ऑलिव्हची संपूर्ण माहिती Olive Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Olive Information In Marathi आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला काही ना काही आरोग्याच्या समस्या बघायला मिळत आहेत. त्यामुळे आरोग्यदायी खानपान देखील प्रचलित होत आहे. या सर्वांमध्ये एक गोष्ट तुम्हाला ऐकायला नेहमी मिळाली असेल, ती म्हणजे ऑलिव्ह ऑइल, तर मित्रांनो काय आहे हे ऑलिव्ह? तुम्ही पिझ्झा टॉपिंग मध्ये देखील याचा उल्लेख नक्कीच ऐकला असेल.

Olive Information In Marathi

ऑलिव्हची संपूर्ण माहिती Olive Information In Marathi

हजारो वर्षांपासून स्वयंपाक घरात वापरले जाणारे अत्यंत आरोग्यदायी आहे, त्याचे आरोग्यदायी फायदे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेत. त्याच्या अष्टपैलू गुणधर्मामुळे त्याला स्वयंपाक घरातील सोने असे देखील म्हणून ओळखले जाते.

आजच्या भागामध्ये आपण ऑलिव्ह याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

ऑलिव्ह म्हणजे काय

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणून ओळखले जाणारे हे ऑलिव्ह ऑलिव्ह झाडापासून प्राप्त केले जाते. ज्या झाडाला शास्त्रीय भाषेमध्ये ओले युरोपिया म्हणून ओळखले जाते. हे एक प्रकारचे चरबीयुक्त झाड असून भूमध्य सागरीय प्रदेशात आढळणारे प्रमुख झाड आहे. इतर तेलांच्या विपरीत ऑलिव्ह तेल या ऑलिव्हजला दाबून बनविले जाते.

या झाडाचा उगम भूमाध्यीय सागरीय प्रदेशात झाला असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये याचा वापर त्याच प्रदेशात केला जाई, मात्र आजकाल संपूर्ण जगामध्ये वापर केला जातो. ऑलिव्ह हे संपूर्ण किंवा काप करून खाल्ले जाते. पिझ्झा किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये टॉपिंग म्हणून याचा वापर केला जातो. हे अगदी आपल्या इतर स्वयंपाक करण्याच्या तेलासारखेच असते, त्यामुळे ते तळणे, भाजणे, शिजवणे यांसारख्या अनेक पद्धतीने स्वयंपाकात वापरले जाऊ शकते.

एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की, ऑलिव्ह ऑइल हे हृदय आणि रक्तवाहिन्या या संदर्भातल्या आजारांवर अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे ऑलिव्ह ऑईलचे नियमित सेवन करणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होण्याची शक्यता फारच कमी असते. तसेच गॅस्ट्रो इंटेस्टायनल आजारांच्या उपचारांमध्ये देखील ऑलिव्ह ऑइल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

ऑलिव्ह ऑइल मध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स प्रचंड प्रमाणात असल्यामुळे पचनासाठी अतिशय सोपे असते. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणारे कोलेस्ट्रॉल ब्लॉक्स दूर करण्यामध्ये देखील ऑलिव्ह ऑइल मदत करते. तसेच यामध्ये असणारे पॉलीअनसॅच्युएटेड फॅट्स हे रक्त वाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी एका योग्य मर्यादेमध्ये ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात.

आज काल ऑलिव्ह सगळीकडे प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये असणारे आरोग्यदायी फायदे होय. ऑलिव्ह हे लोह, तांबे, कॅल्शियम, फायबर, कोलीन, मीठ, विटामिन ई, आणि के, तसेच फिनोलिक कंपाउंड इत्यादीं यांनी समृद्ध असते, जे ऑलिव्हला अगदी परफेक्ट आरोग्यदायी बनविते.

ऑक्सिडेशन कमी करणे, ठिसूळ हाडांच्या आरोग्य मजबूत करणे, कर्करोगावर उपचार करणे, विविध प्रकारचे वात आणि सांधेदुखी दूर करणे, पचन सुधारून पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी थांबविणे, विविध औषधांच्या एलर्जी कमी करणे, रक्तातील घटकांची योग्य प्रमाण राखून रक्ताभिसरण संस्थेमध्ये सुधारणा करणे, मन भक्कम करणे, आणि विविध आजारांविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता विकसित करणे या सर्व गोष्टींमध्ये वापरले जाते.

