ओवा विषयी संपूर्ण माहिती Ajwain Information In Marathi

Ajwain Information In Marathi प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे ओवा होय. जेवणाला चवदार बनवण्याबरोबरच अनेक आरोग्यदायी फायदे असणारा हा ओवा गृहिणींकडून सर्रास वापरला जातो. एक मसाल्याचा पदार्थ असणारा हा ओवा इजिप्त देशांमध्ये उगम पावला आहे, असे सांगितले जाते. मात्र त्याचा विस्तार व लोकप्रियता भारतामधूनच सर्वत्र पसरलेली आहे. भारतामधील या ओवा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते.

Ajwain Information In Marathi

ओवा विषयी संपूर्ण माहिती Ajwain Information In Marathi

आयुर्वेदामध्ये देखील या ओव्याचा उल्लेख केलेला असून, त्याचे अनेक फायदे देखील विशद केलेले आहेत. हा ओवा वजन देखील कमी करत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम, प्रथिने, सॉल्टस, कॅल्शियम, थायमीन, रायबोफ्लोविन, निकोटेनिक ऍसिड, आयोडीन, कॅरोटीन, इत्यादी घटक आढळून येत असतात.

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा किंवा अन्न पचण्याचा त्रास जाणवत असेल, अशा लोकांनी ओवा खाण्याचा सल्ला डॉक्टरांद्वारे दिला जातो. गॅस्ट्रो इंटेन्स्टाईनल समस्यांमध्ये फार गुणकारी असणारा हा ओवा मुख्यतः बेसनाच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. त्याच बरोबर अनेक ठिकाणी कोशिंबीर बनवताना देखील त्याची पूड घातली जाते.

काहीशी कडू चव असणारा हा ओवा औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. आजच्या भागामध्ये आपण या घरगुती उपचारात फायदेशीर ठरणाऱ्या तसेच पोटाच्या आजारांना बरे करणाऱ्या ओव्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावओवा
इतर नावअजवाइन
उगमइजिप्त
चवकडूसर
उपयोगपोटाच्या आजारामध्ये
ओळखउत्तम पाचक
आकारअंडाकृती लांबट
रंगतपकिरी

ओवा म्हणजे काय:

ओवा हा एक मसाल्याचा पदार्थ असून, त्यापासून वाईन सारखे पदार्थ देखील बनवले जातात. अतिशय सुगंधी आणि किंचित कडू चव असणारा हा पदार्थ पोटाच्या समस्यांसाठी अतिशय उत्तम समजला जातो. अनेक ठिकाणी हा ओवा शिजवून देखील खाल्ला जातो, किंवा पावडर स्वरूपात देखील त्याचा स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो.

ओवा हा ओव्याचा झाडाचे बी असते असे सांगितले जाते. तपकिरी आणि फिकट गुलाबी रंगाचा हा ओवा अगदी प्राचीन काळापासून स्वयंपाकात वापरला जात आहे. सर्वात प्रथम इजिप्त या देशांमध्ये ओव्याची उत्पत्ती झाली असावी असे सांगितले जाते. पुढे पर्शियामार्गे इराण आणि तिथून आशियामध्ये हा ओवा आला.

आशियामधून तुर्कीमध्ये आणि तुर्कीतून भारतामध्ये पसरलेला हा ओवा पुढे सर्व जगभर प्रसारित झाला. मुख्यतः इजिप्त या उगमर्देशी सर्वात जास्त उत्पादित होणारा हा ओवा इराण, अफगाणिस्तान, भारत यांच्यासारख्या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. भारतामध्ये विचार केल्यास एकट्या राजस्थान राज्यात संपूर्ण भारताच्या ९० टक्के उत्पादन होत असते.

ओव्याचे पाणी पिणे:

मित्रांनो, ओवा उकळून त्याचे पाणी तयार केले की या ओव्याचे सर्व गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरत असतात. पोटाच्या अनेक समस्यांमध्ये या ओव्याच्या पाण्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अगदी पूर्वापार आजीबाईच्या बटव्यामध्ये आढळणारा हा पदार्थ अनेक लोकांकडून दररोज सेवन केला जातो.

ज्या लोकांना पोटाचे आजार असतील, अशा लोकांना मुख्यतः हा ओवा खाण्याचा सल्ला दिला जात असतो. ओवा दररोजच्या वापराकरिता कचोरी, पुरी, फाफडा, समोसा, भजी, विविध प्रकारच्या भाज्या, इत्यादी पदार्थांमध्ये हा ओवा मिसळला जातो.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ओव्याचे महत्त्व:

ओव्याचे महत्त्व आयुर्वेदामध्ये देखील विशद केले आहे. यामध्ये एक रसायन असते, ज्यामुळे या ओव्याला विशिष्ट प्रकारचा कडू वास व चव प्राप्त होत असते. ओरेगॅनो मध्ये वापरला जाणारा हा ओवा ‘द कम्प्लीट बुक ऑफ आयुर्वेदिक होम रेमेडीज’ या वसंत लाडे लिखित पुस्तकांमध्ये देखील वर्णन केलेला आहे.

या ओव्या पासून तयार करण्यात आलेला हरबल चहा पिल्यामुळे कफ कमी होण्यास मदत मिळते, सोबतच पोटाचे आजार देखील बरे होतात असे सांगितले जाते. लहान मुलांकरिता ओव्याच्या तेलाने पोटाची मालिश करणे देखील आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे.

