फतेहपुर सिक्री किल्ल्याची संपूर्ण माहिती Fatehpur Sikri Fort Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Fatehpur Sikri Fort Information In Marathi मोगल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेहपुर सिक्री ओळखली जाते. उत्तर प्रदेश राज्यामध्ये असणारे हे ठिकाण आग्रा शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. १५७१ या वर्षी मोगल साम्राज्याची राजधानी म्हणून या शहराला ओळखण्यात येऊ लागले तिथंपासून १५८५ पर्यंत ही मोगल साम्राज्याची राजधानी होती. मात्र नंतर ही राजधानी बदलण्यात आली आणि १६१० मध्ये अकबर राजाने या ठिकाणाचा पूर्णतः त्याग केला होता.

Fatehpur Sikri Fort Information In Marathi

फतेहपुर सिक्री किल्ल्याची संपूर्ण माहिती Fatehpur Sikri Fort Information In Marathi

मोगल साम्राज्याच्या काळामध्ये देखील अनेक किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती त्यातील आज काही किल्ले उभे आहेत तर काही नामशेष झालेले आहेत. मुख्यतः या किल्ल्यांचे स्वरूप दर्गा रुपातच असे. त्यातीलच एक ठिकाण म्हणून फतेपुर सिक्रीला ओळखले जाते. मुघलांची राजधानी असलेले हे शहर आज एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या फतेहपुर सिक्री बद्दल माहिती बघणार आहोत.

नावफतेहपुर सिक्री
नावाचा अर्थगुजरात वरील विजय
निर्माताअकबर
निर्मिती १५७१
ठिकाणउत्तर प्रदेश
ओळखमोगल राजधानी
जवळील ठिकाणआग्रा

फतेहपुर सिक्रीला नाव पडण्यामागील कथा:

या ठिकाणी किल्ला बांधणे पूर्वी शिखरी नावाचे गाव होते जे त्या ठिकाणी स्थलांतरित करून आलेल्या लोकांचे गाव होते. येथे अकबराचा मुलगा जहांगीर जन्माला आला होता त्यामुळे त्याच्या धर्मगुरूंनी सांगितल्यानुसार अकबराला या ठिकाणी एक वास्तू बांधायची होती त्यांनी या ठिकाणी राजवाडा बांधण्यास घेतला.

हे बांधकाम चालू असतानाच त्यांनी गुजरात वर केलेली स्वारी यशस्वी झाली म्हणून त्यांनी आनंदाच्या भरात या ठिकाणाला फतेहपूर असे नाव दिले होते पुढे या ठिकाणाबद्दल आकर्षण वाटू लागल्याने अकबरने या ठिकाणाला आपली राजधानी बनविण्याची घोषित केले.

फतेहपुर सिक्री मध्ये बघण्यासारखी ठिकाणे:

फतेहपूर सिक्री हा किल्ला बघण्यासाठी खूपच छान असून या ठिकाणी एकच पाच मजल्याची इमारत आहे जी त्याकाळी राजवाड्याची इमारत होती. या इमारतीलाच पंचमहाल म्हणून देखील ओळखले जाते. यातील सर्वात वरील किंवा शेवटचा मजला हा घुमटासारखा असून त्याला छत्रीचा आकार प्राप्त झालेला आहे.

त्याकाळी महिलांच्या दृष्टिकोनातून या मजल्याची निर्मिती करण्यात आली होती असे सांगितले जाते. एकूण १७६ खांबांवर आधारलेला हा राजवाडा कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून याच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले आहे.

त्याचबरोबर येथील बुलंद दरवाजा देखील बघण्यासारखा असून १६०१ मध्ये गुजरात वरील विजय उत्सव साजरा करण्याकरिता अकबर बादशहाने या दरवाजाची निर्मिती केली होती. या दरवाजावर अगदी मधोमध एक शिलालेख असून यावर विविध धर्माप्रती असलेली सहिष्णुता या शिलालेखांमध्ये प्रकट होत असते. या एकाच दरवाजाच्या बांधकामा करिता तब्बल बारा वर्षांचा कालावधी लागला होता.

फतेहपुर सिक्री ला जाण्याचे मार्ग:

फतेहपुर सिक्री हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. हे ठिकाण हवाई वाहतूक सोबत देखील जोडले गेलेले असून अगदी ४० किलोमीटर अंतरावर येथे एक विमानतळ आहे. या अंतर्गत तुम्ही या विमानतळावर उतरून टॅक्सीच्या सहाय्याने किल्ल्यावर पोहोचू शकतात.

या ठिकाणी तुम्ही बसच्या माध्यमातून देखील पोहोचू शकता. येथील आग्रा शहरापासून बस सेवा पुरवण्यात येते ज्यामध्ये सिटी बस आणि उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बस यांचा समावेश होतो. त्यानंतर तुम्ही सहजरित्या किल्ल्यावर पोहोचू शकतात.

तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन जाणार असाल तरीदेखील उत्तम रस्त्यांच्या निर्मितीमुळे तुम्ही येथे अगदी आरामात पोहोचू शकता यासाठी तुम्हाला न्यू यमुना एक्सप्रेस वे चा वापर करावा लागेल.

