रवींद्र जडेजा यांची संपूर्ण माहिती Ravindra Jadeja Information In Marathi

Ravindra Jadeja Information In Marathi भारतामध्ये क्रिकेट प्रत्येकालाच आवडत असते. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण क्रिकेटसाठी वेडा आहे. त्याचबरोबर क्रिकेट खेळाडू अतिशय प्रसिद्ध असून यातीलच एक खेळाडू म्हणून रवींद्र यांना ओळखले जाते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा यांचा उल्लेख केला जातो.

Ravindra Jadeja Information In Marathi

रवींद्र जडेजा यांची संपूर्ण माहिती Ravindra Jadeja Information In Marathi

भारतीय संघात एक महत्त्वपूर्ण स्थान असलेले रवींद्र जडेजा त्यांच्या उत्कृष्ट बॅटिंग आणि फिरकी गोलंदाजी करिता ओळखले जातात. दिनांक ६ डिसेंबर १९८८ या दिवशी गुजरातच्या जामनगर येथे जन्मलेले रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग या आयपीएल संघाचे सदस्य असून ते सौराष्ट्र या संघाद्वारे देखील खेळत असतात.

डाव्या हाताने गोलंदाजी व फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे रवींद्र जडेजा भारतीय संघातील एक उत्तम खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध आहेत. आजच्या भागामध्ये आपण या रवींद्र जडेजा यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

नावरवींद्र जडेजा
संपूर्ण नावरवींद्र सिंह (अनिरुद्ध सिंह जडेजा)
जन्म दिनांक६ डिसेंबर १९८८
जन्मस्थळजामनगर गुजरात
ओळखभारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू
आईचे नावलता जडेजा
वडिलांचे नावअनिरुद्ध सिंह जडेजा
बहिणीचे नावपद्मिनी व नयना
पत्नीचे नावरेवा सोलंकी
मुलाचे नावनिधान
सदस्यचेन्नई सुपर किंग्स
नागरिकत्वभारतीय

रवींद्र जडेजाचे प्रारंभिक आयुष्य:

गुजरातच्या जामनगर या ठिकाणी अनिरुद्ध जडेजा आणि लता जडेजा यांच्या पोटी दिनांक ६ डिसेंबर १९८८ या दिवशी रवींद्र जडेजाचा जन्म झाला. त्यांचे वडील एका खाजगी संस्थेमध्ये वॉचमन तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची प्रचंड आवड होती मात्र त्यांच्या वडिलांना वाटे की रवींद्र जडेजा याने सैन्यामध्ये भरती व्हावे.

लहानपणापासूनच क्रिकेट खेळत रवींद्र जडेजा मोठे झाले होते, मात्र २००६ या वर्षी त्यांच्या आईचे एका अपघातामध्ये निधन झाले त्यावेळी रवींद्र जडेजा सतरा वर्षांचे होते, मात्र आईच्या निधनामुळे त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांना कशाचेही भान राहत नव्हते.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी सौराष्ट्र संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी ७२ धावांसह चार विकेट्स घेऊन दमदार कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांना भारताच्या १९ वर्षाखालील संघामध्ये प्रवेश देण्यात आला. या ठिकाणी पाकिस्तान विरुद्ध असलेल्या सामन्यात त्यांनी १६ धावा आणि तीन बळी घेतले होते त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या अवघी १२५ होऊ शकली, मात्र असे असले तरी देखील त्यावेळी भारताने हा सामना गमावला होता.

त्यांनी अनेक सामन्यासह श्रीलंके विरुद्ध देखील एक दिवसीय क्रिकेट सामना खेळत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. येथे त्यांनी ७७ चेंडू मध्ये सुमारे ६० धावा पूर्ण करत t20 मध्ये आपले स्थान निर्माण केले होते.

रवींद्र जडेजा यांच्या नावावर अनेक विक्रम असून प्रथम श्रेणी प्रकारच्या क्रिकेटमध्ये सुमारे तीन शतके करणारा एकमेव खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा यांनी २०१२ यावर्षी विक्रम नोंदवला होता. त्यांनी सर्वात प्रथम आयपीएल मध्ये २०१२ या वर्षी प्रवेश केला यावेळी सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग या संघाने रवींद्र जडेजाला १४ कोटी रुपयांना बोली लावून त्या संघामध्ये घेतले होते.

चेन्नई सुपर किंग जिला दोन वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबित करण्यात आल्यामुळे गुजरात लायन्स या संघाने रवींद्र जडेजा यांना साडेनऊ कोटी रुपयांना मिळवले होते. त्यांनी फलंदाजी सह गोलंदाजी मध्ये देखील फार विक्रम केलेले असून त्यांच्या आधी असलेल्या रवींद्र अश्विन या गोलंदाज खेळाडूला मागे टाकत त्यांनी प्रथम क्रमांकावर गोलंदाजी क्षेत्रामधील खेळाडू होण्याच्या मान पटकावला होता. रवींद्र जडेजा यांनी १३६ एक दिवसीय सामने खेळले होते ज्यामध्ये त्यांनी सुमारे १५५ बळी घेत एक विश्वविक्रम नोंदवला होता.

