सानिया मिर्झा यांची संपूर्ण माहिती Sania Mirza Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Sania Mirza Information In Marathi भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटू म्हणून ज्या खेळाडूला ओळखले जाते अशी  अष्टपैलू खेळाडू म्हणजे सानिया मिर्झा होय. तिने २००३ पासून २०१३ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये टेनिस असोसिएशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या एकेरी व दुहेरी टेनिस स्पर्धेमध्ये अव्वल स्थान राखत मोठा नाव लौकिक मिळवला होता, मात्र २०१३ या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतल्यामुळे अंकिता राहीना यांनी त्यांच्या जागी स्थान मिळवले.

Sania Mirza Information In Marathi

सानिया मिर्झा यांची संपूर्ण माहिती Sania Mirza Information In Marathi

लहानपणापासूनच टेनिस खेळाचा छंद असल्यामुळे वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी जागतिक स्तरावरील टेनिस स्पर्धा खेळल्या होत्या. त्यामुळे त्या प्रसिद्धी स्वतःमध्ये आल्या होत्या. २००६ यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाच्या खेळाडू म्हणून देखील त्यांचा विक्रम असून, याच वर्षी त्यांना अमेरिकेद्वारे जागतिक टेनिस खेळातील दिग्गज व्यक्तींना दिला जाणारा डब्ल्यू टी ए अंतर्गत असणारा मोस्ट इम्प्रेसिव्ह न्यू कमर अवॉर्ड देखील मिळालेला होता.

त्यामुळे टेनिस क्षेत्रातील भारताची सर्व प्रसिद्ध खेळाडू म्हणून सानिया मिर्झा यांचा नावलौकिक झालेला आहे. आज देखील टेनिस म्हटलं की आपल्याला सानिया मिर्झा यांचीच आठवण होत असते. टेनिस खेळाबरोबरच सानिया मिर्झा कॅमेऱ्यासमोर देखील मोठ्या प्रमाणात झळकलेली असून, अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये त्यांनी उपस्थित राहून कार्य देखील केलेले आहे.

दक्षिण भारतीय राज्यांमध्ये शिकलेल्या सानिया मिर्झा या अतिशय उत्तम खेळाडू असून, त्यांचा नावाचा दबदबा टेनिस जगतामध्ये आहे. आजच्या भागामध्ये आपण या सानिया मिर्झा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावसानिया मिर्झा
संपूर्ण नावसानिया मिर्झा मलिक
ओळखभारतीय टेनिसपटू
जन्मदिनांक१५ नोव्हेंबर १९८६
जन्मस्थळमुंबई महाराष्ट्र
सध्या वय३८ वर्ष
राष्ट्रीयत्वभारतीय
मूळ गावहैदराबाद
धर्ममुस्लिम

सनिया मिर्झा यांचे प्रारंभिक आयुष्य:

सानिया मिर्झा यांचा जन्म मुंबई या ठिकाणी इमरान मिर्झा आणि नसीमा मिर्झा या दांपत्याच्या पोटी दिनांक १५ नोव्हेंबर १९८६ या दिवशी झाला होता. छपाई व्यवसायामध्ये असणारे त्यांचे वडील तत्पूर्वी क्रीडा पत्रकार आणि चित्रपट निर्माता देखील होते. आपले बालपण हैदराबाद येथे व्यतीत केलेल्या सानिया मिर्झा यांनी खेरताबाद येथील नस्सर या शाळेमध्ये प्रवेश घेत आपले शिक्षण सुरू केले होते.

पुढे सहाव्या वर्षी त्यांना हैदराबाद येथील निजाम क्लब या संस्थेमध्ये दाखल केले गेले, मात्र त्यांचे कमी वय बघून येथील प्रशिक्षकाने त्यांना प्रवेश नाकारला. मात्र तिच्या वडिलांनी विनंती केली, आणि त्यांच्या विनंतीच्या नुसार सानिया मिर्झा यांना तेथे प्रशिक्षण घेण्यास सांगण्यात आले.

लहानपणापासूनच सानिया मिर्झा यांनी अतिशय कौशल्यपूर्ण खेळ दाखवला, त्यामुळे प्रत्येक जन तिचे कौतुक करत असे. सर्वात प्रथम महेश भूपती नावाच्या प्रशिक्षकांनी सानिया मिर्झा यांना टेनिस मधील मूलभूत गोष्टींचे ज्ञान दिले होते. पुढे त्यांनी सिकंदराबाद येथील सिनेट नावाच्या टेनिस अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवत प्रशिक्षण मिळवले.

त्यांनी टेनिस मधील प्रशिक्षण मिळवण्याकरिता अमेरिका गाठले होते व तेथील अकादमी मध्ये देखील प्रवेश मिळवला होता. या सर्व उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणामुळे त्यांना टेनिस खेळामध्ये अतिशय प्राविण्य प्राप्त झाले होते.

सानिया मिर्झाचे वैवाहिक जीवन:

सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शोएब मलिक यांच्यासोबत सानिया मिर्झा यांची भेट झाली होती. या भेटीतच एकमेकांचा सहवास दोघांनाही आवडला होता, त्यामुळे ते नेहमी एकमेकांना भेटत असत. अतिशय साधेपणाने वागणाऱ्या शोएब ला सानिया मिर्झा यांची भुरळ पडली होती. तो पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये माजी कर्णधार राहिलेला होता, त्यामुळे दोघेही चांगले खेळाडू असल्यामुळे यांची गट्टी चांगली जमत होती.

