Kasara Ghat Information In Marathi गर्द हिरवीगार झाडी, वेड्यावाकड्या वळणाचे रस्ते, धुके आणि सुखद निसर्ग सौंदर्य म्हटलं की इतक्याच वर्णनाने आपल्यासमोर घाट रस्ते उभे राहत असतात. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतामुळे अनेक घाट रस्त्यांची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घाट हे एक पर्यटनाचे देखील ठिकाण म्हणून ओळखले जाते.
कसारा घाटची संपूर्ण माहिती Kasara Ghat Information In Marathi
अगदी हिरवाईंनी नटलेल्या या घाटामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात, ज्यामुळे त्यांना अनेक नेत्र दीपक दृश्य अनुभवायला मिळतात. विविध प्रकारच्या ठिकाणांना महामार्गाच्या माध्यमातून जोडण्यासह एक पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून देखील या घाटांना ओळखले जाते. अशा या सौंदर्यमय घाटामध्ये कसारा या घाटाचा देखील समावेश होत असतो. आजच्या भागामध्ये आपण याच कसारा घाटाबद्दल माहिती बघूया…
नाव | कसारा |
प्रकार | घाट |
ओळख | भयकथा साठी प्रसिद्ध |
मार्ग | नाशिक ते मुंबई |
प्राचीन नाव | थळ घाट |
साधारण उंची | २००० फूट |
आसपासची ठिकाणे | त्रिंगलवाडी टेकडी आणि बलवंतगड |
मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्यासाठी प्रसिद्ध असणारा घाट म्हणून कसारा घाटाला ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून नाशिक ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान या घाटामधून वाहतूक करण्यात येते.
या घाटाबद्दल लोकांच्या अनेक मान्यता असून, या घाटामध्ये लोकांना भूत प्रेताचे अनुभव आले असल्याचे सांगितले जाते. अगदी युट्युब वर देखील या संदर्भात अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यामध्ये लोक या घाटामध्ये आलेल्या अलौकिक अनुभवांना सर्वांसमोर मोकळे करत असतात.
मात्र याबाबत किती सत्यता आहे हे कोणीही सांगत नाही. असे असले तरी देखील दिवसाच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. कुठल्याही अफवा असल्या तरी देखील एक उत्तम पर्यटन स्थळ किंवा निसर्ग सौंदर्याचे केंद्रस्थान म्हणून कसारा घाटाला ओळख प्राप्त झालेली आहे.
प्राचीन काळी या घाटाला थळघाट या नावाने ओळखले जात असे. सुमारे दोन हजार फूट उंच असणारा हा घाट नाशिक मार्गे मुंबईकडे जाताना वाटेमध्ये लागत असतो. या घाटातून रेल्वेतून प्रवास करणे एक सुखद अनुभव असून, भारतीय निसर्ग सौंदर्याचा अनुभव तुम्ही यामध्ये घेऊ शकता.
एका बाजूने खोलदरी, तर दुसऱ्या बाजूने पर्वतरांगा, त्यातही वळणावळणाचा रस्ता त्यामुळे भीतीवजा थरार अनुभवायचा असेल, तर या घाटाला नक्कीच भेट दिली पाहिजे. या ठिकाणी प्रवाशांना मध्ये थांबण्याची परवानगी नसते, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते.
तुम्ही एक पर्यटक म्हणून कसारा घाटाला भेट देणार असाल, तर या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्यटन स्थळे देखील अनुभवता येऊ शकतात. ज्यामध्ये बलवंतगड व त्रिंगलवाडी टेकडी हे दोन ठिकाणे मुख्य आहेत. कल्याण शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर ही दोन ठिकाणे दिसून येतात.
कसारा घाट हा डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे, येथे पाऊस देखील मोठ्या प्रमाणावर पडत असतो. ज्यामुळे दरडी देखील कोसळत असतात. पावसाळ्यामध्ये हा घाट सुंदर दिसत असला, तरी देखील तेवढाच धोकादायक व प्रवासासाठी जीकरीचा असतो.
त्याचबरोबर या घाटामध्ये अनेक वेळा धुक्याचा सामना करावा लागतो, त्यामुळे अवघ्या काही मीटर अंतरावरील वाहन देखील दिसणे दुरापास्त असते. अशा वेळेला अनेक वेळा या रस्त्याला बंद करण्यात येते. याच घाटाच्या परिसरामध्ये भावली नावाचे धरण असून, आजूबाजूला लहान-मोठे काही धबधबे देखील बघायला मिळत असतात.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका कडेला असणारा तालुका म्हणून अकोला तालुका ओळखला जातो, जो नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. या ठिकाणी एक सुप्रसिद्ध धरण बांधलेले असून, त्याचे नाव भंडारदरा आहे. तुम्ही कसारा घाटाच्या जवळील पर्यटन स्थळांचा विचार करत असाल तर प्रवरा नदीवर बांधलेल्या या धरणाला नक्कीच भेट देऊ शकता.
