बांबू वनस्पतीची संपूर्ण माहिती Bamboo Plant Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Bamboo Plant Information In Marathi बांबूचे झाड माहित नाही असे निदान महाराष्ट्रात तरी कोणी असणार नाही. बांबू ही प्रजाती अतिशय उंचच उंच आणि सडपातळ स्वरूपाची वाढणारी असून, या बांबूपासून अनेक उत्पादने बनवली जात असतात. अगदी शोभेच्या वस्तू पासून तर बांधकाम साहित्यापर्यंत अनेक ठिकाणी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सुमारे २५ ते ३० मीटर उंच वाढणारी ही झाडे निमुळत्या स्वरूपाच्या पानांनी भिडलेली असतात.

Bamboo Plant Information In Marathi

बांबू वनस्पतीची संपूर्ण माहिती Bamboo Plant Information In Marathi

बांबूच्या झाडाला वेत या नावाने ओळखले जाते. सर्वत्र फायदेशीर ठरणारे या बांबूमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळून येत असतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स, विटामिन्स, इत्यादी सर्व घटकांसोबतच तांबे हा घटक सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो.

आयुर्वेदामध्ये देखील या बांबू वनस्पतीचा उल्लेख आढळून आलेला असून, याचा अनेक उपचार पद्धतींमध्ये वापर करण्याची सांगितलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण या बांबू वनस्पती बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत मिळेल. सोबतच या बांबूच्या इतिहासाबद्दल, वैशिष्ट्याबद्दल, आणि लागवडी बद्दल देखील जाणून घेणार आहोत…

नाव बांबू
इतर नाववेत
जातमॅग्नेलिओसपिडा
वर्गएकदल किंवा एकपत्री
कुळ किंवा कुटुंबरोजॅकी
किंगडमप्लांट

बांबू वनस्पती बद्दल ऐतिहासिक माहिती आणि उगम:

बांबू ही वनस्पती अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असून, ही वनस्पती चीन या देशांमध्ये उगम पावली असावी असे सांगितले जाते. सोबतच आशियाई देशांमध्ये या बांबूचे अनेक संदर्भ आढळून येतात.

आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळी हा बांबू निसर्गात हा इकडे तिकडे उगवत असे, मात्र चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर या बांबूची लागवड फार पूर्वीपासून करत आलेले असून, जवळपास ५००० वर्षांपासून चीनमध्ये बांबूची लागवड केली जात आहे, असे उल्लेख आढळतात.

भारतासह जपान आणि आग्नेय आशियाई देशांना या बांबूचे निर्यात करत असे देखील सांगितले जाते. चीनमधील अर्थव्यवस्थेमध्ये बांबूचा मोठा वाटा असून, तेथील अनेक लोकांच्या जीवनशैलीचा भाग म्हणून या बांबू वनस्पतीला ओळखले जाते.

बांबू वनस्पतीची वैशिष्ट्ये:

बांबू हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा असून, जलद वाढ होण्यासाठी या बांबूला ओळखले जाते. त्यामुळे या बांबू पासून झटपट उत्पन्न मिळवणे देखील शक्य होते. एका निरीक्षणाअंती असे आढळून आले आहे, की एका दिवसापर्यंत बांबू ३६ इंच देखील वाढू शकतात. मात्र त्यासाठी त्याला योग्य वातावरण मिळणे गरजेचे असते.

अतिशय सामर्थ्यवान असण्याबरोबरच लवचिकता हे देखील बांबूचे गुणधर्म समजले जातात. जास्तीत जास्त मजबूत असूनही हा बांबू त्याच्यामध्ये असलेल्या विविध धाग्यामुळे लवचिक होण्यास देखील मदत मिळत असते. या बांबूची तुलना लोखंडाशी देखील केली जाते.

हे एक उत्तम बांधकाम साहित्य असून, बांधकाम कामगारांकडून पहाड बनवण्याकरिता याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे बांबूचे झाड अनेक गोष्टींमध्ये वापरले जाते. अगदी बांबूच्या कोवळ्या कोंबा पासून भाजी बनवुन देखील खाल्ली जाते.

त्याचबरोबर फर्निचर बनविणे, हस्तकलेच्या विविध वस्तू बनविणे, कागद बनवण्यासाठी चा लगदा तयार करणे, कापड बनवणे, इत्यादी विविध कार्यांसाठी या बांबूचा वापर केला जातो. बांबू ही पर्यावरण पूरक वनस्पती असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. मात्र बांबू जाळल्या नंतर दूषित वायू बाहेर पडतो असे देखील सांगितले जाते.

बांबू वनस्पतीची लागवड:

बांबू ही वनस्पती आजकाल भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून, यापासून अनेक शेतकरी उत्पन्न देखील मिळवत आहेत. बांबूच्या लागवडीकरिता विविध पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये बांबूच्या काही प्रजातींचे बियाणे गोळा करून, त्याला सर्वात आधी रोपे बनविले जातात. व पुढे या रोपांची लागवड केली जाते. काही ठिकाणी बांबूच्या वनस्पतीचे कंद जुन्या वनस्पती पासून बाजूला करून त्यापासून नवीन वनस्पतीची लागवड केली जाते.