मात्र त्यांच्या प्रेम प्रवासामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते, शोएब पाकिस्तानचा असल्यामुळे त्यांचा विवाह होईल की नाही याबाबत शक्यता नव्हती. त्याच बरोबर खेळामुळे अनेक महिने सानिया मिर्झाला बाहेर राहावे लागेल, त्याचा लग्नामध्ये काही अडथळा येईल का याबाबत देखील शोएब सोबत चर्चा केली होती. अखेर अनेक अडथळे पार करत त्यांनी २०१० या वर्षी लग्न केले.

सनिया मिर्झा चे अफेयर:

सानिया मिर्झा यांचे देखील दोन व्यक्तींसोबत अफेयर सुरू होते, असे सांगितले जाते. यामध्ये शहीद कपूर आणि सोहराब मिर्झा या दोन व्यक्तींचा समावेश होतो. मात्र यांचे नातेपुढे टिकू शकले नाही.

सनिया मिर्झा चे काही वाद:

सनिया मिर्झामुळे अनेक वाद देखील निर्माण झालेले आहेत. टेनिस खेळताना ती लहान लांबीचा स्कर्ट घालत असे, त्यामुळे अनेक मुस्लिम लोकांना आक्षेप होता. त्याचबरोबर तिने २००८ यावर्षी तिरंग्यावर चालून तिरंग्याचा अपमान देखील केला होता. शिधापत्रिकांच्या वाटपावरून देखील वाद निर्माण झालेला असून, पाकिस्तानच्या नागरिकत्वावरून देखील तिचा वाद निर्माण झालेला आहे.

सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, तेलंगाना राज्याचा ब्रँड अँबेसिडर पद, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, यांसह अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

निष्कर्ष:

आपल्याकडे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते की अभ्यास केला नाही तर आयुष्यात पुढे काहीही करता येणार नाही. अगदी अभ्यास केला तरच करिअर घडू शकते. अशी मानसिकता हल्ली मुलांच्या मनावर बिंबवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास सोडून इतर कुठल्याही क्षेत्राकडे वळताना दिसत नाही.

मात्र पुढे जाऊन अभ्यासामध्ये अपयश आल्यानंतर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये जाण्याची देखील क्षमता उरत नाही. त्यामुळे लहानपणापासूनच पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या आवडीला प्राधान्य दिले, तर तो विद्यार्थी त्या क्षेत्रामधील उत्तम व्यक्ती ठरू शकतो. सानिया मिर्झा यांना लहानपणापासूनच टेनिस खेळण्याची आवड होती, त्यांच्या पालकांनी त्यांच्या या टेनिस खेळाच्या आवडीला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या अल्पावधीतच टेनिस खेळामध्ये प्रसिद्ध होऊ शकल्या.

वयाच्या अगदी कमी वयातच त्यांनी अनेक पुरस्कार जिंकण्याबरोबरच अनेक स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केलेली आहे, ते केवळ आणि केवळ त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच. आजच्या भागामध्ये आपण या सानिया मिर्झा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्यांच्या जीवनचरित्रासह यांच्या प्रारंभिक आयुष्याबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल देखील जाणून घेतलेले आहे.

त्यांचे अफेअर आणि टेनिस क्षेत्रामधील कारकीर्द याबद्दल माहिती घेतानाच त्यांच्याबद्दल काही तथ्य माहिती देखील जाणून घेतलेली आहे. सानिया मिर्झा यांच्या संदर्भात निर्माण झालेली काही वाद जाणून घेतानाच, त्यांच्या खेळाच्या शैलीबद्दल आणि पुरस्काराबद्दल देखील माहिती घेतलेली आहे.

FAQ

सानिया मिर्झा यांचे संपूर्ण  नाव काय होते?

सानिया मिर्झा यांचे संपूर्ण नाव सानिया मिर्झा मलिक असे होते.

सानिया मिर्झा यांचा जन्म कोणत्या ठिकाणी व कोणत्या दिवशी झाला होता?

महाराष्ट्राची राजधानी क्षेत्र असलेल्या मुंबईमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर १९८६ या दिवशी सानिया मिर्झा यांचा जन्म झाला होता.

सानिया मिर्झा यांचे मूळ गाव कोणते होते, व त्यांनी शिक्षण कोठे घेतलेले आहे?

सानिया मिर्झा यांची मूळ गाव हैदराबाद हे होते, व त्यांनी शिक्षण देखील तेथेच घेतलेले आहे.

सानिया मिर्झा यांचे सद्यस्थितीमध्ये अर्थात २०२४ या वर्षी वय किती आहे?

सानिया मिर्झा यांचे सद्यस्थितीमध्ये अर्थात २०२४ या वर्षी वय ३८ वर्षे इतके आहे.

सनिया मिर्झा यांच्या वडिलांचे नाव काय होते, व त्यांनी कोणत्या स्वरूपाचा व्यवसाय केलेला आहे?

सानिया मिर्झा यांच्या वडिलांचे नाव इमरान मिर्झा असे होते, त्यांनी अनेक व्यवसाय केलेले असून ते सुरुवातीला क्रीडा पत्रकार होते. त्यानंतर त्यांनी निर्माता बनून पुढे छपाई व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या आई देखील या व्यवसायात त्यांना मदत करत असत.

Leave a Comment