विठ्ठल रामजी शिंदे यांची संपूर्ण माहिती Vitthal Ramji Shinde Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Vitthal Ramji Shinde Information In Marathi अगदी पूर्वीपासून भारतामध्ये अनेक स्वरूपाचे विभाजन पडलेले होते. मग ते जातीच्या आधारावर असो, प्रांतांच्या आधारावर असो किंवा राज्यांच्या आधारावर असो. मात्र इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय दृष्ट्या सर्व भारताला एकत्र करण्याचा निर्णय घेतला, यामुळे सर्व भारतावर सारख्याच प्रकारचा अन्याय होत असल्यामुळे येथील जनता या अन्यायविरुद्ध एकत्रित संघटित होण्यास मदत झाली. यामध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपले योगदान दिले. त्याचबरोबर समाजाला संघटित करणे, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे, चांगल्या कार्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे, यामध्ये विविध समाजासेवकांचा देखील मोठा वाटा आहे.

Vitthal Ramji Shinde Information In Marathi

विठ्ठल रामजी शिंदे यांची संपूर्ण माहिती Vitthal Ramji Shinde Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण वि रा शिंदे अर्थात विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार असून, यामध्ये तुम्हाला त्यांच्या जीवनचरित्र बघायला मिळणार आहे.

विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील एक आघाडीचे समाजसेवधारक असण्याबरोबरच, दलित वर्गाचे प्रतिनिधी देखील होते. त्यांनी समाजातील अस्पृश्यता संपवून समानता आणणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कापले कार्य केले होते. जमखंडी या कर्नाटकातील गावात जन्म झालेले वि रा शिंदे समाजकार्यासाठी मात्र महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात.

चला तर मग सुरु करूया या वि रा शिंदे यांच्या विषयीच्या इत्यंभूत माहितीला…

नाववि रा शिंदे
संपूर्ण नावविठ्ठल रामजी शिंदे
उपाधीमहर्षी
जन्मस्थळजमखंडी, कर्नाटक
वैचारिक प्रभावजॉन स्टुअर्ड मिल, मॅक्स मिलर आणि हरबर्ट स्पेन्सर
जन्म दिनांक२३ एप्रिल १८७३
पदवीकला शाखा, १८९८
विवाह वर्षवयाच्या नवव्या वर्षी

विठ्ठल रामजी शिंदे यांचे सुरुवातीचे प्रारंभिक जीवन:

मित्रांनो, कर्नाटक राज्यातील जमखिंडी या गावामध्ये किंवा संस्थांनामध्ये दिनांक २३ एप्रिल १८७३ या दिवशी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झालेला होता. सुरुवातीला उदारमतवादी विचारांचे असणारे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनावर जॉन स्टुअर्ड मिल, मॅक्स म्युलर आणि हर्बर्ट स्पेन्सर इत्यादी परदेशी लेखकांचा मोठा प्रभाव पडलेला होता.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक आयुष्य:

शिक्षणाचे महत्त्व विठ्ठल रामजी शिंदे यांना लहानपणीच पटलेले होते. विठ्ठल रामजी शिंदे फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथून १८९८ यावर्षी कला शाखेची पदवी घेऊन बाहेर पडले होते. पुढे त्यांनी एल एल बी ही परीक्षा बॉम्बे विद्यापीठांतर्गत उत्तीर्ण करून, मुंबईमध्ये आपले वास्तव्य केले होते.

पुढे त्यांनी प्रार्थना समाजामध्ये सहभागी होत आपल्या एल एल बी चे शिक्षण सोडले होते. या ठिकाणी त्यांना शिवराम पंथ गोखले, जी बी कोतकर, सर रामकृष्ण गोपाळ, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांसारख्या विविध व्यक्तींची साथ लाभली होती. त्याच ठिकाणावरून त्यांनी प्रार्थना समाजासाठी मिशनरी म्हणून कार्य केले होते.

प्रार्थना समाजामार्फत विठ्ठल रामजी शिंदे यांची ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मँचेस्टर कॉलेजमध्ये विविध धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करावा, याकरिता नियुक्ती करण्यात आली होती. या महाविद्यालयाची स्थापना १९०१ यावर्षी युनिटेरियन चर्च मार्फत करण्यात आलेली होती. त्यांच्या या परदेशी प्रवासाकरिता बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी फार मोलाची आर्थिक व इतरही मदत केली होती.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेले विविध कार्य:

विठ्ठल रामजी शिंदे यावर्षी इंग्लंडमध्ये पोहोचले, तिथून पुढे त्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्मासाठी व सामाजिक सुधारणांसाठी व्यतीत केले. या ठिकाणी त्यांनी प्रार्थना समाजाचे मिशनरी म्हणून कार्य चालू ठेवण्याबरोबरच, भारतात अस्पृश्यता संपवण्यासाठी देखील महत्त्वाचा प्रयत्न केला होता.