हार्ट अटॅक किंवा हृदयरोग हा सर्वात जीवघेणा आणि धडकी भरावणारा आजार असून या आजारावर ऑलिव्ह अतिशय गुणकारी आहे. हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता असलेल्या लोकांसाठी डॉक्टर ऑलिव्ह ऑइल वापरण्याचा सल्ला देतात. हॉलीवुड मध्ये ओलिक ऍसिड चा प्रभाव असल्यामुळे ते रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. जेणेकरून संभाव्य हार्ट अटॅक टाळले जाऊ शकतात. तसेच रक्तवाहिन्यांमधील दोष देखील दूर केले जाऊ शकतात.

हृदयरोगाखालोखाल जीवघेणा ठरणारा आजार म्हणजे कर्करोग होय. यामध्ये माणसाला अतिशय त्रास भोगावा लागतो, मात्र कर्करोगांमधील दाह कमी करण्याचे कार्य ऑलिव्ह ऑइल मधील विविध अँटॉक्सिडंट करत असतात. ऑलिव्ह ऑइल हे कर्करोगा विरोधी लढण्यास समर्थ असल्याचे एका संशोधनामध्ये आढळून आलेले आहे. ऑलिव्ह मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट शरीरातील अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

निष्कर्ष

ऑलिव्ह याला मराठी मध्ये जैतून असे देखील म्हटले जाते. ते स्वयंपाक घरातील अतिशय जुने असे पदार्थ आहे. मात्र हल्ली त्याचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. या ऑलिव्ह पासून तेल देखील बनवले जाते. जे आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट समजले जाते.

एक काळ असा होता जेव्हा या ऑलिव्हच्या तेलाचा दिवे लागण्यासाठी वापर केला जाई, मात्र जसजसे याचे देखील गुणधर्म चर्चेत येऊ लागले, तसे तसे याचा वापर खाण्याचा गोष्टींमध्ये देखील केला जाऊ लागला. हेच कमी का काय, आज-काल ओलिव्हचा वापर सौंदरप्रसाधने, औषधे, तसेच साबण यांच्या निर्मितीमध्ये देखील केला जातो.

तसेच अनेक प्रकारच्या फास्टफूडमध्ये देखील या ऑलिव्हचा गार्निशिंग म्हणून किंवा टॉपिंग म्हणून वापर केला जातो. आजच्या भागामध्ये आपण या ऑलिव्ह बद्दल माहिती बघितली आहे.

FAQ

ऑलिव्ह हे काय आहे?

ऑलिव्ह हा एक खाद्यपदार्थ आहे.

ऑलिव्ह पासून सर्वात महत्त्वाचा कुठला पदार्थ बनवला जातो?

ऑलिव्ह पासून सर्वात महत्त्वाचा बनवला जाणारा पदार्थ म्हणजे ऑलिव्ह ऑइल हे आहे. त्यासोबत विविध प्रकारच्या गार्निशिंग आणि टॉपिंग मध्ये देखील या चा वापर केला जातो.

ऑलिव्ह हे कशापासून मिळविले जाते?

ऑलिव्ह हे एक फळ असून ते झाडापासून मिळविले जाते, काही वेळेस यास दगड म्हणून देखील ओळखले जाते.

ऑलिव्ह या झाडाबद्दल कोणती गोष्ट अतिशय खास आहे?

ऑलिव्ह बद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे याचे झाड अतिशय सहनशील असे आहे, दुष्काळ पडू, तापमान वाढू, किंवा कमी होऊ, अगदी आग जरी लागली तरी देखील आग विझल्यानंतर त्याची मुळे पुन्हा नवीन झाडांमध्ये विकसित होण्यास तयार असतात.

ऑलिव्ह तेलाचे सेवन करणे केव्हा सुचविले जाते?

ज्या रुग्णांना स्तनाचा किंवा कॉलरेक्टल प्रकारचा कर्करोग असेल, किंवा संधिवात, मायग्रेन, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असेल अशा सर्व रुग्णांना ऑलिव्ह तेलाचे सेवन करण्याचे सुचविले जाते.

आजच्या भागामध्ये आपण ऑलिव्ह या खाद्यपदार्थ बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. ही आरोग्यदायी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तसेच आरोग्याच्या समस्या असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींच्या नक्कीच ही माहिती उपयोगीची वाटल्यास त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. आणि कमेंट मध्ये आपली छोटीशी प्रतिक्रिया आम्हा पर्यंत पोहोचवा.

धन्यवाद…

Leave a Comment