विठ्ठल रुक्मिणी यांची संपूर्ण माहिती Vitthal Rukmini Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Vitthal Rukmini Information In Marathi ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती’ ही भक्तीगीताची ओळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या ओठावर अगदी सहज तरळून जाते. हो अगदी बरोबर ओळखलं, तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी यांच्या विषयी माहिती बघणार आहोत.

Vitthal Rukmini Information In Marathi

विठ्ठल रुक्मिणी यांची संपूर्ण माहिती Vitthal Rukmini Information In Marathi

आपल्या भक्ताच्या भेटीला आलेला विठ्ठल विटेवर उभा राहून याच पंढरपुरात कायमचा स्थायिक झाला, त्याबद्दलची आख्यायिका आपल्याला माहीतच असेल. या विठ्ठल रुक्मिणीचे आज पंढरपुरामध्ये अतिशय मोठे मंदिर बांधलेले आढळून येते. या ठिकाणी दररोज विठ्ठलाची भक्तीभावे पूजा केली जाते. आणि असंख्य भाविक येथे दर्शनाला हजेरी लावतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी तर येथे मोठी यात्रा भरते, भीमा नदी जिला पंढरपुरात चंद्रभागा असे नाव आहे, त्या नदीच्या काठी वाळवंटात भक्तांची अगदी मांदियाळी बसत असते. महाराष्ट्रातून अनेक लाखांनी भाविक भक्त पायी वारी करत विठ्ठलाचे दर्शनासाठी येत असतात. चला तर मग वेळ न दवडता या विठ्ठल रुक्मिणी विषयी संपूर्ण माहिती बघूया, आणि विठ्ठल पंढरपूर येथेच का स्थायिक झाले याबद्दलची देखील माहिती घेऊया…

पंढरी या नावाने ओळखले जाणारे पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी या देवतेचे वास्तव्य स्थान. पुण्यापासून २०० किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्यात हे ठिकाण असून, तेथे विठ्ठलाचे सुप्रसिद्ध असे मंदिर आहे. कृष्णाचे रूप असणारे हे विठ्ठल देवता पौराणिक कथेनुसार मात्र भगवान विष्णू यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते.

विठ्ठल रुक्मिणीचे नाव अगदी सोबतच घेतले जाते, कारण भगवान विठ्ठलाची अर्धांगिनी असणारी माता रुक्मिणी देखील या मंदिरात विठ्ठल भगवानांच्या सोबत उभी आहे. विठ्ठलाला विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.

पंढरपूरचे हे मंदिर भीमा या नदीकाठी असून  या नदिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. कारण येथे गोलसर वळण घेते नदीचा तो भाग चंद्रासारखा दिसतो. आषाढ महिन्यामध्ये येथे फार मोठी यात्रा भरते. तसेच कार्तिक, चैत्र आणि माघ या महिन्यांमध्ये देखील येथे कार्यक्रम असतात. ज्या साठी अनेक भाविक भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात, आणि विठ्ठलाच्या नामघोशात भजन कीर्तन करत अगदी तल्लीन होऊन जातात.

महाराष्ट्र मध्ये अनेक साधुसंतांनी वारीचे परंपरा सुरू केली. ज्यामध्ये तुकाराम महाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सर्वात मोठ्या पालख्या आषाढीनिमित्त पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत असतात.

पंढरपूर येथे श्रीहरी अर्थात कृष्ण यास विठ्ठल रूपात पुजले जाते. मात्र हा विठ्ठल आपण कमरेवर दोनही हात देऊन विटेवर उभा राहिलेला बघितलेला असेल, विटेवर उभा राहिलेला तो विठ्ठल असे विठ्ठल नावाचा अर्थ होतो. विठ्ठलाच्या यात्रेनिमित्त अनेक भाविक भक्त येत असतात, त्यापैकी स्त्रिया या डोक्यावर तुळस घेऊन तर पुरुष हे गळ्यात विना किंवा टाळ घेऊन अखंड विठुरायाचा नामघोष करत चाललेले असतात.

ज्ञानेश्वरांच्या पुढे तेराव्या शतकापासून अनेक संतांनी विठ्ठलाला कृष्णाचे रूप असल्याचे सांगितले, मात्र याबाबत पुराण किंवा वैदिक वाङ्ममयात कुठेही उल्लेख आढळत नाही. रामचंद्र चिंतामण धरणे या लेखकानुसार सुमारे एक हजार वर्षांपूर्वी विठ्ठलाची छोटेसे मंदिर या पंढरपुर मध्ये होते, ज्याला अनेक गाई चारणारे आणि मेंढपाळ लोक पूजत असत. हे या गावचे ग्रामदैवत होते.

आषाढी एकादशीचे महत्व:

आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते, हे आपल्याला ठाऊकच आहे, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र उपवास करतो. या दिवसानंतर चतुर्मास सुरू होतो जो सुमारे चार महिने चालतो, आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपतो. या कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. मान्यता नुसार भगवान विष्णू जे की शेषनागावर निद्रा दिन आहेत ते चातुर्मासा नंतर जागे होतात असे समजले जाते. या चतुर्मासामध्ये मांसाहार व्यर्ज केला जातो.

