मिल्का सिंग यांची संपूर्ण माहिती Milka Singh Information In Marathi

Milka Singh Information In Marathi मध्यंतरीच्या काळामध्ये भाग मिल्खा भाग हा चित्रपट आला होता, त्यामुळे भारताचे सर्वात वेगवान धावपटू असणाऱ्या मिल्खा सिंग यांच्या जीवनचरित्राबद्दल अनेकांना माहिती होण्यास मदत मिळाली होती. अनेक लोक खेळाडूंची चरित्र वाचत असतात. अलीकडील मुलांना तर वाचन करणे फारच कंटाळवाणे वाटू लागले आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून तरी मिल्खा सिंग यांच्याबद्दल सर्वत्र जागृती निर्माण झाली होती.

Milka Singh Information In Marathi

मिल्का सिंग यांची संपूर्ण माहिती Milka Singh Information In Marathi

भारताचे सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखले जाणारे मिल्का सिंग पंजाब मधील गोविंदपुरा या ठिकाणी जन्मले होते. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा व फाळणी पूर्वीचा इतिहास बघितलेले मिल्का सिंग खेळाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय होते.

त्यांनी भारताच्या फाळणी दरम्यान आपल्या आई वडिलांना गमावले होते, मात्र आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये आपण काहीतरी उत्तम कार्य करून नावलौकिक मिळवायचा असे लहानपणापासूनच मिल्का सिंग यांनी ठरविले होते. त्यांनी काही काळ भारतीय सेनेमध्ये देखील कार्य केले असून, येथे विद्युत मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये ते कार्य करत असत.

त्यांना १९५६ या वर्षी खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली होती. त्यावर्षी पटियाला येथे राष्ट्रीय खेळाच्या स्पर्धा झाल्या होत्या, आणि येथे अतिशय उत्तम कामगिरी या मिल्का सिंग यांनी दाखवली होती. भारतातील उत्तम ऍथलेटिक खेळाडूंमध्ये त्यांचे नाव आज देखील मानाने घेतले जाते. त्यांना फ्लाईंग सिख या नावाने देखील ओळखले जात असते.

ते धावत असताना अगदी उडत चालल्या सारखेच वाटत असे, त्यामुळे त्यांना ही पदवी दिली होती. आजच्या भागामध्ये आपण या मिल्का सिंग यांच्या जीवन चरित्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत…

नावमिल्खा सिंग
संपूर्ण नावमिल्खा सिंग लाटीयान
उपनावफ्लाईंग शीख
जन्मदिनांक२० नोव्हेंबर १९२९
जन्मस्थळगोविंदपुरा, पंजाब, सध्याचा पाकिस्तान
मृत्यू दिनांक१८ जून २०२१

सध्या पाकिस्तान मध्ये असणाऱ्या पंजाबच्या गोविंदपुरा या ठिकाणी दिनांक २० नोव्हेंबर १९२९ या दिवशी एका जाट कुटुंबामध्ये मिल्का सिंग यांचा जन्म झाला होता. मात्र काही संदर्भानुसार त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३५ या दिवशी झाला असे देखील समजले जाते.

ते एकूण १५ भावंडे असली तरी देखील यातील अनेक भावंडांचा मृत्यू लहानपणीचा झाला होता. ज्यावेळी भारत पाकिस्तान फाळणी झाली, त्यावेळी मोठी दंगल उसळली होती. या दरम्यान मिल्का सिंग वळगळता त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य वारले गेले होते.

आपल्या आई वडिलांना गमावताना बघून मिल्का सिंग फारच घाबरले होते. आणि घाबरून ते दिल्लीमध्ये आपल्या बहिणीकडे येऊन राहिले होते. पुढे त्यांना निर्वासितांच्या छावणीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. अतिशय खडतर जीवन व्यतीत करत असतानाच ते १९५१ यावर्षी सैन्य दलामध्ये सहभागी होण्यात यशस्वी झाले होते.

ते शाळेमध्ये देखील जात असताना दहा किलोमीटरचे अंतर पायी चालत असत, आणि शाळेला उशीर होऊ नये म्हणून हे अंतर ते पळत पळत पूर्ण करत असत. त्यामुळे त्यांच्या धावण्याच्या स्टॅमिनाबद्दल विचार न केलेलाच बरा.  क्रॉस कंट्री धावण्याचा स्पर्धेमध्ये सहाव्या स्थानावर असणारे मिल्खा सिंग यांनी हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी विराजमान असणाऱ्या निर्मल कौर यांच्याशी विवाह केला होता.

पुढे त्यांना चार अपत्य झाली. ज्या मधील एक मुलगा व तीन मुली होत्या. पुढे त्यांनी १९९९ मध्ये पुन्हा एक मुलगा दत्तक घेतला, मात्र हा मुलगा पुढे जाऊन टायगर हिल्स लढाईमध्ये मृत्युमुखी पडला होता.

मिल्खा सिंग यांची धावपटू म्हणून ओळख:

सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून डोळे झाकून मिल्का सिंग यांचे नाव घेतले जात असते. अतिशय परिश्रम करत त्यांनी आपली नोकरी सांभाळत या खेळाच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यांनी २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मोठा एक विक्रम नोंदवत, अगदी ऑलम्पिक स्पर्धा पर्यंत देखील यश मिळवले होते.

