Dhamana Snake Information In Marathi दिसायला अतिशय घातक मात्र अतिशय बिनविषारी स्वरूपाचा साप म्हणून धामण या सापाला ओळखले जात असते. टायस म्युकोकस या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा धामण हा साप मुख्यतः पठारी प्रदेशावर वास्तव्य करत असतो. या प्रजातीच्या संख्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, तिबेट, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, कंबोडिया, म्यानमार, तैवान, थायलंड, मलेशिया, इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रजाती आढळत असतात. मुख्यतः २००० मी उंचीवर देखील या प्रजाती आढळू शकतात. महाराष्ट्रामध्ये या धामण सापाच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळत असून, साधारणपणे अडीच ते तीन मीटर लांबी साठी हा साप ओळखला जात असतो.
धामण सापाची संपूर्ण माहिती Dhamana Snake Information In Marathi
रंगाने काहीसा पिवळसर आणि करडा असणारा हा साप काही वेळेला तपकिरी रंगछटा देखील दाखवत असतो. दहा सेंटिमीटर शरीराचा घेर असणारा हा प्राणी त्याच्या टोकदार शेपटीसाठी ओळखला जातो. त्याचे डोके अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, ते लगेचच दिसू शकते. हा साप वेटोळी करून देखील पडू शकतो.
अतिशय चपळ म्हणून या सापाला ओळखले जाते. हा साप चावा घेत असला, तरी देखील तो विषारी नसतो, त्यामुळे या सापाने चावा घेतल्यास फारसे घाबरू नये. अनेक लोक या सापाच्या भयंकर दिसण्याने घाबरूनच मृत्युमुखी पडत असतात. पाण्यामध्ये देखील हा साप पोहण्यास सक्षम असतो. मात्र यावेळी तो पाण्याच्या बाहेर आपले डोके ठेवत असतो. इतकच नाही तर तब्बल सहा मीटर उंचीची उडी मारणारा हा साप झाडावर देखील सहज चढू शकतो.
आपल्या शेपटीने भक्षाला पकडून त्याला खाण्यासाठी हा प्राणी ओळखला जात असतो. मुख्यतः लहान लहान पृष्ठवंशीय प्राणी, बेडूक, वटवाघुळे, कासवाची पिल्ले आणि छोट्याशा सापांना हा साप भक्ष बनवत असतो. याचे सर्वात आवडीचे अन्न म्हणून उंदीर समजले जाते, त्यामुळे शेतातील उंदीर खाऊन तो शेतकऱ्यांना एक मदतच करत असतो.
त्यामुळे शक्यतो या सापाला मारू नये, असे सांगितले जाते. मात्र अतिशय चपळ असणारा हा साप अनेकांना भीती दाखवत असतो. आजच्या भागामध्ये आपण या धामण प्रजातीच्या सापाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया या सापाच्या माहितीला…
नाव | धामण |
प्रकार | साप |
शास्त्रीय नाव | टायस म्युकोसा |
श्रेणी | सरपटणारा प्राणी |
कुटुंब किंवा कुळ | कोलुब्रीडे |
किंगडम | एनिमलिया |
धामण सापाचे भक्ष:
धामण हा साप एक भक्षक प्राणी असून, मोठ्या प्रमाणावर लहान प्राण्यांची शिकार करून तो खात असतो. ज्यामध्ये लहान प्राणी तसेच छोटे साप, पक्षी, आणि सरपटणारे प्राणी, इत्यादींचा समावेश होत असतो. अतिशय चपळ आणि सावध स्वरूपाचे धामण साप अतिशय वेगवान हालचाली करण्यासाठी ओळखले जात असतात. त्यांच्यासाठी उंदीर हा अतिशय उत्कृष्ट अन्न असून, उंदीर खाऊन हे साप शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असतात.
धामण साप कसा वागतो:
धामण हा अतिशय चपळ स्वरूपाचा साप असतो, तो नेहमी चिडलेल्या स्वरूपातच असतो. त्यामुळे अनेकांना हा साप धोकेदायक वाटत असतो. विषारी गटातील नसल्यामुळे याच्या चाव्यामुळे शक्यतो कोणीही मरत नाही. मात्र हा साप चावल्यामुळे याच्या भयानक स्वरूपामुळे घाबरून अनेक लोक मृत्युमुखी पडत असतात.
या सापाच्या चावल्यानंतर कुठल्याही प्रकारे न घाबरता योग्य औषधोपचार केल्यास माणूस मृत्यूमुखी पडत नाही. हे साप मुख्यतः खेड्याच्या ठिकाणी, ओलसर शेत जमिनीत किंवा घराच्या कपारीमध्ये आढळून येतात. भाताच्या शेतामध्ये देखील हे साप मोठ्या प्रमाणावर आढळत असून, ओलसर जागा त्यांच्या राहण्यासाठी अतिशय उत्तम समजली जाते.
