फिनिक्स पक्षाची संपूर्ण माहिती Phoenix Bird Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Phoenix Bird Information In Marathi जर तुम्ही अरबी, ग्रीक, इराणी चिनी किंवा रोमन पौराणिक कथा ऐकल्या असतील, तर तुम्हाला त्यामध्ये एक पक्षी नक्कीच ओळखीचा झाला असेल. आणि तो म्हणजे फिनिक्स पक्षी होय. या पक्षाला मायापंची किंवा अमर पक्षी म्हणून ओळखले जाते. अतिशय कमनीय बांधा असलेला हा पक्षी जांभळट सोनेरी रंगांमध्ये आढळून येतो.

Phoenix Bird Information In Marathi

फिनिक्स पक्षाची संपूर्ण माहिती Phoenix Bird Information In Marathi

स्वतःला जाळून घेण्यामध्ये ओळखला जाणारा हा पक्षी सुमारे ५०० ते १००० वर्षे जगत असतो, असे सांगितले जाते. असे सांगितले जाते की नर व मादी फिनिक्स पक्षी ज्वालेमध्ये   जळून राख होत असतात, व या पक्षांच्या राखेपासून अंडी निर्माण होतात. ज्यापासून नवीन फिनिक्स पक्षाची निर्मिती होते.

फिनिक्स पक्षी हा त्याच्या राखेपासून पुन्हा निर्माण होत असल्यामुळे, त्याला अमर पक्षी म्हणून ओळखले जाते. या फिनिक्स पक्षाबद्दल अनेक दंतकथा वाचायला मिळतात, मात्र यातील सत्यता कुणालाही सांगता येत नाही. अतिशय सुंदर किलबिलाट करून आवाज करणाऱ्या या फिनिक्स पक्षाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघूया…

नावफिनिक्स पक्षी
इतर नावेअमर पक्षी अथवा मायापंची
दंतकथा राखेपासून निर्माण होतो
प्रतीक नावलौकिक, विजय आणि गतिशीलता
साधारण आयुष्य५०० ते १००० वर्ष

वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेला पक्षी म्हणून या फिनिक्स पक्षाला ओळखले जाते. कारण या पक्षाची कृपादृष्टी घरावर असेल तर घरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात, व नकारात्मक ऊर्जेवर किंवा शक्तींवर नियंत्रण मिळवले जाते. ज्यावेळी घरामध्ये अथवा व्यवसायाच्या ठिकाणी फिनिक्स पक्षाची छायाचित्रे लावली जातात, त्यावेळी व्यवसाय मध्ये येणाऱ्या अडचणी तसेच घरामध्ये होणारे कलह निवळण्यास मदत मिळत असते.

घरामध्ये अनेक प्रकारच्या फ्रेम किंवा छायाचित्रे लावली जातात. या प्रत्येक मूर्ती छायाचित्र किंवा फ्रेम लावण्यामागे काहीतरी ठोस कारण असते. त्यातील काही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, तर काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी लावलेली असतात.

त्याचप्रमाणे फिनिक्स हा पक्षी देखील अतिशय भाग्याचा व नकारात्मक ऊर्जा दूर करणारा समजला जातो. ज्या ठिकाणी आपली नजर वारंवार जात असते, अशा ठिकाणी या पक्षाच्या मूर्ती किंवा चित्रे लावण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून संपूर्ण परिसरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरत असते.

फिनिक्स पक्षाला गतिशीलता, विजय आणि नावलौकिक इत्यादी गुणवैशिष्ट्यांचे प्रतीक समजले गेल्यामुळे या पक्षाच्या मूर्तीचा व्यवसायाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ज्यावेळी कोणताही व्यक्ती व्यवसायाच्या ठिकाणी फिनिक्स पक्षाची मूर्ती किंवा छायाचित्र लावतो, त्यावेळी त्याच्या व्यवसायामध्ये त्याला नावलौकिक मिळण्याबरोबरच मोठा विजय देखील प्राप्त होतो. आणि मोठ्या झपाट्याने त्याचा व्यवसाय विस्तारण्यास मदत होते.

फिनिक्स पक्षी साधारणपणे लवकर आढळत नसला तरी देखील जिवंत पक्षी घरामध्ये पाळणे हे देखील एक चांगले लक्षणे समजले जाते, किंवा पाळणे शक्य नसेल तर आपल्या घराभोवती फिनिक्स पक्षाचा वास असेल तर ही गोष्ट देखील खूपच भाग्याची आहे असे सांगितले जाते.

जेणेकरून नवनवीन कार्य करण्यासाठी व्यक्तीला उत्साह निर्माण होतो. त्याच बरोबर या पक्षाला घराच्या आसपास बोलाविण्याकरिता घरावर या पक्षाकरिता अन्न व पाणी ठेवावे असा सल्ला दिला जातो. जर असे केल्यानंतर तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला पक्षांच्या आवाजाचा किल्किलाट ऐकू येत असेल, तर तुमच्या घराजवळ फिनिक्स पक्षी आला असे समजले तरी हरकत नाही.

मित्रांनो, तुमच्या माहितीकरता सांगायचे झाल्यास फिनिक्स हा पक्षी एक काल्पनिक पक्षी असून, तो कोणालाही दिसत नाही. मात्र घराच्या आसपास वास करत असतो असे सांगितले जाते. ज्यावेळी त्या पक्षाला साजेसे वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होते, त्यावेळी हा पक्षी तुमच्या घरामध्ये वास करतो असे सांगितले जाते.