१९५६ मध्ये झालेल्या ऑलंपिक स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले असले तरीही काही कारणांमुळे त्यांना यश मिळाले नाही. मिल्का सिंग यांनी अवघ्या पाच सेकंदांमध्ये ४०० मीटर अंतर १९५७ या वर्षी पूर्ण केले होते. यांनी धावण्याच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या नोकरीला देखील खूपच फायदा झाला.

या अंतर्गत त्यांना कनिष्ठ आयोग अधिकारी या पदावर बढती देखील देण्यात आली होती. पुढे त्यांनी पंजाब राज्याच्या शिक्षण विभागामध्ये क्रीडा संचालक या पदावर देखील कार्य केलेले असून, आयुष्याची निवृत्ती त्यांनी याच पदावरून घेतली होती.

मिल्खा सिंग यांना आयुब खान यांनी सन्मानित करताना या मिल्खा सिंग यांना द फ्लाईंग शिख नावाने उल्लेखित केले होते, त्यामुळे पुढे त्यांना याच नावाने ओळखले जाऊ लागले. ४० वर्षांचा विक्रम मोडण्यासाठी त्यांनी १९६० या वर्षी ४०० मीटर स्पर्धेचे जीव तोडून प्रयत्न केले होते, आणि  हा विक्रम त्यांनी पूर्ण केला होता.

निष्कर्ष:

कोण कशातून प्रेरणा घेईल याबद्दल कोणीही काहीही सांगू शकत नाही. ज्यावेळी भारताच्या फाळणी दरम्यान मिल्का सिंग यांनी आपल्या आई वडिलांना गमवले, तेव्हाच त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी आयुष्यात असे काहीतरी करून दाखवेल, ज्याने मी नक्कीच प्रसिद्ध होईल.

शारीरिक दृष्ट्या अतिशय कणखर असणारे मिल्का सिंग सैन्यांमध्ये देखील सहभागी झाले होते. मात्र त्यांना काहीतरी वेगळे करून दाखवायची आवड शांत बसू देत नव्हती. त्यांनी अनेक प्रकारचे कार्य करून शेवटी धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपले नावलौकिक मिळवले होते.

पटियाला या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्वरूपातील खेळ स्पर्धांमध्ये त्यांनी सर्वात प्रथम मिळवला होता. या ठिकाणच्या स्पर्धेमुळे त्यांना अल्पावधीत संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली होती. पुढे त्यांनी अनेक स्वरूपाच्या स्पर्धा खेळल्या, ज्यामुळे त्यांना धावण्याच्या स्पर्धेतील एक उत्तम खेळाडू म्हणून नावलौकिक मिळाला होता. त्यांच्या या धावण्याच्या कलेमुळे त्यांना फ्लाईंग शीख या नावाने देखील संबोधले जात असते.

अतिशय उंच स्वरूपाचे आणि उंचीने देखील जास्त असणारे मिल्का सिंग वयाचे ९१ वर्ष पूर्ण करून २०२१ यावर्षी स्वर्गवासी झाले होते. आजच्या भागामध्ये आपण या मिल्का सिंग यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे, व त्यांचे जीवन चरित्र देखील जाणून घेतलेले आहे.

यामध्ये त्यांचे बालपण व वैवाहिक जीवन या संदर्भात माहिती घेतानाच, धावपटू क्षेत्रातील त्यांची एक कारकीर्द व त्यांनी नोंदवलेले काही विश्वविक्रम याची देखील माहिती घेतलेली आहे. यासोबतच त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, त्यांच्याविषयी तथ्य माहिती, इत्यादी देखील समजून घेतलेले आहे. यासोबतच यांच्या मृत्यू बद्दल माहिती आणि त्यांच्यावर आलेल्या चित्रपटाबद्दल देखील माहिती बघितलेली आहे.

FAQ

मिल्खा सिंग यांचे संपूर्ण नाव काय होते?

मिल्खा सिंग यांचे संपूर्ण नाव मिल्खा सिंग लाठीयान असे होते.

मिल्खा सिंग यांचा जन्म केव्हा व कुठे झाला होता?

मिल्खा सिंग यांचा जन्म दिनांक २० नोव्हेंबर १९२९ या दिवशी पंजाब मधील गोविंदपुरा या ठिकाणी झाला होता. हे ठिकाण सध्या पंजाब मध्ये आहे.

मिल्का सिंग यांनी धावण्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याअगोदर कुठे कार्य केलेले आहे?

सर्वप्रथम मिल्खा सिंग यांनी भारताच्या संरक्षण दलामध्ये अर्थात भारतीय सेनेमध्ये कार्य केलेले असून, त्या ठिकाणी ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये कार्यरत होते. येथे कार्यरत होण्याचे वर्ष १९५१  हे समजले जाते.

मिल्खा सिंग सर्वात प्रथम प्रसिद्धीच्या झोतामध्ये कधी आले?

मिल्खा सिंग यांनी सर्वप्रथम १९५६ यावर्षी राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या होत्या. ज्या स्पर्धा पटियाला येथे झाल्या होत्या. यामध्ये मिळवलेल्या यशामुळे ते प्रसिद्धी झोतामध्ये येण्यास मदत झाली होती.

मिल्खा सिंग यांना कोणत्या पदवीने ओळखले जाते?

मिल्खा सिंग अतिशय उत्तम धावपटू असल्यामुळे त्यांना फ्लाईंग शिख या पदवीने ओळखले जाते.

Leave a Comment