Discord अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Discord Application Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Discord Application Information In Marathi Discord अँप्लिकेशन बद्दल माहिती आहे Discord अँप्लिकेशन कसे वापरावे ?  मित्रहो आज आपण या  लेखात Discord  या एप्लीकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत. Discord हे कम्युनिकेशन साठीचे ॲप्लिकेशन आहे,  या एप्लीकेशन चा वापर करून आपण आपल्या मित्रांसोबत चॅटींग, व्हॉइस कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग करु शकतो. Discord या एप्लीकेशनचे  महत्त्वाचे फायदे असे आहे की आपण याच्या उपयोगाने आपल्या डिवाइस ची High कॉलिटीमध्ये स्क्रीन शेअर करून, आपले डिव्हाइस स्लो न होता ,एकमेकांशी बोलू शकतो.

Discord Application Information In Marathi

Discord अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Discord Application Information In Marathi

आजकाल या एप्लीकेशन चा उपयोग गेमर्स गेम खेळताना स्क्रिन शेअर करण्यासाठी आणि कॉमेंट्री करण्यासाठी खूप प्रमाणात वापर करीत आहेत.  चला तर मग हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये कसे वापरावे हे माहिती करून घेऊया.

मित्रहो हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये Discord हे एप्लीकेशन मोबाईल मधील असणाऱ्या एप्लीकेशन स्टोअरमधून डाऊनलोड करा आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

Discord  हे ॲप्लिकेशन कसे सुरु करावे ?

मित्रहो  Discord  हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर, ते एप्लीकेशन ओपन करा.

एप्लीकेशन ओपन केल्यानंतर  तुम्हाला Welcome to Discord असे दाखवण्यात येईल,  तेथे खालचा बाजूस दोन पर्याय असतील तेथे Register या पर्यायावर क्लिक करा.

Register या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तीन  रिकामे रकाने येतील,  तेथे तुम्हाला युजरनेम, ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड विचारले जाईल तेथे ती सर्व माहिती टाका.  सर्व माहिती टाकल्यानंतर खाली असणाऱ्या Create an account या पर्यायावर क्लिक करा.

Create an account या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या ई-मेल अड्रेस वर व्हेरीफिकेशन लिंक जाईल त्यामुळे तुमचे ईमेल अकाऊंट उघडा व तेथे Discord कडून आलेला मेल उघडा व त्यातील वेरिफिकेशन लिंक वर क्लिक करून ई-मेल  ऍड्रेस व्हेरिफाय करा,  आता तुम्ही ई-मेल अड्रेस आणि पासवर्ड टाकून Discord मध्ये लॉग इन करू शकता.  अशाप्रकारे Discord  वर आपले अकाऊंट तयार होईल व आपल्या मोबाईल मध्ये Discord हे ॲप्लिकेशन सुरू होईल.

Discord अकाऊंट सेट अप कसे करावे ?

मित्रहो Discord मध्ये अकाउंट तयार केल्यांनतर, आपल्याला सर्वप्रथम येथे Discord चे अकाउंट सेट अप करावे लागते, म्हणजेच येथे आपण आपले प्रोफाइल पिक्चर ठेऊ शकतो, हवे असल्यास पासवर्ड बदलू शकतो, ई-मेल ऍड्रेस बदलू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि Discord वर अकाउंट सेट अप कसे करायचे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा.

  1. आपल्या मोबाईल मधील Discord चे अँप्लिकेशन उघडा.
  2. Discord चे अँप्लिकेशन उघडल्यानंतर आपले ई-मेल ऍड्रेस आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  3. लॉग इन केल्यांनतर तुमच Discord चे अकाउंट उघडेल, तेथे खालच्या बाजूस उजव्या बाजूस तुम्हाला एक गोलाकार icon दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. गोलाकार icon वर क्लिक केल्यावर तुमची Discord अँप्लिकेशन मधील user setting उघडेल, तेथे तुमच्या समोर  अनेक पर्याय येतील.
  5. तुमच्या समोर आलेल्या पर्ययामध्ये My account हे पर्याय असेल त्यावर क्लीक करा.
  6. My account या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर My account हे पर्याय उघडेल, येथे तुम्हाला Discord कडून by default ठेवलेले प्रोफाइल पिक्चर दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ते प्रोफाइल पिक्चर बदलू सुद्धा शकता.
  7. My account मध्ये तुम्हाला Edit account असे सुद्धा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपले email ऍड्रेस किंव्हा पासवर्ड बदलू शकतो.

अशाप्रकारे आपण डिस्कॉर्ड या अँप्लिकेशनवर अकाउंट सेट अप करू शकतो.

Discord मध्ये friends कसे ऍड करावे ?

