अजिंठा वेरूळ लेण्यांची संपूर्ण माहिती Ajantha Verul Caves Information In Marathi

Ajantha Verul Caves Information In Marathi महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर ला ओळखले जाते. आणि येथे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या लेण्या असून त्यांची नावे अजिंठा वेरूळ लेणी असे आहेत. अतिशय आकर्षक रित्या कोरलेल्या या लेण्या आधी कळस मग पाया या स्वरूपाच्या आहेत.

Ajantha Verul Caves Information In Marathi

अजिंठा वेरूळ लेण्यांची संपूर्ण माहिती Ajantha Verul Caves Information In Marathi

उत्तम शिल्पकला, स्थापत्यकाला, कोरीव काम, आणि चित्रकला इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या अजिंठा वेरूळ लेण्या वाकाटक, सातवाहन,राष्ट्रकूट, आणि चालुक्य इत्यादी राजवटींच्या काळात निर्माण झाल्या असाव्या असे सांगितले जाते. 

या लेण्या मुख्यतः बौद्ध स्वरूपाच्या असून, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर या शहरापासून अवघ्या शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर वसलेल्या आहेत. त्याचबरोबर जळगाव पासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेण्या एक बुद्ध केंद्र असून, हजारो वर्षांपूर्वी या लेण्यांची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते.

त्यामुळे अजूनही सुस्थितीत असणाऱ्या या लेण्यांना युनोस्को या आंतरराष्ट्रीय संघटने द्वारे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. पूर्वीच्या काळी निजामशाहीमध्ये आणि हैदराबादी संस्थांनामध्ये या लेण्यांना फारच महत्त्व होते.

अतिशय उत्तम रित्या डोंगराच्या पोटामध्ये कोरलेल्या या लेण्यांच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये घोषित करण्याचे वर्ष १९८३ हे होते.यातील अजिंठा ही लेणी वाघूर नदीकाठी असून, घोड्याच्या नालासारखा आकार असणाऱ्या या लेण्या संख्येने एकूण २६ इतक्या आहेत.

अतिशय मनोरंजक आणि तितकेच आकर्षक असणारे हे ठिकाण इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करत असते. आपल्या महाराष्ट्राचे प्राचीन वैभव बघण्यासाठी अगदी जगभरातून या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात, व या लेण्यांचा आस्वाद घेत असतात. या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि अल्हाददायक वाटत असते. आजच्या भागामध्ये आपण या अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.…

नावअजिंठा वेरूळ
प्रकारलेणी
समावेशअजिंठा आणि वेरूळ लेण्या
अजिंठा लेणी संख्या २६
प्रसिद्धीचित्रकला, स्थापत्य कला, शिल्पकला आणि कोरीव काम
निर्मातावाकाटक, सातवाहन, राष्ट्रकूट, आणि चालुक्य
दर्जाजागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळ दर्जा वर्ष१९८३

अजिंठा लेणी:

साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये तयार करण्यात आलेली अजिंठा लेणी ३० लेण्यांचा समूह असून, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वसलेली ही लेणी पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय उत्तम समजली जाते. या लेणीचे बांधकाम दोन टप्प्यात केले गेले असावे असे सांगितले जाते.

यामध्ये सातवाहन आणि वाकटक या राजवंशांचा समावेश आहे. यातील पहिला टप्पा दुसऱ्या शतकात बांधण्यात आला असला, तरी देखील उर्वरित दुसरा टप्पा साधारणपणे इसवी सन १४०७ ते १४८० या कालखंडात बांधण्यात आला आहे असे सांगितले जाते. पहिल्या काळात बांधण्यात आलेल्या ९, १०, ११, १३ आणि १५ या क्रमांकाच्या असून, उर्वरित पहिल्या टप्प्यातील लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित असून, दुसऱ्या टप्प्यातील लेण्या हिंदू धर्माशी संबंधित आहेत.

अजिंठा लेणी येथील चित्रकलेसाठी प्रसिद्ध असून, यांमध्ये अनेक प्रकारचे चित्र काढलेले आहेत. जे तत्कालीन काळामध्ये येथे वास्तव्य करणाऱ्या बौद्ध भिकूंच्यामार्फत काढले गेले असावे असे सांगण्यात येते. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेली ही लेणी पुरातत्व विभागाच्या दृष्टीने खूपच खास आहे.

वेरूळ लेणी:

राष्ट्रकूट राजघराणे द्वारे बांधण्यात आलेली ही लेणी मुख्यतः व्यावसायिक आणि श्रीमंत लोकांच्या सहयोगाने बांधण्यात आली असावी असे सांगितले जाते. या ठिकाणी वाटसरूसाठी विश्रांतीचे ठिकाण निर्माण केले गेलेले असून, येथे अनेक मठ आणि मंदिरे देखील बघायला मिळतात.