फतेहपुर सिक्री मधील राहण्याची ठिकाणे:

फतेहपुर सिक्री एक उत्तम पर्यटन स्थळ असल्यामुळे वर्षभर येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी कित्येक हॉटेल्स व रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. येथील पुरवण्यात येणाऱ्या सोयीच्या दर्जा नुसार विविध किमतीमध्ये तुम्हाला हॉटेल उपलब्ध होऊ शकतात जे एक दिवसापासून काही दिवसांपर्यंत तुम्हाला सेवा पुरवत असतात. तुम्हाला परवडणाऱ्या किमतीनुसार तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे हॉटेल निवडू शकता व तेथे राहू शकता.

फतेहपुर सिक्री ला भेट दिल्यानंतर तुम्ही येथील काही महत्त्वाची ठिकाणे बघू शकता ज्यामध्ये ९० खाना चा समावेश होतो. हे एक मुघल शैलीमध्ये बनवण्यात आलेले ड्रम हाऊस असून तेथे विविध प्रकारच्या वाद्यांचे व शहनाईचे प्रदर्शन केले जात असे

त्याचबरोबर तुम्ही येथील बुलंद दरवाजा बघू शकता जो अकबराने गुजरातच्या विजयाचे प्रतीक म्हणून बांधला होता. लाल दगडापासून बनवण्यात आलेला हा बुलंद दरवाजा त्याच्या नक्षीकामासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर येथे  न्यायालय, पंचमहल, मरियम जमाने पॅलेस, यांसारखी ठिकाणी देखील बघण्यासारखी आहेत।.

निष्कर्ष:

पूर्वीच्या काळी किल्ले हे साम्राज्याच्या समर्थाचे प्रतीक म्हणून ओळखले जात असत त्यामुळे अनेक लोकांनी नवनवीन किल्ले बांधण्यासह जुने किल्ले जिंकण्यास देखील भर दिला होता. असाच एक किल्ला म्हणून फतेहपूर सिक्रीला ओळखले जाते जो अकबर बादशहाने आपल्या राजधानीच्या मानसातून बांधला होता.

त्या ठिकाणाचे नाव सिकरी असे होते मात्र या बादशहाने गुजरातवर विजय मिळाल्यानंतर या ठिकाणाला फतेहपुर असे नाव दिले त्यामुळे हे ठिकाण फतेहपुर सिक्रिया नावाने ओळखले जाऊ लागले. आजच्या भागामध्ये आपण या फतेहपुर सिक्री बद्दल माहिती बघितली असून त्यामध्ये या ठिकाणाला नाव कसे पडले? तेथील ठिकाणाचा इतिहास काय आहे?

राजधानी म्हणून या शहराचा किंवा ठिकाणाचा त्याग करण्यामागे काय कारण आहे? या ठिकाणावरील बघण्यासारख्या गोष्टी, आसपासची पर्यटन स्थळे, येथील बुलंद दरवाजा, फतेहपुर सिक्रीला जाण्याचा मार्ग आणि तेथे राहण्याच्या सोयी इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली आहे.

FAQ

फतेहपुर सिक्री हे ठिकाण कोठे वसलेले आहे?

फतेहपुर सिक्री हे ठिकाण उत्तर प्रदेश मध्ये वसलेले असून आग्रा या ठिकाणापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर हे शहर आहे.

फतेहपुर हा किल्ला कोणा द्वारे बनवण्यात आला होता व का बनवण्यात आला होता?

अकबर बादशहा याने सिक्री या ठिकाणी एक किल्ला उभारला होता ज्या ठिकाणी राजधानी बनवण्याचा त्याचा मानस होता यादरम्यान त्यांनी गुजरातवर स्वारी केली व त्यामध्ये तो विजयी झाला त्यामुळे या ठिकाणाचे नाव त्याने फतेहपूर असे केले जेणेकरून आजपर्यंत या ठिकाणाला फतेहपुर सिक्री या नावाने ओळखले जाते.

१९९९- २००० यावर्षी पुरातत्त्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार फतेहपुर सिक्री बाबत काय माहिती आढळून आली?

१९९९- २००० या वर्षी पुरातत्व विभागाने फतेहपुर सिक्री या ठिकाणी सर्वेक्षण व उत्खनन केले होते ज्या अंतर्गत हा किल्ला उभारण्याऐवजी या ठिकाणी एक गाव वसलेले होते तिथे एक मंदिर तसेच व्यावसायिक केंद्र देखील होते असे सांगितले गेलेले आहे.

अकबर बादशहा ने फतेहपुर सिक्रीला कायमचे सोडून देण्यामागे काय कारण होते?

काही संदर्भानुसार असे सांगितले जाते की फत्तेपूर शहरांमध्ये पाणीपुरवठा अतिशय दूषित येत होता म्हणून अकबराने हे ठिकाण सोडले होते मात्र काही इतिहासकार असे देखील सांगतात की या किल्ल्याचे अतिशय निवांत काम केल्यामुळे अकबराच्या पसंतीस काम उतरले नव्हते म्हणून त्याने १६१० यावर्षी हे ठिकाण सोडले होते.

फतेहपुर सिक्रि या किल्ल्याच्या बांधकामाकरिता कोणत्या प्रकारचा दगड वापरण्यात आलेला आहे?

फतेहपूर सिक्री या किल्ल्याच्या बांधकामा करिता लालवाळूच्या दगडाचा वापर करण्यात आलेला आहे.

Leave a Comment