ओव्याचे पाणी पिल्यामुळे होणारे विविध फायदे:

ओव्याचा पोटाशी सर्वात जास्त संबंध आढळून येतो. ज्या लोकांना मानसिक त्रास जाणवत असतील, अशा लोकांनी ओव्याचे पाणी पिले पाहिजे. सोबतच वजन कमी करण्याकरिता देखील दररोज एक ग्लास ओव्याचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यासोबतच ओव्याच्या पाणी पिल्यामुळे पचन संस्था निरोगी होते.

गर्भवती महिलांना त्रास जाणवत नाही. बद्धकोष्ठता कमी होते. ऍसिडिटी च्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. जुनाट सर्दी आणि खोकला यांच्या उपचाराकरिता ओवा फार मोठ्या प्रमाणावर वापरला जात असतो. यामध्ये ओव्या पासून तयार केलेला काढा तुळशीची पाने टाकून घेतला जातो. चेहऱ्याच्या विविध समस्या मुरूम त्याचबरोबर डोके व कान दुखी, दातांमध्ये होणारे कीड, इत्यादी सर्वच गोष्टींमध्ये हा ओवा मोठ्या प्रमाणावर वापरला जात असतो.

ओवा अतिशय फायदेशीर असला, तरी देखील अति प्रमाणात सेवन केल्यास त्यामुळे पोटात गॅसेस होऊ शकतात. त्याचबरोबर मळमळ, उलट्या, चिडचिड, यांसारख्या समस्या जाणवू शकतात. उष्ण प्रवृत्तीच्या लोकांना तोंडामध्ये अल्सर देखील येऊ शकतो. त्याचबरोबर प्रत्यक्षरीत्या तोंडाने ओवा जास्त प्रमाणात चावून खाल्ल्यास, विषबाधा देखील होऊ शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थांच्या माध्यमातूनच या ओव्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

निष्कर्ष:

स्वयंपाक घरात काही आढळले नाही तरी देखील ओवा नेहमी आढळत असतो. थोडेसे पोट दुखले की लगेच ओवा चावण्याचा सल्ला जुन्या जाणत्या लोकांकडून किंवा आजीबाई कडून दिला जातो. अगदी लहान बाळांचे पोट दुखत असेल, तरीदेखील थोडासा ओवा कापडामध्ये गरम करून बाळाचा पोटाला त्याने शेक देतात.

जेणेकरून बाळाची पोटदुखी देखील थांबत असते. असा हा बहुगुणी ओवा बद्धकोष्ठतेचा आजारावर खूपच गुणकारी समजला जातो. याचा स्वाद कडूसर असला, तरी देखील त्याचे फायदे मात्र फारच गोड आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. घरगुती उपचारांच्या पेटीमध्ये नेहमी ओवा आढळून येत असतो. ज्या लोकांना ऍसिडिटी नेहमी जाणवते, त्यांना दररोज जेवणानंतर ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचबरोबर ओटी पोटात येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ओवा ओळखला जातो. वजन कमी करू शकणारा ओवा स्तनदा मातांना दूध निर्माण करण्यासाठी देखील खूपच फायदेशीर असतो. आजच्या भागामध्ये आपण या ओवा मसाल्याच्या पदार्थाबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये ओवा म्हणजे काय, त्याचे विविध आरोग्याच्या दृष्टिकोनातून असणारे फायदे, ओवा वापरण्याच्या पद्धती, व ओळखण्याच्या पद्धती, तसेच ओव्या पासून होणारे काही तोटे देखील जाणून घेतलेले आहेत.

FAQ

ओवा या मसाल्याच्या पदार्थाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?

ओवा या मसाल्याच्या पदार्थाला आणखी अजवाइन या नावाने देखील ओळखले जाते.

ओवा या मसाल्याच्या पदार्थाची चव कशी असते?

ओवा अर्थात अजवाइन या मसाल्याच्या पदार्थाची चव काहीशी कडू असते.

अजवाइन या मसाल्याच्या पदार्थाचा आकार कसा असतो?

अजवाइन या मसाल्याच्या पदार्थाचा आकार किंचितसा लांबट तांदळाप्रमाणे असतो. ते अगदीच जिऱ्यासारखे किंवा बडीशेप यासारखे दिसत असले, मात्र लांबीला काहीशी कमी असते.

ओव्याचा वापर मुख्यतः कोणत्या प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो?

ओव्याचा वापर हा मुख्यतः वातूळ स्वरूपातील पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. ज्यामध्ये भजे, पापड्या, शेव, किंवा बेसन पिठाच्या विविध पदार्थांचा समावेश असतो. सोबतच इतर पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जात असतो.

अजवाइन किंवा ओवा हा मसाल्याचा पदार्थ कुठल्या उगमाचा आहे?

अजवाइन किंवा ओवा हा मुख्यतः इजिप्त मध्ये उगम पावला गेलेला आहे. तेथून तो इराण, पर्शिया, आशिया, इत्यादी ठिकाणी पसरला. पुढे तुर्की मार्गे तो भारतामध्ये आला, आणि इथून सर्वत्र त्याची प्रसिद्धी झाली.

Leave a Comment