Discord मध्ये अकाऊंट तयार केल्यांनतर आपण या अँप्लिकेशनमध्ये आपल्या मित्र-मैत्रीनीना किंव्हा नातेवाईकांना friend request पाठवू शकतो त्याचप्रमाणे ते देखिल आपल्याला friend request पाठवू शकतात.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहे की Discord या ॲप्लिकेशन मध्ये तुमच्या मित्र-मैत्रीनीना किंव्हा नातेवाईकांना friend request  कसे पाठवावे तर पुढे दिल्याप्रमाणे  स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Discord चे अँप्लिकेशन उघडा.
  2. Discord ॲप्लिकेशन मध्ये आल्यानंतर खालच्या बाजूस मधल्या  भागात असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  3. खालच्या बाजूस मधल्या भागत असणाऱ्या पर्यायावर क्लिक  केल्यावर तुमच्या Discord एप्लीकेशन मधील Friends हि tab उघडेल.
  4. Friends tab मध्ये आल्यानंतर तेथे वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या icon वर क्लिक करा.
  5. वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या icon  वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Add friend हि tab उघडेल.
  6. Add friend या tab मध्ये तुम्हाला तुमच्या मित्राला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी त्याचे Discord चे युजरनेम आणि टॅग टाकण्यासाठी विचारण्यात येईल.
  7. मित्राचा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवन्यासाठी त्याचे Discord चे युजरनेम आणि टॅग समोर येणाऱ्या पर्याय मध्ये टाईप करा व टाईप केल्यानंतर खाली निळ्या रंगात असणाऱ्या Send friend request या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण Discord  या अप्लिकेशन वर आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो.

Discord मध्ये आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कशी एक्सेप्ट करावी ?

मित्रहो Discord या अँप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कशी एक्सेप्ट करावी हे समजण्यासाठी पुढील  स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Discord चे  एप्लीकेशन उघडा.
  2. Discord ॲप्लिकेशन मध्ये आल्यानंतर खालच्या बाजूस मधल्या  भागत असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  3. खालच्या बाजूस मधल्या  भागत असणाऱ्या पर्यायावर क्लिक  केल्यावर तुमच्या Discord एप्लीकेशन मधील Friends हि tab उघडेल.
  4. Friends tab मध्ये आल्यानंतरतेथे  तुम्हाला समोरच आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट दिसून येतील.
  5. तुमच्या समोर आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये,  प्रत्येकाच्या नावासमोर तुम्हाला एक बरोबरचे आणि चुकीचे चिन्ह दिसेल, जर तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची असेल तर तेथे बरोबरच या चिन्हावर क्लिक करा आणि जर तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची नसेल तर चुकीच्या चिन्हावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण Discord  या ॲप्लिकेशन मध्ये  आपल्याला आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आणलेली फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू शकतो.

Discord या ॲप्लिकेशन मध्ये server  कसे जॉईन करावे ?

मित्रहो Discord या एप्लीकेशन मध्ये  जर तुम्हाला एखादे server जॉईन करायचे असेल तर त्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत.  पहिल्या पर्यायांमध्ये आपण आपल्या मित्रांकडून एखादे server जॉईन करण्यासाठी आलेल्या इन्व्हिटेशन मध्ये असणाऱ्या Join या पर्यायावर क्लिक करून server जॉईन करू शकतो.

दुसऱ्या पर्यायांमध्ये तुम्ही एखाद्या server ची  लिंक  वापरून  ते server  join करू शकता,  त्यासाठी पुढे दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Discord चे एप्लीकेशन उघडा.
  2. Discord  अप्लीकेशन उघडल्यानंतर डाव्या बाजूला वरच्या भागात असणार्‍या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
  3. डाव्या बाजूला वरच्या भागात असणार्‍या तीन आडव्या रेषांवर क्लिक  केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येतील त्यातील अधिक चिन्ह असेलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  4. अधिक चिन्ह असलेल्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर Create a server आणि Join a server असे दोन पर्याय विचारण्यात येतील,  येथे आपल्याला server join  करायचे आहे त्यामुळे Join a server या पर्यायावर क्लिक करा.
  5. Join a server  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्हाला ज्या server ला जॉईन करायचा आहे त्या server ची invite लिंक टाकण्यासाठी पर्याय येईल, तेथे त्या पर्याय मध्ये तुमच्याकडे असणाऱ्या एखाद्या server ची invite लिंक पेस्ट करा.
  6. server ची invite लिंक पेस्ट केल्यानंतर खाली निळ्या रंगात असणाऱ्या Join server या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण Discord या अँप्लिकशनवर दोन पर्यायांच्या मदतीने server join करू शकतो.

Discord मध्ये server कसे create करायचे ?

मित्रहो Discord अँप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला स्वतःचे server तयार करायचे आहे तर तुम्ही यातील Create server या पर्यायाचा वापर करून server तयार करू शकता.

