फळां विषयी संपूर्ण माहिती Fruits Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Fruits Information In Marathi मित्रांनो, आपल्या आसपास अनेक फळे आढळून येत असतात. विविध ऋतूनुसार विविध फळे पिकण्याचा कालखंड देखील वेगळा असतो, आणि त्या विशिष्ट ऋतूमध्ये ती फळे खाल्ली असता शरीराला फायदेशीर ठरत असतात. मात्र हीच फळे दुसऱ्या ऋतूमध्ये खाल्ल्यास त्यापासून शरीराला अपाय देखील होत असतो. ही निसर्गाची अतिशय योग्य रचना असून, निसर्गाची एक वेगळी किमयाच म्हणावी लागेल.

Fruits Information In Marathi

फळां विषयी संपूर्ण माहिती Fruits Information In Marathi

शरीरात वेगवेगळ्या ऋतूनुसार ज्याप्रमाणे बदल होत असतात, तशी शरीराची आवश्यकता देखील बदलत असते. आणि त्या आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी विविध फळे निसर्गामध्ये पिकत असतात. फळांचा राजा असलेला आंबा अगदी उन्हाळ्यातच पिकतो.

ज्यावेळी शरीराला त्या आंब्याची फार गरज असते. मात्र हिवाळा अथवा पावसाळ्यामध्ये या आंब्याच्या सेवन केल्यास अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये ऊर्जा प्रदान करणारे आणि शरीराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या फळांची गरज असते. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये पचायला जड असणारे आणि भरपूर ऊर्जा देणारे फळे उन्हाळ्यामध्ये खाऊन चालत नाही. फळांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर असून, त्यामुळे सौंदर्य देखील वाढत असते.

त्यासोबतच माणूस दीर्घायुषी होण्याबरोबरच शरीरावरील सुरकुत्या देखील कमी होत असतात. अनेक पोषक तत्व आणि जीवनसत्त्व इत्यादींनी युक्त असणारे ही फळे सर्वात जास्त फायबरचे प्रमाण असणारी असतात, त्यामुळे पचन देखील सहजतेने होण्यास मदत मिळत असते.

ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल, अशा लोकांनी नेहमी फळे खावेत असा सल्ला दिला जातो. कारण या फळामुळे वजन वाढत नसले, तरी देखील शरीराला आवश्यक असणाऱ्या ऊर्जेची पूर्तता केली जाऊ शकते. विविध प्रकारचे आजार, जसे की कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, उष्माघात, यांचा सारख्या आजारांवर प्रभावी उपाय म्हणून फळांना ओळखले जात असते. त्याचबरोबर किडनीची समस्या, अपचन, बद्धकोष्ठता, इत्यादी गोष्टींसाठी देखील फळे फार मोठ्या प्रमाणात ओळखले जातात. आजच्या भागामध्ये आपण विविध फळांविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

फळांमध्ये असणारे घटक:

मित्रांनो, आजारी व्यक्तीला दिली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळे होय. फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळून येत असतात. मिश्र स्वरूपातील फळे खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक घटकांची उपलब्धता करून देण्यास मदत मिळत असते.

विविध प्रकारच्या मुख्य घटकांमध्ये कर्बोदके, लोह, प्रथिने, विविध प्रकारचे फायबर्स, आणि अँटिऑक्सिडंट इत्यादी घटक आढळत असतात. त्याचबरोबर विविध स्वरूपाची खनिजे जसे की मॅंगनीज, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, आढळत असतात.

जीवनसत्व देखील या फळांमध्ये भरपूर प्रमाणात असून, त्यामध्ये जीवनसत्त्व ब कॉम्प्लेक्स, क, इ आणि डी इत्यादी मोठ्या प्रमाणात आढळत असतात. त्याचबरोबर शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी मिश्र फळांची सेवन करणे सुचविले जाते. या फळांमध्ये असणारे फायबर अतिशय उत्तम असून, बद्धकोष्ठता दूर करण्याबरोबरच अन्नाला पचन करण्याचे कार्य देखील करत असतात.

फळांच्या पिकन्यानुसार आणि सालीनुसार त्यांचे विविध प्रकार पडत असतात. त्या अंतर्गत मध्यम जाडीची फळे, लहान झाडीची फळे, आणि जास्त जाडीची फळे इत्यादी प्रकार असण्याबरोबरच हंगामी आणि वार्षिक इत्यादी फळांचे प्रकार देखील पडत असतात. योग्य हंगामामध्ये फळे खाल्ल्यास खूपच फायदा मिळत असतो.

फळे खाण्याचे फायदे:

फळे खाल्ल्यामुळे कोणकोणत्या स्वरूपाचे फायदे होतात, हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. कारण फळामुळे संपूर्ण शरीराला फायदा होत असतो.

फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असल्यामुळे शरीराला लगेचच्या लगेच ऊर्जा प्रदान करण्यासाठी ही फळे ओळखली जात असतात. ज्यामध्ये टरबूज, केळ इत्यादी फळांचा समावेश होतो. ही फळे खाल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच शरीर ऊर्जावान वाटत असते.

सफरचंद सारख्या फळाने पचनसंस्थेच्या संदर्भातील आजार दूर केले जाऊ शकतात, कारण यामध्ये असणारे फायबर्स अन्न पचवण्याबरोबरच बद्धकोष्ठता दूर करत असतात.

