वन वनवा विषयी संपूर्ण माहिती Forest Fire Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Forest Fire Information In Marathi आग ही अशी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी सुंदर जेवण देखील बनवू शकते, तर क्षणार्धात सर्व सृष्टीचा नाश देखील करू शकते. त्यामुळे आगीचा खेळ कोणीही करू नये असे सांगितले जाते. चांगल्या कामासाठी वापरली असता ही आग फायदेशीर असली, तरी देखील काही वेळेला ही आग अतिशय रौद्र स्वरूप धारण करत असते. त्यामुळे आग ही देवस्वरूप समजली गेलेली आहे.

Forest Fire Information In Marathi

वन वनवा विषयी संपूर्ण माहिती Forest Fire Information In Marathi

निसर्गामध्ये अचानक काही कारणास्तव आग लागत असते, ज्यामध्ये काही कारणे मानवनिर्मित असतात, तर काही कारणे निसर्गतः निर्माण झालेली असतात. मात्र एकदा जंगलामध्ये आग लागली की ती आटोक्यात आणणे फार अवघड कार्य असते. या प्रकारच्या आगीला वनवा म्हणून ओळखले जाते.

वनवा लागल्यानंतर कित्येक एकर क्षेत्रावरील जंगल नाश पावत असते  भारताच्या तुलनेत विकसित देशांमध्ये या प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत असतात. ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील मोठा परिणाम दिसून येत असतो. त्याचबरोबर निसर्गाला हानी पोहोचते ती वेगळीच. आजच्या भागामध्ये आपण या वन वनवा या विषयावर संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाववन वनवा
इतर नावजंगलातील आग
इंग्रजी नावफॉरेस्ट फायर
स्वरूपजंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागणे
नुकसानकित्येक एकर जंगल क्षेत्र खाक होणे
कारणेमानवनिर्मित तसेच नैसर्गिक

जंगलातील आग म्हणजे काय:

जंगलातील आग म्हणजे कोणत्याही कारणामुळे वनांना मोठ्या प्रमाणावर लागलेली आग असते. यामध्ये काही वेळा जाणून-बुजून लागलेली आग तर काही वेळेला नैसर्गिक स्वरूपाने लागलेली आग असे प्रकार असतात. लवकर लक्षात आले तर ही आग आटोक्यात आणली जाते.

तरीदेखील आटोक्यात आणण्यापर्यंत या आगीने फार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक नुकसान केलेले असते. त्यामुळे जंगलातील आग ही मानवाच्या तसेच संपूर्ण निसर्गाच्या दृष्टीने एक नैसर्गिक आपत्ती म्हणून ओळखली जाते.

जंगलातील आग लागण्याची कारणे:

जंगलामध्ये आग लागण्याचे अनेक कारणे असतात. ज्यामध्ये मानवनिर्मित कारणे आणि नैसर्गिक कारणे असे दोन विभाग केले जातात.

मुख्यतः जंगलातील आगी या नैसर्गिक कारणांनीच लागत असतात. ज्यामध्ये झाडांच्या दोन फांद्यांमध्ये घर्षण होऊन उष्णता निर्माण होणे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पानझडी वनांमध्ये पडलेल्या पानांमध्ये उष्णतेने पेट घेणे, अतिशय उच्च तापमान, तसेच आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तरी देखील या आगी लागू शकतात. एखादी ठिणगी देखील या आगेसाठी कारणीभूत ठरत असते.

मानव निर्मित कारणांमध्ये मानवाचा निष्काळजीपणा हा फार मोठा घटक असून, अनेक लोक वनांच्या कडेने जाताना बिडी, सिगारेट, यांसारख्या घटकांचे थोटूक पेटलेले असतानाच जंगलामध्ये फेकतात. त्यामुळे वाळलेला पाला पेट घेतो, आणि त्याचे रूपांतर मोठ्या आगेमध्ये होते. त्याचबरोबर काही विघ्न संतोषी लोक जाणून बुजून देखील जंगलांना आग लावत असतात.

जंगलातील आगीमुळे होणारे परिणाम:

जंगलातील आगीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम हा पर्यावरण संस्थेवर होत असतो. आगीमुळे आसपास असणारा परिसर मोठ्या प्रमाणावर उष्ण होत असतो, त्यामुळे हवेमध्ये अनेक विषारी वायू देखील मिसळत असतात. प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणावर होत असते, त्या ठिकाणी राहणारे प्राणी आणि इतरही सजीव यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. आणि त्यांना काही समजण्याच्या आतच ते मृत्युमुखी देखील पडू शकतात.

काही जंगलांमध्ये अतिशय दुर्मिळ प्रकारच्या वृक्षांची संख्या असते, अशा जंगलातील आगीमुळे काही वेळेला या प्रजाती नामशेष देखील होऊ शकतात. ज्या ठिकाणी वनवा लागला असेल तेथे बरेच दिवस मातीची धूप देखील होत असते.

