कोकिळा पक्षाची संपूर्ण माहिती Koyal Bird Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Koyal Bird Information In Marathi गाणारा पक्षी कुठला असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच कोकिळा किंवा कोयल पक्षाचा आवाज येत असतो. आपल्या विशेष आवाजासाठी ओळखली जाणारी ही कोकिळा प्रजाती मुख्यतः भारतीय उपखंडामध्ये राहत असते. त्याचबरोबर आग्नेय आशिया या प्रदेशांमध्ये देखील त्यांच्या काही प्रजाती आढळून येत असतात. मुख्यतः वसंत ऋतुच्या कालावधीमध्ये या पक्षांचा आवाज मोठ्या प्रमाणावर ऐकला जात असतो.

Koyal Bird Information In Marathi

कोकिळा पक्षाची संपूर्ण माहिती Koyal Bird Information In Marathi

या पक्षाचा उल्लेख अगदी भारतीय पौराणिक कथांमध्ये देखील असून, गोड आवाज असणारा हा पक्षी समृद्धी आणि नशीब यांचे प्रतीक म्हणून देखील ओळखला जात असतो. शारीरिक दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असलेला, हा पक्षी परजीवी स्वरूपातील असून, दुसऱ्या पक्षाच्या घरट्यामध्ये स्वतःची अंडी घालण्यासाठी हा पक्षी ओळखला जात असतो.

नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असले, तरी देखील शरीर रचनेच्या दृष्टिकोनातून जराशी सारखेच असतात.  दुसऱ्या पक्षाच्या घरामध्ये अंडी घालत असणारे हे पक्षी शक्यतो जोडीने आढळून येत असतात. वेगवेगळ्या रंगाचे हे पक्षी एकत्रच आपल्या पिल्लांना वाढवत असतात.

अगदी लांब अंतरावरून देखील या पक्षाचे गाणे ऐकले जाऊ शकते. यातील आशियाई प्रजातीचे नर कोकिळा पक्षी गाण्यासाठी सर्वात उत्तम समजले जात असतात. मुख्यतः विनीच्या हंगामामध्ये तर हे पक्षी हमखास गात असतात. मादी पक्षी चा आवाज कर्कश्य असला, तरी देखील नर पक्षी आपल्या सुरेल आवाजाने मादी कोकिळेला आकर्षित करून घेत असतो. आजच्या भागामध्ये आपण या पक्षाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावकोकिळा
प्रकारपक्षी
शास्त्रीय नावEudynamys
हायर क्लासिफिकेशनओव्हीप्यारस
किंगडमऍनिमलया
फायलमकोरडाटा
गटकुकिलीफॉर्मस

कोकिळा पक्षाची वागणूक:

कोकिळा हा एक स्थलांतरित स्वरूपातील पक्षी असून, तो उष्णकटिबंधीय परिसरामध्ये आढळत असतो. मात्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तो भारतीय उपखंडामध्ये येऊन काही उबदार वातावरण अनुभवत असतो. अतिशय उत्तम आवाजासाठी ओळखला जाणारा हा पक्षी प्रजनन काळामध्ये मादी कोकीळा पक्षाला आकर्षित करून घेण्याकरिता सुंदर आवाजामध्ये गाणे गात असतो. मात्र मादी ही कर्कश्य आवाज निर्माण करत असते.

परजीवी स्वरूपातील असणारा हा पक्षी कावळ्यांच्या घरट्यामध्ये आपली अंडी घालण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे घरटे बनवावे लागत नाही. कावळा हा आपली अंडी समजून त्या अंड्यांना देखील उबवत असतो, त्यामुळे कावळ्याच्या अंड्यांच्या आधीच या अंड्यामधून पिल्ले बाहेर येत असतात. 

काही दिवस कावळे या पिल्लांना आपली पिल्ले म्हणूनच वाढवत असतात. कारण लहानपणी कावळ्याची आणि कोकिळेची पिल्ले जवळपास सारखेच दिसत असतात. पुढे मात्र योग्य संधी हेरून कोकिळा आपल्या पक्षांना पुन्हा एकदा कावळ्याच्या घाटातून पळून नेत असते.

कोकिळा पक्षाचा खानापानाच्या सवयी:

कोकिळा हा पक्षी मुख्यतः झाडांवरील फळे खाण्यासाठी ओळखला जातो. त्याच बरोबर विविध बेरी देखील हा पक्षी आवडीने खात असतो. काही प्रमाणात लहान कीटक आणि सुरवंट देखील या पक्षाद्वारे खाल्ले जात असतात. यातील केसाळ सुरवंट अनेक पक्षी खात नाहीत, कारण ते विषारी असतात. मात्र या पक्षाच्या सेवनाने कोकिळा पक्षांना काहीही होत नाही, आणि याचे कारण म्हणजे त्यांची विशिष्ट पचन संस्था होय. उलट या सुरवंटांकडून कोकिळा पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर प्रथिने उपलब्ध होत असतात.

कोकिळा पक्षाचे प्रजनन:

कोकिळा या पक्षामध्ये शक्यतो उन्हाळ्याच्या महिन्यात प्रजनन केले जात असते. यातील मार्च महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत यांचा प्रजननाचा काळ सुरू असतो. प्रजननाच्या वेळेस नर कोकिळा झाडावर बसून आपल्या सुरेल आवाजात मादी कोकिळेला साद घालतो.

ज्यावेळेस मधी कुठला आकर्षित होते, त्यावेळेस ते मिलन करून नंतर मादी या अंड्यांना कावळ्याच्या घरट्यामध्ये घालत असते, आणि नर व मादी दोघेही पक्षी या अंड्यांवर लक्ष ठेवून असतात. ज्यावेळी कावळा आपली अंडी समजून या अंड्यातून पिल्ले उबवतो, त्यावेळेस योग्य संधीची वाट बघत कोकिळा पुन्हा एकदा या पक्षांना आपल्याकडे घेऊन जात असते.