जर तुम्हालाही Discord अँप्लिकेशन मध्ये server  तयार करायचे आहे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Discord चे एप्लीकेशन उघडा.
  2. Discord  अप्लीकेशन उघडल्यानंतर डाव्या बाजूला वरच्या भागात असणार्‍या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
  3. डाव्या बाजूला वरच्या भागात असणार्‍या तीन आडव्या रेषांवर क्लिक  केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येतील त्यातील अधिक चिन्ह असेलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  4. अधिक चिन्ह असलेल्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर Create a server आणि Join a server  असे दोन पर्याय विचारण्यात येतील,  येथे आपल्याला server तयार  करायचे आहे त्यामुळे Create a server या पर्यायावर क्लिक करा.
  5. Create a server या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला जे server बनवायचे आहे, त्या server च्या नावाबद्दल विचारण्यात येईल, तेथे तुम्ही ठरवलेले server चे नाव समोर असणाऱ्या रिकाम्या रकान्यात टाईप करा.
  6. server चे नाव टाईप केल्यानंतर, तेथे बाजूला server च्या नावाच्या Initials वापरून दाखविले गेलेले आयकॉन वर क्लिक करुन आपण server साठी प्रोफाइल पिक्चर सेट करू शकतो.
  7. server चे नाव टाईप केल्यानंतर आणि server चे प्रोफाइल पिक्चर सेट केल्यानंतर, उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात असणाऱ्या Create या पर्यायावर क्लिक करा.
  8. Create या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे server तयार होईल. तेथे असणाऱ्या Invite friends या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्रांना server जॉईन करण्यासाठी इन्व्हाईट करू शकता किंवा तिथे असणारी इन्व्हाईट लिंक आपल्या मित्रांना server जॉईन करण्यासाठी मेसेजने पाठवू शकता.

अशाप्रकारे मित्रहो आपण Discord या अँप्लिकेशन मध्ये आपले server  तयार करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात तुम्हाला Discord या अँप्लिकेशन  बद्दल महत्त्वाची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला Discord हे  ॲप्लिकेशन समजण्यास आणि वापरण्यास नक्कीच मदत करेल.  जर आम्ही लिहिलेला Discord  बद्दलचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर  आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा लेख सोशल मीडियाच्या मदतीने शेअर करायला विसरू नका.


डिस्कॉर्ड सर्व्हरची किंमत किती आहे?

डिस्कॉर्ड सर्व्हर विनामूल्य आहेत आणि ज्यांच्याकडे डिसकॉर्ड खाते आहे ते सहजपणे सेट करू शकतात. तुम्हाला प्रीमियम वैशिष्ट्ये वापरायची असतील, जसे की सर्व चॅट सदस्यांसाठी अनुकूल ध्वनी गुणवत्ता, तुम्ही सशुल्क डिस्कॉर्ड नायट्रो सेवा देखील वापरू शकता


डिस्कॉर्ड कसे कार्य करते?

वापरकर्ते चॅटरूम सेट करू शकतात किंवा त्यात सामील होऊ शकतात, ज्याला डिस्कॉर्ड ‘सर्व्हर’ म्हणून संबोधतो. वापरकर्ते त्यांना आमंत्रित केलेल्या गटांमध्ये सामील होऊ शकतात किंवा त्यांचा स्वतःचा खाजगी चॅट सर्व्हर तयार करू शकतात आणि त्यांच्या मित्रांना आमंत्रित करू शकतात – त्यानंतर ते सर्व्हर किंवा चॅटरूम वापरणाऱ्या इतर लोकांसह मजकूर किंवा चॅट करण्यासाठी आवाज वापरू शकतात.


डिसकॉर्ड गेम्स कसे खेळायचे?

पुढच्या वेळी तुम्ही व्हॉईस चॅटमध्ये सर्व्हर किंवा DM कॉलमध्ये हँग आउट कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या व्हिडिओ आणि स्क्रीन शेअर बटणांच्या शेजारी एक नवीन रॉकेट शिप चिन्ह दिसेल . ते निवडणे तुम्हाला ऑफरवरील सर्व क्रियाकलापांसह सादर करेल. प्रारंभ करण्यासाठी फक्त एक निवडा.


डिस्कॉर्ड सर्व्हर म्हणजे काय?

सर्व्हर: सर्व्हर ही डिस्कॉर्डवरील स्पेस आहेत. ते विशिष्ट समुदाय आणि मित्र गटांद्वारे तयार केले जातात. बहुसंख्य सर्व्हर लहान आणि केवळ आमंत्रण आहेत. काही मोठे सर्व्हर सार्वजनिक आहेत. कोणताही वापरकर्ता नवीन सर्व्हर विनामूल्य सुरू करू शकतो आणि त्यांच्या मित्रांना त्यात आमंत्रित करू शकतो.

Leave a Comment