किंगफिशर पक्षाची संपूर्ण माहिती kingfisher Bird Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

kingfisher Bird Information In Marathi आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शरीरारचनेसाठी त्याचप्रमाणे आपल्या आकर्षक दिसण्यासाठी ओळखला जाणारा अतिशय लहानसा पक्षी म्हणून किंगफिशर अर्थात खंड्या पक्षाला ओळखले जाते. याला काही ठिकाणी राम चिडिया किंवा किलकिला या नावाने देखील ओळखले जाते.

Kingfisher Bird Information In Marathi
किंगफिशर पक्षाची संपूर्ण माहिती kingfisher Bird Information In Marathi 2

किंगफिशर पक्षाची संपूर्ण माहिती kingfisher Bird Information In Marathi

हा पक्षी पाण्यातील मासे अतिशय विस्मयकारक रित्या पकडून खात असतो. त्यामुळे या पक्षाला खूप पसंत केले जाते. मुख्यतःहा तपकिरी रंगाचा असणारा हा पक्षी पंखावर मात्र निळ्या चमकदार रंगाने माखलेला असतो. त्याच बरोबर त्याच्या डोक्यावर निळा तुरा देखील उपलब्ध असतो.

अतिशय लहान पाय आणि धारदार चोच असणारा हा प्राणी त्याच्या तीक्ष्ण दृष्टीसाठी देखील ओळखला जातो. हा असा प्राणी आहे जो चपळ असण्याबरोबरच खूप वेगाने देखील उडू शकतो, व कित्येक तास पाण्यावर न थकता उडू शकतो. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय उंचावर उडत हे शिकार हेरत फिरत असतात, आणि मासा टप्प्यात आला असता क्षणात खाली येऊन या माशाची शिकार करून पुन्हा आकाशात जात असतात.

मुख्यतः मांसाहारी असणारा हा प्राणी मासे खाण्यासाठीच ओळखला जातो. त्याच बरोबर तो बेडूक, कीटक, लहान उभयचर प्राणी, गोगलगाय, कोळी त्याचबरोबर काही सरपटणाऱ्या प्राण्यांना देखील आपले भक्ष बनवत असतो. आजच्या भागामध्ये आपण या किंगफिशर अर्थात खंड्या पक्षाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावखंड्या
इंग्रजी नावकिंगफिशर
शास्त्रीय नावहेलसायन स्मिरमेंसिस
इतर नावेराम चिडिया, किंवा किलकिला
कुटुंब किंवा कुळलसेर्निडे
प्रजातींची संख्या९०
साधारण आयुष्यमानपंधरा वर्षे
रंगतपकिरी निळसर
आकारलहानसा

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रंगाचा आणि शरीररचनेने देखील वैशिष्ट्यपूर्ण असलेला किंगफिशर प्राणी जगभरात जवळपास सर्वत्र आढळून येतो. या प्राण्याच्या प्रजाती जास्तीत जास्त संख्येने ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आढळून येत असतात. त्याच्या सुमारे ९० प्रजाती असून, या सर्व प्रजाती अतिशय टोकदार तीक्ष्णव लांबसर चोचीसाठी ओळखल्या जातात.

अतिशय मोठे डोके आणि लहान पाय हे या पक्षांचे वैशिष्ट्य समजले जाते. या पक्षामधील नर व मादी अतिशय वेगवेगळ्या स्वरूपाची दिसून येत असतात. मुख्यतः मासे शिकार करून खाणाऱ्या प्रजातींमध्ये यांचा समावेश होतो. ते झाडाच्या पोकळ फांदीमध्ये आपले घरटे निर्माण करत असतात. त्याचबरोबर इमारतींच्या बोगद्यामध्ये देखील ते आपले वास्तव्य करत असतात. या खंड्या पक्षाच्या काही प्रजाती आजकाल नष्ट होण्याचे देखील मार्गावर आलेल्या आहेत.

