द्राक्ष फळाची संपूर्ण माहिती Grape Fruit Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Grape Fruit Information In Marathi सर्वांना प्रिय असणारे एक वेलवर्गीय फळ म्हणून द्राक्षाला ओळखले जाते. मुख्यत्वे शरद ऋतूमध्ये काढणीस येणारे हे फळ दिसायला घुंगरा सारखे असते. हे द्राक्ष काहीशी आंबटसर गोड असतात. द्राक्षापासून ज्यूस, जाम, वाईन, जेली, सॅलड, आणि मनुके यांसारखे पदार्थ देखील बनवले जातात. द्राक्षाला इंग्रजीमध्ये ग्रेप या नावाने ओळखले जाते. जो शब्द फ्रेंच भाषेतील आहे. आणि द्राक्ष हा शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आलेला आहे.

 Grape Fruit Information In Marathi

द्राक्ष फळाची संपूर्ण माहिती Grape Fruit Information In Marathi

असे म्हटले जाते की आईच्या दुधामध्ये जे घटक असतात किंवा ज्या पातळीचे पोषण मिळते, त्याच पद्धतीचे पोषण द्राक्ष या फळापासून मिळते. द्राक्ष हे फळ अतिशय बहुगुणी असून, जे शरीराला त्वरित ऊर्जा देणे, शरीराचे सौंदर्य वाढवणे, शरीर निरोगी करणे, यांसारखे अनेक कार्य करत असते.

द्राक्ष ही वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळून येतात. जे त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. असे असले तरी देखील सर्वसामान्यपणे हिरव्या रंगाचे द्राक्ष सर्वात जास्त वापरली जातात. इतर रंगांमध्ये निळसर, पिवळसर, काळे, गुलाबी, नारंगी, आणि लाल द्राक्षाचा समावेश होतो.

द्राक्ष वेलीला लागताना सुरुवातीच्या काळात रंगाने पांढरी असतात. मात्र जसजसे ते परिपक्व व्हायला लागतात, तसतसे ते आपला मूळ रंग धारण करतात. एका द्राक्षाच्या घडामध्ये किमान २० ते कमाल ३०० द्राक्ष असू शकतात. ज्यांचा आकार प्रजातीनुसार गोल ते लंबगोलाकार असतो.

काही प्रजातीचे द्राक्ष घड हे सुमारे १२ इंच म्हणजेच एक फूट लांब देखील असू शकतात. द्राक्षाची पाने हे मानवी हातासारखे दिसतात. द्राक्षाच्या वेलीचा वाढीचा कालावधी हा मार्चपासून सप्टेंबर पर्यंत समजला जातो. नंतर मात्र त्याला फळे लागणे सुरू होते, आणि याप्रसंगी शक्यतो वेलीची वाढ खुंटते.

आजच्या भागामध्ये आपण द्राक्ष या फळाबद्दल माहिती बघणार आहोत…

नावद्राक्ष
इंग्रजी नावग्रेप्स
शास्त्रीय नाव
उपलब्ध कॅल्शियम१ टक्का
उपलब्ध आयर्न३ टक्के
उपलब्ध प्रोटिन्स०.७२ ग्राम
जीवनसत्वांचे प्रमाणसुमारे २२ टक्के
द्राक्षाची राजधानीनाशिक

द्राक्ष पिकण्याची ठिकाणे:

भारतात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची शेती केली जाते. यामध्ये तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणा, मिझोरम, हिमाचल प्रदेश, पंजाब व महाराष्ट्र इत्यादी राज्य आघाडीवर आहेत. मात्र या सर्वांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये द्राक्षाची सर्वाधिक लागवड केली जाते. म्हणून नाशिकला द्राक्षाची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते.

द्राक्ष फळ खाण्याचे फायदे:

  • द्राक्षामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
  • द्राक्ष खाताना इतर फळांप्रमाणे सोलून खावे लागत नाही, त्यामुळे खाण्यासाठी अतिशय सोपे असतात.
  • द्राक्षामध्ये जीवनसत्व क आणि ई मोठ्या प्रमाणावर आढळते, तसेच फायबर आणि कॅलरी ची संख्या देखील मुबलक असते. त्यामुळे त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत होते.
  • द्राक्षामध्ये असणारा सेव्हरेट्रोल हा घटक त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर समजला जातो, ज्यामुळे उन्हापासून झालेल्या टॅनिंग किंवा सन बर्नला बरे केले जाऊ शकते.
  • द्राक्ष सेवनामुळे केसांचे आरोग्य देखील चांगले होते, आणि केस काळेभोर आणि घनदाट होण्यास मदत होते.
  • द्राक्षाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर केली जाऊ शकते.
  • ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांसाठी द्राक्ष हा एक चांगला पदार्थ समजला जातो.
  • पोटाच्या आरोग्याची समस्या असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा द्राक्षाचे सेवन करणे सांगितले जाते.

द्राक्ष सेवनाचे तोटे:

एका विशिष्ट प्रमाणात द्राक्ष खाणे चांगले असले, तरी देखील अति प्रमाणात द्राक्ष खाल्ली तर त्याच्या आंबटसर चवीमुळे ऍसिडिटी चा त्रास जाणवू शकतो.

