एन.जी.ओ विषयी संपूर्ण माहिती NGO Information In Marathi

NGO Information In Marathi नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे याकरिता शासन अनेक योजना मार्फत नागरिकांच्या हिताची निर्णय घेत असते मात्र काही वेळेला नागरिकांपर्यंत ही संपूर्ण मदत पोहोचणे शक्य होत नाही आणि या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी अनेक एनजीओ अर्थात गैरसवर काही संस्था पुढे येत असतात म्हणजे अशी संस्था जी सरकारच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय किंवा सहभागाशिवाय लोकांनी स्थापन केलेली संस्था असते ज्या अंतर्गत समाजाच्या हिताचे विविध कार्य केले जातात.

Ngo Information In Marathi

एन.जी.ओ विषयी संपूर्ण माहिती NGO Information In Marathi

काही वेळेला या एनजीओ ला सरकारने पाठिंबा देखील दिलेला असतो मात्र या संस्थेचे संपूर्ण नियोजन व प्रशासन खाजगी स्तरावरच चालवले जात असते. यामध्ये सरकारी प्रतिनिधी सहभागी होऊ शकत नाहीत केवळ गैरसरकारी अथवा खाजगी घटकांना यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.

गैरसरकारी संस्थांची कुठलीही कायदेशीर व्याख्या नसली तरी देखील काही वेळेला या संस्थांना नागरी समाज संस्था या नावाने देखील ओळखले जाते. समाजाच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या या संस्था खऱ्या अर्थाने समाजासाठी कार्य करत असतात. आजच्या भागामध्ये आपण या एन.जी.ओ बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे.

नावएन.जी.ओ
संपूर्ण स्वरूप नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन
मराठी नावगैरसरकारी संस्था
आद्य प्रवर्तक चंडी प्रसाद भट
सुरुवातसंयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे
प्रथम एनजीओ२७ फेब्रुवारी १९५०

एनजीओ म्हणजे काय?

एनजीओ म्हणजे अशा संस्था ज्या गैरसरकारी किंवा खाजगी संस्थांच्या स्वयंसेवी स्वरूपातून समाजामध्ये विविध कार्य करत असतात. ज्यामध्ये विधवा महिलांना सहाय्य करणे, अनाथांचे शिक्षणाचे सोय करणे, महिला सुरक्षिततेसाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे, पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करणे, पाणी आडवा पाणी जिरवा अशा योजना राबविणे इत्यादी. कार्य या एनजीओ मार्फत केले जातात.

यामध्ये समाजाचे कल्याण सर्वात महत्त्वाचे समजले जाते. या एनजीओ चे नेतृत्व कोणीही करण्यास सक्षम असते. सर्वात पहिल्या एनजीओ ची निर्मिती अमेरिका देशामध्ये झाली असे सांगितले जाते कारण अमेरिका मध्ये सरकारी योजनांपेक्षा या खाजगी संस्थाद्वारे समाजासाठी खूप कार्य केले जाते.

एनजीओ चे तत्व:

कुठलीही संस्था सुरू करायची असेल तर एक प्रमुख उद्दिष्ट किंवा तत्व सोबत असणे फार गरजेचे ठरते. हे उद्दिष्ट आपल्याला काय कार्य करायचे व तत्व ते कार्य कशा पद्धतीने करायचे यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करीत असते. काही मुख्य तत्त्वांमध्ये ना नफा ना तोटा हे तत्व प्रमुख्याने विचारात घेतले जाते कारण समाजासाठी कार्य करताना त्यातून काही अपेक्षा केली तर ती फोल ठरते असा विश्वास एनजीओ मध्ये व्यक्त केला जातो.

किमान सात व्यक्ती मिळून एनजीओ स्थापन करू शकतात व त्याचे व्यवस्थापन देखील करू शकतात. या एनजीओची नोंदणी करण्याकरिता सात सदस्य असणे हा देखील एक नियम किंवा अट ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतरांना देखील या सदस्यत्वाच्या अंतर्गत एनजीओ मध्ये सामील करून घेतले जाऊ शकते.

अलीकडील काळामध्ये एनजीओ ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक सेवा आणि विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये नव्याने बलात्कार पीडित महिला, अनाथ मुले यांच्यासाठी खास कार्य केले जात आहे. सोबतच वाचनालय निर्माण करणे, शाळा किंवा महाविद्यालयांना देणगी देणे, स्वच्छता कार्यक्रम राबवणे इत्यादी देखील गोष्टींचा समावेश होतो.

