कपिल देव यांची संपूर्ण माहिती Kapil Dev Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Kapil Dev Information In Marathi हरियाणा तुफान म्हटलं की प्रत्येकाच्या नजरेसमोर कपिल देव यांचे चित्र येत असते. क्रिकेट जगतामधील एक अतिशय सन्माननीय नाव म्हणून कपिल देव अतिशय गाजलेले आहेत. भारताला सर्वात पहिला विश्वचषक मिळवून देण्याचा मान या कपिल देव यांनी पटकावलेला असून, भारत त्यांच्या गुणाचे नेहमीच गौरव व सत्कार करत आलेला आहे.

Kapil Dev Information In Marathi

कपिल देव यांची संपूर्ण माहिती Kapil Dev Information In Marathi

पहिल्या विश्वचषकाचे मानकरी ठरण्याबरोबरच त्यांनी १९९९ ते २००० या कालावधीसाठी भारतीय संघाला प्रशिक्षक म्हणून देखील मार्गदर्शन केलेले आहे. कधीही धावबाद न झालेला हा खेळाडू अतिशय फिट असून, त्यांच्यासाठी तब्येत देखील फार महत्त्वाची होती.

आरोग्याच्या कारणामुळे कधीही कपिल देव यांनी सामना रद्द केलेला नाही, हे त्यांच्या उत्तम प्रकृतीचेच लक्षण म्हणावे लागेल. ते उजव्या हाताने खेळत असतात. उत्तम फलंदाज तर होतेच, त्याशिवाय ते उत्तम गोलंदाज देखील होते. सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे. आजच्या भागामध्ये आपण क्रिकेट विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव असणाऱ्या कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.…

नावकपिल देव
संपूर्ण नावकपिल देव रामलाल निखंज
इतर नावके डी, हरियाणा तुफान
जन्म दिनांक६ जानेवारी १९५९
जन्मस्थळचंदीगड
शिक्षणडीएव्ही हायस्कूल, चंदिगड
ओळखव्यावसायिक क्रिकेटर
इतर आवडटेबल टेनिस आणि गोल्फ खेळणे, चित्रपट बघणे
संघहरियाणा
ओळखउजव्या हाताचा गोलंदाज व फलंदाज
खेळाची शैलीहुक आणि ड्राईव्ह
विवाह दिनांक १९८०
एकूण संपत्ती२२० कोटी

कपिल देव यांचे प्रारंभिक आयुष्य:

भारताच्या चंदीगड या भारताच्या केंद्रशासित प्रदेशाच्या ठिकाणी दिनांक ६ जानेवारी १९५९ या दिवशी कपिल देव यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच शाळेमध्ये देखील त्यांचे फार यश होते. त्यांनी डीएव्ही या शाळेमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत, पुढे पदवीचे शिक्षण देखील मिळवले होते. त्यासाठी त्यांनी सेंट एडवर्ड कॉलेजची निवड केली होती.

क्रिकेट क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे ठरविले होते. त्याचबरोबर त्यांना देशाविषयी देखील प्रचंड प्रेम होते, आणि देशाच्या वतीने क्रिकेट खेळत कामगिरी करण्यासाठी त्यांनी योजना आखली. त्यांना क्रिकेट शिकवण्यासाठी देश प्रेम आझाद नावाचे प्रशिक्षक होते, ज्यांनी कपिल देव यांच्याकडून पुरेपूर क्रिकेटची तयारी करून घेतली होती.

कपिल देव यांच्या जन्मापूर्वी त्यांचे कुटुंब सध्याच्या पाकिस्तान प्रदेशामध्ये राहत होते, मात्र फाळणीनंतर त्यांच्या आई-वडिलांनी भारतामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील एक लाकूड व्यावसायिक होते. त्यांच्या आई या पाकिस्तानच्या नागरिक होत्या.

कपिल देव यांच्या आई वडिलांना एकूण सात अपत्य होती, ज्यामध्ये तीन मुले तर चार मुली होत्या. पुढे १९८० यावर्षी कपिल देव यांनी रोमी भाटिया यांच्याशी लग्न केले. त्या पूर्वीपासूनच व्यावसायिक पार्श्वभूमीच्या असल्यामुळे पुढे जाऊन कपिल देव यांनी देखील व्यवसायामध्ये पदार्पण केले होते. लग्नाच्या सतरा वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव अमिया देव असे ठेवण्यात आले.

कपिल देव यांच्या आयुष्याला कलाटनी देणारा क्षण:

वेस्ट इंडिजच्या विरुद्ध १९८४ मध्ये एक दिवसाचा सामना ठरवला होता. मात्र या सामन्यांमध्ये भारत पराभूत झाल्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये शोककळा पसरली होती. कपिल देव यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आपण ही मालिका घातली असे अनेकांचे म्हणणे होते, त्यामुळे कपिल देव यांना कर्णधार पदावरून हटवत सुनील गावस्कर यांना पुन्हा कर्णधार बनविण्यात आले.