यासाठी त्यांनी पुण्यामध्ये अस्पृश्य मुलांसाठी रात्र शाळा सुरू केली होती, ते वर्ष होते १९०५.  त्याचबरोबर डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची देखील त्यांनी १९०६ या वर्षी स्थापना केली होती. पुढे १९१० मध्ये मुरली बंधक सभा, १९१२ मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद इत्यादी महत्त्वपूर्ण संस्थांची स्थापना करून त्यांनी यशस्वीरित्या त्यांचे संचालन देखील केले होते.

पुण्यामध्ये त्यांनी मिशनच्या इमारतीचे १९२२ या वर्षी बांधकाम केले होते. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत त्यांनी अस्पृश्यता या प्रथेविरुद्ध ठराव देखील मंजूर करून घेतला होता.

भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद या संस्थेची त्यांनी १९१८ ते १९२० या काळादरम्यान स्थापना केली होती. यामध्ये महात्मा गांधी व महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अध्यक्षपदी बसवण्यात आले होते. त्यांचे गांधीजी सोबत देखील चांगले संबंध होते.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी साउथबरो फॅन्चायीजी समोर साक्ष देऊन १९१९ या वर्षी अस्पृश्य वर्गाला प्रतिनिधीत्व मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले होते. पुढे काही कारणास्तव १०२३ मध्ये त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेचे मुख्य पद सोडले. त्यामुळे अस्पृश्य जातीतील लोकांनी या संस्थेचे कार्य पुढे चालू ठेवले होते.

कोणताही धर्म किंवा जात कमी नसून, हिंदू धर्मातील सर्व जाती एकत्र येऊन त्यांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांनी सविनय कायदेभंग या चळवळीमध्ये देखील सहभाग नोंदवून, येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये सहा महिन्यांची शिक्षा भोगलेली होती.

अशा या सर्वांच्या प्रिय समाजसेवकांचे अर्थात विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन २ जानेवारी १९४४ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अवघ्या काही वर्षांआधी झाले होते.

निष्कर्ष:

समाजासाठी प्रयत्न करणारे अनेक लोक आपल्या आसपास आढळून येतात. हल्ली अशा समाजसेवी लोकांची संख्या कमी झाली असली, तरी देखील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणावर असे लोक समाजामध्ये आपले कार्य करत होते. त्यांच्यामधील एक व्यक्ती म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांची ओळख सर्वदूर पसरलेली आहे.

आपल्या समाजासेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी आज आपण माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये त्यांचे जीवन चरित्र जाणून घेण्याबरोबरच, प्रारंभिक आयुष्य, शैक्षणिक आयुष्य, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली विविध कार्य, इत्यादी माहिती बघितलेली आहे.

सोबतच त्यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेविषयी देखील माहिती बघितलेली असून, त्यांच्या बद्दल इतर माहिती विषयी देखील जाणून घेतले आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघितलेले आहेत, जेणेकरून तुमच्या उर्वरित शंकांचे देखील समाधान झाले असेल.

FAQ

विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणत्या पदवीने ओळखले जात असे?

विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेला समाजसेवी कार्यामुळे त्यांना महर्षी या पदवीने सन्मानित करण्यात आलेले होते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ या दिवशी झाला होता.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मस्थान कोणते होते व ते कोणत्या राज्यामध्ये होते?

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मस्थान म्हणून जमखंडी या गावाला ओळखले जाते. जे सध्या कर्नाटक राज्यामध्ये आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा विवाह वयाच्या कोणत्या वर्षी झाला होता?

विठ्ठल रामजी शिंदे यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी अर्थात १९८२ या वर्षी झाला होता.

बडोदा संस्थानामार्फत कोणत्या नावाने विठ्ठल रामजी शिंदे यांचा गौरव करण्यात आला होता?

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९२५ व १९२६ या दोन वर्षांमध्ये आपल्या सामाजिक नीतिमत्ते करिता व बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याकरिता इंडो बर्मा या ठिकाणी प्रवास करून मोठे कार्य केले होते. त्यामुळे १९३२ या वर्षी बडोदा संस्थानाने त्यांना दलित मित्र या पदवीने सन्मानित केले होते.

आजच्या भागामध्ये आपण वि रा शिंदे, अर्थात विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. महर्षी या पदवीने सन्मानित असणारे विठ्ठल रामजी शिंदे सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर मग प्रतिक्रिया देतानाच थोडासा वेळ काढून तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करून या माहितीच्या प्रसारामध्ये हातभार लावावा, ही विनंती.

 धन्यवाद…!

Leave a Comment