मृदा प्रदूषणची संपूर्ण माहिती Soil Pollution Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Soil Pollution Information In Marathi आज काल एक शब्द फार चर्चेत आहे आणि तो म्हणजे प्रदूषण होय. कुठल्याही क्षेत्रात गेले की प्रदूषण आढळून येते. त्याला अगदी आपली जमीन देखील अपवाद नाही. अनेक प्रकारचे प्रदूषण असले, तरी देखील जमिनी सारख्या क्षेत्रांमध्ये देखील प्रदूषण होईल असे कोणालाही वाटत नाही, मात्र दुर्दैवाने हे खरे आहे. जमिनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, व त्याचे कारण हे कीटकनाशकांचा भडीमार होणारा वापर आणि जमिनीमध्ये अविघटनशील कचरा टाकणे हे मुख्य कारणे समजले जातात.

Soil Pollution Information In Marathi

मृदा प्रदूषणची संपूर्ण माहिती Soil Pollution Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण मृदा प्रदूषण म्हणजे काय याबद्दल विशेष माहिती बघणार आहोत, आणि सोबतच या प्रदूषणाची कारणे व उपाय याबद्दल देखील चर्चा करणार आहोत.

नावमृदा प्रदूषण
प्रकार सामाजिक समस्या
इंग्रजी नावसॉईल पोल्युशन
कारणेजमिनीत विषारी व अविघटनशील घटक मिसळणे
मुख्य स्त्रोतशेती
उपायरासायनिक कीटकनाशके व औषधे यांचा वापर कमी करणे त्याचप्रमाणे रासायनिक खते देखील कमी वापरणे

मृदा प्रदूषण म्हणजे नेमके काय:

मानवाला अनपेक्षित स्वरूपात जमिनीच्या रासायनिक, भौतिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये होणारा बदल म्हणून मृदा प्रदूषण ओळखले जाते. यामुळे अनेक प्रकारच्या वनस्पती व परिणामी प्राण्यांवर देखील या प्रदूषणाचा परिणाम होत असतो. जमिनीची गुणवत्ता व उत्पादकता कमी करण्यासाठी हे प्रदूषण कारणीभूत ठरत असते.

पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी एक चतुर्थांश भाग हा जमिनीचा असून, त्यातील केवळ दोन पॉईंट आठ दशलक्ष चौरस मैल इतकीच जमीन वापरू शकतो. त्यामुळे या जमिनीवर वाढत्या लोकसंख्येमुळे गर्दी व्हायला लागली आहे. त्यामुळे जमिनीमध्ये अनावश्यक घटकांची देखील वाढ झालेली असून, त्यामुळे जमीन प्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण व्हायला लागलेली आहे.

ही एक मोठी समस्या असून, ती या माती प्रदूषणामुळेच उद्भवलेली आहे. ज्यावेळी जमिनीच्या थरामधील माती ही कोणत्याही पिके किंवा वनस्पती उगविण्याकरिता असह्य ठरते, त्यावेळी या जमिनीमध्ये प्रदूषण झालेले आहे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

जमीन ही अनेक प्रकारच्या खडकांच्या थराने बनलेली असते, मात्र या खडकापासून माती व्हायला कित्येक वर्षांचा कालावधी जावा लागतो. मात्र या जमिनीची धूप किंवा प्रदूषण झाल्यास अगदी काही वर्षांमध्ये ही जमीन बदलून टाकाऊ ठरू शकते.

मृदा प्रदूषणाचे परिणाम:

कुठल्याही प्रकारच्या वनस्पतींना उगवण्याकरिता माती ही महत्त्वाचा आवश्यक घटक असते. मात्र जर ही माती प्रदूषित झाली, तर सर्वात महत्त्वाचा परिणाम या वनस्पतीवर होत असतो. अनेक प्रकारच्या वनस्पतींची संख्या या जमीन प्रदूषणामुळे कमी होत असून, त्यांचे उत्पादकता देखील घटत आहे.

मानव आणि इतरही प्राणी आपल्या अन्नाकरिता मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीवर अवलंबून असतात. या वनस्पतींचे उत्पादन घटल्यास, मानवासह इतर प्राण्यांना देखील अन्नाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असतो. त्याचबरोबर जमिनी प्रदूषित झाल्यामुळे भूजल देखील दूषित होत असते. त्यामुळे भूजल प्रकारचे पाणी पिण्यासाठी व कुठल्याही क्रियाकलापासाठी उपयुक्त राहत नाही. परिणामी हा देखील एक धोका मानवी जीवनावर दिसून येत असतो.

मृदा प्रदूषणाची कारणे:

मृदा प्रदूषण म्हणजे जमिनीमध्ये अनावश्यक घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणे, व आवश्यक असणाऱ्या घटकांची मात्रा कमी होऊन त्याच्यावर विपरीत परिणाम होणे होय. जेव्हा जमिनीमध्ये टाकाऊ पदार्थ साचतात, त्यांना माती प्रदूषणाचे स्त्रोत किंवा कारणे म्हणून ओळखले जाते. यामध्ये घरगुती कचरा देखील समाविष्ट असतो.

सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणून शेत जमिनीमध्ये टाकले जाणारे रासायनिक खते व कीटकनाशके यांना ओळखले जाते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातून निघणारा कचरा व सांडपाणी, खान क्षेत्रामध्ये निघणारा कचरा, नगरपालिका किंवा तत्सम संस्थांनी कचरा डेपो मध्ये टाकलेला कचरा, कृषी क्षेत्रातून निघणारा कचरा, जमिनीची किंवा मातीची होणारी धूप, व जास्त खारे पाणी जमिनीला देणे इत्यादी कारणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.

जमीन प्रदूषित होण्यामागे वृक्षतोड हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे, कारण झपाट्याने जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक लोक या ठिकाणी अनावश्यक क्रियाकलाप करताना दिसून येतात. अनेक लोक इकडे घरगुती कचरा, काचा, प्लास्टिक इत्यादी गोष्टी फेकत असतात.

मृदा प्रदूषणावर उपाय:

  • कोणताही कचरा असला तरी देखील शेवटी तो जमिनीवरच फेकावा लागतो. त्यामुळे शक्यतो विघटनशील पदार्थ वापरावर भर दिला पाहिजे.
  • शेती करताना शक्यतोवर सेंद्रिय खते व कीटकनाशके यांचा वापर केला पाहिजे. व कुठलीही गोष्ट आटोक्याबाहेर गेली तरच रासायनिक पदार्थांचा विचार केला पाहिजे.
  • शक्य त्या सर्व जमिनीवर वनस्पतींची लागवड केली पाहिजे, जेणेकरून प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
  • जमिनीमध्ये कचरा पुरताना तो विघटनशील आहे की नाही याचा देखील विचार केला पाहिजे.

निष्कर्ष:

आज काल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रदूषण आढळून येत आहे. त्यात शेती क्षेत्र देखील खूप प्रदूषित झालेले आहे. आजकाल प्रत्येक शेतकरी मोठ्या प्रमाणावर युरिया सारख्या रासायनिक खतांचा वापर करताना दिसत आहे. त्यासोबत कोणत्याही कीटक, बुरशी किंवा रोगांसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक औषधांचा वापर वाढलेला आहे. यामुळे अनेक विषारी घटक जमिनीमध्ये मिसळत आहेत. सोबतच अविघटनशील कचरा जमिनीमध्ये टाकल्यामुळे देखील ही समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे.

आजच्या भागामध्ये आपण या मृदा प्रदूषणाविषयी माहिती बघितलेली असून, त्यामध्ये मृदा प्रदूषण म्हणजे काय, या प्रदूषणाचा काय परिणाम होऊ शकतो, त्याची कारणे काय असतात, या प्रदूषणाकरता मुख्य स्त्रोत कोणकोणते आहेत, त्याचबरोबर याचे जमिनीवर कोणकोणते वाईट परिणाम होऊ शकतात, व हे प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे, इत्यादी माहिती बघितलेली आहे. या सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघून या विषयावर सखोल चर्चा देखील केलेली आहे.

FAQ

मृदा प्रदूषण या समस्येला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

मृदा प्रदूषण या समस्येला इंग्रजी मध्ये सॉईल पोल्युशन या नावाने ओळखले जाते.

मृदा प्रदूषण होण्याकरिता सर्वात महत्त्वाचा स्त्रोत कोणता समजला जातो?

मृदा प्रदूषण होण्याकरिता सर्वात महत्त्वाचा स्त्रोत हे शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशके यांचा भडीमार वापर हा असून, त्याचबरोबर घरगुती कचरा, खाणकामातून निघणारा कचरा, नगरपालिका किंवा तत्सम संस्थाद्वारे जमिनीमध्ये पुरण्यात येणारा कचरा, इत्यादी महत्त्वाचे स्त्रोत समजले जातात.

मृदा प्रदूषण होण्यासाठी कोणकोणती मुख्य क्षेत्र कारणीभूत ठरतात.

मृदा प्रदूषण होण्याकरिता खाणकाम, लष्करी सराव, शेती, तांत्रिक कचरा विल्हेवाट, कचरा व्यवस्थापन, आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, इत्यादी प्रमुख क्षेत्र कारणीभूत ठरत असतात.

मृदा प्रदूषणामुळे कोणकोणते परिणाम दिसून येतात?

मृदा प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांना डोमिनो इफेक्ट म्हणून ओळखले जाते. यामध्ये मातीच्या जैवविविधतेमध्ये आमूलाग्र असे बदल घडवून येत असतात. त्यामुळे मातीतील उत्पादकता ही कमी व्हायला लागते. त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होता होता, जमीन ही नापीक होते, आणि पुढे जाऊन अशा जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारच्या वनस्पती किंवा पिके उगवत नाहीत.

मृदा प्रदूषण म्हणजे नेमके काय?

मृदा प्रदूषण म्हणजे जमिनीमध्ये अति जास्त प्रमाणामध्ये हानिकारक घटक मिसळणे होय. त्यामुळे जमिनीमध्ये आवश्यक असणाऱ्या घटकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत असतो.

आजच्या भागामध्ये आपण मृदा प्रदूषण या विषयावर इत्यंभूत माहिती बघितली आहे. तुम्ही शेती करत असाल तर तुम्ही या मृदा प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करता, त्या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. त्याचप्रमाणे मृदा प्रदूषण कमी करण्यासाठीच्या तुमच्या कल्पना देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. सोबतच तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत ही माहिती शेअर करून, त्यांना देखील या प्रदूषणाविषयी जागरूक करा.

Leave a Comment