खंड्या पक्षाचे राहण्याचे ठिकाण व वितरण:

मुख्यतः उष्णकटिबंधीय तसेच समशीतोष्ण पट्ट्यामध्ये या पक्षांची मोठ्या प्रमाणावर संख्या आढळत असते. असे असले तरी देखील हा एक जागतिक पक्षी असून, काही वाळवंटी प्रदेश व आर्टिक भूभाग सोडला तर जवळपास सर्व देशांमध्ये व बेटांवर या पक्षांची संख्या आढळून येत असते. मुख्यतः प्रशांत महासागराच्या आसपास या पक्षांची मोठी संख्या आढळत असते.

ऑस्ट्रेलिया हे या पक्षांसाठी खूप चांगले क्षेत्र समजले जाते. त्याचबरोबर अमेरिका, युरोप, मेक्सिको, या ठिकाणी देखील त्यांच्या विविध प्रजाती आढळून येत असतात. अमेरिकेमध्ये रंगावरून सहा प्रजाती तयार करण्यात आलेले आहेत. यातील चार प्रजातींचा रंग काहीसा हिरवट स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये हिवाळ्याच्या दरम्यान काही पट्टेरी खंड्या पक्षी देखील आढळून येत असतात.

खंड्या पक्षाचा आहार:

खंड्या हा एक मांसाहारी स्वरूपाचा पक्षी आहे. मात्र काही प्रमाणात तो शाकाहारी अन्न देखील खात असतो. मुख्यतः पाण्यातील मासे हे त्याचे खूप आवडीचे खाद्य असून, हवेमध्ये उडताना तो या पाण्यामध्ये लक्ष ठेवून असतो. मासा दिसला का तो आपली चोच खाली करून अतिशय सरकन पाण्यामध्ये शिरून, त्या माशाला पकडत असतो. व हवेमध्ये घेऊन त्याची शिकार करून खात असतो.

त्याचबरोबर विविध प्रकारचे कोळी, लहान कीटक, काही मृदू शरीराच्या अळ्या, गोगलगाय, गांडूळ, बेडूक, सरपटणारे लहान प्राणी, इत्यादी प्राण्यांना देखील हा पक्षी आपले भक्ष बनवून खात असतो. वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या प्रजातींचा आहार देखील वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. काही खंड्या पक्षी केवळ मासे खाण्यासाठीच लक्ष देत असतात. खंड्या पक्षी कीटक किंवा तृणधान्य खाऊन देखील आपली भूक भागवत असतात.

किंगफिशर किंवा खंड्या पक्षाचे पुनरुत्पादन:

खंड्या पक्षांमध्ये सहकारी स्वरूपाचे प्रजनन आढळून येत असते. मात्र हे पक्षी एक पत्नी स्वरूपामध्ये असतात. जोडप्याच्या स्वरूपाने राहणारे हे पक्षी जोडीने आपल्या पिल्लांचे संगोपन करण्यासाठी ओळखले जातात. प्रजननाच्या कालावधीमध्ये झाडाच्या पोकळीमध्ये हे पक्षी आपल्या घरट्याची निर्मिती करत असतात.

काही वेळेला इमारतींच्या बोगद्यामध्ये देखील या पक्षांचे घरटे आढळून येत असते. झाडे उपलब्ध नसतील, तर नदीकाठी असणाऱ्या झुडपांमध्ये देखील हे पक्षी काहीसा निवारा करून त्यामध्ये अंडी घालत असतात. अगदी वाळवी लागलेल्या झाडाच्या मुळांमध्ये देखील हे पक्षी आपले घरटे बनवू शकतात. शक्यतो आयते घरटे शोधण्याकडे या पक्षांचा कल असतो.