या लेणी परिसरात कैलास मंदिरासारखे एक उत्तम मंदिर असून, वेरूळच्या बसस्थानकापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर हे मंदिर दिसून येत असते. त्याचबरोबर या ठिकाणी रावणाची खंदक नावाचे ठिकाण देखील आढळून येते, जे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले आहे. या ठिकाणी देखील अनेक लेण्यांची संख्या असून, येथे बौद्ध, जैन, आणि हिंदू अशा तिन्ही धर्मियांच्या लेण्या आढळून येतात.

ह्या अजिंठा वेरूळ लेण्या भेट देण्याकरिता वर्षभर खुले असल्या, तरी देखील ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी येथे भेट देण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो. त्यामुळे या कालावधीमध्ये येथे पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळत असते. मात्र जसा जसा उन्हाळा जवळ यायला लागतो, तसे येथील पर्यटकांची गर्दी काहीशी ओसरू लागते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी काहीशी गर्दी असणाऱ्या या ठिकाणी इतर वेळात मात्र प्रचंड गर्दी दिसून येते. या ठिकाणी भारतीय नागरिकांसाठी दहा रुपये, तर परदेशी नागरिकांकरिता २५० रुपये शुल्क प्रदान करावे लागते.

निष्कर्ष:

महाराष्ट्र मध्ये अनेक पर्यटनाचे मुख्य व आकर्षक केंद्रे असून, यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला पर्यटनाचे मुख्य केंद्र अर्थात महाराष्ट्राच्या पर्यटन राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी अगदी प्राचीन काळामध्ये कोरलेल्या अजिंठा आणि वेरूळ या लेण्या वसलेल्या असून, इतरही अनेक बघण्यासारखे ठिकाणी या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आढळून येत असतात.

महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची असणारी गोष्ट म्हणजे या लेण्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये देखील समाविष्ट केले असल्यामुळे येथे अगदी जागतिक पातळीवरून परदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देत असतात. या लेण्यांचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, आधी कळस मग पाया या स्वरूपाने बौद्ध स्वरूपात या लेण्या खोदल्या गेल्या होत्या. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये या लेण्या लुप्त देखील पावल्या होत्या.

इंग्रज राजवटीमध्ये या लेण्यांचे पुन्हा एकदा शोध लागल्याने या लेण्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणामध्ये असणाऱ्या या लेण्या बघण्यासाठी गर्दी करत असतात. आजच्या भागामध्ये आपण अजिंठा वेरूळ लेण्या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे.

अंतर्गत या लेण्या कुठे वसलेल्या आहेत, या लेण्यांचा इतिहास किंवा भूतकाळ काय आहे, येथे असणारी विविध शिल्पकला, चित्रकला, आणि स्थापत्यकला यांचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचबरोबर येथे काय प्रसिद्ध आहे, आजूबाजूला मिळणारे प्रसिद्ध खाद्यपदार्थ, भेट देण्याची योग्य वेळ, आवश्यक असणारे शुल्क, आणि प्रवास करताना घ्यावयाची दक्षता इत्यादी बाबतची माहिती बघितली आहे.

सोबतच या लेण्यांच्या रचनेबद्दल देखील जाणून घेतलेले आहे. यामध्ये असणाऱ्या विविध लेण्या, त्यांचे क्रमांक, आणि आजूबाजूच्या परीक्षेत्रातील प्रेक्षणीय स्थळे याबाबत देखील जाणून घेतलेले आहे.

FAQ

अजिंठा लेण्या कोणत्या कालावधीमध्ये बनवण्यात आलेल्या आहेत, व त्यांची संख्या किती आहे?

अजिंठा या लेण्या साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये तयार करण्यात आल्या असाव्यात, असे सांगितले जाते. त्याचबरोबर या गुहांची संख्या एकूण ३० इतकी आहे.

अजिंठा या लेण्यांचा शोध कोणत्या वर्षी लावण्यात आला, व हा शोध कोणी लावलेला होता?

अजिंठा या लेण्यांचा शोध अलीकडील काळामध्ये अर्थात १८१९ यावर्षी लागला होता. व या शोधाचे संपूर्ण श्रेय जॉन स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याला जाते.

वेरूळ लेण्या साधारणपणे कोणत्या राजवटीच्या कालखंडामध्ये बांधण्यात आल्या असाव्यात?

वेरूळ या लेण्या राष्ट्रकूट घराण्याच्या हिंदू शासकांमार्फत बांधण्यात आल्या होत्या.

वेरूळ लेणीच्या आसपास कोणाकोणाची पर्यटन स्थळे आहेत?

वेरूळ लेणीच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे असून, त्यामध्ये घृष्णेश्वर मंदिर, कैलास मंदिर, धबधबे, धूमसर लेणी यासारख्या ठिकाणांचा समावेश होत असतो.

अजिंठा आणि वेरूळ या लेण्या कोणकोणत्या राजवटींच्या काळात निर्माण झाल्या असाव्यात असे अंदाज बांधला जातो?

अजिंठा आणि वेरूळ लेण्या या वाकटक, सातवाहन, राष्ट्रकूट, आणि चालुक्य यांच्यासारख्या राजवटीमध्ये निर्माण झालेला असाव्यात असे सांगितले जाते.

Leave a Comment