कोकिळा पक्षाबद्दल तथ्य माहिती:

  • कोकिळा पक्षातील नर आणि मादी दिसायला वेगळे असतात, तसेच त्यांचा आवाज देखील वेगळा असतो. यातील केवळ नरपक्षी चांगला गात असतो.
  • इतर पक्षांसाठी विषारी असणारे केसाळ सुरवंट  कोकिळा पक्षी सहजतेने पचवू शकतात.
  • कोकिळा पक्षाचा केवळ नराच्या पंखांवर एक हिरव्या निळ्या रंगाची पट्टी असते, जी अतिशय चमकदार स्वरूपाची असते.
  • कोकिळा पक्षाचे वर्णन प्राचीन भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये देखील आढळून येते
  • कुठला हा पक्षी स्थलांतरित स्वरूपाचा असून मुख्यतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तो भारतीय उपखंडामध्ये येत असतो.
  • कोकिळा पक्षाच्या आवाजामुळे त्याला ब्रेन फीवर बर्ड असे देखील नाव देण्यात आलेले आहे.

निष्कर्ष:

सकाळी गावाकडे उठलो की सर्वात पहिले विविध पक्षांचे आवाज कानी पडत असतात. सर्वात पहिला कोंबडा बाक घेतो, त्यानंतर विविध पक्षी देखील आपल्या आवाजाने आपल्याला जागे करत असतात. चिमण्या तर त्यांच्या चिव चिवचिवाटासाठी नेहमीच ओळखल्या जात असतात.

अगदी दिवसभर या चिवचिव चिमण्या करत असतात. मात्र शहराकडे हे आवाज ऐकायला मिळत नाही,  तिथे कोकिळा पक्षाचे आवाज तरी कसे ऐकायला मिळतील?  गावाकडे मोठ्या प्रमाणावर या कोकीळ पक्षाचा आवाज ऐकायला मिळत असतो  मुख्यतः विनीच्या हंगामामध्ये तर या कोकीळ पक्षाकडून अनेकवेळा आवाज निर्माण केला जात असतो. शक्यतो नर कोकीळ पक्षी त्याच्या आवाजासाठी ओळखला जात असला, तरी देखील मादी पक्षी हा कर्कश आवाज काढत असतो.

या नर व मादी पक्षांमध्ये दिसण्यात देखील बराच फरक आढळून येतो. आजच्या भागामध्ये आपण या कोकिळा पक्षाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. त्यातील पक्षांच्या विविध प्रजाती, त्यांचे वर्गीकरण, त्यांचे अस्तित्व,  आढळतात. तसेच निवासस्थान इत्यादी बाबत इत्यंभीत माहिती बघितलेली आहे.

सोबतच पक्षांचे प्रकार, आणि त्यांचे वागणे इत्यादी माहिती घेण्याबरोबरच त्यांचे आयुष्यमान पुनरुत्पादन संवर्धन इत्यादी गोष्टी देखील जाणून घेतले आहेत. कोकिळा पक्षाचे विविध वैशिष्ट्ये असतात, ती काय आहेत व त्यांचे संवाद साधण्याची पद्धत, शारीरिक आकार, उडण्याचा वेग, खानपानाच्या पद्धती, आणि असे पक्षी पाळले जाऊ शकतात का, याबद्दल माहिती बघितली असून काही मनोरंजक तथ्य माहिती देखील बघितली आहे.

FAQ

कोकिळा या पक्षाचे निवासस्थाने कोणत्या ठिकाणाला समजले जाते?

कोकीळ हे पक्षी शक्यतो जंगलामध्ये आढळून येत असतात. यामध्ये उष्णकटिबंधीय वने, आणि उप उष्णकटिबंधीय वने यांचा समावेश होत असतो. त्याचबरोबर मॅगृव्ह वनामध्ये देखील या प्रजातीचे अस्तित्व दिसून येत असते.

कोकिळा या पक्षाचे शारीरिक आकारमान साधारणपणे किती असते?

कोकिळा हा पक्षी आकारमानाच्या दृष्टिकोनातून मध्यम स्वरूपाचा असतो.  जवळपास १८ ते २२ सेंटीमीटर पर्यंत या पक्षाची शारीरिक लांबी दिसून येते.

कोकिळा या पक्षाचा रंग साधारणपणे कशा स्वरूपाचा असतो?

कोकिळा हा पक्षी अतिशय खास रंगांमध्ये उपलब्ध असतो. हिरवट राखाडी रंग असण्याबरोबरच त्याच्या गळ्याभोवती पांढरा पट्टा देखील दिसत असतो, तसेच डोळ्यांकडेला काळसर पट्टा देखील आढळतो.

कोकिळा या पक्षाची प्रजाती कोणकोणत्या ठिकाणांमध्ये विस्तारलेली आहे?

कोकिळा हा उष्णकटिबंधीय परिसरामध्ये राहणारा पक्षी असून, तो भारतीय उपखंडासह दक्षिण पूर्व आशिया आणि चीन देशाच्या काही विभागांमध्ये आढळून येत असतो.

कोकिळा या पक्षाचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते?

कोकिळा हा पक्षी साधारणपणे अवघे पाच ते सहा वर्षांचे आयुष्य जगत असतो. मात्र त्याला योग्य वातावरण मिळाल्यास आणि अन्न मिळवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे न लागल्यास तो पंधरा वर्षे देखील जगू शकतो.

Leave a Comment