ॲथलेटिक्स खेळाची संपूर्ण माहिती Athletics Game Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Athletics Game Information In Marathi खेळाचे अनेक प्रकार पडतात. त्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणून ऍथलेटिक्स खेळ प्रकारांना ओळखले जाते. ग्रीस या देशांमध्ये सर्वात प्रथम सुरू झालेल्या, या ॲथलेटिक स्पर्धा आज काल  सर्व देश खूप उत्साहाने खेळतात. काही संदर्भानुसार झ्यूस या ग्रीस देवतेला प्रसन्न करण्यासाठी ग्रीक लोकांनी हा खेळ सुरू केला होता. जो त्यांच्याकडे एक उत्सव म्हणून साजरा केला जाई.

Athletics Game Information In Marathi

ॲथलेटिक्स खेळाची संपूर्ण माहिती Athletics Game Information In Marathi

आजकाल या खेळांना स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झालेले असून, अनेक देश या प्रकारचे खेळ करतात. एके काळी हे खेळ केवळ ग्रीक वंशाच्या लोकांसाठीच खेळण्याची परवानगी होती, किंवा त्यांच्यासाठीच खुले होते असे म्हणता येईल.

इसवी सन पूर्व १७७६ यावर्षी या खेळांना स्पर्धा म्हणून दर्जा देण्यात आला. त्यावेळी मात्र महिलांना या खेळांमध्ये सहभागी करून घेतले जात नसे. त्यानंतर याच खेळांना ऑलिंपिया हा शब्द वापरला गेला.

सर्वप्रथम १८९६ या वर्षी आधुनिक ऑलम्पिक स्पर्धांचे आयोजन अथेन्स या ग्रीस शहराची राजधानी असलेल्या ठिकाणी करण्यात आले होते. तेव्हापासून अगदी पद्धतशीरपणे नियोजनबद्धरित्या या स्पर्धांचे आयोजन केले जाते. आजच्या काळामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रिया देखील या खेळांमध्ये सहभागी होत असून, यशस्वी देखील होत आहेत. मात्र पूर्वीच्या काळी त्यांना केवळ हा खेळ बघण्याचीच संधी असे. या स्पर्धांमध्ये अनेक खेळांचा समावेश होतो, पुरुषांकरिता २४ खेळ तर महिलांसाठी १९ खेळ या स्पर्धांमध्ये उपलब्ध आहेत.

नावएथलेटिक्स
प्रकारखेळ स्पर्धा
सुरुवातग्रीस
सुरुवात वर्षइसवी सन पूर्व ७७६
हल्लीचे आधुनिक स्वरूपओलिम्पिया
आधुनिक स्वरूपास सुरुवात१८९६ या वर्षी
आधुनिक स्वरूपाचे पाहिले आयोजनग्रीसची राजधानी अथेन्स

ॲथलेटिक्स म्हणजे काय:

मित्रांनो, शारीरिक क्षमतेंचा विकास करणाऱ्या खेळांना ॲथलेटिक्स खेळ म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये उंच उडी, धावणे, चालणे, लांब उडी, थाळीफेक, गोळा फेक यांसारख्या खेळांचा समावेश होतो.

ज्यावेळी ॲथलेटिक्स प्रकारातील खेळ सुरू झाले, त्यावेळेस त्यांचे मुख्य उद्देश सर्वात कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार पाडणे हा होता. मग ते लांब उडी मारण्यात असो, की धावण्यात अथवा चालण्यात, सोबतच थाळीफेक किंवा गोळा फेक स्पर्धेमध्ये देखील जास्तीत जास्त अंतर कापत फेकणे समाविष्ट होते.

ॲथलेटिक्स खेळ प्रकारांचा इतिहास:

मित्रांनो, सर्वात प्रथम १७ व्या शतकामध्ये स्लेजहॅमर फेकण्याच्या स्पर्धेपासून या खेळाचा उदय झाला असे म्हटले जाते. ऑलम्पिक स्पर्धांचे मूळ ग्रीस या देशांमध्ये आढळून येत असले, तरी देखील फ्रांस क्रांतीनंतर अनेक ठिकाणी या उन्हाळी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

या खेळ प्रकारांसाठी सर्वप्रथम इंग्लंडमध्ये पहिली राष्ट्रीय संस्था देखील स्थापन करण्यात आली होती. जिला हौशी अथलेटिक असोसिएशन असे म्हणून देखील ओळखले जाते. आज सुद्धा ही संस्था दरवर्षी ए ए ए चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन करत असते. मात्र १९ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या खेळ प्रकारांना नियमबद्ध आणि संहिताबद्ध करून प्रमाणित केले गेले.

१८९६ यावर्षीपासून ॲथलेटिक्स स्पर्धांना चार महिन्यांमध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र ही स्पर्धा केवळ पुरुषांसाठीच असायची. त्यानंतर सुमारे १२२८ यावर्षी महिलांचा सहभाग या स्पर्धेमध्ये करण्यात आला.