सहा वर्षाखालील मुलांना द्राक्ष देताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला जावा. मोठ्या प्रमाणावर द्राक्ष सेवन केल्यामुळे शरीरामध्ये एलर्जीचे प्रमाण वाढू शकते.

द्राक्ष या फळाची चव:

द्राक्ष हे फळ जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये पिकणारे फळ आहे, त्यामुळे यामध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. म्हणून या फळाची चव अगदी मांसल आणि मऊ अनुभवासह काहीशी आंबटसर गोड अशी असते. पोटात गेल्यानंतर हे द्राक्ष अतिशय थंडावा देण्याचे कार्य करतात.

द्राक्ष सेवन करण्याची योग्य वेळ:

कुठलीही फळे फायदेशीर असली, तरी देखील त्याची सेवन करण्याची एक योग्य वेळ ठरलेली असते. त्यावेळेला सेवन केल्यास त्या फळातून मिळणारे घटक खूपच फायदेशीर सिद्ध होतात. द्राक्ष हे नेहमी सकाळच्या वेळेला खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातल्या त्यात जर तुम्ही सकाळी द्राक्षाचा ज्यूस करून पिलात तर तुम्हाला डीहायड्रेशन किंवा निर्जलीकरण होण्याचा धोका टाळता येतो.

शिवाय यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि साखर असते. त्यामुळे अगदी सकाळीच शरीराला विविध कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होते. आणि या सकाळच्या वेळी द्राक्ष खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर देखील चांगला परिणाम होतो, आणि भूकही कडाडून लागते.

निष्कर्ष:

आपल्या भागामध्ये अनेक प्रकारची विविधतेने संपन्न अशी कितीतरी फळे मिळतात. प्रत्येक फळाचे आपले असे एक वैशिष्ट्य असते, त्यामुळे ते फळ इतरांपासून वेगळे बनते. द्राक्ष देखील सर्वांना आवडणारे एक फळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते. चवीला काहीसे आंबटसर आणि मधुर असणारे हे फळ घुंगराच्या आकाराच्या लहान लहान फळांच्या स्वरूपात आढळते.

या फळांचा एक संपूर्ण घड असतो, त्यामध्ये द्राक्षाच्या प्रजातीनुसार कमी अधिक प्रमाणावर द्राक्षांची संख्या असते. द्राक्ष या फळांमध्ये अनेक पोषक घटक आढळत असल्यामुळे आजारी व्यक्तीला देखील द्राक्ष खायला दिले जातात. तसेच द्राक्षापासून वाईन देखील बनवले जाते.

महाराष्ट्राचे नाशिक या ठिकाणी द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, आणि याबरोबर द्राक्षापासून वाईन बनवण्याचे कारखाने देखील दिसून येतात. आज आपण या द्राक्ष फळाबद्दल माहिती बघितलेली आहे.

FAQ

त्वचेच्या आरोग्यामध्ये द्राक्ष फळाचा का वापर केला जातो?

द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्वचा लवचिक बनते, तसेच त्वचेमधील लहान रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह देखील वाढतो. त्वचा तरुण, निरोगी आणि तेजस्वी दिसायला लागते. द्राक्षामध्ये असणारी अँटिऑक्सिडंट चेहऱ्यावरील वांग, डाग, आणि सुरकुत्या घालवतात. जेणेकरून व्यक्ती तरुण दिसायला लागतो.

द्राक्ष या फळापासून कोणकोणते पदार्थ बनविले जातात?

द्राक्ष फळापासून जॅम, जेली, सॅलड, मनुके, वाईन हे आणि यांसारखे अनेक पदार्थ बनविले जातात.

द्राक्ष शेतीचा उगम कुठे झाला?

तब्बल ५००० पेक्षा सुद्धा जास्त वर्षाआधी सर्वप्रथम इजिप्त या देशांमध्ये द्राक्षाची लागवड केली गेली होती, असे पुरावे सापडतात. आणि इजिप्त मधून या द्राक्ष शेतीला संपूर्ण जगभर पसरविण्याचे काम ग्रीक व रोमन लोकांनी केलेले आहे.

द्राक्ष खाण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता?

द्राक्ष या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे द्राक्षाच्या सेवनामुळे शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन होण्यास मदत होते. तसेच डिहायड्रेशन, उच्च रक्तदाब, हृदय विकार, स्ट्रोक यांसारख्या आजारांमध्ये देखील आराम मिळण्यास मदत होते.

द्राक्ष खाण्यासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती समजली जाते?

द्राक्षामध्ये पाणी असल्यामुळे सकाळी सर्वप्रथम द्राक्ष खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे द्राक्षा मधील पाणी व साखरेमुळे शरीराला सकाळीच चांगली ऊर्जा प्राप्त होते.

आजच्या भागामध्ये आपण द्राक्ष या फळाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये आवर्जून कळवा. तसेच तुम्हाला द्राक्ष या पिकाबद्दल काही अजून माहिती असेल तर ती देखील सोबत जोडा, आणि आपल्या इतर मित्र मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment