Divya Marathi Epaper In Marathi दिव्य मराठी हे भारतामधील दैनिक भास्कर ग्रुपचे महाराष्ट्र राज्यात वाचले जाणारे मराठी दैनिक आहे . दैनिक भास्कर हे भारतातील नंबर १ चे वृत्तपत्र आहेत ते जास्तीत जास्त शहरामध्ये वितरीत केले जातात. या वृत्तपत्राच्या समूहामध्ये ६५ आवृत्त्यांसह ५ वर्तमानपत्रे आहेत. या गटाचे वाचकवर्ग सुमारे ६.६३ कोटी आहे. या समूहाची डिजिटल शाखा, डीबी डिजिटलकडे हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी भाषेत नऊ पोर्टल आणि चार अॅप्स आहेत.
दिव्य मराठी दैनिकची माहिती Divya Marathi Epaper In Marathi
दिव्य मराठीचा इतिहास ( Divya Marathi History In Marathi )
भारतातील सर्वात मोठे मीडिया हाऊस दैनिक भास्कर समूहाने १९५८ मध्ये भोपाळपासून हिंदी आवृत्ती सुरू केली. २००३ मध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुजराती आवृत्ती सुरू केली गेली आणि त्यानंतर २ मे २०११ रोजी औरंगाबाद येथे दैनिक भास्कर समूहाने पुढचे पाऊल उचलले आणि “दैनिक दिव्य मराठी” ( Divya Marathi ) ही मराठी भाषा उदयास आली. ही आवृत्ती सुरू होण्यापूर्वी या समूहाने डोअर-टू-डोअर सर्वेक्षण केले ज्यामध्ये १,४०,००० घरांना भेट दिली गेली आणि ८५,००० प्रतींसह महाराष्ट्रात दैनिक दिव्य मराठी सुरू केली गेली.
प्रथम संपादकीय मंडळ ( First Editorial Board )
रमेश चंद्रजी अग्रवाल यांनी १९५८ मध्ये दैनिक भास्करची सुरूवात मध्य प्रदेशातील भोपाळ येथून केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गिरीश अग्रवाल हे व्यवस्थापकीय संचालक झाले. दैनिक भास्करचे मुख्यालय भोपाळ येथे आहे. दैनिक दिव्य मराठीचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. दैनिक भास्कर समूहाने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा ध्यास न ठेवण्यासाठी “द न्यूयॉर्क टाईम्स” सारख्या दैनिकांसमवेत सामंजस्य करार केला आहे. राज्य संपादकाची धुरा श्री.अभिलाष खांडेकर व श्री.प्रशांत दीक्षित यांनी सांभाळली. पुढे श्री.संजय आवटे हे राज्य संपादक झाले.
वाचकीय दृष्टी:
सामाजिक परिवर्तनासाठी हा सर्वात मोठा मीडिया ब्रँड आहे. वेगवेगळ्या स्थानिक बातम्यांसाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्य मूल्ये वापरली जातात. बातमीतून वाचकाला ज्ञान मिळायला हवे आणि ते इतर वृत्तपत्रांपेक्षा वेगळे असले पाहिजे अशी विभागीय रणनीती आहे.
विशेषतः वाचकांसाठी :
१) राष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, स्थानिक घडामोडी व जिल्हास्तरीय घडामोडींच्या बातम्यांसोबत वाचकांसाठी क्रीडा, रंजन, व्यापार, भूमिका, विविध, देश – विदेश इ. अश्या शीर्षकांखाली माहिती दिलेली असते.
२) आठवड्याची सुरुवात सकारात्मक विचारांनी व्हावी म्हणून दिव्य मराठीने दर सोमवारी “मंडे पॉझिटिव्ह अंक” ही संकल्पना मांडली सोबत “WEALTH” मध्ये गुंतवणूक व त्याविषयीची माहिती दिलेली असते आणि YOUGLE मध्ये शैक्षणिक , नोकरीविषयक तसेच परीक्षांबाबत सदर दिलेले असतात
३) दर मंगळवारी मधुरिमा हे महिलाविषयक सदर छापले जाते .
४) वाचकांसाठी सामाजिक,शैक्षणिक, मनोरंजनपर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात जसे हेल्थ एक्स्पो, प्राउड महाराष्ट्रीयन अवॉर्ड्स, पोलीस अवॉर्ड्स, दिव्य एज्युकेशन फेअर इ. आयोजित केले जातात.त्याचबोबर महिलांसाठी रातरागिणी हा एक महिलांसाठी पुढाकार घेण्यात आला ज्यामध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदवला
५) जिंका १५ कोटी या कार्यक्रमाद्वारे वाचकांसाठी स्पर्धा घेतली जाते त्याचबरोबर वाचकांसाठी वर्षभर अनेक स्पर्धा राबविल्या जातात.
वर्धापनदिन :
२९ मे, २०२१ रोजी दिव्य मराठी म्हणजेच औरंगाबाद आवृत्तीच्या पहिल्या आवृत्तीने त्याचा १० वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहेत.
या सणाबद्दल जरूर वाचा :
दिव्य मराठी दैनिकची स्थापना
२९ मे २०११
दिव्य मराठी दैनिकची प्रकाशक
दैनिक भास्कर वृत्तसमूह