आयपीएस पदा विषयी संपूर्ण माहिती IPS Post Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

IPS Post Information In Marathi ज्याप्रमाणे देशपातळीवर अनेक कार्यासाठी वेगवेगळ्या अधिकारी व्यक्तींची नियुक्ती केलेली असते, तसेच देशाच्या अंतर्गत देखील शांतता व सुरक्षितता अबाधित रहावी, त्याचबरोबर अनेक प्रशासकीय कार्य करणे सोपे व्हावे, याकरिता अनेक पदांची निर्मिती करण्यात येत असते. त्यातील एक पद म्हणजे आयपीएस होय. याकरिता नागरि सेवा परीक्षा देऊन, त्या अंतर्गत हे पद मिळवले जाऊ शकते.

Ips Post Information In Marathi

आयपीएस पदा विषयी संपूर्ण माहिती IPS Post Information In Marathi

तर वर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी या पदाकरिता अर्ज करत असतात, आणि परीक्षा देखील देत असतात. संघ लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी मार्फत दरवर्षी राबवली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी फार मोठे परिश्रम घेत असतात. प्रथम वर्गाचे पोलीस खात्यातील अधिकारी म्हणून या आयपीएस अधिकाऱ्यांना ओळखले जात असते.

या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे वाटते तितके सोपे नसते. त्यासाठी अनेक विषयांचा अभ्यास करत अतिशय खडतर परीक्षा पार करावी लागते. मात्र एकदा ही परीक्षा उत्तीर्ण झाली की मग तुमचे जीवन अतिशय सुखकर होण्यास मदत मिळत असते. आयपीएस अधिकाऱ्यांचा सर्वत्र सन्मान असतो, व त्यांना अनेक फायदे देखील प्रदान केले जात असतात. त्याचबरोबर सरकार त्यांच्यासाठी अनेक सुख सुविधा देखील पुरवत असते.

ज्यामध्ये नोकर चाकर, गाडी, बंगला, बॉडीगार्ड, अगदी घरामधील लाईट आणि फोनचे बिल देखील शासनामार्फत भरले जात असते. त्याचबरोबर शहरांमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून विना तिकीट देखील उपस्थित राहू शकतात.

देशाची सेवा करण्यासाठी या आयपीएस अधिकाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. त्या जबाबदाऱ्या पार पाडून एक उत्कृष्ट अधिकारी बनण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असते, आणि त्यासाठी प्रत्येक जण मेहनत देखील घेत असतो. आजच्या भागामध्ये आपण या यूपीएससी अंतर्गत मिळवल्या जाणाऱ्या आयपीएस पदाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावआयपीएस
संपूर्ण स्वरूपइंडियन पोलीस सर्विसेस
मराठी नावभारतीय पोलीस सेवा
परीक्षा टप्पेतीन
परीक्षा घेणारी संस्था यु पी एस सी
पात्रतापदवी उत्तीर्ण
स्तरवर्ग एक अधिकारी

आयपीएस अधिकारी म्हणजे काय:

आयपीएस अधिकारी हे एक पोलीस सेवेतील पद असून, त्याची निर्मिती १९४८ यावर्षी करण्यात आली होती. वर्ग अ गटातील हा अधिकारी त्याला निवडलेल्या प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत असतो. या व्यक्तींना पुढे एसपी किंवा एसीपी या पदावर देखील नियुक्त केले जाऊ शकते.

आयपीएस पदाच्या पात्रता:

मित्रांनो, आयपीएस व्हायचे असेल तर उमेदवारांनी कुठल्याही क्षेत्रातून पदवी मिळवलेली असली पाहिजे. त्याचबरोबर या पदवीमध्ये त्यांनी किमान गुण देखील मिळवलेले असावे. त्यानंतर हा अधिकारी यूपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देण्यासाठी पात्र ठरत असतो.

या परीक्षा उत्तीर्ण करून, तो आयपीएस अधिकारी होऊ शकतो. त्याचबरोबर शासनाद्वारे वेळोवेळी निहित केल्या गेलेल्या शारीरिक पात्रता पूर्ण करणे देखील या उमेदवाराला बंधनकारक करण्यात आलेले असते. त्या अंतर्गत उंची, छाती यांसारख्या पात्रता देखील उमेदवारांनी पूर्ण करणे गरजेचे असते. त्याचबरोबर उमेदवारांची निर्णय क्षमता, धाडस इत्यादी गोष्टी देखील मुलाखतीच्या अंतर्गत तपासल्या जात असतात.

आयपीएस अधिकाऱ्याची कार्य:

  • दिलेल्या प्रदेशांमध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण करणे.
  • लोकांच्या सुरक्षेची काळजी घेणे, व त्यासाठी उपाययोजना करणे.
  • गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे व त्यांच्यापासून सामान्य नागरिक सुरक्षित ठेवणे.
  • कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता विविध नियमांची पूर्तता करणे, तसेच नवीन नियम बनवणे.
  • वेळप्रसंगी आई बी किंवा सीबीआय यांसारख्या संस्थांसोबत मिळून कार्य करणे व त्यांच्या कार्यासाठी संपूर्ण पाठिंबा दर्शवणे.

आयपीएस होण्यासाठी च्या पायऱ्या:

सर्वप्रथम बारावीचे शिक्षण घेऊन कोणत्याही स्ट्रीम अंतर्गत आपली पदवी पूर्ण करावी लागते. या पद्धतीमध्ये किमान गुणाची मर्यादा देखील गाठणे गरजेचे असते. त्यानंतर उमेदवार हा यूपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सक्षम असतो.

या अर्जानंतर उमेदवार प्राथमिक परीक्षा किंवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला, तर त्याला मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र समजले जाते. याही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढे जाऊन मुलाखतीसारख्या टप्प्यावर जात असतो. मुलाखतीत देखील  यशस्वी झाला, तर हा अधिकारी आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, व त्याला आयपीएस अधिकाऱ्यांची सर्व कार्य प्रशिक्षणानंतर बहाल केली जात असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, कोणाच्याही हातामध्ये अधिकार दिले, तर प्रत्येकालाच चांगले वाटत असते. मात्र हे अधिकार मिळवण्यासाठी तितकी मेहनत देखील घेणे गरजेचे असते. भारतामध्ये अधिकार हे विविध प्रशासकीय सेवेमधील अधिकाऱ्यांच्या हातामध्ये एकवटलेले असून, या अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याकरिता प्रचंड मोठी मेहनत घ्यावी लागत असते.

त्यातील एक सर्वोत्कृष्ट पद म्हणजे आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा हे आहे. या अंतर्गत भारताच्या विविध राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत मिळत असते. या पदाची निर्मिती स्वातंत्र्याचा दुसऱ्या वर्षी अर्थात १९४८ मध्ये करण्यात आली होती. हा अधिकारी प्रथम वर्ग गटातील असून, या अधिकाऱ्याच्या हातामध्ये अनेक अधिकार एकवटलेले असतात.

ग्रॅज्युएशन झालेला हा उमेदवार एकूण तीन परीक्षा देऊन या मध्ये उत्तीर्ण होत असतो. या तीन परीक्षा अर्थाचे तीन टप्पे म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत होय. या परीक्षेसाठी खूपच अभ्यास गरजेचा असतो. त्याचबरोबर या पदाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रतिष्ठा देखील त्या पटीत मिळत असते, त्यामुळे अनेक लोक या पदाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता कसून मेहनत करत असतात.

आजच्या भागामध्ये आपण या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्या अंतर्गत आयपीएस अधिकारी म्हणजे काय, त्याचे पूर्ण स्वरूप काय आहे, आयपीएस व्हायचे असेल तर कोणकोणत्या पात्रता धारण करणे गरजेचे असते, आयपीएस अधिकारी कोणकोणती कर्तव्य व कार्य पार पाडत असतो, आयपीएस होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांमधून जावे लागते, व या टप्प्यांवर कशी तयारी करणे गरजेचे असते, सोबतच पदवीचा विषय यूपीएससीचा अर्ज व पूर्व परीक्षा, त्याचबरोबर मुख्य परीक्षा, आणि मुलाखत इत्यादी बद्दल देखील माहिती बघितली आहे. त्याचबरोबर या पदाच्या प्रशिक्षणाबद्दल देखील जाणून घेतलेली आहे.

FAQ

आयपीएस चे संपूर्ण स्वरूप काय आहे, व त्याला मराठी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

आयपीएस चे संपूर्ण स्वरूप इंडियन पोलीस सर्विसेस असे आहे, व त्याला मराठीमध्ये भारतीय पोलीस सेवा असे म्हणून ओळखले जाते.

आयपीएस होण्याकरिता कोणत्या परीक्षा पार कराव्या लागतात?

आयपीएस होण्याकरिता भारत सरकार द्वारे घेण्यात येणाऱ्या यु पी एस सी च्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. या परीक्षांमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांचा समावेश असतो.

आयपीएस हे पद कोणाच्या वर्षी तयार करण्यात आले होते?

आयपीएस हे पद अतिशय जुने असून त्याची निर्मिती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षी अर्थात १९४८ यावर्षी करण्यात आली होती.

आयपीएस अधिकारी होण्याकरिता कोणकोणत्या पात्रता पूर्ण कराव्या लागत असतात?

ज्या उमेदवाराला आयपीएस अधिकारी व्हायचे असेल, अशा उमेदवारांनी भारत, नेपाळ किंवा भूतान या तीन पैकी एका देशाचे नागरिकत्व धारण केलेले असावे. त्याचबरोबर उमेदवार हा २१ ते ३० वय वर्षाच्या मर्यादेतील असावा. सोबतच त्यांनी कुठल्याही क्षेत्रातून आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

आयपीएस अधिकारी होण्याकरिता काही शारीरिक पात्रता आवश्यक असतात का, असतील तर कोणत्या?

आयपीएस अधिकारी होण्याकरिता शारीरिक पात्रता देखील गरजेचे असतात. त्यामध्ये साधारणपणे उमेदवार हा १६५ सेंटीमीटर पेक्षा जास्त उंचीचा असला पाहिजे. महिलांसाठी ही उंचीची मर्यादा १५० सेंटीमीटर ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर छाती ही पुरुषांसाठी ८४ सेंटीमीटर तर महिलांसाठी ७९ सेंटीमीटर गरजेची असते.

Leave a Comment