तिरंदाजी खेळाची संपूर्ण माहिती Archery Game Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Archery Game Information In Marathi प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या खेळांची निर्मिती होत असते. सुरुवातीला गरज म्हणून तयार करण्यात आलेले हे खेळ, नंतर मनोरंजनाचा भाग होत असतात. याच प्रकारचा एक खेळ म्हणून तिरंदाजी किंवा धनुर्विद्या या खेळाला ओळखले जाते. अतिशय जुन्या प्रकारचा खेळ असणारा तिरंदाजी खेळ प्राचीन काळापासून युद्धामध्ये वापरला गेलेला आहे.

Archery Game Information In Marathi

तिरंदाजी खेळाची संपूर्ण माहिती Archery Game Information In Marathi

पूर्वी युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर तिरंदाजी केली जात असे, मात्र आज हा एक खेळ म्हणून लोकप्रिय झाला असून, जागतिक स्तरावर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. आजच्या भागामध्ये आपण या लेखाच्या माध्यमातून तिरंदाजी या विषयावर संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावधनुर्विद्या
इतर नावतिरंदाजी
इंग्रजी नावआर्चरी
साहित्यधनुष्य व बाण
खेळाडूंची संख्याएक
स्वरूपधनुष्याच्या सहाय्याने ताणवलेला बाण इच्छित लक्ष्यावर साधने
खेळाडूची ओळखधनुर्धर

तिरंदाजी म्हणजे काय:

मित्रांनो, तीर म्हणजे बाण होय. या बाणाचा वापर करून अचूकरीत्या कुठल्याही गोष्टीचा वेध घेणे, म्हणजे तिरंदाजी समजली जाते. हा एक आजकाल खेळात रूपांतरित झालेला विद्येचा प्रकार असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर कौशल्य हस्तगत करावे लागते. सराव हा एकमेव घटक या क्षेत्रामध्ये महत्त्वाचा असतो. या मध्ये धनुष्याचा वापर करून,  बाणाला मागे खेचून ताण दिला जातो, आणि हवेतून सपकन बाण सोडला जातो. पूर्वीच्या काळी शिकार करण्यासह युद्ध लढण्यासाठी देखील धनुर्विद्या वापरात आणली जात असे.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असणारा हा खेळ अतिशय मनोरंजक व स्पर्धात्मक स्वरूपाचा असून,हा खेळ खेळणार्‍या व्यक्तीला धनुर्धर किंवा धनुर्धारी किंवा तिरंदाज या नावाने ओळखले जाते. तिरंदाजी या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूला इंग्रजीमध्ये टॉक्सॉफीलाईट म्हणून ओळखले जाते.

या खेळामध्ये एका स्थिर लक्ष्यावर धनुष्याच्या सहाय्याने बाण सोडला जातो. आजकाल खेळ स्वरूपामध्ये लक्ष म्हणून एक गोल चकती निवडली जाते, यावर विविध वर्तुळ काढलेली असतात. ज्यांची संख्या सुमारे दहा इतकी असते. खेळाडू जेवढा एकाग्र असेल तेवढा तो या गोल चकतीच्या मध्यभागी बाण छेदण्यासाठी सक्षम असतो. या चकतीवरील विविध वर्तुळांवर विविध गुण ठरवलेले असतात, कोणत्या वर्तुळात बाण  गेलेला आहे त्यानुसार स्कोर दिला जातो.

तिरंदाजी खेळामधील खेळाडू:

मित्रांनो, सामान्य स्तरावर तिरंदाजी हा खेळ एकाच खेळाडू द्वारे खेळा जात असून, यामध्ये खेळाडूचे एकाग्र चित्त व लक्षवेधनाची क्षमता इत्यादी गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. याच बरोबर पाच ते दहा लोकांच्या संघाद्वारे देखील हा खेळ खेळला जातो. ज्यामध्ये अनेक खेळाडू आपले वैयक्तिक गुण एकत्र करतात, व इतर संघाच्या खेळाडूंना मागे टाकण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये कुठलीही जीवित हानी होऊ नये, किंवा कुठलीही इजा होऊ नये याकरिता या बाणांचे टोक मऊ पदार्थांनी झाकण्यात येत असते.

ज्यावेळी सर्वात प्रथम ऑलम्पिक स्पर्धा सुरू झाल्या, त्यावेळी या खेळाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आले होते. आज पर्यंत दक्षिण कोरिया च्या खेळाडूंनी १९ सुवर्ण पदके, ०९ रौप्य, तर ०६ कांस्यपदके जिंकून एकूण ३४ पदकांच्या यशस्वी खेळीने संपूर्ण जगभर आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. ज्यामुळे या खेळातील दक्षिण कोरियाचा संघ प्रतिस्पर्धी देशांपेक्षा सर्वात अप्रतिम समजला जातो.

तिरंदाजी या खेळामध्ये अनेक राष्ट्र सहभागी होत असून, यामध्ये जगभरातील अनेक राष्ट्र सहभागी आहेत. ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स, दक्षिण कोरिया, बेल्जियम, सोवियत युनियन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्पेन, नेदरलँड, जपान, चायना, स्वीडन, जर्मनी, पोलंड, मेक्सिको, इंडोनेशिया इत्यादी देशांचा समावेश होतो.