येथे तुम्हाला निसर्गसौंदर्यसह शांतता देखील अनुभवायला मिळेल. भंडारदरा या ठिकाणी जाण्याकरिता नाशिक मुंबई महामार्ग वापरावा लागतो. या ठिकाणी तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून देखील जाऊ शकता, किंवा बस चा पर्याय देखील निवडू शकता.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे शिखर म्हणून कळसुबाई शिखराला ओळखले जाते. हे शिखर सुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून, त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फूट इतकी आहे. तुम्ही कसारा घाटाच्या सहलीमध्ये या ठिकाणी देखील भेट देऊ शकता, मात्र येथे सकाळी जाणे खूपच फायदेशीर ठरते.
कळसुबाई शिखराला नाव पडण्यामागे देखील एक प्रथा आहे, कारण येथील एका गावाची सून म्हणून कळसुबाई प्रसिद्ध होती. या महिलेला किंवा स्त्रीला औषधी वनस्पतींचे खूप प्रकार ज्ञान होते. आजूबाजूच्या जंगलामध्ये जाऊन ही महिला वेगवेगळ्या वनस्पती गोळा करत असे, व विविध रोगांवर इलाज म्हणून या वनस्पतींचा वापर केला जात असे.
ज्यामुळे रुग्णांना झटपट गुण देखील येत असे. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक रुग्णांची सेवा केलेली होती. परिणामी या कळसुबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांना देवतेचे स्वरूप लोकांद्वारे बहाल करण्यात आले. आणि त्यांच्या नावावरून या शिखराचे नाव कळसुबाई शिखर असे ठेवण्यात आले.
कळसुबाई महामार्गावर तुम्हाला अमृतेश्वर मंदिर, भंडारदरा धबधबा, रंधा धबधबा इत्यादी मनमोहक ठिकाणे देखील बघायला मिळू शकतात.
निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने अतिशय विलोभनीय असणारा हा घाट लोकांनी उठवलेल्या वावड्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. कारण या ठिकाणी भूत प्रेतांच्या घटना घडतात, असे सांगितले जाते. प्रवास करणाऱ्याला भूत जखडते किंवा मारते, त्याचबरोबर या ठिकाणावरून रात्रीचा प्रवास करणाऱ्या अनेक लोकांकडून अलौकिक अनुभव आल्याच्या घटना देखील सांगितल्या जातात. आता ही गोष्ट किती खरी आहे किंवा किती खोटी आहे हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा व श्रद्धेचा प्रश्न आहे. असे असले तरी निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने मात्र हा घाट अतिशय उत्तम आहे.
निष्कर्ष:
घाट रस्ते हे विविध प्रकारच्या भौगोलिक परिसरांना एकमेकांशी जोडण्याची काम करत असतात. मात्र हे घाटरस्ते डोंगरदऱ्या मधून गेल्यामुळे त्यांना एक नैसर्गिक सौंदर्य देखील प्राप्त होत असते. येथून प्रवास करणारे प्रवासी या मोहक दृष्टीने अगदी सुखावून जात असतात. म्हणूनच घाटांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. येथील पर्यटनाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर उधाणच येत असते.
आजच्या भागामध्ये आपण अशाच एका घाटाबद्दल अर्थात कसारा घाटाबद्दल माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळालेल्या असतील, जसे की हा घाट कोणत्या मार्गातून जातो, या घाटाने कोणकोणत्या ठिकाणी जाता येऊ शकते, या घाटाच्या प्रवासामध्ये लागणारी विविध प्रेक्षणीय स्थळे, या घाटाची उंची, येथे आढळणाऱ्या विविध वनस्पती किंवा औषधी वनस्पती, येथील पर्यटन स्थळ, निसर्ग सौंदर्य इत्यादींबाबत माहिती बघितलेली आहे.
FAQ
कसारा घाट कोणकोणत्या शहरांना जोडण्याचे कार्य करत असतो?
कसारा घाट हा मुंबई व नाशिक या दोन शहरांदरम्यान असून, या दोन शहरांना जोडण्याचे कार्य करत असतो.
कसारा घाटाचे पूर्वीचे नाव काय होते?
पूर्वी कसारा या घाटाला थळघाट या नावाने ओळखले जात असे.
थळघाट अर्थातच कसारा या घाटाबद्दल काय माहिती सांगितली जाते? किंवा तो घाट कशासाठी प्रसिद्ध आहे?
थळघाट हा विविध भूत प्रेतांच्या कथांसाठी प्रसिद्ध असून, येथे अनेकांना असे अनुभव आले असल्याचे सांगितले जाते.
कसारा घाट किंवा थळघाटाची साधारण उंची किती समजली जाते?
कसारा घाट किंवा थळ घाट याची साधारण उंची २००० मीटर इतकी समजली जाते.
थळघाट परिसरात असणारे जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?
थळघाट परिसरामध्ये असणारे जंगल हे तेथे आढळून येणाऱ्या औषधी वनस्पती साठी प्रसिद्ध आहे.