या सापाच्या शिकारीची पद्धत अतिशय अनोखी असून, या सापाद्वारे शेपटीच्या सहाय्याने भक्षाला वेढा घातला जातो, जेणेकरून तो भक्ष गारद होण्यास मदत मिळेल. आणि त्यानंतर आरामात त्या प्राण्याची शिकार या सापांकडून केली जात असते. या सापाच्या पुनरुत्पादनासाठी उष्ण कटिबंधीय हवामान अतिशय उत्तम समजले जाते.
अगदी वर्षभर देखील हे साप पुनरुत्पादन करू शकतात, मात्र असे असले तरी देखील वसंत ऋतुच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला या सापांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रजनन केले जाते, व अंडी घातली जातात. या सापाद्वारे प्रजननाच्या कालावधीमध्ये विन नृत्य देखील केले जात असते.
धामण सापाचे नाव:
शास्त्रीय नावाच्या आधारे अनेक प्राण्यांचे वर्गीकरण केले जात असते. आणि हे शास्त्रीय नाव देण्याचे कार्य इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमिनक्लेचर अर्थात आय सी झेड एन या संस्थेच्या माध्यमातून केले जात असते. टायस हा विषारी सापांसाठी वापरला जाणारा शब्द असला, तरी देखील अविषारी धामण सापासाठी देखील हा शब्द वापरला जातो.
निष्कर्ष:
आपल्या अवतीभोवती अनेक जीव राहत असतात. त्यातील काही मानवासाठी उपयुक्त, तर काही घातक स्वरूपाचे असतात. साप हा मानवासाठी फार पूर्वीपासून भीतीचे कारण ठरणारा प्राणी आहे. या सापामुळे अनेकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर भीती वाटत असते. त्यामुळे प्रत्येक जण या सापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. तर अनेक जण या सापाला दिसताक्षणी मारत देखील असतात.
या सापाला मारण्यामागे कारण असे, की अनेक साप हे विषारी प्रकारातील असतात. त्यामुळे मानवाचा मृत्यू देखील होऊ शकतो, आणि कोणता साप विषारी आहे व कोणता बिनविषारी हे ओळखणे देखील कठीण असते. त्यामुळेच या सापांना मारले जात असते. असे असले तरी देखील अविषारी स्वरूपातील साप शेतातील उंदीर खाऊन हे साप शेतकऱ्यांना एक प्रकारे मदतच करत असतात.
अनेक वेळा सापांना न मारण्याचे सांगितले जाते, मात्र घराजवळ साप निघाला आणि घरामध्ये लहान मुले असतील तर हा साप मारला जात असतो. कारण या सापाने प्रजाती वाढवली, व लहान मुलांना चुकून त्यांनी दंश केला तर लहान मुलांना हे सांगता देखील येणार नाही. व तत्पूर्वीचा त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
आजच्या भागामध्ये असाच एका दिसायला भयंकर असणाऱ्या मात्र बिनविषारी स्वरूपाच्या सापाबद्दल अर्थात धामण सापाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघितलेली आहे.
त्यामध्ये या धामण सापाच्या भौगोलिक क्षेत्राची माहिती, त्याचे भक्षण करण्याची पद्धत, या सापाची शरीररचना व त्याचे वर्णन, त्याचबरोबर हा साप कसा प्रकारे वागत असतो, याची देखील माहिती घेतलेली असून, या सापाचे नामकरण कशा पद्धतीने करण्यात आले हे देखील बघितलेले आहे.
FAQ
धामण हा साप कशा स्वरूपाचा आहे?
धामण हा साप बिनविषारी स्वरूपाचा असून, अतिशय चपळ म्हणून या सापाला ओळखले जाते. बिनविषारी असला तरी देखील दिसायला अतिशय घातक स्वरूपाचा हा साप असतो.
धामण या सापाचे शरीर रचना कशी असते?
धामण हा साप लांबीला सुमारे अडीच ते तीन मीटर आणि शरीराच्या घेराने जवळपास दहा सेंटिमीटर इतका असतो. अतिशय टोकदार स्वरूपाची शेपटी असणारी ही प्रजाती अतिशय लांबट व चपट्या डोक्यासाठी ओळखली जाते. त्याचबरोबर त्याचा रंग देखील पिवळसर करडा किंवा तपकिरी स्वरूपाचा असतो.
धामण हा साप कोणत्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे?
धामण हा साप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, तो पाण्यामध्ये पोहणे किंवा झाडावर चढणे इत्यादी कार्यासाठी सक्षम असतो.
विनीच्या हंगामामध्ये नर धामण काय करतो?
विणीच्या हंगामामध्ये नर धामण हा स्वतःच्या शरीराला अतिशय उंच करून शेपटी जमिनीवर विसावत असतो. आणि नृत्य करत असतो, ज्यामुळे इतर नर त्या परिक्षेत्रात येत नाहीत.
धामण कशा स्वरूपाचा प्राणी आहे?
धामण हा दिनचर स्वरूपाचा प्राणी असून, रात्रीच्या वेळेस तो निद्रा घेत असतो, व दिवसभर शिकार करत वावरत असतो. जुन्या घराच्या भिंतीमध्ये झाडझुडपात आणि शेतामध्ये हा साप दिसून येत असतो.