खारुताई प्राण्याची संपूर्ण माहिती Kharutai Animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Kharutai Animal Information In Marathi खारुताई हा एक छोटासा, मात्र चपळ प्राणी असून त्याचे नाव ग्रीक या भाषेमधून घेण्यात आलेले आहे. त्याची अगदी झुपकेदार शेपटी हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. संपूर्ण जगभरामध्ये अनेक ठिकाणी या खारुताईच्या प्रजाती आढळून येतात, जो एक सर्वात लहान सस्तन प्राणी असून सर्वात प्रसिद्ध आणि प्रचलित असणारे प्राणी आहे. आजच्या भागामध्ये आपण खारुताई या छोट्याशा प्राण्याबद्दल माहिती घेणार आहोत…

Kharutai Animal Information In Marathi

खारुताई प्राण्याची संपूर्ण माहिती Kharutai Animal Information In Marathi

नावखारुताई
इंग्रजी नावस्क्विरल
कुटुंब किंवा कुळSciuridae
साधारण आयुष्यमान६ ते १० वर्षे
साधारण वेग३२ किलोमीटर प्रति तास
हायर क्लासिफिकेशनस्क्यूरोमॉर्फ
गर्भधारणा कालावधी४२ ते ४४ दिवस
शत्रू/ कोण खातातसाप, कोयोट, नेसल, बॉबकट, लाल कोल्हा, आर्टिक कोल्हा, लाल शेपटीचा हॉक, हेरॉनस, कूपर्स हॉक इ.

खारुताई या प्राण्याची वैशिष्ट्ये:

मित्रांनो, सस्तन प्राण्यांमधील सर्वात लहान प्राणी म्हणून खारुताईला ओळखले जाते. तिचा आकार केवळ दहा ते चौदा सेंटीमीटर पर्यंत लांब असतो, तर वजन हे सव्वा किलोच्या आसपास असते. मात्र काही खारुताई सुमारे आठ किलोपर्यंत देखील वाढू शकतात.

या खारुताईची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची शेवटी अतिशय लांब आणि झुबका असलेली असते, डोळे मोठे असतात, मात्र शरीर त्या मानाने थोडेसे सडपातळ असते, त्यांच्या अंगावर अतिशय मऊ आणि रेशमी केस असतात. त्यांचा रंग प्रजातीनुसार बदलत असतो.

खारुताईच्या विविध प्रजातींना एका पायाला चार ते पाच बोटे असतात. तसेच या खारुताई मध्ये पुढील पाय व मागील पाय यांची लांबी वेगवेगळी असते. ही खारुताई झाडावर चढण्यासाठी खूप पटाईत आहे, ती तिचे पाय सुमारे १८० अंशापर्यंत फिरवू शकते. म्हणजे अगदी उलटे देखील करू शकते. ज्यामुळे तिला झाडावर चढणे सहज शक्य होते. ती आपल्या पुढील पायांचा वापर हाताप्रमाणे करू शकते, ज्याद्वारे तिला अन्न खाता येते.

खारुताई हा प्राणी अगदी थंड आर्टिक झोन पासून, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, आणि वाळवंटीय प्रदेश अशा जवळपास सर्वच परिसंस्थेमध्ये आढळून येते. ती मुख्यत्वे झाडावरील छोटी छोटी फळे खाण्यास प्राधान्य देत असली, तरी देखील काही वेळेस ती लहान कीटक देखील खाते. मात्र याचे प्रमाण अगदीच नगण्य असते.

खारुताईच्या दातांची डिझाईन ही क्लासिक रॉईंट प्रकारातील असते. तिचे दात नेहमी वाढतच असतात, आणि तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील त्यांची वाढ सुरूच असते. या खारुताई ला दृष्टीचे वरदान खूप चांगले मिळालेले आहे, ती खूप दूरवरचे अगदी स्पष्टपणे बघू शकते. तसेच या खारुताईचे स्पर्शज्ञान देखील अतिशय उत्तम असते. त्यामुळे थोडे जरी काही टेकले तरी देखील अतिशय चपळतेने दूर होते.

खारुताईंचे सरासरी आयुष्य हे सहा ते दहा वर्षे असते, मात्र काही प्रजाती की ज्यांना अन मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही, अशा प्रजाती सुमारे दहा ते वीस वर्षांपर्यंत सुद्धा जगू शकतात.

खारुताई च्या विविध सवयी:

मित्रांनो, खारुताई ही दिवसा वावरणारी असून ती आपले अन्न मिळवणे आणि इतर कार्य दिवसाच करत असते, आणि रात्रीच्या वेळी ती झोपत असते. खारुताई नेहमीच चपळ दिसत असली, तरी देखील हिवाळ्यामध्ये तिच्यामध्ये थोडीशी सुस्ती चढते. तर काही आर्टिक प्रदेशातील खारुताईच्या प्रजाती या काही काळासाठी सुप्त अवस्थेमध्ये जात असतात.

खाण्याच्या सवयींमध्ये खारुताई अगदी शाकाहारी आहे, जी विविध झाडांच्या फळांपासून त्यांच्या बिया, विविध भाज्या, काजू, यासारख्या गोष्टी खात असतात. ही खारुताई शाकाहारी असली तरी देखील आणीबाणीच्या प्रसंगात ती लहान लहान कीटक खाऊन देखील आपला उदरनिर्वाह करत असते. एक आठवड्यामध्ये एक खारुताई अंदाजे एक पौंड वजनाचे अन्न ग्रहण करत असते.