एका ठिकाणी लागवड केल्यानंतर या बांबूच्या वनस्पतीचे मोठे बेट देखील तयार होत असते. त्यामुळे ही वनस्पती वर्षानुवर्षे देखील उत्पन्न देत असते. आजकाल काही बांबूच्या प्रजातींची कलमे देखील आढळत असून, या कलमांच्या आधारे देखील बांबूची लागवड आणि प्रसार केला जात असतो. मुख्यतः उष्ण कटिबंधीय परिसरामध्ये या बांबू वनस्पतींना लागवड केली जाते.

बांबू वनस्पतीचे विविध उपयोग:

बांबू ही वनस्पती अतिशय महत्त्वपूर्ण असून, अनेक ठिकाणी याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो. मुख्यतः बांधकामांमध्ये मचाण बनविणे, पूल तयार करणे, इमारतीसाठी वापरणे, इत्यादी कारणांकरिता या बांबूचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असतो.

त्याचबरोबर फर्निचर च्या वस्तू बनवण्यासह विविध हस्तकल्यांच्या कार्यामध्ये देखील बांबू वापरला जातो. अनेक ठिकाणी बांबूपासून छोटे खाणी कॅफे देखील बनवले जातात, जे अतिशय आकर्षक दिसतात. अनेक ठिकाणी कागद व कापड या गोष्टींच्या निर्मिती करिता आवश्यक असणारा लगदा देखील बांबूपासून बनवला जातो.

बांबू हा तंतुमय पदार्थ असल्यामुळे यापासून तयार होणारे कापड आणि कागद अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असतात. तसेच यापासून तयार करण्यात आलेले उत्पादन कुठल्याही जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करण्यास सक्षम असतात.

त्याच बरोबर स्वयंपाक घरामध्ये देखील या बांबू वनस्पतीचा वापर केला जातो. यापासून सूप, लोणचे, किंवा सॅलड बनवले जाते. यासाठी बांबूच्या कोवळ्या कोंबांचा वापर केला जातो.

निष्कर्ष:

मानवाने निसर्गातील अनेक गोष्टींचा उपयोग शोधून त्याचा दैनंदिन जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. त्यातीलच एक वनस्पती म्हणजे बांबूची वनस्पती होय. बांबू हा असा प्रकार आहे, ज्याच्या प्रत्येक घटकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरला जाणारा हा बांबू आरोग्यदायी असण्याबरोबरच शोभिवंत देखील आहे. सोबतच मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये बांधकाम साहित्य म्हणून देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो. बांबू हा एक सरळ स्वरूपातील असल्यामुळे त्याचा वापर करणे सोयीचे होत असते.

शोभिवंत वस्तू बनवण्याबरोबरच अलीकडे बांबूच्या वनस्पती पासून कलाकुसरीच्या वस्तू देखील बनवले जात आहेत. त्यामुळे बांबूची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून, पूर्वी जंगली स्वरूपात उगवणारे हे वनस्पती अनेक शेतकऱ्यांकडून लागवडीत देखील केले जात आहे.

आजच्या भागामध्ये आपण या बांबू वनस्पती बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली असून, बांबू म्हणजे काय, त्याचे विविध गुणधर्म काय असतात, व या वनस्पती पासून कोणकोणत्या स्वरूपाचे फायदे होतात तिथे सर्व गोष्टींची माहिती घेतलेली आहे.

FAQ

बांबू ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे?

बांबू ही एक गवताळ स्वरूपाची वनस्पती असून, ग्रामीनी कुटुंबाची सर्वात मोठी सदस्य म्हणून या वनस्पतीला ओळखले जाते.

बांबूची वनस्पती साधारणपणे किती उंचीपर्यंत वाढत असते?

सर्वसाधारणपणे ३० ते ४० फुटापर्यंत बांबूची वनस्पती वाढत असली तरी देखील काही प्रजाती या ६० ते ७० फुटांपर्यंत वाढत असतात.

बांबू या वनस्पतीच्या साधारणपणे किती प्रजाती ज्ञात झालेल्या आहेत?

बांबू या वनस्पतीच्या आतापर्यंत सुमारे १५०० वनस्पती प्रजाती ज्ञात झालेले असून, यांचे विभाजन दोन गटांमध्ये केले जाते. ज्यातील एक वनस्पती ही साधारण बांबू वनस्पती असते, तर दुसरी क्रिपर स्वरूपातील असते.

बांबू वनस्पती रचनेनुसार कशी असते?

बांबू ही वनस्पती अतिशय सडपातळ स्वरूपाची असते, व उसाप्रमाणे तिच्यावर डोळे देखील दिसून येतात. ही वनस्पती देखील बेटांच्या स्वरूपात वाढत असते.

बांबू वनस्पतीची लागवड आणि पैदास कोणकोणत्या पद्धतीने केली जाऊ शकते?

बांबू वनस्पतीची लागवड किंवा पैदास करण्यासाठी रायझोम चे तुकडे, बियाणे, किंवा कलमे लावली जाऊ शकतात. त्याच प्रकारे बांबूची वनस्पती ही आपोआप देखील वाढत आजूबाजूच्या ठिकाणी पसरत चालत असते.

Leave a Comment