Kangaroo Animal Information In Marathi मानवाप्रमाणे दोन पायावर चालणारा आणि टुणटून उड्या मारणारा प्राणी तुम्ही बघितला असेल, त्याचे नाव कांगारू असे असते. ऑस्ट्रेलिया देशाने आपला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेला हा प्राणी अतिशय विस्मयकारक असून, त्याला चालता येत नाही, त्यामुळे तो उड्या मारत असतो. त्याची उडी ही जवळपास दोन किंवा तीन मीटर पर्यंत देखील असू शकते.
कांगारू प्राण्याची संपूर्ण माहिती Kangaroo Animal Information In Marathi
आजच्या भागामध्ये आपण या कांगारू प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. पोटावर पिशवी असणारा हा प्राणी आपल्या पिल्लांना या पिशवीमध्ये वागवत असतो, आणि जेव्हा ही पिल्ले मोठी होतील तेव्हा त्या पिल्लांना बाहेर काढत असतो. चला तर मग जाणून घेऊया या कांगारू प्राण्याविषयी माहिती…
नाव | कांगारू |
प्रकार | प्राणी |
आहार | शाकाहारी |
साधारण वेग | ६४ किलोमीटर प्रति तास |
निवासस्थान | गवत, वन, समुद्री बीच, आणि आर्द्र वने |
गर्भधारणा कालावधी | ३० ते ३५ दिवस |
साधारण आयुष्य | सहा ते आठ वर्ष |
कांगारू हा एक चतुष्पात प्राणी असला, तरी देखील तो आपल्या मागील दोन पायांवरच इकडून तिकडे फिरत असतो. त्यामुळे वैशिष्ट्य पूर्ण असलेला हा कांगरू प्राणी सर्वांनाच आकर्षक वाटत असतो. इतर कोणत्याही प्राण्याकडे नसलेली गोष्ट म्हणजे या प्राण्याच्या पोटावर एक पिशवी सारखे स्ट्रक्चर असते, ज्यामध्ये तो त्याची मुले ठेवण्याचे काम करत असतो.
कांगारू प्राण्याची शरीररचना:
या प्राण्याची शरीर रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. दोन पायांवर उभे राहणारा हा प्राणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचे मागील पाय जास्त लांब असतात. तर पुढील पाय काहीसे आखूड असतात. त्याच्या पायांना अंगठा नसतो, तर इतर बोटे ही अतिशय सडपातळ स्वरूपाची असतात. एक झुपकेदार शेपटी असणारा हा प्राणी उंचीला सुमारे पाच फुटांपर्यंत देखील आढळून येतो. त्याचे वजन ९० किलोच्या दरम्यान असते. आणि हा प्राणी पाण्यामध्ये सहजरित्या पोहू शकतो.
कांगारू प्राण्याचे प्रकार:
इतर प्राण्यांप्रमाणेच कांगारूचे देखील विविध प्रकार किंवा प्रजाती आढळून येतात. यामध्ये चार प्रजाती अतिशय मुख्य असून, त्यांच्यात पूर्व राखाडी कांगारू, लाल कांगारू, वेस्टर्न ग्रे कांगारू, आणि टॉपिस कांगारू इत्यादी प्रजातींचा समावेश होतो. लाल कांगारू हे जगातील सर्वात मोठे कांगारू प्राणी असून, ते ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळून येत असतात.
ते उंचीला पाच फूट तर वजनाने ९० किलो पर्यंत असण्या बरोबरच, अतिशय धिप्पाड स्वरूपाचे असतात. ऑस्ट्रेलिया या देशाच्या पूर्व भागामध्ये कांगरू ची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते. सर्वसाधारणपणे विचार केल्यास कांगारूचे इतर प्रजाती ६० ते ७० किलोच्या दरम्यान आणि उंचीला मात्र सहा फूट असतात. त्यामुळे ते काहीसे हडकुळे दिसतात. अतिशय दयावान व मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे माणसांची या प्राण्याशी सहज मैत्री होऊ शकते.
कांगारूच्या खानापानाच्या सवयी:
हा प्राणी शाकाहारी स्वरूपातील असल्यामुळे तो गवत, झाडपाला, फळे, इत्यादी खाण्याला प्राधान्य देत असतो.
कांगारू प्राण्याचे वास्तव्य स्थान:
ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कांगारू आढळून येत असतो. तेथील गवताळ प्रदेशांमध्ये याची फार मोठी लोकवस्ती असून, हे प्राणी दिवसा शक्यतो दिसत नाहीत. कारण चारा खाण्यासाठी रात्री बाहेर पडणारे हे प्राणी निशाचर स्वरूपातील आहेत. हे प्राणी गट करून राहतात, त्यामुळे या प्राण्यांवर हल्ला केला तरी देखील त्याला परतावून लावण्याची धमक यांच्यामध्ये असते.
कांगारू प्राण्याबद्दल तथ्य:
कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. तो अगदी तेथील रस्त्यांवर देखील फिरताना दिसतो. ज्याप्रमाणे भारतात कुत्र्यांची संख्या आहे, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूची संख्या आहे.
कांगारू या प्राण्याची चालण्याची पद्धत अतिशय असामान्य असून, तो उड्या मारत चालत असतो.
या प्राण्याला उत्तम पोहता येते.
- या प्राण्याचे कान अतिशय लवचिक असतात, जे कोणत्याही दिशेला सहजरित्या वळवू शकतात.