ॲथलेटिक्स स्पर्धांचे नियमन करणारी संस्था म्हणून इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन अर्थात आय ए ए एफ या संस्थेला ओळखले जाते. या संस्थेची स्थापना सर्वप्रथम १९१२ या वर्षी करण्यात आली होती.

ॲथलेटिक्स खेळ प्रकारांमध्ये मास्टर्स ऍथलेटिक्स, वरिष्ठ ॲथलेटिक्स, २३ वर्षाखालील ॲथलेटिक्स, कनिष्ठ ॲथलेटिक्स, आणि तरुण ॲथलेटिक्स अशा पाच श्रेणींचे गट पडतात. यामधील ३५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना मास्टर्स ऑफ अथलेटिक्स या श्रेणीमध्ये टाकले जाते. वरिष्ठ ॲथलेटिक्स प्रकारातील श्रेणीला कुठलीही वयाचे मर्यादा नसून, २३ वर्षाखालील श्रेणीमध्ये केवळ २३ वर्षाखालील खेळाडूंचा समावेश होतो. तसेच कनिष्ठ आणि तरुण या दोन श्रेणी गटांमध्ये अनुक्रमे २० वर्षाखालील व १८ वर्षाखालील खेळाडूंचा समावेश होतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, खेळ हा प्रत्येकालाच आवडीचा असतो. पूर्वीच्या काळी मनोरंजना करता खेळ खेळला जाई, यामध्ये हार किंवा जीत याचा फारसा विचार केला जात नसे. मात्र आजकाल खेळांना स्पर्धेचे स्वरूप आल्यामुळे, त्यामध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करणे खूपच गरजेचे झालेले आहे. प्रत्येक जण खेळांमध्ये यशस्वी होण्याकरिता कित्येक दिवस आधीपासून मेहनत आणि सराव करत असतो.

या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक संस्था देखील तयार झालेल्या आहेत. आज स्थानिक स्तरासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. असेच आज आपण अथलेटिक्स प्रकारातील स्पर्धांची माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲथलेटिक्स म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे, तसेच त्याच्या श्रेणी कशा आहेत, इत्यादी गोष्टींची माहिती पहिली. सोबतच काही प्रश्न उत्तरे आणि माहितीपर तक्ता देखील बघितलेला आहे.

FAQ

ॲथलेटिक खेळ प्रकारामध्ये एका खेळाडूला किती प्रयत्न दिले जातात?

उंच उडी या प्रकाराचा अपवाद वगळला तर प्रत्येक खेळाडूला इव्हेंट मध्ये तीन प्रयत्न दिले जातात.

ॲथलेटिक्स खेळामध्ये काय नियम आहेत?

ऍथलेटिक्स खेळ खेळताना एखाद्या खेळाडूंनी, अन्यायकारक प्रकारचा फायदा मिळवण्याच्या हेतूने दुसऱ्या खेळाडूला अडविले, त्याला हात लावला, किंवा खेळताना त्याला हस्तक्षेपित केले, तर सदर खेळाडूला स्पर्धेमधून बाद केले जाते. तसेच या संपूर्ण खेळामध्ये धावपटूंनी नेहमी पायामध्ये स्निकर्स किंवा शूज परिधान केले पाहिजेत.

ॲथलेटिक्स खेळाचे महत्व काय सांगता येईल?

ॲथलेटिक्स प्रकारातील खेळ खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच, त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित करत असतात. तसेच खेळाडूंना येणारी आव्हाने कशी हाताळायची, व त्यावर कशी मात करायची याचे देखील प्रशिक्षण आपोआपच मिळते. सोबतीने खेळाडूचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. अनेक खेळाच्या स्पर्धा शारीरिक वाढीसाठी चांगल्या समजल्या जातात.

ॲथलेटिक्स खेळाच्या कोणकोणत्या श्रेणी किंवा गट पडतात?

ॲथलेटिक्स खेळ प्रकारामध्ये मास्टर्स ॲथलेटिक्स, वरिष्ठ ॲथलेटिक्स, २३ वर्षाखालील गट, कनिष्ठ गट, आणि तरुण गट अशा पाच श्रेणी पडतात.

ॲथलेटिक्स प्रकारामध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश होतो?

ॲथलेटिक्स खेळामध्ये धावणे, गोळा फेक, किंवा थाळीफेक, उंच किंवा लांब उडी, आणि चालणे यांसारख्या खेळांचा समावेश होतो. यातील धावणे ही स्पर्धा खूपच प्रसिद्ध आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ॲथलेटिक्स या खेळाच्या स्पर्धेबद्दल माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून पाठवा. तसेच तुमच्या शंका आणि प्रश्न यांच्या सोबतच तुमच्याकडची माहिती देखील कमेंटमध्ये आवश्यक कळवा. सोबतच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment