कुलाबा किल्याची संपूर्ण माहिती Colaba Fort Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Colaba Fort Information In Marathi महाराष्ट्राला अनेक किल्ल्यांचे वैभव लाभलेले आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणून कुलाबा किल्ला ओळखला जातो. कोकणाच्या अलिबाग मध्ये जुन्या तटबंदीचा एक सागरी किल्ला म्हणून या कुलाबा किल्ल्याला ओळखले जाते. कोकणामध्ये अलिबाग किनाऱ्यापासून अगदी एक ते दोन किलोमीटर अंतरावर समुद्रात असणारा हा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. आज मीतिला याला संरक्षित ऐतिहासिक स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

आजच्या भागामध्ये आपण या कुलाबा किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत…

Colaba Fort Information In Marathi

कुलाबा किल्याची संपूर्ण माहिती Colaba Fort Information In Marathi

नावकुलाबा किल्ला
प्रकारजलदुर्ग (पाण्यातील / सागरी किल्ला)
बांधकाम इसवी सन १६५२
किनारपट्टी चे नावअष्टाघर किनारपट्टी
संस्थापक व मालकछत्रपती शिवाजी महाराज
सध्या ताबामहाराष्ट्र शासन
भौगोलिक ठिकाणकुलाबा, अलिबाग किनाऱ्यापासून २ कि मी

मित्रांनो, अलिबाग किल्ला म्हणून देखील ओळखला जाणारा हा कुलाबा किल्ला समुद्रामधील एक किल्ला असून, अलिबाग शहरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये याचा समावेश होतो. या किल्ल्याचे वय सुमारे ३०० वर्ष इतके असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राजवटीमध्ये एका नौदल चौकीच्या स्वरूपात या किल्ल्याची निर्मिती केली होती.

अरबी समुद्रामध्ये असलेला हा किल्ला लष्करी रचनेचा एक उत्तम नमुना आहे. या किल्ल्यावर ओहोटीच्या वेळी पाण्यातून चालत देखील जाता येऊ शकते, मात्र भरती असेल त्यावेळी बोटीच्या सहाय्यानेच जाता येते. या परिसरात अतिशय तुरळक लोक वस्ती असून, अतिशय शांततेने भरलेला हा परिसर आहे. त्यामुळे तुम्हाला शांतता अनुभवायची असेल तर तुमच्यासाठी हे ठिकाण अतिशय चांगले आहे.

किल्ल्याच्या आतील बाजूने प्राचीन कलाकृती आणि विविध वस्तूंची संग्रहालय आहे. तसेच किल्ल्याच्या भिंतीवर पक्षी, प्राणी, इत्यादींचे चित्रे कोरलेले आहेत. येथे तुम्हाला काही तोफा देखील बघायला मिळतात. तसेच काही मंदिरांचे अवशेष देखील दिसून येतात.

या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे चोहोबाजूने खारे पाणी असून देखील या किल्ल्यामध्ये गोडे पाणी प्यायला मिळते. या किल्ल्यावर १७५९ यावर्षी राघोजी आंग्रे यांनी गणपतीचे मंदिर बांधलेले आहे. ज्याला स्थानिक मच्छीमार अतिशय भक्ती भावाने पूजत असतात.

पूर्वीच्या काळी त्याच्या भौगोलिक ठिकाणामुळे ते एक मुख्य नौदल चौकी म्हणून विकसित करण्यात आलेले ठिकाण आहे. या किल्ल्यावरून ब्रिटिशांवर हल्ला केला जात असे. आजकाल भारत सरकारने या किल्ल्याला सुशोभित केल्यामुळे एका चांगले पर्यटन स्थळ म्हणून या किल्ल्याचा विकास झालेला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अर्थात ए एस आय या संस्थेने कुलाबा किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिलेला आहे.

कुलाबा किल्ल्यांवर इंग्रजी आक्रमण:

मित्रांनो, कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बऱ्याच कालावधीसाठी सांभाळला होता. या किल्ल्यावरून ब्रिटिश बोटींना नेस्तानाबुत करण्यासाठी कारवाया केल्या जात असत. यामुळे कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटिशांना अगदी जेरीस आणले होते.

या कुलाबा किल्ल्यावरून ब्रिटिश जहाजांना नेहमीचे होणारे नुकसान लक्षात घेता ब्रिटिशांनी १७२१ या वर्षी पोर्तुगीजांसह मिळून हा किल्ला ताब्यात घेण्याची योजना आखली, मात्र यामध्ये इंग्रजांचे अपयश झाले. पुढे १७२९ या वर्षी कानोजी आंग्रेंचा मृत्यू झाला आणि त्याच्या आसपासच या किल्ल्याच्या पिंजरा बुरुजावर आग लागली. त्यामुळे या किल्ल्यातील सर्व ऐतिहासिक गोष्टी जळून खाक झाल्या. पुढे १८४२ या वर्षी इंग्रजांच्या ताब्यामध्ये हा किल्ला गेला.

कुलाबा किल्ल्याचा इतिहास:

मित्रांनो, अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये राहिलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेल्या शेवटच्या किल्ल्यांपैकी होता. त्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी देखील हा किल्ला बऱ्याच कालावधीसाठी सांभाळला. या किल्ल्यावर ईस्ट इंडिया कंपनी व पोर्तुगीज यांचे देखील अनेक दिवस अधिपत्य होते. छत्रपती यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी या किल्ल्याचे मजबुतीकरण देखील केले होते. कान्होजी आंग्रे यांनी १७१३ ते १७२९ या वर्षांपर्यंत या गडावरून कारभार बघितला होता.

कुलाबा किल्ल्यावर काय बघावे:

अरबी समुद्रामध्ये असलेला हा किल्ला सूर्यास्ताच्या वेळी खूपच सुरेख दिसतो. तसेच या ठिकाणी येणाऱ्या समुद्रावरील हवेने मन प्रसन्न होऊन जाते.

या किल्ल्यावर बघण्यासारख्या गोष्टींमध्ये भिंतीवर कोरलेले हत्ती, मोर, वाघ यांची शिल्पे देखील महत्त्वपूर्ण आहेत. तसेच काही ऐतिहासिक तोफा देखील तुम्हाला येथे बघायला मिळतात. येथील आश्चर्य म्हणून गणल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये गोड्या पाण्याचा विहिरीचा देखील समावेश होतो.

किल्ल्यावर तुम्ही अनेक मंदिरे देखील बघू शकता. ज्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर समाविष्ट आहे. जे राघोजी आंग्रे यांनी १७५९ यावर्षी बांधले होते. त्यासोबतच किल्ल्यावर पद्मावती आणि महिषासुर हे दोन मंदिरे देखील आहेत, सोबतच येथे एक दर्गा देखील आहे.

मित्रांनो समुद्रामध्ये अतिशय सुरेख रित्या बांधल्या गेलेला एक किल्ला म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते. या किल्ल्यावर तुम्ही नोव्हेंबर ते जुलै या दरम्यान भेट दिल्यास तुम्हाला तेथील चांगला अनुभव गाठीशी बांधता येऊ शकतो. मात्र येथे पावसाळ्यामध्ये जाणे टाळण्याचे सांगितले जाते. कारण भरतीच्या कालावधीमध्ये किल्ल्यावर जाणे थोडेसे कठीण असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या हयातीत अनेक किल्ल्यांची निर्मिती केली. त्यामध्ये बहुतांशी गिरीदुर्गांचा समावेश असला, तरी काही जलदुर्ग देखील बांधलेले आहे. असाच एक जलदुर्ग म्हणजे कुलाबा किल्ला होय. अलिबाग किनारपट्टीपासून अगदी जवळ असणारा हा किल्ला छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे.

आजच्या भागामध्ये आपण याच कुलाबा किल्ल्याबद्दल माहिती घेतली. ज्यामध्ये कुलाबा किल्ल्यावर झालेले इंग्रजांचे आक्रमण, या किल्ल्याचा इतिहास, किल्ल्यावर काय काय बघावे, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, आणि कोणत्या वेळेमध्ये येथे भेट देणे उत्तम ठरू शकते इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. सोबतच या किल्ल्याला भेट देताना लक्षात ठेवण्याच्या काही टिप्स आणि येथील मार्ग त्याची देखील माहिती घेतली आणि शेवट प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.

FAQ

जलदुर्ग किंवा साखरी किल्ला म्हणजे काय?

मित्रांनो, जो किल्ला समुद्रामधील एखाद्या बेटावर बांधलेला असतो त्याला समुद्रकिला किंवा जलदुर्ग असे म्हणून ओळखले जाते.

कुलाबा किल्ला कोणत्या प्रकारातील किल्ला आहे?

मित्रांनो, कुलाबा किल्ला हा अलिबाग येथे समुद्रामध्ये बांधण्यात आले असल्यामुळे, त्याला जलदुर्ग या प्रकारातील किल्ला म्हणून ओळखले जाते. हा किल्ला संपूर्ण बाजूने पाण्याने वेढलेला असून, हा किल्ला मूळतः समुद्रामध्ये संरक्षण व्हावे याकरिता बांधण्यात आला होता.

कुलाबा किल्ल्याची निर्मिती कोणी केलेली आहे?

मित्रांनो, भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या कुलाबा किल्ल्याची निर्मिती केली होती. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा तटबंदी युक्त नौदल तळ होता.

कुलाबा या किल्ल्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

कुलाबा या किल्ल्याला २५ फुटाच्या उंच उंच भिंती, आणि दोन प्रवेशद्वारे आहेत. यातील एक प्रवेशद्वार समुद्राकडे उघडते, तर दुसरे अलिबाग किनाऱ्याकडे उघडते. याशिवाय समुद्रामध्ये असलेल्या या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरींचा समावेश होतो.

कुलाबा किल्ल्याला भेट देण्यासाठी काही टिप्स सांगता येतील का?

मित्रांनो, कुलाबा किल्ल्यावर जाण्याकरिता पायी देखील जाता येते, मात्र याकरिता आपल्या भेटीचा दिनांक निवडताना ओहोटीच्या वेळेचा असावा. भरतीच्या वेळी गेलात तर तुम्हाला बोटीने किल्ल्यापर्यंत पोहोचावे लागेल, याशिवाय तेथे अनोखे अनुभव मिळवण्याकरिता तुम्ही घोडा गाडी देखील भाड्याने घेऊ शकता.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुलाबा या ऐतिहासिक किल्ल्याबद्दल माहिती घेतलेली आहे. ज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती. मित्रांनो या किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली ना?… तर मग पटापट कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. आणि सोबतच तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करण्यास देखील विसरू नका.

धन्यवाद…

Leave a Comment