महाराष्ट्रातील अभयारण्यं विषयी संपूर्ण माहिती Maharashtra Abhayaranya Information In Marathi

Maharashtra Abhayaranya Information In Marathi आपण वरचेवर बातम्यांमध्ये ऐकले असेलच, की अमुक एका प्राण्याची प्रजाती लुप्त पावली आहे. अमुक एक प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, कारण मानवाने या प्राण्यांची शिकार करण्याबरोबरच त्यांची नैसर्गिक अधिवासस्थाने नष्ट केलेली आहेत. त्यामुळे या प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून, या प्राण्यांच्या संवर्धनाकरिता काही पावले उचलणे गरजेचे आहे. आणि याचमुळे महाराष्ट्र संपूर्ण भारतभर अनेक अभयारण्याची निर्मिती केलेली असून, यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्राण्यांना आणि पक्षांना अभय दिले जाते. जेणेकरून त्यांची संख्या कमी होऊ नये.

Maharashtra Abhayaranya Information In Marathi

महाराष्ट्रातील अभयारण्यं विषयी संपूर्ण माहिती Maharashtra Abhayaranya Information In Marathi

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अभयारण्यांची संख्या असून, हे प्रत्येक अभयारण्य कोणत्यातरी प्राणी अथवा पक्षासाठी राखीव ठेवलेले असते. या वन्य प्राण्यांकरिता सर्वात सुरक्षित जागा म्हणून अभयारण्यंना ओळखले जाते. जिथे ते निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्याबरोबरच सुरक्षित जीवन देखील जगू शकतात.

धोक्यात असणाऱ्या प्रजातींच्या संरक्षणाकरिता हे अभयारण्य बनवले जात असतात. अभयारण्य म्हणजे राष्ट्रीय उद्यानांचा छोटासा भाग असतो, जिथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षित वातावरण निर्माण करून वनविभाग पर्यटन क्षेत्र देखील तयार करत असते. तेथे अनेक व्यक्ती पर्यटन करून आनंद देखील घेऊ शकतात,ज्यातून महाराष्ट्र सरकारला महसूल देखील गोळा होत असतो.  आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील काही खास वन्यजीव अभयारण्यं विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत…

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य:

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये डोंगराच्या सानिध्यात वसलेले हे अभयारण्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुमारे १३१ चौरस किलोमीटर इतके आहे. येथे भारतातील सर्वात मोठी खारुताई सापडलेली असून, तिची लांबी तीन फुटांपर्यंत आहे. १९८४ या वर्षी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी भगवान शिव यांचे मंदिर असून, तेथूनच नदी देखील उगम पावत असते. व भीमा आणि घोड या दोन नद्या देखील या ठिकाणी उगम पावतात.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प:

ताडोबा अंधेरी अभयारण्याच्या नावातच व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे, तुमच्या लगेचच लक्षात आले असेल की हे अभयारण्य वाघासाठी बनवण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील हे अभयारण्य सर्वात जुने अभयारण्य असून, येथे दिलेले नाव हे आदिवासी लोकांच्या सांगण्यावरून ठेवण्यात आलेली आहे.

या ठिकाणी एक मंदिर असून, तेथे डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये मोठी यात्रा देखील भरत असते. या अभयारण्यामध्ये तुम्ही अनेक प्राणी बघू शकता, ज्यामध्ये नीलगाय, बिबट्या, मगर, टरटल, नाग इत्यादी सह अनेक फुलपाखरांच्या प्रजाती देखील बघण्यासारखे आहेत.

कळसुबाई हरिचंद्र गड वन्यजीव अभयारण्य:

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगड नावाचे अभयारण्य वसलेले आहे. अकोला तालुक्यातील हे अभयारण्य मांजर, लांडगा, मुंगूस, डुक्कर, सांभर, ससा, यांच्यासारख्या अनेक प्राण्यांचे वास्तव्य स्थान असून, येथे या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येत असतो.

महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण असलेले हे कळसुबाई जलचर प्राण्यांसाठी देखील ओळखले जाते. सोबतच येथे फुलपाखरांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रजाती आढळून येत असतात. या ठिकाणी ट्रेकिंग चा आनंद देखील पर्यटकांकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे खास स्वरूपाचे हे अभयारण्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते.

कोयना वन्यजीव अभयारण्य:

महाराष्ट्रातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य म्हणून कोयना वन्यजीव अभयारण्यला ओळखले जाते. येथे बंगाल टायगर देखील आढळत असून, यामुळे येथील पर्यटनाचा अनुभव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होत असतो. या सोबतच येथे अस्वल, बिबट्या, बाईसण यांसारख्या विविध प्राण्यांचे अस्तित्व देखील असून निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेले हे अभयारण्य कुटुंबासह सहल आयोजित करण्याकरिता किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याकरिता खूपच उत्तम समजले जाते.

ग्रीष्म ऋतूमध्ये येथे जाणे सर्वोत्कृष्ट समजले जात असून, यादरम्यान तुम्ही खास निसर्गसौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. कधी कधी तुम्हाला येथे भारतीय अजगराची किंवा किंग कोब्राची प्रजाती देखील बघायला मिळू शकते. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले हे अभयारण्य ४२३ चौरस किलोमीटर परिसरामध्ये असून, या अभयारण्य मधून कोयना, सोलाशी आणि कांदती या तीन नद्या वाहत असतात.