अनेकांना पंढरपुराबद्दल आकर्षण असते. मात्र ते कधी पंढरपूरला गेलेले नसतात. त्यांना पंढरपूरला कसे जायचे याबद्दल माहिती नसते, त्यासाठी सर्वप्रथम आपण पंढरपूर पासून महत्त्वाच्या शहरांचे अंतर बघूया. पंढरपूर पासून सांगोला हे सर्वात जवळचे शहर असून ते अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर आहे.

त्यानंतर कुर्डूवाडी नावाचे रेल्वे जंक्शन पंढरपूर पासून ५२ किलोमीटरवर आणि सोलापूर हे ७२ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच अहमदनगर पासून पंढरपूरचे अंतर १९६ किलोमीटर इतके आहे. तुम्ही पंढरपूरला रेल्वे मार्गाने कुर्डूवाडी स्टेशन वरून रस्ता मार्गाने अनेक रस्त्यावरून जाऊ शकता. तसेच पुणे विमानतळावर उतरून २४५ किलोमीटर रस्ता प्रवास करत पंढरपूरला पोहोचू शकतात.

निष्कर्ष:

विठ्ठल हा देव आणि भक्त यांच्यातील भक्तीचा एक अनमोल साठा आणि प्रतीक असून सावळ्या रंगांमध्ये असणारा हा विठ्ठल पूर्वीपासूनच पंढरपुरात स्थायिक नव्हता. मात्र आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी विठ्ठल या पंढरपुरात दाखल झाला.

त्यानंतर पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करत असताना विठ्ठलाला उभे राहण्यासाठी एक वीट फेकली, माझ्या आई वडिलांची सेवा करत असताना मला खुद्द देवालाही भेटायला वेळ नाही असे म्हणत कुंडलिक पुन्हा आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये गर्क झाला. बाहेर विठ्ठल उभा आहे हे त्याला लक्षातच राहिले नाही, मात्र आपल्या या प्राणप्रिय भक्ताला भेटण्यासाठी विठ्ठल देखील तेथेच विटेवर उभा राहिला आणि शेवटी त्या ठिकाणीच विठ्ठलाचे मंदिर बनविण्यात आले.

अशा या महान देवतेचे महाराष्ट्रात अनेक भक्त बघायला मिळतात. वारकरी संप्रदायाचे अनेक संत आणि माळकरी, वारकरी लोक दरवर्षी न चुकता आषाढ महिन्यामध्ये वारी करतात आणि आपल्या भक्ताला भेटण्यासाठी विठ्ठल देखील आसुसलेला असतो.

अखेर एकादशीच्या दिवशी हा सगळा भक्त मेळा विठ्ठला भोवती गोळा होतो, आणि हा सगळा गोतावळा बघून विठ्ठल देखील खूप आनंदी होतो. असे हे देव आणि भक्त यांच्यामधील प्रेमळ नाती पंढरपूरमध्ये अनुभवायला मिळते.

FAQ

विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोठे आहे?

विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर या ठिकाणी आहे.

विठ्ठल रुक्मिणी यांचा सर्वात मोठा उत्सव केव्हा साजरा केला जातो?

विठ्ठल रुक्मिणी यांचा सर्वात मोठा उत्सव आषाढी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो.

विठ्ठला सोबत नेहमी पुंडलिकाचे नाव का घेतले जाते?

कृष्ण आपल्या भक्ताला अर्थात पुंडलिकाला भेटण्यासाठी पृथ्वीवर अवतरले असताना आपल्या भक्ताच्या आग्रहाखातर त्यांनी पंढरपूर येथेच आपले वास्तव्य विठ्ठल रूपात केले, म्हणून विठ्ठला सोबत नेहमी पुंडलिकाचे नाव घेतले जाते.

पंढरपूर या ठिकाणापासून सर्वात जवळचे प्रमुख शहर कुठले आहे?

पंढरपूर या ठिकाणाहून सर्वात जवळचे प्रमुख शहर सांगोला असून ते पंढरपूर येथून केवळ ३२ किलोमीटर अंतरावर आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची अर्धांगिनी समजली जाणारी रुक्मिणी माता हिचे माहेर कोणत्या राज्यातील आहे आणि ती कोणत्या देवतांचा अवतार आहे?

पंढरपूरच्या विठ्ठलाची अर्धांगिनी समजली जाणारी रुक्मिणी माता हिचे माहेर कर्नाटक राज्यातील आहे, आणि ती माता लक्ष्मीचा अवतार आहे.

आजच्या भागामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी या देवतेबद्दल माहिती बघितली. यामध्ये आम्ही आपल्याला शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र या व्यतिरिक्त ही तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला ती माहिती कमेंट मध्ये शेअर करू शकता. योग्य माहिती असेल तर नक्कीच प्रसिद्धी देण्यात येईल. सोबतच तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा पाठवा व ही माहिती इतरही मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा.

धन्यवाद.

Leave a Comment