Sai Tamhankar Information In Marathi :- सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
सई ताम्हणकर यांची संपूर्ण माहिती Sai Tamhankar Information In Marathi
अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हळूहळु तिने स्वबळावर मोठ्या पडद्यावर जम बसवला. तर चला मग पाहुयात यांच्या विषयी माहिती.
नाव | सई ताम्हणकर |
जन्म तारीख | 25 जून 1986 |
जन्म ठिकाण | सांगली, महाराष्ट्र |
वडिलाचे नाव | नंदकुमार ताम्हणकर |
आईचे नाव | मृणालिनी ताम्हणकर |
व्यवसाय | अभिनेत्री |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
जन्म :-
सई ताम्हणकर यांचा जन्म 25 जुन 1986 रोजी महाराष्ट्रातील सांगली या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नंदकुमार ताम्हणकर आणि आई मृणालिनी ताम्हणकर आहे. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत.
शिक्षण :-
त्यांनी सावरकर प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेतले. ती राज्यस्तरीय कबड्डीपटू होती आणि कराटेमध्येही नारंगी रंगाचा पट्टा मिळवला होता. ती एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे तसेच ती चिंतामणी महाविदयालयाची विदयार्थीनी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती. कॉलेजमधील अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती. तिच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या नाटकातून ती अभिनयात उतरली. तिचे दुसरे नाटक ‘आधे अधोरे’ यांनी महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला.
चित्रपटाची सुरवात :-
त्यांच्या नाटकांमधील कार्यक्रमानंतर त्यांना मराठी टेलिव्हिजन कार्यक्रमात भूमिका दिल्या गेल्या आणि या गोजिरवाण्या घरात, अग्नि शिखा, सती रे आणि कस्तुरी या चित्रपटात त्यांनी चांगल्या भूमिका केल्या.
2008 मध्ये, ताम्हणकरने सुभाष घईच्या क्राईम थ्रिलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मुख्य भूमिका घेत ऑन-स्क्रीन पदार्पण केले. त्याच वर्षी तिने सनाई चौघडे यांच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सई ताम्हणकर यांनी अमीर खानच्या गजनी या हिंदी चित्रपटात देखील चांगली भूमिका केली. त्यामध्ये सई हि सुनीताची मैत्रीण होती. ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या शीर्षकातील नो एंट्रीच्या मराठी रिमेकमध्ये बिपाशा बासूच्या बॉबी व्यक्तिरेखाचा रोल त्यांनी घेतला.
2013 साली प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशी यांच्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. त्यामध्ये त्यांनी केलेली ऍक्टिंग सर्वांना खूप आवडली. 2015 मध्ये ती आदित्य सरपोतदार दिग्दर्शक क्लासमेट मध्ये दिसली पुढे ‘हंटर’ या बॉलिवूडमधील चित्रपटात तिची ज्योत्स्ना ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर 2016 मध्ये तिने सचिन कुडाळकर दिग्दर्शित वजनदार मध्ये कावेरीची भूमिका साकारली त्यात तिचा अभिनयाचे कौतुक झाले.
त्याच वर्षी ती फॅमिली कट्टाममध्ये ही दिसली होती. 2018 मध्ये ती लव सोनिया मध्ये अंजली नावाच्या भूमिकेसाठी तिला दहा किलो वजन वाढवावे लागले. जुलै 2019 मध्ये अमेय वाघ सोबत ती गर्लफ्रेंड या चित्रपटामध्ये ती दिसली. सई ताम्हणकरने नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘मीमी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे. यात पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसले होते. यांचा हा चित्रपट टेलिग्रामवर लीक झाल्याने ठरलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्यात आला होता.
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने हंटर, लव्ह सोनियो या हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकतीच ती मिमी या हिंदी चित्रपटात पहायला मिळाली. यात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसले होते. सनई चौघडे हा सईचा पहिला चित्रपट. मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ख्याती काही नवीन नाही. ती तिच्या ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’. या चित्रपटामुळेच बिकिनी सीनमुळेच सई बरीच चर्चेत आली. इतर अभिनेत्रींपेक्षा सई नेहमीच आपल्या बिंधास्त लाईफ स्टाईल आणि अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत असते.