पेरू, पपई, नाशपती, यांच्यासारख्या फळांना उत्तम पाचक फळे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शरीरामध्ये पचन कार्य सुधारण्यासाठी मदत मिळत असते.

त्वचेचे आजार असणाऱ्या रुग्णांनी क जीवनसत्त्वांनी समृद्ध असणाऱ्या फळांचे सेवन करावे असे सुचवले जाते. त्याचबरोबर चेहरा, आणि केस चांगले व्हावे याकरिता आवळा संत्री यांच्यासारखे फळे सेवन करण्याची सांगितले जाते.

अनेक प्रथिने युक्त फळांचे सेवन केल्यामुळे  शरीर बलवान होण्यास मदत मिळत असते. त्यामध्ये मनुके, खजूर, पेरू, इत्यादी फळांचा समावेश होत असतो.  हृदयरोगी रुग्णांसाठी फळे सेवन करणे खूपच फायद्याचे ठरत असते.

शरीरातील रक्त कमी झाले असेल, तर बीट, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद, यांच्यासारख्या फळांचे सेवन करण्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर लोहाची कमतरता दूर करण्यासाठी देखील विशिष्ट स्वरूपाची फळे खाली जात असतात.

लहान मुले जर जेवण करत नसतील, तर त्यांना अनेक आकर्षक स्वरूपाची फळे देऊन जेवण करायला लावू शकता. तसेच फळांच्या माध्यमातून त्यांच्या शरीराची गरज देखील पूर्ण करू शकता. यामध्ये ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी,  किवी, आव्हाकॅडो  यांच्यासारख्या फळांचा समावेश होत असतो.

फळांचे सेवन केल्यामुळे काही फायदे असले, तरी देखील शरीरासाठी काही नुकसान देखील होऊ शकतात. केवळ फळांचा आहार घेतल्यास शरीर दुबळे देखील होऊ शकते. त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता देखील निर्माण होऊ शकते. सोबतच अनेक मधुर स्वादाची फळे नेहमी खाल्ल्यामुळे मधुमेहाची समस्या देखील वाढवू शकते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या रुग्णांना त्रास देखील होऊ शकतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, कुठलाही आजारी व्यक्ती असू देत, भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये एक फळांची थैली असतेच. कारण आजारी व्यक्तीला अतिशय फायदेशीर असणारे फळे, सुदृढ माणसांनी जरी खाल्ली तरी देखील शरीराला फायदेशीर ठरत असतात.

अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याबरोबरच, अशे रोग होऊ नये म्हणून देखील फळे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विविध ऋतूनुसार वेगवेगळे फळे भारतामध्ये पिकत असतात, त्यामुळे संपूर्ण वर्षभर फळांची चांगलीच रेलचेल बघायला मिळते. अगदी काही फळे तर संपूर्ण वर्षभर अर्थात बाराही महिने उपलब्ध असतात.

या फळांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याबरोबरच केळी सारख्या फळामुळे जिम करणाऱ्या व्यक्तींना देखील खूपच फायदा होत असतो. आजच्या भागामध्ये आपण अनेक फळांविषयी संपूर्ण माहिती बघितली असून, या फळांमधील विविध पोषक तत्व, घटक, गुण, फायदे यामधील असणारे गुणधर्म, हंगामी वैशिष्ट्य, विविध प्रकारचे फळे, तसेच नारळ पाणी यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे.

FAQ

भारतामध्ये आढळणारी फळे कशा स्वरूपाचे असतात?

भारतामध्ये आढळणारी विविध फळे ही हंगामी स्वरूपाची असून, विशिष्ट हंगामामध्ये विशिष्ट फळे उगवली जातात. त्याचप्रमाणे काही फळे अशी देखील आहेत, जी संपूर्ण वर्षभर घेतली जातात. त्यांना वार्षिक फळे म्हणून ओळखले जाते.

काही वार्षिक फळांची उदाहरणे म्हणून कोणत्या फळांची नाव सांगता येईल?

पपई, केळी, डाळिंब, इत्यादी सारख्या फळांचे नावे सांगता येतील.

उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची उपलब्धता करून देण्याबरोबरच शरीराला थंडावा देण्याचे कार्य करणाऱ्या विविध फळांची नावे काय आहेत?

उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची उपलब्धता करून घेण्याबरोबर शरीराला थंडावा देण्याचे कार्य खरबूज, टरबूज, आंबा यांसारखे फळे करत असतात.

फक्त फळे खाऊन व्यक्ती जिवंत राहू शकतो का?

फक्त फळांचे सेवन करून व्यक्ती जिवंत राहणे शक्य असले, तरी देखील शारीरिक वाढीसाठी ही गोष्ट उपयुक्त ठरणार नाही. त्याचबरोबर शरीराला अनेक पोषक तत्वांची कमतरता देखील निर्माण होऊ शकते. जे अंतर्गत अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

फळांमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे घटक आढळत असतात?

फळांमध्ये अनेक प्रकारचे घटक आढळत असतात. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, लोह, एंटीऑक्सीडेंट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध प्रकारचे जीवनसत्वे इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो.

Leave a Comment