या खंड्या पक्षाची अंडी ही अतिशय चमकदार मोत्यासारख्या पांढरा रंगाची असतात. शक्यतो एक पक्षी दोन अंडी देत असतो, तर काही प्रजाती १० थंडी देखील घालत असतात. इतर पक्षांच्या व्यतिरिक्त खंड्या पक्षाची नर व मादी असे दोघेही या अंड्यांना उब देण्याचे कार्य करत असतात. अंडी उबवल्यानंतर यातून पिल्ले बाहेर पडत असतात, ज्यांचे संगोपन नर व मादी जोडीने करत असतात.

निष्कर्ष:

आपल्या आसपास अनेक पक्षी आढळून येत असतात. या प्रत्येक पक्षाचे काहीतरी वैशिष्ट्ये असते. एक उत्तम शिकारी पक्षी, ज्याला मासे फार आवडतात असा पक्षी म्हणून किंगफिशर अर्थात खंड्या पक्षाला ओळखले जाते. आपल्या चमकदार निळसर तपकरी रंगासाठी ओळखला जाणारा हा पक्षी आकाराने मात्र लहान असतो.

पाण्यावर कित्येक तास उडू शकणारा हा पक्षी अतिशय उच्च क्षमता असलेला असतो. त्याच्या चोचीची अतिशय विशिष्ट रचना त्याला विना आवाज करता कितीही वेगाने आकाशातून  झरकन  खाली येऊन मासा पकडण्यासाठी मदत करत असते. असा हा वैशिष्ट्यपूर्ण किंगफिशर पक्षी कसा असतो, याबद्दल आज आपण माहिती बघितली आहे.

त्यामध्ये त्याचे कौटुंबिक वर्गीकरण, त्याच्या विविध प्रजाती, त्याच्या राहण्याचे ठिकाण, निवास, वितरण, त्याचबरोबर किंगफिशर पक्षी कोणकोणत्या स्वरूपाचे अन्न व आहार खात असतो, त्याच्या प्रजातीमधील पुनरुत्पादन, किंगफिशरचा मानवाशी असलेला संबंध, आणि सद्यस्थिती, त्याचबरोबर किंगफिशर प्राण्याच्या संरक्षणाची व संवर्धनाची गरज इत्यादी गोष्टींवर माहिती बघितली आहे.

FAQ

खंड्या या पक्षाला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?

खंड्या या पक्षाला बोली भाषेमध्ये राम चिडिया, तसेच किलकिला या नावाने ओळखले जाते. तर इंग्रजीमध्ये याला किंगफिशर म्हणून संबोधले जाते.

किंगफिशर या पक्षाचा रंग कशा स्वरूपाचा असतो?

किंगफिशर या पक्षाचा रंग मुख्यतः तपकिरी असतो. मात्र त्याच्या पंखावर चमकदार निळा रंग देखील आढळून येतो. सोबतच त्याच्या डोक्यावर निळसर तुरा देखील दिसतो.

किंगफिशर पक्षाच्या शरीररचनेबद्दल काय वैशिष्ट्ये सांगता येईल?

किंगफिशर पक्षाची शरीर रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याची चोच ही चाकू सारखी धारदार असते, जेणेकरून त्याला अतिशय वेगाने उडता येते. सोबतच तो पाण्यामध्ये सूर मारण्यासाठी देखील समर्थ असतो, तर त्याचे पाय अतिशय बारीक स्वरूपाचे व पिवळसर असतात.

किंगफिशर या पक्षाच्या जगभरामध्ये सुमारे किती प्रजाती आढळून येतात?

किंगफिशर या पक्षाच्या जगभरामध्ये सुमारे ९० प्रजाती आढळून येतात.

किंगफिशर पक्षी साधारणपणे किती वर्षांचे आयुष्य जगत असतो?

किंग फिशर पक्षी हा पक्षी गटामधील इतर पक्षांपेक्षा बरेचसे अधिक अर्थात पंधरा वर्षापर्यंतचे आयुष्य जगत असतो, जे पक्षी गटांमध्ये बरेचसे अधिक समजले जाते.

Leave a Comment