रवींद्र जडेजाला मिळालेले पुरस्कार:

रवींद्र जडेजा यांनी विविध सामन्यांमध्ये केलेल्या विशेष कामगिरी करिता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून सर्वाधिक विकेटसाठी २००८ या वर्षीचा माधवराव सिंधिया पुरस्कार रवींद्र जडेजा यांनी पटकावला होता. पुढे २०१३ व २०१६ या दोन वर्षांमध्ये आयसीसी चा ओडीआय टीम ऑफ द इयर हा पुरस्कार देखील त्यांनी पटकावलेला असून २०१८ मध्ये देण्यात आलेला आयसीसी टॉप टेन कसोटी अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड करण्यात आली होती. त्यांना २०१९ या वर्षी अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले असून इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.

रवींद्र जडेजा बद्दल तथ्य माहिती:

  • क्रिकेट बरोबर रवींद्र जडेजा इतरही क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत, त्यांनी गुजरातच्या राजकोट मध्ये स्वतःच्या मालकीचे एक फूड फील्ड देखील तयार केलेले आहे.
  • गोलंदाजी क्षेत्रामध्ये अनिल कुंबळे यांच्या नंतर एकदिवसीय क्रमवारीतील खेळाडू म्हणून रवींद्र जडे यांचे नाव घेतले जाते.
  • देशांतर्गत क्रिकेट खेळताना रवींद्र जडेजा सौराष्ट्र संघाकडून खेळत असतो.
  • भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये तीन शतके पूर्ण करणारा पहिला खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा यांचे नाव घेतले जाते.
  • क्रिकेट बरोबर रवींद्र जडेजा यांना घोडे स्वारीचा देखील छंद असून ते सुट्टीच्या वेळी अनेकदा घोडे स्वारी करताना आढळून येत असतात, याकरिता त्यांनी केसरी व गंगा या नावाचे दोन उत्तम प्रजातीचे गोड देखील पाळलेले आहेत.
  • एका सामन्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना महेंद्रसिंग धोनी कडून सर म्हटलेले आहे.

निष्कर्ष:

क्रिकेट म्हटलं की आपल्या हातातील काम सोडून देखील भारतातील लोक या क्रिकेटकडे आकर्षित होत असतात. त्यातही भारत व पाकिस्तान यांची क्रिकेट मॅच असेल तर मग प्रत्येक जण सुट्टी घेऊन याचे दर्शन करत असतो. क्रिकेट हा मूळ इंग्लंड देशामध्ये उगम पावलेला खेळ असला तरी देखील भारत या खेळामध्ये फार आघाडीवर आहे.

भारताने विविध प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा आयोजित करून या खेळाला अगदी जनसामान्याच्या मनापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचवलेले आहे. गल्लीत अगदी कुठलेही साधन नसले तरी देखील मुले क्रिकेट खेळताना दिसून येतात. अगदी रविवारची सुट्टी ही हक्काची क्रिकेट खेळण्यासाठीच आहे असे लहान मुलांना वाटत असते.

आजच्या भागामध्ये आपण याच खेळाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या रवींद्र जडेजा यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. यामध्ये त्यांच्या जीवनचरित्राबद्दल जाणून घेतानाच त्यांचे प्रारंभिक जीवन, जन्म, त्यांची एक क्रिकेटर म्हणून कारकीर्द, आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार देखील बघितलेले आहेत.

त्याचप्रमाणे रवींद्र जडेजा यांच्या संदर्भात निर्माण झालेले काही वाद आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार याच्याबद्दल देखील माहिती जाणून घेतलेली आहे. सोबतच काही रोचक तथ्य माहिती देखील बघितलेली आहे.

FAQ

रवींद्र जडेजा या भारतीय क्रिकेटपटू खेळाडूचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

रवींद्र जडेजा या भारतीय क्रिकेटपटू खेळाडूचा जन्म दिनांक ६ डिसेंबर १९८८ या दिवशी गुजरात मधील जामनगर या ठिकाणी झाला होता.

रवींद्र जडेजा यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?

रवींद्र जडेजाच्या आईचे नाव लता जडेजा तर वडिलांचे नाव अनिरुद्ध सिंह जडेजा असे होते.

रवींद्र जडेजा यांच्या बहिणींचे नाव काय होते?

त्यांचे नाव पद्मिनी आणि नयना असे होते.

रवींद्र जडेजाची वैवाहिक स्थिती काय आहे?

रवींद्र जडेजा सद्यस्थितीमध्ये विवाहित असून त्यांनी रेवा सोलंकी यांच्यासोबत विवाह केलेला आहे. या दांपत्याला निधान जडेजा नावाचा एक मुलगा देखील झालेला आहे.

रवींद्र जडेजा यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी कोणते क्षेत्र निवडावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे?

त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी भारतीय सैन्यामध्ये सहभागी व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे.

Leave a Comment