नायगाव नागझिरा वन्यजीव अभयारण्य:

लहान प्रकारच्या प्राण्यांसाठी ओळखले जाणारे अभयारण्य म्हणून नायगाव नागझिरा अभयारण्याला ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान कीटक, परदेशी उगमाचे मासे, मुंग्या, इत्यादी लहान प्राणी आढळून येत असतात. त्यामुळे जैवविविधता पुरेपूर असलेले हे अभयारण्य पर्यटकांच्या नियमित पसंतीस उतरत असते.

त्याचबरोबर येथे मोठ्या प्राण्यांमध्ये अस्वल, वाघ, निलगाय, बिबट्या, वन्य कुत्रा, यांसारख्या प्राण्यांचे देखील अस्तित्व आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रजातींचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचा परिसर या अभयारण्यामध्ये मोडतो. येथे पक्षांच्या देखील १०० पेक्षा अधिक प्रजाती असून, निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत या लहानग्या प्राण्यांना बघणे काही वेगळाच आनंद प्रदान करत असते.

या ठिकाणी अनेक तलाव असून, तलावाच्या काठी देखील खूप निसर्गसौंदर्य आढळून येत असते. येथील नागाझीर, बोदबडीया, आणि मालूटोला हे तलाव फारच विशेष समजले जातात. या ठिकाणी तुम्ही आपल्या कुटुंबासह आलात तर एक अविस्मरणीय सहलीचा अनुभव तुम्ही गाठीशी बांधून घरी घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही येथे मित्रांसोबत येऊन देखील खूप आनंद लुटू शकता.

महाराष्ट्रासह भारतातील सर्वच अभयारण्य प्राणी व पक्षी यांच्या संवर्धन करता बनवलेले असून, या प्राण्यांना इजा न पोहोचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. त्यामुळे अभयारण्य बाहेर देखील या प्राण्यांशी चांगल्या रितीने वागावे असे प्रत्येक स्तरातून सांगण्यात येते. प्रत्येकाने ही गोष्ट अमलात आणायला हवी.

निष्कर्ष:

सह्याद्रीचा वारसा लाभलेले महाराष्ट्र राज्य निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय खास असून येथे प्राणी आणि वनस्पती यांच्या अनेक प्रजाती आढळून येत असतात. मात्र असे असले तरी देखील महाराष्ट्रातील काही मूळ प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे संरक्षण करणे फारच गरजेचे ठरलेले असून, त्यासाठी शासन स्तरावर देखील मोठे उपाययोजना केल्या जात आहेत. सामान्य माणसांनी देखील या प्राण्यांसाठी केलेल्या उपाययोजना अमलात आणल्या पाहिजे.

त्याचबरोबर स्वतः देखील शिकारी करण्यास प्रतिबंध करून इतरांनाही रोखले पाहिजे. जेणेकरून महाराष्ट्रसह संपूर्ण भारतातील विविध प्राणी प्रजाती सुरक्षित राहण्यास मदत होईल. सरकारने यासाठी अनेक अभयारण्याची निर्मिती केलेली असून, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील काही मुख्य आणि महत्त्वाच्या अभयारण्य बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे.

FAQ

उत्तर महाराष्ट्र मध्ये कोणकोणती महत्त्वाची अभयारण्य तयार करण्यात आलेली आहेत?

उत्तर महाराष्ट्र मधील महत्त्वाच्या अभयारण्यामध्ये अनेर धरण अभयारण्य, पाल यावल अभयारण्य, गवताळा औट्रम घाट अभयारण्य इत्यादी अभयारण्यांचा समावेश होतो.

मराठवाड्यामध्ये कोणकोणती महत्त्वाची अभयारण्य वसलेली आहेत?

मराठवाड्यामध्ये किनवट अभयारण्य, जायकवाडी अभयारण्य, येडशी अभयारण्य, नायगाव अभयारण्य इत्यादी अभयारण्य वसलेली आहेत.

नायगाव अभयारण्य हे कोणत्या प्राण्यासाठी तयार करण्यात आलेले अभयारण्य आहे?

नायगाव अभयारण्य हे मोर या प्राण्यासाठी तयार करण्यात आलेले अभयारण्य असून, त्याचे नाव कधीकधी नायगाव मयूर अभयारण्य असे देखील घेतले जाते.

कोयना वन्यजीव अभयारण्य मध्ये कोणकोणत्या प्राण्यांचे अस्तित्व आहे?

कोयना वन्यजीव अभयारण्य मध्ये भारतीय बिबट्या, हरण, बायसन, अस्वल, खार यांसारखे अनेक प्राणी दिसून येत असतात.

भीमाशंकर हे वन्यजीव अभयारण्य कशासाठी निर्माण करण्यात आलेले आहे?

भीमाशंकर हे वनीचे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये वसलेले असून, येथे खारुताई या प्राण्यासाठी अभयारण्य तयार करण्यात आलेले आहे. सोबतच या ठिकाणी भुंकणारे हरीण, बिबट्या, डुक्कर, जंगली पक्षी, आणि लंगूर यांसारखे प्राणी देखील आढळून येतात. हे अभयारण्य शिवमंदिरासाठी देखील ओळखले जाते.

Leave a Comment