गवा प्राण्याची संपूर्ण माहिती Gawa Animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Gawa Animal Information In Marathi प्राण्यातील एक शक्तिशाली प्रजाती म्हणून गवा या प्राण्याला ओळखले जाते. अतिशय भरभक्कम शरीर, दणकट अवयव, आणि भले मोठे डोके असा हा गवा लालसर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असतो. मात्र त्याच्या पायांचा रंग काहीच फिकट स्वरूपाचा दिसत असतो.

Gawa Animal Information In Marathi

गवा प्राण्याची संपूर्ण माहिती Gawa Animal Information In Marathi

या प्रजातीला डोक्याच्या बाजूने वाकलेले शिंगे असतात, जे शिंगे यांच्या डोक्याच्या कडेने वाढत असतात. पिवळसर रंगाचे शिंगे टोकाला मात्र काळे असतात. त्याचबरोबर या प्राण्यांना खांदा देखील असतो, जो प्रौढ प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो. मुख्यतः दक्षिण आशिया खंडामध्ये आढळणारा हा प्राणी जंगली स्वरूपाचा आहे.

बोबिडे या कुटुंबातील सर्वात मोठी प्रजाती म्हणून त्या प्राण्याला ओळखले जाते. काहीसा गाई म्हशीसारखा दिसणारा हा प्राणी अत्यंत दणकट बांधण्याचा व प्रचंड ताकतवान असतो. आजपर्यंत सर्वात मोठा गवा दहा फूट लांबीचा नोंदवलेला असून, साधारणपणे सात फुटापर्यंत त्यांची उंची आढळून येत असते. आकाराप्रमाणेच अतिशय वजनदार असणारा हा गवा प्राणी ३००० ते ३३०० किलोपर्यंत दिसून येतो. आजच्या भागामध्ये आपण या गवा प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावगवा
प्रकारप्राणी
उपप्रकारजंगली प्राणी
किंगडमऍनिमलिया
कुटुंब किंवा कुळबोविडे
साधारण आकारमानदहा फूट लांब आणि सात फूट उंच
साधारण वस्तुमान३००० ते ३३०० किलो
सरासरी आयुष्यमान२५ ते ३० वर्षांपर्यंत
आहार स्वरूपशाकाहारी

गवा प्राण्याचे वास्तव्य:

मुख्यतः जंगली स्वरूपाचा असणारा हा प्राणी सदाहरित वनांमध्ये जास्त प्रमाणावर दिसतो. त्यासोबतच निमसदाहरित वने आणि पानझडी वने येथे देखील काही प्रमाणात या प्राण्यांची संख्या आढळून येत असते. अतिशय बिनधास्तपणे वावरणारी ही प्रजाती मानवाशी फारशी मिळती जुळती झालेली नाही, त्यामुळे मानवी वसाहती मध्ये या प्राण्यांची संख्या आढळत नाही.

असे असले तरी देखील या प्राण्यांची संख्या कमी असून, अगदी दुर्मिळतेने हा प्राणी आढळत असतो. या प्राण्यांच्या संख्या कमी होण्यामागे बेसुमार जंगलतोड हे महत्त्वाचे कारण पुढे आलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५००० ते ६००० फूट उंचीवर राहणे पसंत करणारा हा प्राणी डोंगराळ आणि उंच भागात राहत असतो.

भारताच्या नैऋत्य आणि पूर्व दिशेला असणाऱ्या काही जंगलांमध्ये या प्राण्यांच्या संख्या आढळून आलेल्या असून, जागतिक पातळीवर विचार केल्यास कंबोडिया, थायलंड, बांगलादेश, मलेशिया, लाओस, बर्मा, त्याचबरोबर या प्राण्यांच्या मोठ्या संख्या असून, काही प्रमाणावर नेपाळ व भूतान या देशांमध्ये देखील या प्रजाती काही भागांमध्ये दिसून येतात. मात्र दक्षिण आशियामध्ये या प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी झालेली आहे.

गवा प्राण्याचे खानपान:

गवा हा प्राणी शरीराने अतिशय धष्टपुष्ट व बलाढ्य ताकतवान असला, तरी देखील खानपानाच्या सवयी मध्ये शाकाहारी स्वरूपाचा आहे. त्यामुळे तो आपल्या अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतो. वनस्पतीच्या विविध भागांचा वापर तो आपल्या आहारामध्ये अगदी आवडीने करत असतो. गाई म्हशीप्रमाणे हे प्राणी गवतावर चरत असतात. त्याचबरोबर झाडाझुडपांची पाने देखील खात असतात. काही वेळेला या प्राण्यांकडून वनस्पती वरील देठ, फुले यांसारखे घटक देखील खाल्ले जात असतात.

गवा प्राण्यांमधील पुनरुत्पादन:

गवा हा प्राणी हंगामी स्वरूपाचे पुनरुत्वदन करत असतो. ज्यावेळी या पुनरुत्पादनाचा हंगाम येतो, त्यावेळी मादीसाठी नर गवा प्राण्यांचे भांडण किंवा संघर्ष होत असतात. यामध्ये जिंकणारा नर मादीशी संभोग करून प्रजनन करत असतो. या प्राण्यांमधील गर्भधारणा कालावधी मानवाप्रमाणेच नऊ महिन्यांचा समजला जातो.