- कांगारू उभा राहताना आपल्या शेपटीचा देखील आधार घेत असतो. त्याची शेपटी फार मजबूत असते, जी महाकाय प्राण्याला देखील खाली लोळवायला भाग पाडू शकते.
- कांगारू हा समाजशील प्राणी असून, तो नेहमी कळपामध्ये राहत असतो. त्याचप्रमाणे एका कांगारूला धोका जाणवला, तर तो इतरांना देखील त्याबाबत सूचित करत असतो. त्यासाठी तो आपला पाय जमिनीवर जोरजोरात आपटत असतो.
- कांगारू दिसायला मोठा असला तरी देखील त्याची पिल्ले जन्मतः खूपच लहान असतात, जी अवघ्या एक इंच लांबीची असतात. कांगारू हा प्राणी आपल्या संपूर्ण आयुष्यभर शरीराची वाढ करत असतो.
- कांगारू हा अतिशय शांत स्वरूपाचा व शाकाहारी प्राणी आहे. तो कधीच कोणत्याही प्राण्याच्या वाटेला जात नाही. मात्र त्यावर संकट आल्याचे जाणवल्यास तो पायांच्या साहाय्याने या संकटाचा सामना करत असतो.
- कांगरू प्राण्याचे सर्वसाधारण वय किंवा आयुर्मान हे सहा ते आठ वर्षे असले, तरी देखील त्यांना योग्य रीतीने पाळल्यास ते वीस वर्षांपर्यंत देखील जगू शकतात.
- कांगारू प्राणी उडी मारण्यामध्ये फार तरबेज असतात. आपल्या उंचीच्या जवळपास तीन पट उडी मारण्यामध्ये हे प्राणी सक्षम असतात.
- कांगारू प्राण्याची सर्वात लहान प्रजाती म्हणून कस्तुरी उंदीर कांगारू या प्रजातीला ओळखले जाते.
- कांगारू हा प्राणी अतिशय कमी कालावधीमध्ये गर्भधारणा करू शकतो, व केवळ ३० ते ३५ दिवसांमध्येच आपल्या पिल्लांना जन्म देत असतो.
निष्कर्ष:
जगभरात अनेक प्राणी आढळत असले, तरी देखील प्रत्येक जण काहीतरी वेगळे वैशिष्ट्य घेऊन जन्माला येत असतो. असाच कांगारू हा प्राणी देखील एक वैशिष्ट्यपूर्ण असून, चार पाय असले तरी देखील तो केवळ दोन पायांवरच उभा असताना आपल्याला दिसत असतो.
त्याला दोन पायावर चालता येत नसल्यामुळे, तो उड्या मारत एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्याच्या पोटावर एक पिशवी सारखे आवरण असते, यामध्ये तो आपल्या पिल्लांना ठेवून त्यांच्या संगोपन करत असतो. जोपर्यंत मुले मोठी होत नाही, तोपर्यंत ही पिल्ले त्याच्या पिशवीमध्येच असतात.
आजच्या भागामध्ये आपण या कांगारू प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, या लेखामध्ये कांगारू प्राणी कसा असतो, त्याची शारीरिक रचना कशी असते, तो कोणकोणत्या प्रकारचे आहार घेतो, त्यांचे विविध प्रकार कोणकोणते असतात, व त्याचबरोबर कांगारू प्राण्याबद्दल काही मनोरंजक तथ्य इत्यादी माहिती जाणून घेतलेली आहे…
FAQ
कांगारू हा प्राणी खानापानाच्या सवयीनुसार कोणत्या स्वरूपातील आहे?
कांगारू हा प्राणी खानपानाच्या सवयीनुसार शाकाहारी गटातील असून, तो विविध झाडांची पाने, गवत, फळे, इत्यादी खाण्याला प्राधान्य देत असतो.
कांगारू हा प्राणी कोठे वास्तव्य करण्यास प्राधान्य देतो?
कांगारू हा प्राणी समुद्राच्या कडेची वने, समुद्रकिनारे, बीच, गवताळ प्रदेश, वने, आद्र पानझडी क्षेत्र किंवा वने इत्यादी ठिकाणी वास्तव्य करण्यास प्राधान्य देत असतो.
कांगारू हा प्राणी साधारणपणे किती वेगाने धावू शकतो?
कांगारू हा प्राणी उड्या मारत चालत असला, तरी देखील त्याची उडीचे अंतर सुमारे तीन ते चार मीटर पर्यंत असते. त्यामुळे तो प्रति तास ६४ किलोमीटर या वेगाने धावू शकतो.
कांगारू प्राण्यांमध्ये गर्भधारणेचा कालावधी किती दिवसापर्यंत असतो?
कांगारू या प्राण्यांमध्ये गर्भधारणेचा कालावधी साधारणपणे ३० ते ३५ दिवसांपर्यंत असतो.
कांगारू हा प्राणी साधारणपणे किती वर्षांचे आयुष्य जगत असतो?
कांगारू हा प्राणी साधारणपणे सहा ते आठ वर्षांचे आयुष्य जगत असतो, मात्र त्याला पाळले तर त्याला अन्न मिळवण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाही. त्यामुळे त्याच्या वयोमर्यादा मध्ये सुमारे वीस वर्षांपर्यंत देखील वाढ होऊ शकते.