त्यांचे पोट भरलेले असल्यानंतरही त्यांना अन्न मिळाले, तर ते जमिनीमध्ये खड्डा खणून त्यामध्ये हे अन्न पुरून ठेवतात, जेणेकरून नंतर उपयोगात आणता येऊ शकेल. मात्र बऱ्याच वेळेस त्या हे पुरलेले अन्न विसरून जातात.

मित्रांनो, खारुताई ला आपले अन्न शोधण्यासाठी चांगले नाक देखील मिळालेले आहे. त्यामुळे एक फूट अंतरावर देखील अन्न असेल तरी देखील या खारुताई ते अन्न शोधून त्यावर आपली गुजराण करत असतात.

इतर सस्तन प्राण्यांप्रमाणेच खारुताई देखील आपले घर बांधत असते. आणि या घरांमध्ये ती शक्यतो कोणालाही प्रवेश करू देत नाही.

खारुताई चे खानपान:

मित्रांनो, खारुताई शाकाहारी असल्यामुळे त्यांना शाकाहारी अन्नाचा शोध घ्यावा लागतो. त्यामध्ये मुख्यत्वे काजू असतात. सोबतच अनेक फळे, वनस्पती, भाज्या, विविध झाडांच्या बिया, यांचा समावेश होतो. या खारुताईच्या काही प्रजाती लहान कीटक, सुरवंट, लहान लहान अंडी देखील खात असतात.

खारुताई बद्दलची काही मजेदार तथ्य:

  • मित्रांनो, खारुताई ही उंदीर या प्रजातीपासून निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते.
  • खारुताई पक्षांप्रमाणे उडू शकत नाहीत. मात्र तरी देखील त्या झाडावर सरसर चढत असतात. त्यांना झाडावर राहणे पसंत आहे.
  • चिपमंक्स या प्रजातीमध्ये खारुताई च्या अंगावर विशिष्ट पट्टे आढळून येतात, आणि या प्रजातीची खारुताई खाल्लेले अन्न साठवून ठेवण्याकरिता आपल्या गालावरील चरबीच्या पाऊच चे देखील वापर करत असते.
  • जगभरात खारुताई च्या सुमारे २८० प्रजाती असल्याची नोंद आढळून येते.

निष्कर्ष:

मित्रांनो, या पृथ्वीतलावर अनेक गोंडस प्राणी बघायला मिळतात. त्यातील अगदी लहानसा आणि खूपच चुनकदार प्राणी, तसेच चपळ असणारा खारुताई या प्राण्याविषयी आपण आज माहिती बघितली. या माहितीमध्ये तुम्हाला खारुताईची वैशिष्ट्ये, तिच्या विविध सवयी, ती आहार कोणता घेते, तसेच तिच्याबद्दलची काही मनोरंजक तथ्ये देखील जाणून घेतली. सोबतच काही प्रश्नोत्तरे देखील बघितलेली आहेत.

FAQ

खारुताई या प्राण्याला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते?

खारुताई या प्राण्याला अजून गिलहरी किंवा इंग्रजीमध्ये स्क्वेरल या नावाने ओळखले जाते.

खारुताई चे पर्यावरणामध्ये कसे योगदान आहे?

मित्रांनो, खारुताईला निसर्गाचे राखणदार म्हणून ओळखले जाते. ती पर्यावरणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याबरोबरच वनामध्ये राहताना विविध झाडांच्या बिया पसरविण्यात मोठे योगदान देते. त्यामुळे अनेक जंगले मोठी होतात. आपली फळे खाऊन झाली की ती या फळांच्या बिया जमिनीमध्ये पुरवून ठेवते, जेणेकरून तिला त्या भविष्यामध्ये खाता येतील, मात्र बऱ्याचदा ती ही गोष्ट विसरून जाते, आणि मग पावसाळ्यामध्ये त्या बियांपासून चांगली झाडे उगण्यास मदत होते.

खारुताई चे वैशिष्ट्य काय आहे?

खारुताई ही मानवाप्रमाणेच आपल्या भविष्यासाठी तरतूद करून ठेवणारी असून, ती जमिनीमध्ये काजू आणि एकोर्ण सारख्या बिया लपवून ठेवते, जेणेकरून हिवाळ्यामध्ये कामात येईल. मात्र ती या अन्नाला विसरून जाते, परिणामी या बियांपासून मोठ-मोठी काजूची झाडे वाढतात.

खारुताई चा साधारण अधिवास कोठे असतो?

साधारणपणे खारुताई या जमिनीवरच आढळून येतात, मात्र काही वेळेस त्या स्वतःसाठी घर देखील बांधतात. शक्यतो त्या खडकाळ ठिकाणी किंवा गवताळ कुरणांमध्ये आढळून येतात. शिवाय जंगला शेजारच्या डोंगराळ प्रदेशांमध्ये देखील यांचे वास्तव्य आढळून येते.

खारुताई च्या प्रजाती बद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो, मुख्यत्वे खारुताई ची प्रजाती उंदरापासून निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते. आज जगभरात सुमारे २८० पेक्षा देखील अधिक खारुताईच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण खारुताई या अगदी लहान असलेल्या सस्तन प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, अशी खात्री आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची कमेंट बॉक्समध्ये वाट बघत आहोत, आणि याच बरोबर या खारुताई च्या माहितीला जास्तीत जास्त शेअर करण्याची देखील तुम्हाला विनंती करत आहोत.

धन्यवाद…

Leave a Comment