत मिळाली. शिस्तीचे असले तरी देखील खूपच प्रेमळ होते. त्यांचे कुटुंब बऱ्यापैकी सदन असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना कशाचीही कमी भासली नव्हती. लहानपणापासूनच त्यांना आई-वडिलांनी बाबा हे टोपण नाव दिले होते.

लहानपणी अतिशय सुखसोइ असल्यामुळे त्यांना समाजाकडे लक्ष द्यायला जमत नसे अगदी एलएलबी ही कायद्याची पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना गरीब लोकांबद्दल काहीही जाणं नव्हती. पुढे त्यांनी १९४६ यावर्षी साधनाताई गुलशास्त्री अर्थात साधना आमटे यांच्यासोबत विवाह केला ज्यावेळी ते समाजामध्ये बाहेर वावरू लागले, त्यावेळी त्यांना अनेक लोकांच्या समस्या आढळून आल्या त्यामध्ये कुष्ठरोग ही एक महत्त्वाची समस्या दिसून आली.

या गोष्टीमुळे त्यांना फार हुरहूर वाटली त्यामुळे त्यांनी या कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पत्नी सोबत अर्थात साधनाताई आमटे यांच्यासोबत सल्ला मसलत करून त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे ठरविले.

बाबा आमटे आणि स्वातंत्र्य चळवळ:

बाबा आमटे हे महात्मा गांधी यांना फार मानत असत. इंग्रजांनी केलेल्या छळवणुकीचा त्यांना देखील मोठा त्रास होत असे त्यामुळे त्यांनी अनेक स्वातंत्र्य चळवळींमध्ये सहभाग नोंदवला होता. गांधीजी यांनी सुरू केलेल्या जवळपास सर्वच आंदोलनांमध्ये बाबा आमटे यांचा सहभाग असे, त्याचबरोबर त्यांनी भारत छोडो आंदोलनामध्ये फार महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

त्यांनी सक्रिय स्वातंत्र्य चळवळी बरोबरच न्यायालयीन व कायदेशीर लढाई लढत देखील महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले होते, त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळ मजबूत होण्यासाठी मदत मिळाली होती.

स्वातंत्र्यानंतर देखील त्यांनी अनेक चळवळींच्या माध्यमातून व आंदोलनांच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचे कार्य केले होते. १९८५ या वर्षी बाबा आमटे यांनी अशीच एक भारत जोडो आंदोलनाची सुरुवात केली होती त्याकाळी देशभरात मोठा हिंसाचार व जातीय तेढ निर्माण झालेला होता.

या गोष्टींना शांत करून देशांमध्ये एकता पुन्हा निर्माण करणे हे त्यांच्या या भारत जोडो आंदोलनाचे उद्दिष्ट होते. यामध्ये पाच हजार बेचाळीस किलोमीटरचा मोठा प्रवास त्यांना करावा लागला होता. त्यामध्ये त्यांना ११६ लोक येऊन मिळाले होते. कन्याकुमारीपासून सुरू केलेली ही भारत जोडो आंदोलनाची वारी कश्मीरमध्ये संपवली होती, त्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये एकता जागृत होण्यास मदत मिळाली होती.

बाबा आमटे यांनी मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाला देखील पाठिंबा दर्शवला होता. त्याकरता त्यांना आनंदवन हे आश्रम देखील सोडावे लागले होते. हे आंदोलन १९९० या वर्षी झाले होते.

निष्कर्ष:

समाजसेवा ही केवळ बोलण्याची गोष्ट नाही त्यासाठी प्रचंड त्याग मनामध्ये असावा लागतो. समाजसेवा करण्यासाठी फार काही लागत नाही केवळ एक चांगला विचार व प्रचंड इच्छाशक्ती असेल तर कोणताही माणूस समाजसेवा करू शकतो. समाजसेवा करण्यासाठी आपले संपूर्ण घरदार किंवा संसार सोडावा असे देखील काही नाही.

समाजसेवा अनेक क्षेत्रांमध्ये केली जाऊ शकते. भारतातील रतन टाटा हे दरवर्षी कित्येक कोटी रुपयांची संपत्ती दान करून गरिबांसाठी मोठे कार्य करत आहेत, मात्र त्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सोडलेला नाही. त्याच प्रकारे आपण आपल्या दैनंदिन कामाला कोणताही फाटा न देता देखील चांगले समाजसेवा कार्य करू शकतो.

कुष्ठरोगी लोकांची सेवा करण्यासाठी ओळखले जाणारे बाबा आमटे असेच एक समाजसेवक असून आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. यामध्ये बाबा आमटे यांचे प्रारंभिक जीवन व बालपण, त्यांच्या विचारांवर गांधीजींचा पडलेला प्रभाव, त्यांनी स्वातंत्र्य कार्यामध्ये दिलेले योगदान, त्याचबरोबर केलेली विविध आंदोलने, बाबा आमटे यांच्या वैयक्तिक जीवनासह त्यांना मिळालेल्या पुरस्काराची माहिती देखील बघितलेली आहे. सोबतच त्यांनी निर्माण केलेल्या वारसा बद्दल जाणून घेतलेले आहे. बाबा आमटे यांचे विचार खूप मोलाचे असून त्यांचे काही विचार देखील आपण बघितलेले आहेत.

FAQ

बाबा आमटे यांचे खरे व संपूर्ण नाव काय होते व त्यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?

बाबा आमटे यांचे खरे व संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे असे होते व त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ या दिवशी महाराष्ट्राच्या हिंगणघाट या वर्धा जिल्ह्यातील एका ठिकाणी झाला होता.

बाबा आमटे कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात?

बाबा आमटे हे त्यांच्या समाजकार्यासाठी ओळखले जातात. त्यातही त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सेवेसाठी बाबा आमटे यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.

बाबा आमटे यांच्या पत्नीचे व मुलांचे नाव काय आहे?

बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव साधनाताई आमटे असे असून त्यांनी बाबा आमटे यांना सामाजिक कार्यामध्ये मोठा हातभार लावला होता तर त्यांच्या मुलांचे नाव प्रकाश आमटे व विकास आमटे असे आहे.

बाबा आमटे यांनी कोणते शिक्षण घेतले होते?

बाबा आमटे यांनी समाज सेवा करण्यापूर्वी उच्च शिक्षण घेतलेले असून त्यांनी बीए एलएलबी ही पदवी मिळवली आहे.

बाबा आमटे यांनी कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन करून कुष्ठरोग यांची सेवा करण्याबरोबरच समाजासाठी कार्य केले होते?

बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन या ठिकाणी आश्रम स्थापन करून कुष्ठरोग्यांच्या सेवेकरिता व समाजसेवेकरीता कार्य केले होते.

Leave a Comment