आचार्य विनोबा भावे यांची संपूर्ण माहिती Acharya Vinoba Bhave Information In Marathi

Acharya Vinoba Bhave Information In Marathi एक उत्कृष्ट समाजसेवक, विचारवंत आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतानाच आध्यात्मिक गुरु म्हणूनही आपली ओळख जपणारे विनोबा भावे गांधीजी यांचे वैचारिक वारस म्हणून ओळखले जात असत. गांधीजींच्या स्मरणार्थ समाजामध्ये अहिंसेचे तत्त्व रुजवण्यासाठी आणि समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करण्यासाठी विनोबा भावे यांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत.

Acharya Vinoba Bhave Information In Marathi

आचार्य विनोबा भावे यांची संपूर्ण माहिती Acharya Vinoba Bhave Information In Marathi

संपूर्ण आयुष्यभर गरीब जनतेच्या कल्याणाकरिता आणि मागसवर्गीयांच्या हिताकरता प्रयत्न करणारे विनोबा भावे.आज संपूर्ण भारतभर त्यांच्या कार्यकर्ता ओळखले जातात अध्यात्मासह त्यांनी समाजाच्या उत्कर्षाकरिता देखील खूप प्रयत्न केलेला आहे. अध्यात्म हे संपूर्ण जगाचे मुख्य तत्व असून त्या अंतर्गत प्रत्येकाने अध्यात्माच्या मार्गावर चालले पाहिजे असे ते नेहमी म्हणत असतात.

भूदान चळवळीसाठी ओळखले जाणारे विनोबा भावे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मानवी हक्कांच्या बाबतीत देखील फार मोठे कार्य केलेले असून महात्मा गांधीजींच्या सर्वात जवळचे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणाकरता वाहिलेल्या आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

नावआचार्य विनोबा भावे
खरे व संपूर्ण नावविनायक नरहरी भावे
जन्म दिनांक११ सप्टेंबर १८९५
जन्म स्थळगागोडे महाराष्ट्र
आईचे नावरुक्मिणी देवी
वडिलांचे नावनरहरी भावे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यअहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य कार्य आणि समाजसेवा.
ओळख गांधीजींचे वैचारिक वारस
मृत्यू दिनांक१५ नोव्हेंबर १९८२
मृत्यू स्थळवर्धा, महाराष्ट्र

विनायक नरहरी भावे यांचे प्रारंभिक आयुष्य व शैक्षणिक आयुष्य:

दिनांक ११ सप्टेंबर १९९५ या दिवशी महाराष्ट्राच्या कुलाबामध्ये जन्मलेले आचार्य विनोबा भावे जन्माने विणकर समाजाचे होते. त्यांचे वडील पंचक्रोशीतील अतिशय उत्कृष्ट विणकर म्हणून ओळखले जात असत तर आई धार्मिक स्वरूपाची स्त्री होती ज्यामुळे लहानपणापासून आचार्य विनोबा भावे यांच्यावर चांगल्या संस्कारांचा पगडा पडलेला होता.

त्यांचे आजोबा शंभुराव त्यांच्यासाठी फार महत्वाचे ठरले. त्यांनी विनोबा भावे यांच्या पालनपोषणामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, त्याचबरोबर भगवतगीता सारख्या धार्मिक ग्रंथांचे ज्ञान आजोबांनी त्यांना दिल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राचे वेध लागले होते. विनोबा भावे यांच्यासाठी त्यांच्या आई-वडील आणि आजोबांकडून मिळालेले शिक्षण हेच खरे शिक्षण होते. त्यांना पारंपरिक व्यवस्थेअंतर्गत दिले जाणारे शिक्षण कधीच आवडले नाही.

विनोबा भावे यांची अटक:

भारतावर इंग्रजांचे राज्य असताना गांधीजी यांनी समाजाला स्वातंत्र्यासाठी जागृत करण्याचे कार्य सुरू केले होते. यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी देखील त्यांना फार मोलाची मदत केली होती, त्यावेळी सरकार विरुद्ध काही बोलले तरीदेखील गुन्हा दाखल केला जात असे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तत्व मिटवले गेले होते.

या काळामध्ये स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे मोठा गुन्हा समजला जात असे, मात्र महात्मा गांधी यांच्या निर्देशाखाली त्यांनी फार मोठे कार्य चालू ठेवले होते व समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू केले होते. १९२० ते १९३० या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेले कार्य इंग्रज अधिकाऱ्यांना खटकत होते त्यामुळे त्यांनी आचार्य विनोबा भावे यांना भीती दाखवण्यासाठी अटक केली, मात्र विनोबा भावे या अटकेला डगमगले नाहीत.

त्यांनी सुमारे पाच वर्षांचा तुरुंगवास भोगला व १९४० मध्ये पुन्हा तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर देखील त्यांनी हार न मानता आपल्या लेखन कार्याने समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य सुरूच ठेवले.