मात्र अवघ्या तीनच वर्षात त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रसन्न केले, आणि पुन्हा एकदा कर्णधारपदी मजल मारली. मात्र इंग्लंड विरुद्ध च्या विश्वचषकात भारताचा पुन्हा पराभव झाला. यावेळी देखील त्यांचे कर्णधार पद सुनील गावस्कर यांना देण्यात आले. मात्र यानंतर त्यांनी कधीही कर्णधार पदी विराजमान होण्याचा विचार केला नाही.

कपिल देव आणि भारतीय प्रशिक्षक:

कपिल देव यांनी भारतीय संघांना प्रशिक्षण दिलेले आहे, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. १९९९ ते २००० या कालावधी दरम्यान जवळपास दहा महिन्यांसाठी त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक पद भूषविले होते. मात्र या त्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील काही वाद निर्माण झाले, आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना हे पद सोडावे लागले होते?

हा वाद म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने दोनास शून्य अशा रीतीने मालिका गमावली होती, त्यानंतर सर्वच स्तरातून कपिल देव यांनी ही मॅच किंवा सामना फिक्सिंग केलेला आहे, अशी टीका होऊ लागली. त्यामुळे या सर्व लोकांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सोडून दिले.

निष्कर्ष:

कपिल देव हे एक अतिशय नामांकित व नावाजलेले क्रिकेटपटू असून, भारताला सर्वात प्रथम विश्वचषक अर्थात वर्ल्ड कप मिळवून देण्याचे श्रेय या कपिल देव यांना जाते. भारताच्या चंदीगड या ठिकाणी जन्मलेले कपिल देव लहानपणापासूनच क्रिकेट खेळासाठी प्रचंड वेडे होते.

त्यांना क्रिकेट बरोबरच इतर खेळ देखील मोठ्या प्रमाणावर आवडत असे,  ज्यामध्ये टेबल टेनिस, गोल्फ आणि स्क्वॅश यांच्यासारखा खेळाचा समावेश होता. त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये नाव करण्याबरोबरच भारताच्या क्रिकेट संघाला मार्गदर्शन करत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होण्याचा देखील मान मिळाला होता.

शालेय शिक्षण पूर्ण करून  त्यांनी कॉलेजचे शिक्षण देखील मिळवलेले आहे, व त्यांनी पदवीदेखील प्राप्त केलेली आहे. ते शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींचा समतोल राखल्यामुळे एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांनी पुढे कारकीर्द गाजवलेली आहे. एक उत्तम फलंदाज असण्याबरोबरच गोलंदाजी क्षेत्रामध्ये देखील त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे.

अनेक वेळा भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्यांनी आपले सर्वस्व पनाला लावलेले आहे. एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून संपूर्ण भारत त्यांना आज देखील ओळखत आहे. फलंदाजीच्या क्षेत्रात ५००० धावा पूर्ण करताना त्यांनी गोलंदाजी करत ४०० पेक्षाही अधिक बळी घेतलेले आहेत. त्यामुळे ते अतिशय अद्वितीय स्वरूपाचे ठरतात.

आजच्या भागामध्ये आपण कपिल देव यांचे जीवन चरित्र जाणून घेतलेले असून, त्यांच्या जन्माविषयी आणि शैक्षणिक आयुष्याविषयी देखील माहिती घेतलेली आहे. सोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्य, क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द, कर्णधार पद, त्यांना मिळालेल्या विविध पुरस्काराची आणि सन्मानाची माहिती, त्यांच्यावर आधारित असणारे विविध चित्रपट, आणि कपिल देव यांच्या विषयी असणारी काही मनोरंजक तथ्य माहिती इत्यादी गोष्टींची माहिती घेतलेली आहे.

FAQ

कपिल देव यांचे संपूर्ण नाव काय होते?

कपिल देव यांचे संपूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे होते.

कपिल देव यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

कपिल देव यांचा जन्म भारताच्या चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या ठिकाणी दिनांक ६ जानेवारी १९५९ या दिवशी झाला होता.

कपिल देव यांनी एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये कोणकोणत्या तारखांना पदार्पण केले होते?

कपिल देव यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये १ ऑक्टोबर १९७८ तर कसोटी सामन्यांमध्ये १६ ऑक्टोबर १९७८ या दिवशी पदार्पण केले होते.

कपिल देव यांनी एकदिवसीय व कसोटी सामन्यांमधून कोणाकोणाच्या तारखेला निवृत्ती घेतली होती?

कपिल देव यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यामधून १७ ऑक्टोबर १९९४ तर कसोटी सामना मधून २३ मार्च १९९४ या दिवशी निवृत्ती घेतली होती.

कपिल देव यांची वैवाहिक स्थिती काय आहे?

कपिल देव हे विवाहित असून, त्यांना आपत्य देखील आहेत. त्यांच्या लग्नाचे वर्ष १९८० हे होते.

Leave a Comment