मित्रांनो, तिरंदाची स्पर्धेमध्ये विविध प्रकार पडत असतात. जे खेळाडू पासून लक्षाचे अंतर किती आहे, यावर ठरत असतात. यामध्ये अंतराचे प्रमाण हे २० यार्ड पासून ८० हजार पर्यंत असते. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८ मीटर किंवा २० यार्ड ते ३० मीटर किंवा ९० यार्ड इतके अंतर या स्पर्धेसाठी ठरवलेले असते. हे खेळाडूचे वय आणि वापरण्यात येणारे साधन यावर अवलंबून असते.

तिरंदाजी खेळातील विविध तथ्य:

  • धनुष्यातून बाण सोडल्यानंतर जर तो वाकला तर हा विरोधाभास समजला जातो.
  • आज देखील तिरंदाजी हा एक खेळ असला, तरी देखील मोठ्या प्रमाणावर मासेमारी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • तिरंदाजी या खेळासाठी केवळ सराव हाच एकमेव उपाय आहे. जेणेकरून खेळाडू उत्कृष्ट कामगिरी दर्शवू शकतो.
  • बाणाची विशिष्ट डिझाईन ही प्रत्येक खेळाडूची ओळख असते.
  • जपानमध्ये या खेळाला  डायक्यू म्हणून ओळखले जाते.
  • या खेळातील सर्वात जास्त गुण असणाऱ्या वर्तुळाला बुलसी या नावाने ओळखले जाते.
  • धनुष्याच्या मध्यापासून खाली व मध्यापासून वरच्या भागांना त्याचे हात समजले जातात.
  • मंगोल ड्रॉ म्हणजे धनुष्याचा अंगठा असतो.
  • पुराण मध्ये एकलव्य ची कथा देखील या धनुष्यबाणाशी संबंधित आहे.

निष्कर्ष:

आज जगभरात अनेक प्रकारचे खेळ खेळले जात आहेत. त्याचप्रमाणे भारताने देखील जगाला अनेक खेळांची देणगी दिलेली असून, विविध प्रकारच्या खेळासाठी भारत देखील जागतिक पातळीवर ओळखला जातो. यामधील एक खेळ म्हणून धनुर्विद्या हा खेळ ओळखला जातो.

पूर्वीच्या काळी युद्ध करणे, किंवा शिकार करणे यासाठी मुख्यत्वे या धनुष्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र अलीकडे काळामध्ये एक मनोरंजक खेळ म्हणून या तिरंदाजी  खेळाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या तिरंदाजी अर्थात धनुर्विद्या खेळाबद्दल विशेष माहिती बघितली असून, यातील धनुर्विधा म्हणजे काय, या खेळामध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात.

मैदान किंवा तिरंदाजी करण्यासाठी असलेल्या जागे बद्दल माहिती, तिरंदाजी कशी करावी, तिरंदाजी खेळल्याने होणारे शारीरिक परिणाम, यासाठी लागणारी विविध उपकरणे व या खेळातील विविध नियम, यांविषयी माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघून या खेळाविषयी अधिक माहिती प्राप्त करून घेतलेली आहे.

FAQ

धनुर्विद्या या खेळाला आणखी कोणाच्या नावाने ओळखले जाते?

धनुर्विद्या या खेळाला तिरंदाजी या नावाने देखील ओळखले जाते, त्याचप्रमाणे याला इंग्रजी भाषेमध्ये आर्चरी या नावाने देखील ओळख आहे.

तिरंदाजी या खेळाकरिता कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता असते?

तिरंदाजी या खेळाकरिता केवळ धनुष्य व बाण या दोनच घटकांची आवश्यकता असते.

तिरंदाजी या खेळाचा शोध कोणत्या देशामध्ये लावण्यात आला होता?

तिरंदाजी किंवा धनुष्यबाण हा शोध मुख्यतः पाषाण युगामध्ये लावलेला असून,  तो कालखंड आज पासून सुमारे ७० हजार वर्षांपूर्वीचा होता.

धनुर्विद्या या खेळामध्ये सर्वात जास्त महत्त्व कोणत्या घटकाला दिले जाते?

धनुर्विद्या या खेळामध्ये सर्वात जास्त महत्त्व नजरेला दिले जाते. त्याचबरोबर योग्य मानसिक दृष्टिकोन, आणि उत्कृष्ट व अचूक वेध या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत.

इतिहासामध्ये धनुर्विद्या या प्रकाराचा वापर सर्वात जास्त कोठे केला गेलेला आहे?

इतिहासामध्ये प्राचीन पूर्व काळामध्ये रामायणासारख्या महाकाव्यांमध्ये धनुर्विद्या चा उल्लेख मोठ्या प्रमाणावर आढळतो. या काळी युद्धभूमीवर धनुर्विद्या मोठ्या प्रमाणावर वापरली जात असे.

आजच्या भागामध्ये आपण तिरंदाजी किंवा धनुर्विद्या या खेळाविषयी माहिती बघितली असून, या खेळाविषयी तुम्हाला काय वाटते तसेच तुम्हाला हा खेळ खेळता येतो का, याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये वाचणे आवडेल. आणि या खेळाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी, याकरिता शेअरच्या माध्यमातून तुम्ही इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत देखील हा खेळ पोहोचवाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद…!

Leave a Comment