स्काऊट गाईडची संपूर्ण माहिती Scout Guide Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Scout Guide Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास होणे खूप गरजेचे असते जेणेकरून एक चांगल्या नागरिकाच्या देशाची निर्मिती होत असते. स्काऊट गाईड देखील एक तरुणांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणणारी संस्था असून १९०७ या वर्षी लष्करी कमांडर लॉर्ड रॉबर्ट स्टीफन, सन स्मिथ बेडेन पॉवेल यांच्याद्वारे या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आज सुमारे ९१६ देश आणि ५० लक्ष सदस्य पेक्षाही जास्त सदस्य या स्काऊट गाईड मध्ये सहभागी आहेत.

Scout Guide Information In Marathi

स्काऊट गाईडची संपूर्ण माहिती Scout Guide Information In Marathi

या स्काऊट गाईड मार्फत तीन ते पंचवीस वयोगटाच्या मुलांना मुलींना आणि तरुणांना मानसशास्त्रीय आधारावर प्रशिक्षण देऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो. मानवातील कलागुणांना वाव देणारी आणि त्यांना खऱ्या अर्थाने जीवन प्रवाहात आणणारी ही संस्था असून व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या संस्थेद्वारे नागरिकांना राष्ट्रीय भावना जोपासण्याबरोबरच एकच जबाबदार आणि जागरूक नागरिक होण्यासाठी सज्ज केले जाते.

इतिहास काळातील मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर अँनी बेझंट, न्यायमूर्ती विवियन बोस, पंडित मदन मोहन मालवीय, तसेच व्यंकट रमण यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी या स्काऊट गाईडचे सदस्यत्व स्वीकारलेले होते.

आजच्या भागामध्ये आपण या स्काऊट गाईड विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

नावस्काऊट गाईड
प्रकारव्यक्तिमत्त्व विकास संस्था
स्थापना वर्ष१९०७
स्थापकलॉर्ड रॉबर्ट स्टीफन्सन्स, स्मिथ बॅडेन पॉवेल
कार्यरत२१६ देशांमध्ये
सदस्य५० दशलक्ष
भारत सहभागी१९३८

भारतामध्ये स्काऊट गाईड चा इतिहास:

मित्रांनो इंग्लंडमध्ये १९०७ यावर्षी डॉक्टर यांनी या स्काऊट गाईडची स्थापना केली. हे तुम्हाला माहितीच आहे मात्र या चळवळीला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की अल्पावधीतच सर्व देशांनी या स्काऊट गाईडचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. भारताने देखील या स्काऊट गाईडला आपलेसे करण्यात मागेपुढे बघितले नाही.

भारतामध्ये या स्काऊट गाईडच्या चळवळीची स्थापना १९०९ यावर्षी करण्यात आली. पुढे १९३८ मध्ये भारत स्काऊट गाईडच्या जागतिक चळवळीच्या संघटनेमध्ये सामील झाला. तसेच १९२८ यावर्षी संपूर्ण जगभर गर्ल गाईड्स व गर्ल स्काउट्स या जागतिक संघटनेची देखील स्थापना करण्यात आली. यावेळी भारत मात्र संस्थापक सदस्य म्हणून सहभागी झाला होता. पहिल्यांदाच भारतामध्ये स्काऊट गाईड मार्गदर्शक नेमण्यात आले होते.

भारतामध्ये स्काऊट गाईड सुरू करण्यामध्ये न्यायमूर्ती विवियन बोस, पंडित हृदयनाथ कुंजरू, अँनी बेझंट, पंडित मदन मोहन मालवीय, गिरीजा शंकर वाजे, आणि जॉर्ज अरुंडेल या व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. भारतीयांसाठी १९९० साली स्काऊट गाईड सुरू झाले असले तरीदेखील खऱ्या अर्थाने भारत त्यामध्ये १९१३ या वर्षीच सहभागी झाला.

भारतामध्ये स्काऊट गाईड विस्तारण्यामागे तत्कालीन ब्रिटिश राज्यसत्ता कारणीभूत ठरली. या स्काऊट गाईडचे मुख्यालय स्थापनेपासून नवी दिल्ली या ठिकाणी असून ऑल इंडिया गर्ल गाईड्स असोसिएशन या संघटनेची १९५० यावर्षी स्थापना झाल्यानंतर एक वर्षांनी म्हणजे १५ ऑगस्ट १९५१ या दिवशी त्याचा भारत स्काऊट अँड गाईड येथे समावेश केला गेला.

१९४७ ते १९४९ या कालावधीमध्ये जागतिक पातळीवर स्काऊट गाईड संघटनेमध्ये विवियन बोस यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. त्याबरोबरच श्रीमती लक्ष्मी मुजुमदार यांचा देखील फार मोठा वाटा आहे. याकरिता त्यांना १९६९ यावर्षी वर्ल्ड स्काउटिंग यांच्याकडून कांस्य धातूपासून बनवलेला उल्फ हा पुरस्कार देण्यात आला.

मित्रांनो भारतीय स्काऊट्स अँड गाईड्स यांची उद्दिष्टे किंवा मार्गदर्शक तत्वे ही लॉर्ड बेडन यांनी १९०७ मध्ये स्थापन केलेल्या स्काऊट गाईड प्रमाणेच असून याच प्रकारे त्याची कार्यप्रणाली सुरू असते.

