कोकण विषयी संपूर्ण माहिती Konkan Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Konkan Information In Marathi मित्रांनो,महाराष्ट्रातील लोकांचे सर्वात उत्तम आणि आवडीचे पर्यटन स्थळ कोणते असा प्रश्न विचारला की लगेच प्रत्येकाच्या तोंडातून आपोआपच कोकणचे नाव बाहेर येत असते, आणि प्रसन्न वाटत असते. त्यामुळे थोडीशी उसंत मिळताच अनेक लोक कोकणाच्या सहलीला धाव घेत असतात.

कोकण विषयी संपूर्ण माहिती Konkan Information In Marathi 1

कोकण विषयी संपूर्ण माहिती Konkan Information In Marathi

तर मुंबईमध्ये कार्य करणारे कोकणवासी लोक देखील सुट्टीला आपल्या गावी परतत असतात. अतिशय निसर्ग सौंदर्याने वेढलेला महाराष्ट्रातील सर्वात सूंदर परिसर म्हणून या कोकण विभागाला ओळखले जात असते. अगदी वर मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत वसलेला हा कोकण अतिशय चिंचोळ्या पट्टीच्या स्वरूपात असून, एका बाजूला विशाल अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच सह्याद्री पर्वत हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे.

मुख्यतः लाल स्वरूपाची माती या परिसरात आढळत असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे भात शेती केली जात असते. त्याचबरोबर भात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची देखील येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असून, किनाऱ्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांकडून मासेमारी आणि मिठाची निर्मिती इत्यादी व्यवसाय केले जात असतात.

अतिशय साधी जीवनशैली जगणाऱ्या कोकणातील लोकांचे हृदय देखील अतिशय शुद्ध असते, त्यामुळे कोकणामध्ये गेल्यानंतर हमखास पाहुणचार केला जात असतो. आजच्या भागामध्ये आपण या कोकणाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावकोकण
प्रकारमहाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग
ठिकाणमहाराष्ट्र, भारत
वैशिष्ट्यसमुद्रकिनारा आणि घाट रस्ते
भाषाकोकणी
मुख्य समुदायकोळी
सर्वात छोटा जिल्हा मुंबई
सर्वात दक्षिणेकडील जिल्हासिंधुदुर्ग
मुख्य व्यवसायभात शेती आणि मासेमारी
दुसरा व्यवसायमीठ निर्मिती

महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे वसलेला हा प्राकृतिक विभाग अतिशय उत्कृष्ट असून, निसर्ग सौंदर्याने जणू येथे मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे असे वाटून जाते. एका बाजूला अथांग असा अरबी समुद्र, आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री कडा आणि मधल्या भागामध्ये वसलेला हा निसर्ग पर्यटनच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असून, महाराष्ट्रामध्ये अनेक बीचेस या कोकण किनारपट्टीवर वसलेले आहेत.

पूर्वीच्या काळी याला गोमंचल सारख्या नावाने देखील ओळखले जायचे. उत्तरेकडे असणाऱ्या दमणगंगा नदीपासून या कोकण प्रदेशाची सीमा सुरू होते, तर दक्षिणेस असणाऱ्या तेरेखोल नदीपर्यंत ही सीमा आहे. हा किनारा प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्याच पद्धतीने महाराष्ट्रमध्ये त्याला कोकण म्हटले जाते.

कोकण मधील लोक अतिशय साध्या स्वरूपाचे असून, त्यांच्या भोळेपणावर निसर्ग खुश झाला आहे, आणि त्यामुळे त्यांना असे निसर्गसानीध्यामध्ये ठेवले आहे असे म्हटले जात असते. निसर्गाच्या संपूर्ण कला या कोकण विभागामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात.

एका आख्यायिकेनुसार एक कुऱ्हाड सह्याद्री खिंडीतून समुद्रामध्ये फेकली होती, आणि त्यातूनच या कोकणाची निर्मिती झाली असे सांगण्यात येते. सप्तः कोकण या नावाने तत्कालीन काळामध्ये कोकण ओळखला जात असे.  या शब्दाचा अर्थ पृथ्वीचा छोटासा तुकडा असा होतो. अनेक बौद्ध भिकूंनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये या कोकणाबद्दल उल्लेख केलेला असून, सर्वात प्रथम कोकण देश या नावाने पंधरावे शतकामध्ये असणारे लेखक प्रयत्नकोश यांनी या कोकणाचा उल्लेख केला होता.

कोकणाचा भौगोलिक विस्तार:

कोकण हा अतिशय सुरेख परिसर असला तरी देखील आकाराने काहीसा लहान आणि चिंचोळ्या स्वरूपातील आहे. त्यातील विविध जिल्हे हे एकाखाली एक वसलेले असून, या कोकणाच्या सीमेवर गुजरात, गोवा, कर्नाटक, यांसारखे राज्य वसलेली आहे. तर पूर्वेस उंच असा सह्याद्री पर्वत आहे.

