केळीची फळाची संपूर्ण माहिती Banana Fruit Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Banana Fruit Information In Marathi चवीला अतिशय मधुर आणि जगाच्या पाठीवर सर्व देशांमध्ये उगवले जाणारे पीक म्हणजे केळी होय. केळापासून बनविलेले शिकरण हे सर्वांनाच फार आवडते. एकादशीच्या उपवासाला केळी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते, कारण थोडीशीच केळी खाल्ली तरीदेखील पोट भरते. आणि ऊर्जा देखील चांगली मिळते.कोणी आजारी असो किंवा काही धार्मिक उत्सव असो, केळी ही लागतेच.

Banana Fruit Information In Marathi

केळीची फळाची संपूर्ण माहिती Banana Fruit Information In Marathi

सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप उपयोगी असलेली ही केळी फारशी महाग देखील नाही, आणि सहज कुठेही उपलब्ध देखील होऊ शकते. त्यामुळे फळ म्हटलं की पहिला मान केळीला जातो. आजच्या भागामध्ये आपण या बहुगुणी केळी बद्दल माहिती बघणार आहोत…

नावकेळी
इंग्रजी नावबनाना
शास्त्रीय नावMusa paradisca
कुटुंब किंवा कुळMusaceae
रंगपिकण्यापूर्वी हिरवा, पिकल्यानंतर पिवळा
उगमस्थळदक्षिणपूर्व आशिया, मलेशिया
साधारण वजन१२० ते १४० ग्राम
उपलब्ध पोषक तत्वेविटामिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबर

तब्बल दहा हजार वर्षांपूर्वीचे जुने असलेले फळ म्हणजे केळी होय. या फळाचे पुरावे ग्रीक पुराणात, तसेच बुद्धाच्या काळामधील पाली भाषेतील तत्त्वज्ञानामध्ये आणि चिनी तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा आढळते. याचबरोबर लॅटिन व अरबी भाषेत सुद्धा याचे काही पुरावे मिळालेले आहेत. यावरून किती पूर्वी हे फळ अस्तित्वात होते, आणि किती दूरपर्यंत त्याचा विस्तार झाला होता याची कल्पना येऊ शकेल.

भारताच्या संस्कृत भाषेमध्ये सुद्धा केळी या फळाचा उल्लेख आढळतो. संस्कृतमध्ये त्याला कदलिफलम असे नाव होते. दक्षिण आशियामधून उगम पावलेले हे फळ इसवी सन पूर्व ३२७ मध्ये अरब राज्यकर्त्यांकडून पश्चिमेत पसरले गेले. पुढे पंधराव्या शतकाच्या आसपास पोर्तुगीज खलाशी लोकांनी या पिकाला युरोपमध्ये नेले. पुढे वेगवेगळे प्रदेश शोधणाऱ्या खलाशांकडून हे फळ जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले.

पूर्वी रानटी फळ म्हणून ओळखले जाणारे हे केळी फळ सर्वप्रथम लागवड करण्याचे श्रेय मुसा यांना दिले जाते, त्यांच्या नावावरून केळीचे शास्त्रीय नाव ठेवण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने केळीचे उत्पादन अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर सुरू झाले, मात्र त्यावेळी हे बाजारांमध्ये विकण्याचे प्रमाण कमी होते. मात्र १९ वे शतक उजाडता उजाडता केळी बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाली.

केळी ला इंग्रजी मध्ये बनाना असे म्हटले जाते. हा शब्द खरा इंग्रजी नसून, अरबी लोकांनी केळीसाठी वापरलेला बनान या शब्दापासून तयार झालेला आहे. तसेच गिनी लोक देखील केळीला बनीमा असे म्हणत असत, त्यावरून देखील बनाना नाव पडले असावे असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.

केळीचे एक पीक म्हणून वर्णन:

केळीचे पीक हे झाड वाटत असले तरीदेखील ते झाड नसून वनस्पती वर्गीय गटांमध्ये मोडते. केळीचा विस्तार हा हवामान आणि तत्सम घटकांवर अवलंबून असतो. साधारणपणे केळीचे झाड पाच ते पंधरा फुटापर्यंत विस्तारते. त्याची पाने लांब म्हणजेच जवळपास पाच ते सात फुटापर्यंत असतात. आणि रुंदीला तब्बल दीड ते दोन फूट असतात. केळीचे संपूर्ण झाड हे मऊसर असते, आणि त्याच्या प्रत्येक भागामध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते. जुनी झालेली पाने चिरली जातात.

योग्य हंगाम आणि पोषक वातावरण मिळाले की, केळीचे लालसर जांभळी फुले उलट्या दिशेने जमिनीकडे वाढायला लागतात. आणि त्या फुलांचा एक मोठासा गुच्छ तयार होतो. पुढे उबदार वातावरणामध्ये या गुच्छचे रूपांतर घडामध्ये होते. हा घड म्हणजे केळीच्या फण्यांचा समूह असतो. एका घडामध्ये अंदाजे एक डझन पर्यंत फणी असू शकतात, आणि एका फनी मध्ये दीड ते दोन डझन केळे असतात. यावरून तुम्ही एका घडामध्ये किती केळी असेल याचा अंदाज लावू शकता.