सस्तन प्राणी असणारा हा गवा एका वेळेला एक पिल्लाला जन्म देत असतो. मात्र क्वचितप्रसंगी दोन जुळे पिल्ले देखील जन्माला येऊ शकतात. गाईप्रमाणेच या पिल्लांना वासरू या नावाने ओळखले जाते. सात महिन्यांपर्यंत आईचे दूध पिल्यानंतर हे वासरू परिपक्व होऊन स्वतःचा चारा खात असते. पुढे लैंगिक परिपक्वता आल्यानंतर मात्र यातील नर वासरे कळप सोडून जात असतात, तर मादी गवा आपल्या आई सोबतच उर्वरित आयुष्य घालवत असतात.

गवा प्राण्याची काही मनोरंजक तथ्य माहिती:

  • गवा प्राणी रंगाने लालसर तपकिरी असतो. यातील नर प्राण्याचा रंग काहीसा गडद तर मादी प्राण्याचा आणि तरुण प्राण्यांचा रंग काहीसा फिकट असतो.
  • गाईच्या कुळातील सर्वात मोठा आणि ताकतवान प्राणी म्हणून गवा प्राणी ओळखला जातो.
  • गवा या प्राण्याला गाईप्रमाणेच शिंगे असतात. ज्यांचा रंग शेंड्याकडे जाताना काळसर होत जातो.
  • गवा हा प्राणी मुख्यतः दिवसा कार्यरत असतो, मात्र अन्न मिळवण्याकरिता काही वेळेला तो आपली दिनचर्या बदलून निशाचरदेखील होऊ शकतो.
  • अतिशय प्रचंड आकारमानामध्ये असल्यामुळे शक्यतो कोणत्या प्राण्यांसोबत त्यांच्या शत्रुत्व निर्माण होत नाही. मात्र मगर, वाघ यांच्यासह मानव देखील त्यांचा मोठा शत्रू समजला जातो.
  • आकाराने अतिशय अवजड असले तरी देखील गवा हे प्राणी आहार शैलीनुसार शाकाहारी आहेत.
  • गवा हा प्राणी कळपाणे राहणे पसंत करत असतो. त्यांच्या कळपाचा आकार साधारणपणे ८ ते ११ प्राण्यांपर्यंत असतो. मात्र काही वेळेला हा गट अगदी ४० प्राण्यांपर्यंत देखील वाढू शकतो.
  • गवा प्राण्यांच्या प्रत्येक गटाला नेतृत्व करणारा एक नर गवा असतो.
  • गवा प्राण्यांची शिंगे जवळपास ४५ इंच लांब वाढू शकतात, जे काळसर टोकासह पिवळ्या रंगाची असतात.

निष्कर्ष:

वन्य बैल या नावाने ओळखला जाणारा हा गवा प्राणी अतिशय दुर्मिळ स्वरूपाचा असून, अतिशय ताकतवान प्राण्यांमध्ये याचा समावेश होत असतो. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा प्राणी बोविडे कुटुंबातील समजला जातो. जे कुटुंब गाई म्हशीच्या प्रजातीशी साम्य दर्शवणारे आहे.

एक ताकतवान सस्तन प्राणी म्हणून याला ओळखले जाते. या प्राण्याचे उगम दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या ठिकाणी झालेले असून, या प्राण्याला भारतीय बायासन या नावाने देखील ओळखले जात असते. सस्तन प्राण्यांच्या प्रजातीतील एक ताकतवर प्राण्यांच्या गटात याची गणना केली जात असते.

अतिशय लांब उंच आणि भरभक्कम असणारा हा प्राणी सहसा मानवी व संस्थेच्या आसपास आढळत नाही. आजच्या भागामध्ये आपण या गावा प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये गवा प्राणी म्हणजे नेमके काय असते, त्याची शारीरिक व खानापाना बाबत काय वैशिष्ट्ये असतात, सर्वात मोठ्या गवा प्राण्याबद्दल माहिती, या प्राण्याचे राहण्याचे ठिकाण, व खानपानाच्या सवयी इत्यादी बाबतीत माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर काही प्रश्न उत्तरे देखील समजून घेतलेली आहेत.

FAQ

गवा हा प्राणी किती आकारमानापर्यंत वाढू शकतो?

साधारणपणे गवा हा प्राणी लांबीला तब्बल दहा फुटापर्यंत वाढू शकतो. त्याचप्रमाणे त्याची उंची देखील सात फूट ते सात फूट तीन इंचापर्यंत वाढत असते.

गवा हा प्राणी किती वजनापर्यंत वाढू शकतो?

गवा हा प्राणी साधारणपणे ३००० किलो ते ३३०० किलो पर्यंत वाढत असतो.

गवा हा प्राणी साधारणपणे किती वर्षांचे आयुष्य जगत असतो?

गवा हा प्राणी साधारणपणे २५ ते ३० वर्षांचे आयुष्य जगत असतो. मात्र या आयुष्याच्या कालावधीमध्ये त्याच्या राहण्याचे ठिकाण, आणि त्याला खायला मिळणाऱ्या आहारानुसार बदल होत असतात.

खानापानाच्या सवयीमध्ये गवा हा प्राणी कसा असतो?

खानापानाच्या सवयी मध्ये गवा हा प्राणी शाकाहारी स्वरूपाचा असून, विविध झाडांची फळे, पाने, देठ, फुले, इत्यादी गोष्टींवर तो आपली उपजीविका करत असतो.

गवा हा प्राणी कसा आहे?

गवा हा प्राणी अतिशय ताकतवान व बलाढ्य असून, सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणून त्याला ओळखले जाते. गायीच्या कुळातील असणारा हा प्राणी जंगलामध्ये आढळून येत असतो.

Leave a Comment