लोणावळा घाटाची संपूर्ण माहिती Lonavala Ghat Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Lonavala Ghat Information In Marathi फार पूर्वीच्या काळापासून पर्यटकांची आवड म्हणून लोणावळा आणि खंडाळा घाटाला ओळखले जाते. लोणावळा हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये वसलेले असून, एक उत्तम हिल स्टेशन म्हणून या ठिकाणाला ओळख मिळालेली आहे. सह्याद्री पर्वतरांगाचा भाग असलेला हा घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठिकाण समजले जाते.

Lonavala Ghat Information In Marathi

लोणावळा घाटाची संपूर्ण माहिती Lonavala Ghat Information In Marathi

या ठिकाणी अनेक लोक आठवड्याच्या शेवटी फार गर्दी करत असतात. समुद्रसपाटीपासून जवळपास ६२२ मीटर उंचीचे हे ठिकाण दख्खन पठार आणि कोकण कड्याच्या काठावर वसलेले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. डोंगरामध्ये वसलेल्या शहरांमध्ये या लोणावळा शहराचा समावेश होत असून, महाराष्ट्रातील लोकांसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ ठरलेले आहे. या लोणावळा हिल स्टेशनचे एकूण क्षेत्रफळ जवळपास ३८ चौरस किलोमीटर समजले जाते.

पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून जवळ असणारे हे ठिकाण येथील चिक्की साठी खूपच प्रसिद्ध आहे. लोणावळा आणि खंडाळा हे दोन्हीही नाव एकत्रच घेतले जातात. अतिशय नैसर्गिक सौंदर्याने नटलेले समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे हे लोणावळा ठिकाण पुण्यापासून अवघ्या ६७ किलोमीटरवर तर मुंबईपासून केवळ ८५ किलोमीटर अंतरावर आहे.

दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात, आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असतात. आजच्या भागामध्ये आपण या लोणावळा घाटाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.…

नावलोणावळा
प्रकारघाट
उपप्रकारहिल स्टेशन
विकास१८७१ पासून
विकसकलॉर्ड एल्फिस्टन
समुद्रसपाटीपासून उंची६२२ मीटर
पुण्यापासून अंतर६७ किलोमीटर
मुंबईपासून अंतर९५ किलोमीटर

लोणावळ्या बद्दल ऐतिहासिक माहिती:

लोणावळा हा शब्द किंवा हे नाव पडण्यामागे एक मनोरंजक कहाणी आहे. या ठिकाणी अनेक लेण्यांची रांग होती. यामध्ये कारले लेणी, भाजे लेणी, बेडसे लेणी, आणि पाटण लेणी यांसारख्या लेण्यांचा समावेश होता. यादव काळामध्ये तयार करण्यात आलेल्या या लेण्या काही कालावधीनंतर मुघलांच्या ताब्यामध्ये गेल्या.

मुघलांनी या ठिकाणी बराच कालावधीसाठी राज्य केले होते. मराठ्यांच्या ऐतिहासिक गोष्टींसाठी देखील या लेण्यांचा फार मोठा इतिहास आहे. या ठिकाणी असणाऱ्या लेण्यांच्या रांगेला लेन अवली या नावाने ओळखले जात असे. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत लेनावली हे नाव तयार झाले, आणि पुढे या लेनावलीचे लोणावळा म्हणून नामकरण करण्यात आले. पुढे या लोणावळा आणि खंडाळा ठिकाणाचे इंग्रज अधिकारी लॉर्ड एलफिस्टन यांनी विकास करत मोठे पर्यटन स्थळ बनविले.

लोणावळा या ठिकाणी बघण्यासारखे ठिकाने:

लोणावळा व खंडाळा हे दोन नावे नेहमी सोबतच घेतली जातात. कारण अगदी जवळजवळ असणारे हे दोनही ठिकाण एक उत्तम हिल स्टेशन आहे. लोणावळ्याप्रमाणे खंडाळा हे देखील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असण्याबरोबरच बोर घाटाच्या उतरणीला मुंबईकडून हे शहर आढळून येते.

लोणावळ्यापासून अवघ्या साडेसहा किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला आहे. या किल्ल्याला राजमाची पॉइंट म्हणून देखील ओळखले जाते. हे देखील एक निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याचे उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर येथे एक उंच कडा असून, त्याला टायगर पॉईंट या नावाने ओळखले जाते. ज्याच्या एका बाजूने तब्बल ६५० मीटर खोलीची दरी आहे. जी त्याला अतिशय साहसी बनवत असते.

मुंबईकडे जाताना लोणावळ्याच्या अगदी जवळच कारले व भाजे लेणी असून, या लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षुणी केली असावी, असे सांगण्यात येते. याच जवळ एकविरा मातेचे मंदिर देखील असून, हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्यावरून तुम्ही जवळच असणाऱ्या भुशी धरणाला देखील भेट देऊ शकता. या ठिकाणी प्रसिद्ध धबधबा देखील असून, याच ठिकाणी काही दिवसात आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेल्वे स्थानक देखील उभा केले जाणार आहे.