फिनिक्स पक्षाबद्दल काही कथा देखील सांगितल्या जातात, यामध्ये फिनिक्स पक्षी कसा निर्माण झाला याबद्दल सांगितले जाते. यामध्ये असे सांगितले आहे की नंदनवन या ठिकाणी अतिशय गुण्या गोविंदाने सर्व प्राणी व वनस्पती वास करत असत. कोणीही येथे त्रास देणारे नव्हते.

एकदा हव्वा आणि आदाम नावाचे दोन व्यक्ती या ठिकाणावर आले होते. त्यांनी बघितले की या प्रत्येक झाडावर विविध फळे लागलेली आहेत, मात्र त्याचा कोणीही वापर करत नाही. त्यामुळे हव्वाने येथील एका झाडाचे फळ तोडून त्याचे सेवन करणे सुरू केले. असे करता करता त्यांनी इथे खूप फळे खाल्ली, आणि येथील सर्व गोष्टींचा उपभोग घेतला.

पुढे या जंगलामध्ये एक गुलाबाच्या झाडावर राहायला पक्षी आला, त्यावेळी हव्वा व आदम यांना तलवारीच्या धाकाने जंगलाच्या बाहेर जाण्यास सांगितले गेले. यावेळी या दोन तलवारी एकमेकांना घासून त्यातून एक ठिणगी पडली, जी या नवीन पक्षाच्या घरट्यात जाऊन पडली. परिणामी तो पक्षी उडून गेला, मात्र त्याचे घरटे जळाले. या घरट्यातूनच एका नवीन पक्षाची निर्मिती झाली आणि तोच पक्षी फिनिक्स पक्षी म्हणून ओळखला जातो.

भारतासह संपूर्ण जगभर अनेक दंतकथा व भाकडकथा किंवा लहान मुलांसाठी गोष्टी सांगितल्या जातात. या प्रत्येक गोष्टी सत्य असतीलच असे नाही. काही गोष्टी काल्पनिक स्वरूपाच्या देखील सांगितल्या जातात, मात्र त्यातून मिळत असलेला संदेश हा खूपच चांगला असतो.

फिनिक्स पक्षाच्या दंतकथेमधून आपल्याला अनेक संदेश मिळत असतात. जसे की संपूर्ण काही संपले असताना देखील अतिशय धीराने आपल्या राखेतूनही नवनिर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी देखील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणे, हा गुण आपण या फिनिक्स पक्षाच्या दंतकथेमधून घेऊ शकतो.

आपल्या आसपास असा अदृश्य फिनिक्स पक्षी नेहमी असतो, जो आपल्याला प्रोत्साहित करत असतो. त्यामुळे प्रत्येकाने थोड्याशा अपयशाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे मोठी झेप घेऊन पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करायला हवे, हाच या दंतकथांचा खरा संदेश समजून घेतला पाहिजे.

निष्कर्ष:

आपल्या पुरानामध्ये अनेक प्रकारच्या दंतकथा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे इतर देशांच्या पुराणांमध्ये देखील मोठ्या दंतकथा आढळून येत असतात. या दंतकथा आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला किंवा ऐकायला मिळालेल्या असतील. ज्यामध्ये तुम्हाला फिनिक्स पक्षाबद्दल ओळख झालेली असेल.

हा पक्षी त्याच्या मृत राख मधून निर्माण होतो, अशी दंत कथा सांगितली जाते. आजच्या भागामध्ये आपण या फिनिक्स पक्षाविषयी जाणून घेताना त्याची संपूर्ण माहिती बघितली आहे. सोबतच वास्तुशास्त्रामध्ये या पक्षाचे कसे महत्त्व आहे, याची देखील संपूर्ण माहिती घेतलेली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि तथ्य माहिती देखील बघितलेली आहे.

FAQ

फिनिक्स पक्षाला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?

फिनिक्स या पक्षाला अमर पक्षी किंवा माया पंछी या नावाने ओळखले जाते.

फिनिक्स पक्षी दंतकथेत सांगितल्यानुसार साधारणपणे किती वर्षांचे आयुष्य जगत असतो.

फिनिक्स पक्षी दंतकथेमध्ये सांगितल्यानुसार साधारणपणे ५०० ते १००० वर्षे आयुष्य जगत असतो.

फिनिक्स या पक्षाचा रंग कसा समजला जातो?

फिनिक्स या पक्षाचा रंग काहीसा जांभळट व सोनेरी असतो.

फिनिक्स पक्षाच्या जन्मा बाबत काय दंतकथा सांगितली जाते?

फिनिक्स पक्षाच्या बद्दल अनेक दंतकथा असून, त्याच्या जन्माबद्दल असे सांगितले जाते की तो मृत झाल्यानंतर त्याच्या राखे मधून नवीन अंड्यांची निर्मिती होत असते. व त्यातून नवीन पक्षी जन्माला येतो.

फिनिक्स पक्षी कोणकोणत्या दंतकथांमध्ये आढळून येतो?

फिनिक्स पक्षी हा अनेक देशांच्या दंतकथेमध्ये आढळून येतो. त्यामध्ये रोम, अरबस्थान, इराण, चीन, ग्रीस, व भारत इत्यादी देशांचा समावेश होतो.

Leave a Comment