प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. आसपासच्या सर्व विभागांमध्ये धूर पसरल्यामुळे येथे दिसण्याचे प्रमाण देखील कमी होते. त्याचबरोबर कार्बन डाय ऑक्साईड सारखे वायू पसरल्यामुळे बचाव कार्य करायला जाणाऱ्या जवानांना देखील फार मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

जंगलातील आग रोखण्याचे काही प्रतिबंधात्मक उपाय:

  • जंगलातील आग ही संपूर्ण मनोसृष्टीसह इतरही प्राण्यांच्या दृष्टीने घातक असते. त्यामुळे या आगीला प्रतिबंध घालणे फार गरजेचे ठरते. त्यासाठी काही उपाययोजना देत आहोत.
  • सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून जंगलासारख्या क्षेत्रांना प्रतिबंधित केले पाहिजे, त्याचबरोबर आवश्यक त्याच व्यक्तींना जंगलामध्ये प्रवेश दिला पाहिजे.
  • जंगलातील वाळलेल्या काडीकचरा एकतर कंपोस्ट खतामध्ये रुपांतरीत केला पाहिजे, किंवा बाहेर तरी काढला पाहिजे.
  • जंगलाच्या ठिकाणावरून वीज वाहतूक करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
  • प्रशिक्षित कामगारांच्या मार्फत ठराविक अंतराने जंगलाची तपासणी देखील केली केली पाहिजे.
  • जळण्यासाठी असणारी इंधन जंगलाच्या विभागात साठवू नये.
  • जंगलामध्ये ये जा करण्याकरिता वापरण्यात आलेल्या गाड्या, तसेच लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्य रीतीने सर्विसिंग केली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या मधून देखील कुठल्याही प्रकारची ठिणगी जंगलामध्ये पडणार नाही.
  • जंगलामध्ये पर्यटनाला जाताना पर्यटकांना योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. तसेच त्या सूचनांची काटेकोर पालन व्हावे याकरिता योग्य व्यक्तीने अशा पर्यटकांसोबत असले पाहिजे.

निष्कर्ष:

आग म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण होत असते. आग ही मानवाच्या दररोजच्या वापरामध्ये अतिशय उपयुक्त ठरत असली, तरी देखील काही वेळेला ही आग रौद्र स्वरूप धारण करत असते. अगदी गावा-शिवारांमध्ये देखील काही ठिकाणी उसासारख्या पिकाला आग लागत असते.

ही आग मानवाच्या दृष्टीने फार मोठी आणि घातक असते, तर मग वनामध्ये लागलेली आग किती भयंकर स्वरूप धारण करत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. त्याचबरोबर विविध ठिकाणी इमारतींना देखील आग लागत असते. अशा ठिकाणी देखील मोठी जीवित व वित्तहानी होत असते. जंगल ही निसर्गाची साधनसंपत्ती आहे. मात्र या आगीमध्ये या साधन संपत्तीचा फार मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतो.

जो पुढील कित्येक वर्षात देखील भरून निघत नाही. आजच्या भागामध्ये आपण या वनव्याबद्दल किंवा जंगलातील आगे बद्दल माहिती बघितलेली असून, त्यामध्ये या वनव्याची कारणे, हा वनवा म्हणजे नेमकं काय असते, त्याचे काय काय परिणाम दिसून येतात, तसेच निसर्गावर वनव्याचे जाणवणारे विविध परिणाम, या आगीला आटोक्यात आणण्याचे उपाय, तसेच यामुळे होणारे विविध प्रकारचे प्रदूषण, इत्यादी प्रकारची माहिती बघितली आहे.

FAQ

वन वनव्याला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

वन वनव्याला इंग्रजी मध्ये फॉरेस्ट फायर या नावाने ओळखले जाते.

जंगलातील आग अर्थात वनवा म्हणजे नेमके काय?

जंगलातील आग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, मोठ्या प्रमाणावर जंगलातील झाडांना लागलेली आग असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष संसाधनाचे नुकसान होत असते. त्याचबरोबर येथे असणाऱ्या अनेक प्राणी व इतर सजीवांना देखील आपले जीवन गमवावे लागते.

जंगलातील आग लागण्यामागे अनेक कारणे असतात, या कारणांना कोणत्या दोन गटांमध्ये वर्गीकृत केले जाते?

वनव्याच्या विविध कारणांना मानवनिर्मित कारणे, आणि नैसर्गिक किंवा प्राकृतिक कारणे या दोन गटांमध्ये वर्गीकृत केले जाते.

जंगलातील आगीचे स्वरूपावरून कोणकोणते दोन प्रकार पडत असतात?

जंगलातील आगीचे स्वरूपावरून दोन प्रकार पडत असतात. ज्यामध्ये नियंत्रित आग, आणि अनियंत्रित आग या दोन प्रकारांचा समावेश होतो.

जंगलातील आग लागण्यामागे कोणकोणते कारण असतात?

जंगलातील आग लागण्यामागे आकाशातून पडणारी वीज, ज्वालामुखीचे उद्रेक, कोळसा,  झाडांच्या घर्शनामुळे होणारी आग, आणि मानवाच्या विविध गोष्टींमुळे लागणारी आग इत्यादी कारणांचा समावेश होतो.

Leave a Comment