लोणावळा भेटीचा उत्तम वेळ:

निसर्ग हा संपूर्ण वर्षभर सारखा नसतो. त्यामुळे ज्यावेळी सर्वात जास्त निसर्ग सौंदर्य उपलब्ध असेल, अशावेळी कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देणे गरजेचे असते. त्यामुळेच लोणावळा या ठिकाणी भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मे महिन्यांचा कालावधी अतिशय उत्तम समजला जातो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य उत्तम असले, तरी देखील येथील घाट अतिशय धोकेदायक स्वरूपाचा असतो.

लोणावळ्याला जाण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणून रेल्वे ओळखली जाते, कारण लोणावळा या ठिकाणी स्वतंत्र रेल्वे स्टेशन असून, ते जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनची जोडले आहे. त्याचबरोबर तुम्ही पुणे विमानतळावर उतरून देखील सत्तर किलोमीटरचा प्रवास करत या ठिकाणी पोहोचू शकता. स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस वे वापरून या ठिकाणी जाऊ शकतात.

निष्कर्ष:

अनेक लोकांना पर्यटन फार आवडत असते. त्यासाठी बरेच लोक महाराष्ट्राबाहेर पर्यटन कार्याला जात असले, तरी देखील महाराष्ट्र मध्ये अनेक उत्तम पर्यटन स्थळांची रेलचेल आहे. असेच एक महाराष्ट्राचे उत्तम पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा घाटाला ओळखले जाते.

लोणावळा खंडाळा अशा जोड्या नावाने येणारा हा घाट अगदी पूर्वीपासूनच लोकांचे आकर्षण ठरलेला आहे. मराठी चित्रपट गीतांमध्ये देखील या लोणावळा खंडाळा घाटाचा उल्लेख झालेला आपल्याला आढळून येतो. लोणावळा हे ठिकाण येथील चिक्की साठी प्रसिद्ध असून, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या घाटामध्ये अनेक लोक वास्तव्य करत असतात.

व आपल्या आठवड्याची शेवटचे दिवस आनंदाने घालवत असतात. त्याचबरोबर अनेक लोक येथे मधुचंद्रासाठी देखील येताना आढळून येतात. पुण्याजवळील एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून लोणावळ्याला ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या लोणावळा घाटाबद्दल संपूर्ण माहिती बघितली असून, या लोणावळा घाटाचा इतिहास व त्याचा विकास तसेच या घाटाच्या विकासामागे लॉर्ड एल्फिस्टन यांची असलेले योगदान इत्यादी गोष्टी बघितलेले आहेत.

सोबतच लोणावळ्याला भेट देण्यासाठी कोणता कालावधी उपयुक्त समजला जातो, हे देखील जाणून घेतलेले आहे. लोणावळ्याचे काही स्थानिक खाद्यपदार्थ, व तेथील चिक्कीचे महत्त्व जाणून घेतानाच या ठिकाणावर कसे जावे याबद्दल देखील माहिती बघितलेली आहे.

FAQ

लोणावळा हा घाट कोणत्या ठिकाणी वसलेला आहे?

लोणावळा हा घाट महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याजवळ बसलेला असून, पुणे मुंबई महामार्गावर पुण्यापासून अवघ्या ६४ किलोमीटर अंतरावर हा घाट आहे.

लोणावळा घाट हे ठिकाण कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जाते?

लोणावळा घाट हे ठिकाण येथील प्रसिद्ध अशा चिक्की साठी ओळखले जाते. त्याचबरोबर येथील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिल स्टेशन साठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला थंड हवेच्या ठिकाणांमध्ये गणले जाते.

नौदलाच्या दृष्टीने लोणावळा हे ठिकाण कशा पद्धतीने उपयुक्त आहे?

सरावासाठी भारतीय सेनेने अनेक ठिकाणी आपले नाविक तळ उभारलेले आहेत. त्याचप्रमाणे लोणावळा या ठिकाणी देखील भारतीय नौदलाने आपले तांत्रिक पद्धतीचे प्रशिक्षण केंद्र अर्थात आय एन एस शिवाजी हे उभारलेले आहे. व याचे मुख्यालय लोणावळा या ठिकाणी आहे.

लोणावळा खंडाळा घाटाच्या जवळ बघण्यासारख्या अनेक गोष्टी कोणकोणत्या आहेत?

लोणावळा खंडाळा या घाटाच्या आसपास आपण वळवण धरण, राजमाची पॉईंट, भुशी डॅम, ड्युक्स अँड डचेस नोज, टायगर्स लीफ, लोहगड आणि विसापूर किल्ला, कारले भाजे लेणी इत्यादी ठिकाणी बघण्यासारखे आहेत.

लोणावळा या शहराला लोणावळा हे नाव कशावरून पडले असावे?

लोणावळा हे नाव लेन व अवली या दोन वेगवेगळ्या शब्दांपासून निर्माण झालेले असून, यातील शब्दाचा अर्थ लेणी असा होतो, तर अवली या शब्दाचा अर्थ रंग असा होतो. लेण्यांची रांग म्हणून या शहराला लोणावळा असे नाव पडले असे सांगितले जाते. कारण या ठिकाणी कारले, भाजे, पाटण बेडसे इत्यादी विविध लेण्या आहेत.

Leave a Comment