अग्निशमन दलाची संपूर्ण माहिती Fire Brigade Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Fire Brigade Information In Marathi कुठेही आग लागली की आपण सहजतेने फायर ब्रिगेडला बोलावतो. मात्र या फायर ब्रिगेड विषयी बऱ्याच जणांना माहिती नसते, की फायर ब्रिगेडला फोन कसा करावा, त्यांचे कार्य कसे चालते, याबाबत अनेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण या फायर ब्रिगेड विषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग आजच्या या माहितीच्या प्रवासाला सुरुवात करूयात…

Fire Brigade Information In Marathi

अग्निशमन दलाची संपूर्ण माहिती Fire Brigade Information In Marathi

नावफायर ब्रिगेड
प्रकारनागरिकांच्या सेवेसाठीची संस्था
कार्यआगीच्या ठिकाणी त्वरेने पोहोचून ती विझवणे
साहित्यपाण्याची गाडी, फायर extinguisher, वाळूच्या बादल्या, शिड्या इत्यादी

अग्निशमन दल अर्थात फायर ब्रिगेड म्हणजे काय?

कुठल्याही ठिकाणी आग लागली असता संपत्ती किंवा जीवित हानी होण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी आगीला नियंत्रणात आणून होणारे संभाव्य नुकसान टाळण्याची जबाबदारी घेणाऱ्या दलाला फायर ब्रिगेड असे म्हटले जाते. यांचे मुख्य कार्य आगीचे वाढते स्वरूप आटोक्यात आणतानाच होणारी जीवित हानी वित्तहानी रोखणे हे असते.

अगदी छोटीशी जरी आग लागली तरी आपल्यातील अनेक जण त्या ठिकाणी जाण्यास किंवा बचाव कार्य करण्यास घाबरतात. मात्र मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये लागणाऱ्या आगेमध्ये देखील आपला जीव धोक्यात घालून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्निशमन दल म्हणून ओळखले जाते. त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण आणि आग विझविण्याचे तंत्रज्ञानात पुरविलेले असते, जेणेकरून आग अगदी सहजतेने विझवू शकतात.

अग्निशामकलाचे जवान हे अनेक प्रकारच्या जोखमा घेण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे त्यांना या कामामध्ये निपुणता प्राप्त झालेली असते. या अग्निशमन कामी त्यांना अनेक वजनदार गोष्टी लागतात. ज्यामध्ये शिडी, श्वास घेण्यासाठी चे ऑक्सिजन सिलेंडर, आणि त्यासाठीची इतर सामग्री. तरीदेखील ते आपले काम अतिशय चपळाईने करत असतात.

आग विझविण्याकरिता अनेक प्रकारच्या पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो. ज्यामध्ये पाणी, इंधन, विविध प्रकारची ऑक्सीडेंट, तसेच विविध वायू देखील वापरले जातात. तसेच ज्या घटकांमुळे आग पकडली जाऊ शकते असे घटक त्वरेने दूर करण्याचे कार्य देखील हे जवान करत असतात. जसे की गॅस टाकी, पेट्रोल किंवा तत्सम पदार्थांचे कॅन इत्यादी.

अग्निशमन दलाचे कार्य कशा पद्धतीने चालत असते:

जेव्हा आपण अग्निशमन दलाला फोन करतो त्यावेळेस केंद्रीय अग्निशमन कार्यालयाला त्याची सूचना मिळते. आग कुठे आहे त्यानुसार जवळील अग्निशमन दलाला माहिती दिली जाते. आणि लगेचच हे अग्निशमन दल त्या घटनास्थळी रवाना होते. शक्य तेवढ्या लवकर पोहोचता यावे म्हणून ॲम्बुलन्स प्रमाणे देखील सायरन वाजवत असते. नियमानुसार कुठल्याही आगीची माहिती मिळाल्यास अग्निशमन दलाने किमान दोन मिनिटांमध्ये सदर घटनास्थळी रवाना व्हायला पाहिजे, अन्यथा त्यांना योग्य कारण देणे बंधनकारक असते.

घटनास्थळी ट्रक पोहोचण्यास उशिरा लागू शकतो, त्यामुळे या दलातील काही जवान मोटारसायकली द्वारे आग विझविण्याची साधने नेऊन लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात.

काही ठिकाणी आग विझवण्याकरिता पाण्याचा वापर करता येत नाही, अशावेळी ही आग विझविण्यासाठी अग्निशमन ट्रकमध्ये फोम देखील असतो. ज्याद्वारे प्लास्टिकच्या आगीसारख्या आगी विजवल्या जाऊ शकतात.

अग्निशमन कार्यासाठी लागणारे उपकरणे:

कुठलीही आग बिझवायची असेल तर त्यासाठी काहीतरी उपकरण आवश्यक हे असतेच. अन्यथा त्या आगीपासून वीझविणाराच्या जीविताला धोका निर्माण होण्याची संभाव्यता असते. अग्निशमन दल देखील बऱ्याच प्रकारचे उपकरणे आणि साधने वापरत असते. ज्यामध्ये बरीच विविधता आढळत असली, तरी देखील काही उपकरणे ही सर्वत्र समान असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी, मित्रांनो कुठल्याही ठिकाणी आग लागल्यानंतर जर ट्रक मध्ये पाणी भरून निघायचे ठरल्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे अग्निशामन दलाची वाहने ही आग विझविण्याची साधने आणि पाणी यांनी नेहमीच सज्ज असतात.

तसेच त्यांच्याकडे फायर डिटेक्शन उपकरणे व अलार्म सिस्टम देखील असते. त्यामुळे आगीचे मूळ शोधता येते, आणि वाढत जाणारी आग आटोक्यात आणली जाऊ शकते. मित्रांनो आगीच्या ठिकाणी प्रचंड धूर असतो, त्यामुळे प्रत्येक जवान एकमेकांना बघू शकेल किंवा संवाद साधू शकेल असे नसते. त्यामुळे जलद संवाद साधता यावा याकरिता त्यांच्याकडे रेडिओ, वाकी टाकी, ध्वनीचलित फोन, लँडलाईन, ब्रॉडकास्टिंग, सेल फोन, किंवा मोबाईल फोन यासारखी संप्रेषण उपकरणे देखील असतात.

तसेच आग विझवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्यासह इतरही अग्निशमक पदार्थ या दलाकडे असतात. यामध्ये फोम, कार्बन-डाय-ऑक्साइड, अनेक प्रकारच्या रासायनिक पावडरी, आणि वाळू यांचा समावेश होतो. तसेच अंधाराच्या वेळी आग विझविण्याचा प्रसंग आल्यास इमर्जन्सी लाईट, पाण्याचा स्त्रोत, वाळूच्या बादल्या, आगीचा भाग तोडण्यासाठी फावडे, किंवा हातोडे अथवा कटर, मानवी आग विण्याकरिता ब्लॅंकेट, इत्यादी साधने देखील उपलब्ध असतात.

निष्कर्ष:

आग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच फायर ब्रिगेड ची गाडी येते. मात्र इतर वेळी आपल्याला कधीही या फायर ब्रिगेड ची आठवण होत नाही, की त्याच्या कर्मचाऱ्यांबद्दल देखील आठवत नाही. म्हणून बऱ्याच लोकांना या फायर ब्रिगेड बद्दल प्राथमिक माहिती देखील नसते. याच्यासाठी आज आपण या लेखांमध्ये ही माहिती घेतलेली आहे.

या माहितीमध्ये तुम्हाला अग्निशमन अर्थात फायर ब्रिगेड म्हणजे काय, त्यांचे कार्य कसे चालते, ते काय काय उपकरणे वापरतात, तसेच त्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षण दिलेले असते, यादरम्यान ते कोणत्या प्रकारची कपडे वापरतात, व संप्रेषण उपकरणे काय असतात, आग शमविण्यासाठी कोणत्या प्रकारचे अग्निशामक पदार्थ वापरले जातात, याविषयी इत्यंभूत माहिती बघितलेली आहे. तसेच आग विझवण्याची जी काही मूलभूत तंत्रज्ञान आहे त्याविषयी देखील माहिती घेतलेली आहे.

FAQ

भारत देशामधील सर्वात पहिले फायर ब्रिगेड कोणते स्थापन करण्यात आले होते?

भारतातील सर्वात प्रथम स्थापन करण्यात आलेल्या फायर ब्रिगेडचे नाव बॉम्बे फायर ब्रिगेड असे होते. ते १८५५ मध्ये स्थापन करण्यात आले असून पोलीसच अर्धवेळ फायर ब्रिगेडचे काम करत असत. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सांगितल्यानुसार अग्निशामक दलामध्ये घोड्यांच्या ताफ्याचा देखील समावेश करण्यात आला होता.

अग्निशामन दलाचे कार्य किंवा भूमिका काय असते?

मित्रांनो, त्यांच्या परिसरात लागणाऱ्या कोणत्याही आगी विझवीने, स्थानीय ज्वलनाच्या घटनेतून लोकांना वाचवणे, व त्यांच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण करणे, आग लागू शकेल अशी परिस्थिती जिथे असेल त्या ठिकाणी आधीच थांबून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे इत्यादी.

अग्निशामन दला बद्दल थोडक्यात काय माहिती सांगता येईल?

मित्रांनो, अग्नी म्हणजे आग तर  शमन म्हणजे विझवणे होय. यावरून अग्निशमन दल असे नाव पडण्यात आलेले आहे. अग्निशमन दलाला कॉल केल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचून आगीची परिस्थिती नियंत्रणात आणत असतात.

आग विझवण्यासाठी कोणकोणत्या मूलभूत अग्निशमन तंत्रांचा वापर केला जातो?

आग विझविण्याकरिता थेट आक्षेप तंत्र, अप्रत्यक्ष आक्षेप तंत्र, कॉम्बिनेशन आक्षेप तंत्र, आणि धुके आकुंचन तंत्र इत्यादी प्रकारचे तंत्र वापरले जातात.

आग विझविण्याकरिता कोणत्या मूलभूत अग्निशमन उपकरणांचा वापर केला जातो?

आग विझविण्याकरिता उपयोग केल्या जाणाऱ्या मूलभूत अग्निशमन उपकरणांमध्ये फायर डिटेक्शन उपकरणे, व अलार्म सिस्टम संप्रेषण उपकरणे, अग्निशामक पदार्थ, आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी यांचा समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण अग्निशमन दल अर्थात फायर ब्रिगेड याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच यातील कोणती माहिती तुमच्यासाठी नवीन होती हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. तसेच तुमच्या इतरही मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा. जेणेकरून संकटकाळी आग लागली असता त्यांना फायदा होईल.

 धन्यवाद…

Leave a Comment