हिंदू धर्मची संपूर्ण माहिती Hindu Religion Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Hindu Religion Information In Marathi भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला धर्म म्हणून हिंदू सनातन धर्माला ओळखले जाते. तसेच सर्वात मोठा धर्म म्हणून देखील या हिंदू धर्माला ओळखले जाते. भारतामध्ये इस्लाम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध यांच्यासारखे अनेक धर्मांचे अस्तित्व असले, तरी देखील या सर्वांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा धर्म म्हणून हिंदू धर्माला ओळखले जाते.

Hindu Religion Information In Marathi

हिंदू धर्मची संपूर्ण माहिती Hindu Religion Information In Marathi

अतिशय धार्मिक स्वरूपाचा हा धर्म साम-दाम-दंड-भेद या चतुसूत्री वर आधारलेला असून, या धर्मामधील लोक नेहमीच शांततेने वावरत असतात. इतर धर्माला बहुमान देण्याबरोबरच आपल्या धर्माचा अभिमान देखील हिंदू धर्माद्वारे बाळगला जातो.

अलीकडेच प्रभू श्रीराम यांच्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी हिंदू धर्माची एकता संपूर्ण भारतासह जगाने अनुभवली. हिंदू हा धर्म विविध जातीपातींमध्ये विभागला असला, तरी देखील वेळप्रसंगी हा धर्म एकवटून कार्य करत असतो. आजच्या भागात आपण हिंदू धर्म म्हणजे काय, याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावहिंदू
प्रकारधर्म
इतर नावसनातन धर्म
ओळखसाम-दाम-दंड-भेद
वेदांची नावेयजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद
वेदांची संख्याचार
वैशिष्ट्यसर्वात मोठा धर्म
निर्मातास्वयंभू  मनू
धर्मग्रंथश्रीमद् भगवद्गीता

हिंदू धर्माबद्दल ऐतिहासिक माहिती:

अतिशय गौरवशाली इतिहास लाभलेला हिंदू धर्म अतिशय प्राचीन आणि जुन्या काळातील असून, याची निर्मिती मुख्यतः चार वेदांवर आधारित करण्यात आलेली आहे असे आपणा सर्वांनाच माहिती आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म म्हणून या हिंदू धर्माला ओळखले जाते.

त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठा आणि जास्तीत जास्त लोकसंख्या असणारा आणि सर्वात जुना धर्म म्हणून देखील या हिंदू धर्माला ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये अनेक साधुसंतांनी प्रचंड मोठे कार्य केलेले असून, हिंदू धर्म नेहमीच सहिष्णू स्वरूपाचा राहिलेला आहे.

हिंदू ही केवळ एक धर्माची संकल्पना नसून, अतिशय आदर्श जीवन कसे जगावे हे सांगणारी एक उत्तम पद्धती म्हणून या हिंदू धर्माला ओळखले जाते. अतिशय लवचिक स्वरूपाचा हा धर्म बदलत्या काळानुसार बदलण्यासाठी देखील ओळखला जातो.

बदलत्या काळाला आपलेसे करत या धर्माने मोठा पल्ला गाठलेला असून, सर्वांत जुना धर्म म्हणून या सर्व जाती धर्माच्या लोकांना हिंदू धर्माने सांभाळून घेतलेले आहे. खरे तर हिंदू म्हणजे केवळ एक जन्माने मिळालेला धर्म नसून, भारताच्या अर्थात हिंदुस्थानच्या मातीवर जन्मलेला प्रत्येक जण मनाने, कर्माने आणि ओळखीने हिंदूच आहे असे म्हटले जाते.

हिंदू धर्माचे भारत देशाशी संबंध:

भारत देश आणि हिंदू धर्म यांचे अतिशय अतूट नाते असून, इतर धर्माशी सहिष्णुतेने वागणारा हा हिंदू धर्म नेहमीच आपल्या मिळून मिसळून राहण्याच्या संकल्पनेसाठी ओळखला जातो. अतिशय उत्तम धर्म संस्कृती असणारा हा हिंदू धर्म समान न्यायाच्या तत्त्वावर कार्यरत असून, समान नागरी कायद्याच्या साठी या धर्माचे फार महत्त्वाचे योगदान ठरू शकते.

कोणत्याही व्यक्तीशी दुजा भाव न करता सर्वांना समान वागविणे हे हिंदू धर्माचे शिकवण असून, भावी पिढींना देखील या हिंदू धर्माची संस्कृती मिळावी याकरिता धार्मिक कार्यक्रम फार महत्त्वाचे ठरत आहेत. आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली तरुण हिंदू मुले भरकटली असली, तरी देखील हिंदू संस्कृती आणि त्यातील विविध प्रकारच्या प्रथा परंपरा त्यांना पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.

या हिंदू धर्माच्या अनेक अनुयायांनी जगप्रसिद्ध बदल केलेले असून, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, यांच्यासारख्या अनेक लोकांनी हिंदू धर्माच्या अंतर्गत फार मोठे कार्य करून दाखवलेले आहे.

हिंदू धर्माची वैशिष्ट्ये:

हिंदू धर्म अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, सर्वच क्षेत्रांमध्ये गुणसंपन्न असणारा हा धर्म इतिहासापासून सभ्यता, संस्कृती, कला, साहित्य, राजकारण इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्य करण्याबरोबरच त्याच्या प्रामाणिकपणा न्याय आणि कार्यक्षमतेसाठी ओळखला जात असतो. सर्वात जास्त मनोबल वाढवणारे धार्मिक कार्यक्रम हिंदू धर्मांमध्येच आयोजित केले जात असून, आजकाल मात्र काही लोकांनी साधुसंताच्या नावाखाली या धर्मामध्ये कुकर्म चालविलेले आहेत.