आचार्य विनोबा भावे यांनी लेखन कार्य देखील फार मोठे केलेले असून त्यांनी तुरुंगामध्ये दोन पुस्तके लिहिली होती त्याचबरोबर या तुरुंगाच्या कालावधीमध्ये त्यांनी चार दक्षिण भारतीय भाषांचे शिक्षण घेतले त्यांचा अभ्यास देखील केला होता त्याचबरोबर लोकनागरी या नावाची एक पटकथा तयार करून त्यांनी फार मोठे कार्य केले होते प्रकृती गीता सर्वसामान्यांना समजावी याकरिता त्यांनी तुरुंगामध्ये या भगवद्गीतेचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली होती

भूदान चळवळ भारत स्वतंत्र झाला तरी देखील समाजामध्ये सुधारणा घडवून आणणे आणि समाजासाठी काहीतरी कार्य करणे गरजेचे होते आणि याच विचारातून विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 या दिवशी एका चळवळीची घोषणा केली ती चळवळ म्हणजे भूदान चळवळ होय भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांनी आपल्या घरादाराचाही विचार न करता मोठे योगदान दिले होते यात अनेक लोक शहीद देखील झाले होते.

त्यामुळे पाठीमागे त्यांच्या कुटुंबाची फार मोठ्या प्रमाणावर वाताहात झाली होती अनेक कुटुंबांना अगदी राहण्याची जागा देखील उरली नव्हती अशा लोकांचा विचार करता काहीतरी केले पाहिजे या विचारातून विनोबा भावे यांनी या भूदान चळवळीची निर्मिती केली होती या अंतर्गत ज्या लोकांकडे बऱ्यापैकी जमीन आहे अशा लोकांना ज्यांना राहण्यासाठी सुद्धा जागा नाही अशा गरीब लोकांकडे ही जमीन दान करण्याचे आवाहन केले गेले होते.

आपल्या एकूण जमिनीपैकी एक तृतीयांशी जमीन या गरीब लोकांसाठी दान करा अशी आर्थ हाक या विनोबा भावे यांनी दिली होती आणि त्यांच्या या योजनेमुळे अनेक लोक प्रभावित होऊन जमीन दान करण्यासाठी पुढे आले होते संपूर्ण तेरा वर्षांच्या या योजनेच्या कालावधीत त्यांनी सहा आश्रम तयार केले होते

निष्कर्ष

प्रत्येक व्यक्ती सर्वसामान्य स्वरूपात त्याचा जन्माला येत असतो, मात्र त्याच्या आजूबाजूला असलेले वातावरण आणि त्याच्यावर असलेले वैचारिक प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत असतात. विनोबा भावे हे सर्वसामान्य कुटुंबांमध्ये जन्माला आले असले, तरीदेखील आजूबाजूला असणाऱ्या इंग्रजी राजवटीमुळे आणि त्यांना मिळालेल्या संस्कार मुळे त्यांचे विचार पूर्णतः बदललेले होते आणि त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण जीवन वाहिण्याचे ठरविले होते.

विनोबा भावे गांधीजींना फार मानत असत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी समाजामध्ये विविध बदल घडवून आणण्याचे कार्य करण्याबरोबरच स्वातंत्र कार्यामध्ये देखील मोठी चळवळ उभा केली होती. स्वातंत्र्यानंतर देखील त्यांनी चळवळीच्या माध्यमातून मोठे कार्य केलेले असून आज आचार्य विनोबा भावे यांना सर्वत्र ओळखले जाते.

आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून यामध्ये त्यांचे जीवन, चरित्र, प्रारंभिक आयुष्य आणि शिक्षण याच्यासह त्यांनी गांधीजी सोबत घालवलेले दिवस, त्यांची अटक, त्यांनी केलेले विविध सामाजिक व धार्मिक कार्य, त्यांच्याविरुद्ध चळवळी व त्यांनी लिहिलेली काही साहित्यकृती यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. सोबतच त्यांच्या निधनाची देखील माहिती घेतलेली आहे.

FAQ

आचार्य विनोबा भावे यांचे खरे व संपूर्ण नाव काय होते?

आचार्य विनोबा भावे यांचे खरे व संपूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते.

विनोबा भावे यांच्या आईचे नाव व वडिलांचे नाव काय आहे?

रुक्मिणी देवी या विनोबा भावे यांच्या आई तर नरहरी भावे किंवा नरहरी शंभू हे विनोबा भावे यांचे वडील समजले जातात.

विनोबा भावे यांचा जन्म व मृत्यू कोणाकोणाच्या तारखांना झाला होता?

विनोबा भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ या तारखेला तर मृत्यू हा १५ नोव्हेंबर १९८२ या तारखेला झाला होता जे ८७ वर्षांचे आयुष्य जगले होते.

विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची कोणती चळवळ सुरू केली होती ज्यामुळे त्यांना ओळखले जाते?

विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यामध्ये भूदान चळवळ नावाची सर्वात महत्त्वाची चळवळ सुरू केली होती आणि याच चळवळीच्या नावाने त्यांना ओळखले जाते.

विनायक नरहरी भावे यांना कोणकोणत्या टोपण नावांनी ओळखले जाते?

विनायक नरहरी भावे यांना आचार्य या पदवीसह गांधीजींचे वैचारिक वारस या नावाने देखील ओळखले जाते.

Leave a Comment