येथील नद्या अतिशय उत्तरावरून तीव्र वेगाने वाहत असतात, त्यामुळे त्यांच्याद्वारे खननकार्य देखील केले जात असते, आणि या खनन कार्याद्वारे वाहून आणलेली माती कोकणातील किनारपट्टीच्या भागांमध्ये साचली जाते. त्यामुळे अनेक दलदलीचे प्रदेश देखील या कोकण विभागांमध्ये तयार झालेले आहेत.

कोकण प्रदेशांमध्ये मुख्यतः भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असते. येथे घरे देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून मोठ्या प्रमाणावर येथे पाऊस पडत असल्यामुळे कोकणातील घरांचे स्वरूप हे कौलारू स्वरूपाचे आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये येथे नैसर्गिक गोष्टींवर लोक उपजीविका करत असतात, त्यामुळे येथील लोक नेहमीच सुदृढ आढळून येतात.

कोकण प्रदेशावर अनेक लोकांनी आपले राज्य संस्थापित केलेले असून, इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये येथे मौर्य साम्राज्य आपला राज्यकारभार करत होते असे सांगितले जाते. त्यानंतर शिलाहार, पोर्तुगीज यांसारख्या अनेक लोकांनी येथे राज्य केलेले आहे. स्वराज्याच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जंजिरा सोडून इतर सर्व किल्ल्यांवर आपले नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर पेशव्याने देखील बऱ्याच कालावधीसाठी येथे राज्य केलेले आहे.

निष्कर्ष:

कोकण म्हणजे काय हे कोकणामध्ये गेल्याशिवाय कळत नाही. अतिशय उत्कृष्ट निसर्ग सौंदर्याने नटलेले महाराष्ट्रातील ठिकाण म्हणजे कोकण होय. अतिशय घाटांचा आणि निसर्ग सानिध्याचा प्रवास करत आपण या कोकणामध्ये पोहोचू शकतो. अनेक लोक पर्यटन म्हटलं की कोकणाचे नाव सर्वप्रथम सुचवत असतात.

महाराष्ट्र मध्ये कोकण या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश खालील कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मात्र वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असतो. अतिशय उत्कृष्ट किनारपट्टी असणारे या कोकणामध्ये अनेक बंदरे देखील आढळून येतात. त्यामध्ये काही बंदरे नैसर्गिक स्वरूपाचे असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असतो. यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बंदर म्हणून मुंबई बंदराला ओळखले जात असते.

महाराष्ट्रासह भारताचा अनेक टक्के व्यापार याच मुंबई बंदरातून सुरू असतो. त्याचबरोबर महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे क्षेत्र देखील या कोकण पट्ट्यांमध्येच वसलेले आहे. अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला बघायला मिळत असतात, मात्र या सर्व संस्कृतीमध्ये देखील कोकणी लोकांच्या एकतेचे दर्शन आपल्याला घडवून येत असते.

या ठिकाणी गणपती उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या ठिकाणची माती लाल व अतिशय टिकाऊ समजले जाते. आजच्या भागामध्ये आपण कोकण या प्राकृतिक विभागाबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्या अंतर्गत कोकण म्हणजे काय, त्याचा भौगोलिक विस्तार किती झालेला आहे, त्याचबरोबर येथे कोणकोणत्या प्राणी व वनस्पतीच्या प्रजाती आढळून येतात, कोकणात असलेले विविध व्यवसाय, विविध समुदाय, यांच्याविषयी देखील जाणून घेतलेले असून, कोकणामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक मुख्य पर्यटन स्थळांबद्दल देखील जाणून घेतलेले आहे।

FAQ

कोकण प्राकृतिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येत असतात?

महाराष्ट्रातील कोकण या प्राकृतिक विभागामध्ये ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इत्यादी जिल्हे आढळून येत असतात.

कोकण कोठे वसलेला आहे?

कोकण हा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग अरबी समुद्राच्या आणि सह्याद्री पर्वताच्या मध्ये असणाऱ्या चिंचोळ्या पट्ट्याच्या स्वरूपात असणाऱ्या जागेमध्ये वसलेला आहे.

कोकण विभागामध्ये मुख्यतः कोणत्या समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात?

कोकण विभागामध्ये मुख्यतः कोळी समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात.

कोकण या प्रदेशांमध्ये मुख्यतः कोणकोणते व्यवसाय चालू असतात?

कोकण या प्रदेशांमध्ये मुख्यतः भात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून, जोडधंदा म्हणून मासेमारी देखील केली जात असते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मीठ उत्पादन देखील चालत असते.

कोकण किनारा कशासाठी ओळखला जातो?

कोकण किनारा हा उत्कृष्ट नैसर्गिक बंदरांसाठी ओळखला जात असतो. या ठिकाणी मुंबई बंदरासारखे अतिशय उत्कृष्ट नैसर्गिक बंदर असून, अनेक छोटी मोठी नैसर्गिक बंदरे देखील निर्माण झालेली आहेत.

Leave a Comment