छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र या नात्याने मराठा साम्राज्याचे वारसदार समजले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. औरंगजेब बादशहाचे सर्वात बलाढ्य शत्रू म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, असे छत्रपती संभाजी महाराज आपल्या असाधारण कर्तुत्वाकरिता ओळखले जातात.

Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे विस्तार करण्याबरोबरच, संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी अगदी निष्ठेने पार पाडणारे छत्रपती संभाजी महाराज यांना आयुष्य मात्र फार थोडेसे लाभले होते.

आणि याला स्वकीयांनी केलेली दगाबाजी कारणीभूत ठरली होती.अगदी विजापूर, गोवळकोंडा इत्यादी ठिकाणावर मराठा साम्राज्याची भगवी पताका फडकवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या शूरतेसाठी आणि निर्भयतेसाठी ओळखले जाते.

त्यांनी मराठा साम्राज्याचे अतिशय संरक्षण करून, अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आत्मविश्वासाने राहून मराठा समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिला होते.

३१ वर्षांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कोणतीही लढाई हरली नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य समजले जाते. आजच्या भागामध्ये आपण या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती बघणार आहोत…

नावछत्रपती संभाजी महाराज
संपूर्ण नावछत्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले
इतर नावछावा, बाळ शंभूराजे
जन्म दिनांक१४ मे १६५७
जन्मस्थळपुरंदर किल्ला, पुणे
बंधूंचे नावराजाराम महाराज
आई व वडीलसईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज
पत्नीयेसूबाई
मुलगाछत्रपती शाहू महाराज
धर्महिंदू
ओळखस्वराज्य संरक्षक व शिवपुत्र
स्वराज्य संरक्षक व शिवपुत्र११ मार्च १६८९
समाधीचे ठिकाणतुळापूर, पुणे

छत्रपती संभाजी महाराजांची कौटुंबिक माहिती:

छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित कुटुंब समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील सदस्य होते. भोसले कुळामध्ये जन्मलेले छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या कर्तृत्वासाठी देखील ओळखले जातात.

त्यांच्या कुटुंबामध्ये मासाहेब जिजाऊ अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या आजी, वडील छत्रपती शिवाजी महाराज, आई सईबाई, त्याचबरोबर इतरही अनेक सदस्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजी महाराज यांनी येसूबाई यांच्या सोबत विवाह केला होता, व त्यांना छत्रपती शाहू महाराज नावाचा एक पुत्र देखील झाला होता.

छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रारंभिक आणि शैक्षणिक आयुष्य:

छत्रपती संभाजी महाराज हे पुरंदर किल्ल्यावर जन्मले होते. तो दिवस १४ मे १६५७ असा होता. त्यांच्या मृत्यूच्या वेळेसच त्यांच्या आईचे अर्थात सईबाई यांचे निधन झाले होते, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे संगोपन मासाहेब जिजाऊ यांनीच केले होते. मासाहेब जिजाऊ त्यांना लहानपणी लाडाने बाळ शंभूराजे म्हणत असत.

छत्रपती संभाजी महाराजांचे शिक्षण फार प्रचंड झालेले होते. ते संस्कृत मध्ये निपुण होते. त्याचबरोबर ते इतर १३ भाषा देखील जाणत असत, व या सर्व तेरा भाषांमध्ये त्यांना उत्तम संवाद देखील साधता येत असे. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षीपासून राजा जयसिंग यांच्याकडून धनुर्विद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी, इत्यादी बाबतीतले शिक्षण घेतले होते.

त्याचबरोबर त्यांनी अनेक ग्रंथरचना केलेल्या असून, यातील बुधभूषणम हा ग्रंथ विशेष समजला जातो. याचबरोबर त्यांनी नाइकाभेद, सत्शतक, नकाशिकांत यांसारखे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये रचलेले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांचे प्रथम युद्ध:

आपले सर्व प्रकारचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी १६ व्या वर्षी आपले पहिले युद्ध लढून त्यामध्ये यशस्वीता देखील प्राप्त केली होती. या युद्धकार्याच्या नेतृत्वात सात किलो वजनी तलवार वापरली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी अनेक युद्ध केली. त्यांनी नऊ वर्ष अविरत कष्ट घेत, सुमारे १२० युद्ध करून हे प्रत्येक युद्ध जिंकले.

त्यांच्या नावावर असा देखील विक्रम आहे की, छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली एकही लढाई ते हरले नव्हते. त्यामुळे शत्रूंना कळून चुकले होते, की छत्रपती संभाजी महाराजांवर विजय मिळवायचा असेल तर तो युद्धाच्या मार्गाने मिळवता येणार नाही. यासाठी काहीतरी कुटील कारस्थान रचावे लागेल.

छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश:

छत्रपती संभाजी महाराज चांगल्या मैत्रीसाठी देखील ओळखले जातात. त्यांनी कवी कलश यांच्यासोबत अतिशय कनिष्ठ मैत्री केली होती. नेहमी कवी कलश त्यांच्यासोबतच असत. अगदी मृत्यूश्येवर असताना देखील छत्रपती संभाजी महाराजांची साथ देणाऱ्या या कवी कलशाला देखील इतिहासामध्ये फार मोलाचे स्थान प्रदान करण्यात आलेले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघी रयत दुःखामध्ये बुडून गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजाराम महाराज यांनी राज्याभिषेक करावा असा अनेकांचा प्रयत्न होता, मात्र सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला, आणि अशा रीतीने संभाजी महाराज छत्रपती झाले.

त्यांनी आपल्या हयातीमध्ये जनतेच्या कल्याणाकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवीत कार्य केलेले असून, एक अतिशय पराक्रमी आणि शक्तिमान योद्धा म्हणून इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे नाव अजरामर झालेले आहे, व अजून देखील पुढे हे नाव हजारो लाखो वर्ष अजरामर राहील.

निष्कर्ष:

पूर्वीच्या काळी कोणत्याही व्यक्तीची उपलब्धी हे त्याच्या ताब्यामध्ये असलेला प्रदेश समजला जाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने या स्वराज्याची निर्मिती केली होती, आणि स्वराज्याची पताका पुढे चालू ठेवण्याचे कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी यथोचित स्वरूपात केले होते.

त्यांच्या शूरतेसाठी आणि निर्भयतेसाठी ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज अतिशय चपळ योध्ये होते. त्यांनी अनेक लढाया केल्या असून, त्यांच्यापैकी एकही लढाई न हरलेले योद्धे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो शक्यतो वाघाचा जबडा फाडताना असतो, यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना करता येऊ शकते. छत्रपती संभाजी महाराजांना शंभुराजे किंवा छावा या नावाने देखील ओळखले जात असे.

स्वराज्याला एक उत्तम वारस कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती बघितली असून, त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे.

त्यामध्ये त्यांचे कुटुंब, त्यांचे बालपण व शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचे असलेले संबंध, त्यांनी लिहिलेले विविध ग्रंथ, छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले व अनेक युद्ध, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, व कवी कलश यांच्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलेले कर्तृत्व, व त्यांच्या मृत्यूची विदारक कहानी इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली आहे.

FAQ

छत्रपती संभाजी महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?

छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या दिवशी, व कोणत्या ठिकाणी झाला होता?

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ या दिवशी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये वसलेल्या पुरंदर या किल्ल्यावर झाला होता.

छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव सईबाई असे होते, तर त्यांच्या वडिलांचे नाव स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असे होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू ११ मार्च १६८९ या दिवशी तुळापूर या पुण्यातील एका ठिकाणी झाला होता.

छत्रपती संभाजी महाराजांना कोणकोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?

छत्रपती संभाजी महाराज यांना मासाहेब जिजाऊ नेहमी बाळ शंभुराजे म्हणून ओळखत असत? त्याचबरोबर त्यांना छावा हे देखील टोपण नाव मिळालेले होते.

Leave a Comment