बॉलीवूड मध्ये जाण्याचे कारण :-
सईला मराठी सिनेइंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये जाण्यामागचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, तुमच्या कारकीर्दीत अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात. तसेच मलाही एक कलाकार म्हणून नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता. हा नवीन अनुभव घेतल्यामुळे तुमच्या मनाला समाधान मिळते. मला प्रत्येक प्रोजेक्टसोबत नवीन टीमसोबत काम करायला आवडते. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीने मला स्वतःला पारखण्याची संधी दिली आणि या कारणामुळे मी हिंदी चित्रपटांकडे वळले असल्याचे तिने सांगितले.
वैयक्तिक जीवन :-
सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला झाले होते. अमेय हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता.
पण सई आणि तिच्या पतिचा’ दीड वर्षांपूर्वीच घटस्फोट झालेला आहे. अमेय आणि सईचे खूपच चांगले पटत होते. त्यांनी अनेकवेळा प्रसारमाध्यमांना एकत्र मुलाखतीदेखील दिल्या आहेत. तिने या मुलाखतींच्या दरम्यान अमेय तिला तिच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड सपोर्ट करत असल्याचे सांगितले होते. तिच्या लग्नानंतरच तिने ‘हंटर’ या सिनेमांत काम केलं होतं.
चित्रपटांची नावे :-
ब्लॅक अँड व्हाईट, सनई-चौघडे, पिकनिक, गजनी, दुने साडे चार अजब लग्नाची गजब गोष्ट, सोन्याचे शहर लालबाग परेल, मिशन इम्पॉसिबल, रिटा, नो एन्ट्री पुढे धोका आहे झकास, ऱाडा, दोन घडीचा दाव, दुनियादारी, टाईम प्लीज, अनुमती, मंगलाष्टक वन्स मोर, तेंडुलकर आउट, आशा एक बेटावर, गुरूपौर्णिमा, पोरबाजार, प्यार वाली लव स्टोरी, पोस्टकार्ड, क्लासमेट, हंटर, तु ही रे.., धुराळा, मध्यम मसालेदार.
पुरस्कार :-
सई ताम्हणकर यांच्या अभिनय कारकीर्दीत तिला आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहातात. तर त्यांना मिळालेल्या पुरस्कारा विषयी माहिती पाहूया.
2015- मधील सर्वाधिक नैसर्गिक कामगिरी झी गौरव.
2015- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गुरुपौर्णिमा- संस्कृती कला दर्पण
2015- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : क्लासमेट एनआयएफएफ मराठी न्यूजमेकर अचिव्हर्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
2015– क्लासमेट महाराष्ट्रचा फेवरिट कोन – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
2015- मध्ये फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर दोनदा वैशिष्ट्यीकृत होणारी पहिली मराठी अभिनेत्री.
महाराष्ट्र अचिव्हर्स पुरस्कार 2018
टाईम्स पॉवर वूमन अवॉर्ड – मराठी सिनेमा तरुण अचिव्हर्स पुरस्कार.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- संत एकनाथ संपूर्ण माहिती
- संत ज्ञानेश्वर संपूर्ण माहिती
- संत जनाबाई संपूर्ण माहिती
- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती
- संत तुकाराम संपूर्ण माहिती
FAQ
सई ताम्हणकर यांचा जन्म कसा झाला?
सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगली याठिकाणी झाला. नंदकुमार असे सईच्या वडिलांचे तर मृणालिनी तिच्या आईचे नाव. सईचे बालपण या गावातच गेले. त्यानंतर सईने आपले शिक्षण सावरकर प्रतिष्ठानमधून पूर्ण केले.
सई ताम्हणकर यांचा जन्म कुठे झाला?
सई ताम्हणकरचा जन्म सांगली याठिकाणी झाला.
सई ताम्हणकर यांचा जन्म कधी झाला?
सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगली याठिकाणी झाला.
बॉलीवूड चांगले का आहे?
हे देशाच्या आर्थिक वाढीमागे एक मूलभूत आधार म्हणून काम करते . बॉलीवूड विविध संस्कृती आणि भारताच्या वारशाचे एकत्रीकरण तयार करते कारण प्रत्येक शहर त्याच्या सारात अद्वितीय आहे. हे एकाच चित्रपटातील अनेक संवाद, गाणी आणि नृत्य प्रकारांमध्ये माणसाच्या अमूर्त भावनांना एकत्र आणते.
बॉलिवूड इंडस्ट्री किती मोठी आहे?
भारतीय चित्रपट उद्योग 2021 मध्ये 90 अब्ज भारतीय रुपयांपेक्षा जास्त झाला.