हिंदू धर्म चार वेदांच्या खांबांवर आधारलेला असून, यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद इत्यादी वेदांचा समावेश होतो. यातील ऋग्वेद हा स्तोत्रांचा समूह किंवा संग्रह असून, त्यामध्ये विविध देवदेवतांचा सन्मान वर्णन केलेला आहे. त्याचबरोबर विवाह सोहळा, युद्ध आणि विविध समाजातील चालीरीती याबद्दल देखील विचार मांडलेले आहेत.

यजुर्वेद याच्या नावावरूनच यामध्ये  यज्ञाच्या संदर्भात सर्व विधी आणि पूजा नमूद केलेल्या असून, विविध प्रकारच्या धार्मिक विधी करताना यजुर्वेदाची आवश्यकता भासत असते. सामवेद म्हणजे देवतांच्या पूजेसाठी ओळखले जाणारे वेद असून, यामध्ये संगीताला फार महत्त्व दिलेले आहे.

साम म्हणजे संस्कृत भाषेत दुःखाचा नाश करणारा सुंदर राग असा अर्थ होत असतो. याचबरोबर अथर्ववेद हा अतिशय उत्तम असून, मंत्रमुग्ध करण्याची कला या अथर्ववेदामध्ये सापडते. या चारही वेदांमध्ये हिंदू धर्माविषयी सखोल वर्णन केलेले असून, हिंदू धर्म कशा रीतीने महान आहे याबद्दल सर्व गोष्टी तुम्ही या वेदांच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी या वेदांचे पठण करणे गरजेचे समजले जात असते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हे वेद वाचले पाहिजेत.

निष्कर्ष:

प्रत्येकाच्या चालीरीतीनुसार विविध धर्म फारच पूर्वीच्या काळी निर्माण करण्यात आलेले आहेत. अतिशय जुना व सर्वात मोठा धर्म म्हणून हिंदू धर्माला ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये अनेक जाती, उपजाती, पंथ, संप्रदाय, इत्यादी असून या सर्वांचे हिंदू या एकाच शब्दाखाली एकत्रीकरण झालेले आहे. संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा धर्म म्हणून हिंदू धर्माला ओळखले जाते.

अतिशय सहिष्णू स्वरूपाचा हा धर्म नेहमीच कर्मावर विश्वास ठेवणारा आहे. साम-दाम-दंड-भेद हे चतुसूत्री वापरून या धर्माचे कार्य सुरू असते. या धर्माचे अंतर्गत नेहमीच चांगल्या कार्यांना पुरस्कृत करतानाच वाईट कार्यांना दंड देखील दिला जात असतो.

अतिशय उत्तम स्वरूपाचा हा धर्म भारताबाहेर देखील अस्तित्वात असून, नेपाळमध्ये देखील या हिंदू धर्माचे अनेक अनुयायी दिसून येत असतात. अनेक धर्मांची निर्मिती या हिंदू धर्मातूनच झाली असली, तरी देखील सर्वात जास्त लोकसंख्या हिंदू धर्माची आहे.

आजच्या भागामध्ये आपण हिंदू धर्माविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये हिंदू धर्म म्हणजे नेमके काय, भारताशी हिंदू धर्माचा प्राचीन काळातील संबंध काय आहे, हिंदू धर्मियांची धार्मिक संकल्पना काय असते, हिंदू धर्मामध्ये पवित्र समजले जाणारे चार वेद व त्यांची माहिती, सोबतच या हिंदू धर्माचे संस्थापक आणि विविध हिंदू धर्मग्रंथ यांच्या विषयी देखील माहिती बघितली आहे.

FAQ

हिंदू धर्माला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?

हिंदू धर्माला आणखी सत्य सनातन धर्म या नावाने देखील ओळखले जाते.

हिंदू धर्मामध्ये वेदांची संख्या किती आहे, व त्यांची नावे काय आहेत?

हिंदू धर्मामध्ये एकूण चार वेद असून, त्यांची नावे अनुक्रमे यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि ऋग्वेद अशी आहेत.

हिंदू धर्माची निर्मिती कोणत्या काळामध्ये झाली असावी असे सांगितले जाते?

हिंदू धर्माची निर्मिती सिंधू संस्कृतीच्या देखील आधीच्या काळापासून अर्थात पाच हजार वर्षांपेक्षाही जुन्या काळामध्ये झाली असावी असे सांगितले जाते.

हिंदू धर्माची ओळख कशी आहे?

हिंदू धर्माची ओळख अतिशय प्राचीन स्वरूपाचा धर्म अशी असून, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला धर्म म्हणून देखील या हिंदू धर्माला ओळखले जाते.

हिंदू धर्मा कशा स्वरूपाचा आहे?

हिंदू धर्म अतिशय सहिष्णू स्वरूपाचा असून, सर्वांना मिळून मिसळून वागवत सर्व जाती धर्माचा आदर करतानाच स्वतःच्या धर्माबद्दल प्रचंड अभिमान बाळगणारा असा हा हिंदू धर्म आहे.

Leave a Comment