जवस वनस्पतीची संपूर्ण माहिती Flax Seed Information In Marathif

Flax Seed Information In Marathi उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्र सह अनेक भागांमध्ये हमखास बनवली जाणारी चटणी म्हणजे जवसाची चटणी होय. अतिशय चवदार स्वरूपाची ही चटणी खाण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असे. चवीला छान असणारी ही जवसाची चटणी तसेच आरोग्यदायी देखील असते.

Flax Seed Information In Marathi

जवस वनस्पतीची संपूर्ण माहिती Flax Seed Information In Marathi

जवस या छोट्याशा दिसणाऱ्या बिया स्वरूप अन्नामध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी घटक आढळून आलेले आहेत. ज्या अंतर्गत विविध आजारांवर मात देखील केली जाऊ शकते. या जवसामध्ये तेल उपलब्ध असले तरी देखील हृदयविकार रोखण्याबरोबरच लठ्ठपणा कमी करण्यामध्ये देखील हे तेल खूपच फायदेशीर समजले जात असते.

त्यामुळे आजकाल अनेक लोक या जवसाच्या माध्यमातून आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या स्निग्ध पदार्थांची पूर्तता करताना दिसत आहेत. आरोग्यदायी असल्यामुळे या पदार्थाची कुठलीही साईड इफेक्ट शरीराच्या विविध अवयवांवर दिसून येत नाहीत.

त्यामुळे आजकाल अनेक आहार तज्ञाकडून या जवसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात आहे, व मधुमेही लोकांसाठी देखील हे जवस अतिशय उत्तम असून, यामुळे कर्करोगाचा देखील धोका कमी होतो, असे विविध संशोधनाअंती सिद्ध देखील झालेले आहे.

जवस हे एक तेलवर्गीय पीक असून, जिरायती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जात असते. अतिशय कमी पाण्यामध्ये येणारे हे पीक स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचा भरगच्च खजिना समजले जाते. आजच्या भागामध्ये आपण जवस या वनस्पतीची आणि त्याच्या फायद्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत…

नावजवस
प्रकारखाद्यपदार्थ
उपलब्ध घटकस्निग्ध पदार्थ आणि प्रथिने
उपप्रकारतेलवर्गीय बियाणे
उपयुक्तताहृदयरोग आणि लठ्ठपणा समस्येवर उपाय
रंगतपकिरी
ओळखकोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त
अँटिऑक्सिडेंट लीग्नन्स

जवस म्हणजे काय:

जवस म्हणजे एक केलवर्गीय वनस्पतीचे बियाणे असून, मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती म्हणून देखील याचा वापर केला जात असतो? करड्या रंगाचे बियाणे अतिशय चवदार देखील समजले जाते. त्याचबरोबर या वनस्पतीच्या धाग्यांचा वापर करून कापड, दोरी इत्यादी घटक देखील बनवले जाऊ शकतात. 

विविध प्रजातीनुसार या जवसाच्या बियाण्याचे रंग वेगवेगळे असतात, ज्यामध्ये करडा, तपकिरी, लाल, पांढरा, आणि पिवळा इत्यादी रंग असतात. मोठ्या प्रमाणावर या जवसाच्या बियाण्यापासून तेल निर्माण केले जात असते. या तेलाचे सेवन आरोग्याशी जागरूक असणाऱ्या लोकांकडून केले जात असते. अंदाजे दोन ते तीन फूट उंच वाढणारे हे वनस्पती उष्ण हवामानामध्ये चांगल्या रीतीने उगवत असतात.

जवसामधील पोषक तत्व:

जवस हे शरीरासाठी अनेक पोषक तत्त्वांनी युक्त असून, त्यामध्ये थाईमीन, मॅग्नेशियम, फायबर, मॅंगनीज यांसारखे अनेक घटक आहेत.

जवस खाण्याचे फायदे:

जवस खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी देखील हृदयाच्या आरोग्य संदर्भात अतिशय उपयुक्त म्हणून जवस ओळखले जाते. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर घातक घटक असून, त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याबरोबरच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढत असते.

त्यामुळे या तेलाला पर्याय म्हणून जवसाचे तेल अतिशय उत्तम समजले जाते. या मध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त समजले जात असतात. त्याचबरोबर या जवसाचा वापर रजोनिवृत्तीच्या काळामध्ये केल्यास शरीरासाठी खूपच फायदेशीर बदल दिसून येत असतात.

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतानाच शरीराचे वजन देखील नियंत्रणात आणण्यासाठी जवस खूपच फायदेशीर असून, या मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट कर्करोगाशी लढत, शरीराला समर्थ करत असतात. मधुमेही रुग्ण देखील या जवसाचे सेवन करू शकत असतात. जवसाच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते, व बद्धकोष्ठतेच्या समस्येवर देखील मात केली जाऊ शकते. शरीरामध्ये तयार झालेले विविध टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी देखील जवस खूपच फायदेशीर समजले जाते.