भारतीय स्काऊट गाईड ची उद्दिष्टे:

मित्रांनो भारतामध्ये स्काऊट गाईड स्थापन करण्याची अनेक उद्दिष्टे असली तरी देखील मुख्य उद्दिष्टामध्ये तरुण भारताच्या संपूर्णपणे मानसिक, शारीरिक, बौद्धिक, अध्यात्मिक, सामाजिक क्षमतेचा विकास करून त्यांना माणूस म्हणून एक उत्तम व्यक्ती घडवणे हे आहे. जेणेकरून जबाबदार नागरिकांचा देश तयार होण्यास मदत मिळेल. तसेच हे नागरिक स्थानिक पातळी बरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चांगली कामगिरी करू शकतील.

देवाचे अस्तित्व समजून आपल्याला नैतिकतेने मिळालेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे तसेच आपल्याला दिलेले कार्य अगदी निष्ठेने पार पाडून धर्म व देव यांच्यासाठी आदरभाव बाळगणे.

ज्या देशाचे नागरिक आहे तेथील स्थानिक पातळीवर एकोपा राखण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील परस्पर आदर सहकार्य एकोपा संघटना इत्यादी मूल्यांची जपणूक करणे.

स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास ही आपली जबाबदारी समजून करणे.

स्काऊट गाईड चे नियम:

  • आपल्या मार्गदर्शकावर विश्वास ठेवणे.
  • नेहमी विनम्रतेने राहणे.
  • प्रत्येक गोष्टीमध्ये शौर्य दाखवणे.
  • काटकसरी ला प्राधान्य देणे.
  • आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी देखील बंधुभाव बाळगणे.
  • प्राणी, पक्षी यांच्याबाबत दया बाळगणे.
  • मार्गदर्शकाने सुचवल्याप्रमाणे शिस्त बाळगणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण देखील करणे.

निष्कर्ष:

मित्रांनो जीवनामध्ये शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास या गोष्टींना फारच महत्त्व आहे. ज्यामुळे कुठेही गेलो तरी आपल्याला कमीपणाची भावना निर्माण होत नाही. मित्रांनो व्यक्तिमत्व विकास योग्य रीतीने झाला असेल तर व्यक्ती पुढे कुठल्याही क्षेत्रांमध्ये गेला तरी यशस्वी होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते.

आजच्या भागामध्ये आपण स्काऊट गाईड याविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. या माहितीमध्ये तुम्हाला भारताच्या स्काऊट गाईड विषयी माहिती तसेच त्याचा इतिहास काय आहे भारतीय स्काऊट गाईडचा उद्देश किंवा उद्दिष्ट काय आहेत यातील मार्गदर्शक कोण आहे आणि याबाबत काही नियम आहेत का व असतील तर ती काय याबाबत माहिती घेतली. याशिवाय काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

स्काऊट गाईड ही चळवळ कोणा द्वारे सुरू करण्यात आली होती?

स्काऊट गाईड ही चळवळ लष्करी मेजर जनरल असणारे डॉक्टर लॉर्ड बेडन पॉवेल यांनी इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १९०७ या वर्षी सुरु केली होती.

स्काऊट गाईड या चळवळीचे सुरुवातीचे स्वरूप कसे होते?

ज्यावेळी १९०७ या वर्षी स्काऊट गाईड सुरू झाले तेव्हा संस्थापकांनी ब्राऊन सी या बेटावर सर्वप्रथम २० मुले निवडून त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी एका शिबिराचे आयोजन केले होते.

स्काऊट गाईड का महत्वाचे आहे?

स्काऊट गाईड मुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि इतरही अनेक मूल्यांची जोपासना केली जात असल्यामुळे त्यांचे जीवन अतिशय कौशल्यपूर्ण बनते. याशिवाय त्यांना टीमवर्क, साहस, शिक्षण इत्यादी गुणांमुळे आनंद देखील उपभोगता येतो. शिवाय शालेय शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना जीवनाचे शिक्षण मिळाल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वीतेचे प्रमाण वाढत असते. या स्काऊट गाईड मार्फत संपूर्ण वर्षात अनेक उपक्रमांचे आयोजन देखील केले जाते.

स्काऊट गाईड चे काम काय असते?

मित्रांनो स्काऊट गाईड ची स्थापना संपूर्ण जगाला चांगल्या नागरिकांना विकसित करण्यासाठी करण्यात आली होती. या स्काऊट गाईड अंतर्गत व्यक्ती अतिशय परिपूर्ण आयुष्य जगू शकतो शिवाय येथे विविध तत्वांबद्दल शिकविले जाते.

भारतामध्ये सर्वात प्रथम स्काऊट गाईड कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले होते?

भारतामधील स्काऊट गाईड सर्वप्रथम न्यायमूर्ती विवियन बोस, पंडित हृदयनाथ कुंजरू, पंडित मदन मोहन मालवीय, ऍनी बेझंट, गिरीजा शंकर वाजपेयी आणि जॉर्ज अरुंडेल इत्यादी व्यक्तींच्या मदतीने सुरू करण्यात आले होते.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण स्काऊट गाईड या विषयाची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा. आणि तुम्ही देखील या दलाचे सदस्य आहेत का याविषयी देखील सांगा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचायला मिळावी याकरिता ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.

धन्यवाद!!!!

Leave a Comment