भारत हा पूर्वीपासूनच एक सेवाभावी देश म्हणून उदयास आलेला आहे त्यामुळे अनेकांना असे वाटते की पहिली एनजीओ भारतामध्ये सुरू झाली असावी मात्र खऱ्या अर्थाने या एनजीओ चा पाया अमेरिकेमध्ये घातला गेला होता. आज भारतातील सद्यस्थिती बघितली तर सुमारे दोन दशलक्ष पर्यंत एनजीओ ची संख्या भारतामध्ये असून अनेक संस्था आपले विविध कायदे लागू करून फार मोठ्या पातळीवर कार्य करत आहेत. महाराष्ट्र देखील एनजीओच्या बाबतीत फार प्रगत झालेला असून भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये एनजीओ ची संख्या सर्वाधिक अर्थात ४१८ लाख इतकी आहे.

एनजीओ ची नोंदणी:

तुम्ही एनजीओ सुरू करत असाल तर सर्वप्रथम या संस्थेची नोंदणी करून घेणे फार गरजेचे असते. विश्वस्तच्या अंतर्गत नोंदणी करायची असेल तर ट्रस्ट कायद्याने तुम्ही तुमची संस्था धर्मादाय आयुक्तकडे नोंदणी करू शकता. त्याचबरोबर सोसायटी कायद्या अंतर्गत देखील या एनजीओ ची नोंदणी केली जाऊ शकते.

तुमच्याकडे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मेमोरंटम आणि विविध रेगुलेशन्स कागदपत्रे असतील तर तुम्ही कंपनी कायद्यांतर्गत देखील तुमच्या एनजीओ ची नोंदणी करू शकता. या नोंदणी करता अगदी स्टॅम्प पेपर देखील आवश्यक असत नाही.

समाजसेवा ही फारच गरजेची आहे तुम्ही एनजीओ स्थापन करू शकत नसाल तर अशा संस्थांना अप्रत्यक्षरीत्या मदत करून तुम्ही या कार्यात हातभार लावू शकता.

निष्कर्ष:

मानव हा एकमेकांशी सामाजिक बांधिलकी जपत जीवन जगणारा प्राणी आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय कुठल्याही समाजाला प्रगती करणे शक्य होणार नाही. एकमेकांना साहाय्य करून योग्य दिशा दर्शवणारा आपला समाज, योग्य शिकवण देणारा आपला समाज समाजातील सर्वच घटकांना योग्य ती वागणूक आणि सन्मान देऊन प्रत्येकाला घेऊन पुढे चालण्यावर भर देत असतो.

समाजामध्ये अनेक लोक श्रीमंत असले तरी देखील बरेचसे लोक अजूनही गरीब आहेत त्यातही काही लोक अशे आहेत ज्यांना दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रांत निर्माण होते. अशा लोकांना मदत करणे, त्याचबरोबर निसर्गाच्या विविध घटकांचे होणारे ऱ्हास टाळणे, समाजाचे हिताचे विविध कार्य राबवणे, वृक्षारोपण करणे, यासारख्या कार्यासाठी या एनजीओ अर्थात नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन सारख्या संस्था ओळखल्या जातात.

या संस्था कुठल्याही नफा किंवा फायद्याच्या तत्त्वावर कार्य न करता केवळ समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करत असतात. आज भारतामध्ये अनेक एनजीओ असून ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगले उत्तम कार्य करत आहेत. आजच्या भागामध्ये आपण या एनजीओ बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे त्यामध्ये एन.जी.ओ म्हणजे काय?

या संस्थेची ना नफा तत्वावर कार्य कशी चालतात? एनजीओ सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? त्याची नोंदणी कशी करावी? या संस्था काय भूमिका बचावत असतात? या संस्थांचा उद्देश, या संस्थांना प्राप्त होणारा निधी? त्याचबरोबर संस्था सुरू करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी ,आणि या संस्थांचे विविध प्रकार त्याचबरोबर समाजामध्ये एनजीओ ने दिलेले योगदान, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि भारतामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या व लोकप्रिय एन.जी.ओ संस्था इत्यादी बद्दल माहिती घेतलेली आहे.

FAQ

एन.जी.ओ चे संपूर्ण स्वरूप काय आहे?

एन.जी.ओ चे संपूर्ण स्वरूप नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असे आहे.

एन.जी.ओ ला मराठी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

एन.जी.ओ ला मराठी मध्ये सरकारी संस्था म्हणून ओळखले जाते.

एन.जी.ओ ची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती किंवा कोणी सुरू केली होती?

एनजीओ ची संकल्पना सर्वात प्रथम संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद यांनी मांडली होती.

एनजीओ ची संख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे व महाराष्ट्रात ही संख्या किती आहे?

एनजीओ ची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्र राज्यांमध्येच असून त्याची संख्या सुमारे ४१८ इतकी आहे.

एनजीओ ची नोंदणी कोणकोणत्या विविध कायद्यांच्या अंतर्गत करता येते?

एनजीओ ची नोंदणी करण्यासाठी विविध कायदे असून त्यामध्ये ट्रस्ट कायदा, सोसायटी कायदा आणि कंपनी कायदा इत्यादी महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश होतो.

Leave a Comment