जवस सेवनाचे तोटे किंवा दुष्परिणाम:

अति प्रमाणात जवस सेवन केल्यानंतर ते शरीरासाठी देखील फायदेशीर राहत नाही. स्तनपान करणाऱ्या माता व गर्भवती महिला यांना देखील या जवसाचे सेवन निशिद्ध सांगितलेली आहे.

जवस खात असाल तर त्याबरोबर अधिक प्रमाणात पाणी देखील पिले गेले पाहिजे, अन्यथा शरीरातील अंतर्गत अवयव आणि आतडे यांना त्रास जाणवू शकतो. त्याचबरोबर पायांना देखील त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक लोकांना जवसाच्या सेवनामुळे एलर्जीची समस्या देखील दिसून येत असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने अधिक प्रमाणात याचे सेवन करू नये.

जवस हे शरीरातील मल बाहेर काढून टाकण्यासाठी अर्थात बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ओळखले जात असले, तरी देखील पचनाच्या आधीच जर शरीरातील विविध मल बाहेर काढून टाकला, तर त्यामध्ये असणारे पोषक घटक शरीरामध्ये लवकर शोषून घेतले जात नाहीत. आणि यामुळे शरीरातील पोषक द्रव्यांच्या कमतरतेला सुरुवात होत असते. तसेच त्यामुळे व्यक्तीला नेहमीच गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन देखील वाटू शकते.

ज्या रुग्णांना डॉक्टरांनी रक्त पातळ होण्याचे औषधे सुरू केले असतील, अशा रुग्णांनी जवसाचे सेवन करण्यापूर्वी सदर डॉक्टरांना विचारणे गरजेचे ठरते. अन्यथा शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची शक्यता देखील निर्माण होते.

निष्कर्ष:

रोजच्या आहारामध्ये अनेक प्रकारच्या घटकांचा समावेश असला, तरी देखील फार क्वचित खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये जवस सारख्या पदार्थांचा समावेश होत असतो. मुख्यतः जवसाची चटणी करून त्याचे सेवन केले जात असते. अनेक ठिकाणी या जवसाचे तेल देखील स्वयंपाकासाठी वापरले जात असते, मात्र त्या तेलाची किंमत जराशी महाग असल्यामुळे मुख्यतः आरोग्याशी जागृत असणाऱ्या लोकांकडूनच हे तेल सेवन केले जात असते.

करड्या रंगाचे जवसाचे बियाणे चवीला देखील अत्यंत उपयुक्त असून, रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी देखील या जवसाला ओळखले जाते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्याबरोबरच हृदयाच्या विविध समस्या देखील नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात. या जवस बियाण्यामध्ये उपलब्ध असणारी एंटीऑक्सीडेंट, कॅन्सर सारख्या आजारांपासून देखील शरीराचे लक्षण करत असतात.

सोबतच या बियाण्याच्या आवरणामध्ये आढळणारे तंतुमय पदार्थ पोट साफ करण्यास अत्यंत फायदेशीर असतात. आजच्या भागामध्ये आपण या जवस बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. त्या अंतर्गत जवस म्हणजे काय, या जवस बियाण्यातील पोषक घटक, जवसाच्या सेवनाचे विविध फायदे, तसेच होणारे काही दुष्परिणाम किंवा तोटे देखील बघितलेले आहेत. जवस खाण्याची योग्य वेळ, योग्य पद्धत, आणि योग्य प्रमाण याबद्दल देखील माहिती बघितलेली आहे.

FAQ

जवस वनस्पती कोणत्या गटातील वनस्पती म्हणून ओळखली जाते?

जवस वनस्पती ही एक तेलवर्गीय गटातील वनस्पती असून, त्यामध्ये प्रथिनांची देखील संख्या आढळून येत असते.

जवस खाण्यामुळे शरीराला कोणकोणते फायदे होत असतात?

जवस खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल मर्यादित राहण्याबरोबरच रक्तातील साखरेचे प्रमाण देखील मर्यादित ठेवले जाते. सोबतच यातील विविध घटक कॅन्सर सारख्या आजारांना देखील शरीरापासून दूर ठेवत असतात. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवणे, हाडे मजबूत करणे, पोट साफ करणे, इत्यादी विविध कार्यासाठी हे जवस ओळखले जात असते.

जवस या बियांमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट कोणत्या नावाने ओळखले जाते?

जवसाच्या बियाण्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट लिग्नांस या नावाने ओळखले जात असते. ज्याच्यामुळे कॅन्सर साठीचा धोका कमी केला जाऊ शकतो.

एक चमचा जवसामध्ये फायबर्स ची संख्या किती असते?

एक ग्राम जवसाच्या बियाण्यामध्ये सुमारे तीन ग्राम फायबर्स असतात असे सांगितले जाते.

जवसाच्या सेवनामुळे काही नुकसान देखील होऊ शकते का?

जवस हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असण्याबरोबरच विविध पोषक घटकांनी अतिशय समृद्ध असते. त्यामुळे जास्त प्रमाणात या जवसाचे सेवन केले असता अनेक लोकांना पोटदुखी, वायुदोष, अतिसार, आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दिसू शकतात.

Leave a Comment