केळी खाण्याचे फायदे:

केळीमध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे पोटॅशियम आणि फायबर असल्यामुळे ते शरीरासाठी अतिशय पोषक आणि फायदेशीर ठरत असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळीचे फळ हे कुठल्याही प्रकारची चरबी किंवा कोलेस्ट्रॉल यांपासून मुक्त असते. त्यामुळे शरीरावर कुठलाही अपायकारक परिणाम होत नाही.

केळीच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारले जाते. हृदयाचे ठोके नियमित होतात. रक्तदाब देखील नियंत्रित केला जातो. आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत होते. त्यामुळे माणूस जास्त ऍक्टिव्ह होतो.

केळी हे फळ आजारी माणूस किंवा कष्टाची कामे करणाऱ्या लोकांना दिले जाते, हे आपल्याला माहितीच आहे. कारण अतिशय जलदरीत्या ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य या केळी द्वारे केले जाते. म्हणून केळीला पौष्टिक पावर हाऊस म्हणून देखील ओळखले जाते. शरीरातील अशक्तपणाला दूर करण्याचे कार्य या केळी द्वारे केले जाते.

आजकाल प्रत्येकालाच सौंदर्याविषयी फार चिंता लागून असते, मात्र या चिंतेमुळे चेहऱ्यावर असणारे तेज हरविले जाते. मात्र केळीच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील तेज आणि हास्य पुन्हा एकदा येण्यास मदत होते. केळीच्या फळांमध्ये ट्रीफटोफॅन नावाचे एक अमिनो ऍसिड सापडते, तसेच विटामिन बी सिक्स देखील सापडते. या दोन्हीही गोष्टींमुळे चेहऱ्यावर ग्लो यायला मदत मिळते. तसेच चेहऱ्यावरील हास्य देखील खुलण्यास मदत मिळते.

केळीमध्ये अधिक प्रमाणात फायबर्स असतात, हे तुम्हाला माहितीच आहे. यामुळे अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते. तसेच बऱ्याच कालावधीपर्यंत पोट भरलेले वाटते, आणि पोट साफ व्हायला देखील मदत मिळत असते. त्यामुळे शक्यतो नाश्ता मध्ये केळाचा समावेश करणे सुचविले जाते.

निष्कर्ष:

कोणाला दवाखान्यात भेटायला जायचे असो किंवा कुठलेही धार्मिक कार्य असो, लहान पासून मोठ्या कोणत्याही कार्यासाठी केळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. व्यायाम करणारे, डायट करणारे, आणि शरीर कमावण्यासाठी प्रयत्न करणारे लोक केळी खाण्यास पहिले प्राधान्य देतात. कारण केळीमध्ये अतिशय उपयुक्त असे घटक बघायला मिळतात.

थोडीशी खाल्ली तरी पोट भरणारी आणि शरीराला त्वरित ऊर्जा निर्माण करून देणारी असल्यामुळे आजारी माणसांपासून सदृढ ठणठणीत असणाऱ्या पैलवानांना सुद्धा केळी भुरळ घालते. केळी भारतीय फळ नसले तरी देखील आज भारतातील प्रत्येक चौकाचौकामध्ये केळी विक्रीस ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. याचे कारण म्हणजे केळीला असणारी चांगली मागणी होय. आजच्या भागामध्ये आपण ह्या केळी बद्दल माहिती बघितलेली आहे.

FAQ

केळी या पिकाचे उगमस्थान कोणत्या देशातील सांगितले जाते?

केळी या पिकाचे उगमस्थान दक्षिण पूर्व आशिया व मलेशिया च्या जंगलात सांगितले जाते.

केळीचे एक फळ वजनाने साधारणपणे किती असते?

केळीचे एक फळ वजनाने साधारणपणे १२० ते १४० ग्रॅम इतके असते.

केळी चा उगम किती वर्षांपूर्वी झाला असावा असे सांगितले जाते?

केळीचा उगम संशोधकांच्या मते १० हजार वर्षांपूर्वी झाला असावा असे सांगितले जाते.

केळीची लागवड किंवा केळीला लागवड योग्य बनविण्याचे श्रेय कोणाला दिले जाते?

केळीच्या लागवडीबाबत श्रेय अँटोनियस मुसा जे रोमन सम्राट ऑक्टोव्हीएस ऑगस्ट याचे वैयक्तिक चिकिस्तक होते त्यांना दिले जातो.

केळीचे आरोग्यदायी फायदे काय काय आहेत?

केळीचे आरोग्यदायी फायद्यांमध्ये हृदयाचे आरोग्य राखणे, त्वरित ऊर्जा मिळवून देणे, चेहऱ्यावर तेज वाढविणे, पोट साफ करणे, अशक्तपणा विरुद्ध लढणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे इत्यादी फायद्यांचा समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण केळी या फळाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कळवालच, मात्र काही अधिकची माहिती असेल तर ती देखील पाठवा. तसेच शरीर कमावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती जरूर शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment