सर आयझॅक न्यूटन यांची संपूर्ण माहिती Sir Isaac Newton Information In Marathi

Sir Isaac Newton Information In Marathi १७ व्या व १८ व्या शतकामध्ये अतिशय असामान्य बुद्धिमत्तेसाठी ओळखले जाणाऱ्या सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म इंग्लंड मध्ये झालेला होता. त्यांनी अनेक स्वरूपाचे नियम मांडलेले असून, त्यांचे तीन नियम अतिशय प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक वैज्ञानिक शोधांचे जनक असलेले सर आयझॅक न्यूटन अनेक पुस्तके लिहिण्यासाठी देखील ओळखले जातात.

Sir Isaac Newton Information In Marathi

सर आयझॅक न्यूटन यांची संपूर्ण माहिती Sir Isaac Newton Information In Marathi

अगदी खगोलशास्त्रापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले असून, गणितामध्ये देखील त्यांनी काही नियम व पद्धती विकसित केलेले आहेत. सर आयझॅक न्यूटन हे खूपच बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी वैज्ञानिक क्रांतीचे पायाभरणी केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

या सर आयझॅक न्यूटन यांना त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या शोधा करता अर्थात गुरुत्वाकर्षणाच्या शोधा करिता ओळखले जाते. गुरुत्वाकर्षण शक्तीचा केवळ त्यांनी शोधच लावला नाही, तर विविध गणितिय स्वरूपामध्ये त्याची मांडणी देखील केली. त्यांच्या या शोधामुळेच आज अनेक देशांनी अंतराळ क्षेत्रामध्ये प्रगती केलेली असून, आज अवकाशात सोडण्यात येणारे रॉकेट त्यांच्याच शोधाचे फळ आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अनेक स्वरूपाचे शोध लावणारे हे आयझॅक न्यूटन जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठांमध्ये देखील शिकलेले आहेत. त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केलेली असून, त्यांच्यावर देखील फार मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आहे. जे त्यांच्यासाठी काही पुरस्कारापेक्षा कमी नाही. आजच्या भागामध्ये आपण या सर आयझॅक न्यूटन यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावसर आयझॅक न्यूटन
जन्म दिनांक४ जानेवारी १६४३
आईहन्ना अस्केफ
जन्म ठिकाणइंग्लंड मधील कोल्स्टवर्थ
वडीलआयझॅक न्यूटन
शिक्षणबी ए, एम ए, आणि इंटरमिजिएट
ओळखगुरुत्वाकर्षणाच्या शोधाचे जनक
शोधगतीविषयक तीन नियम
नागरिकत्वब्रिटिशियन
मृत्यु दिनांक३१ मार्च १७२७

सर आयझॅक न्यूटन यांचे बालपण:

४ जानेवारी १६४३ या दिवशी ब्रिटनच्या एका छोट्याशा गावामध्ये न्यूटन यांचा जन्म झाला होता. मात्र त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांची साथ सोडली होती, अर्थात ते वारले होते.  तीन वर्षे वयाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न करून न्यूटन यांना एकटे सोडले होते. त्यामुळे लहानपणापासूनच न्यूटन यांना आई वडिलांचे प्रेम मिळाले नव्हते.

न्यूटन यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केलेला असून, ज्यावेळी न्यूटनच्या आईच्या दुसऱ्या पतीचे अर्थात न्यूटनच्या सावत्र वडिलांचे निधन झाले, तेव्हा पुन्हा त्याच्या आईने त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला. व त्यांना शेतामध्ये मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र न्यूटन यांनी शेतीकडे लक्ष देण्याऐवजी अभ्यास करण्यावर भर दिला. त्यामुळे ते फार मोठे शास्त्रज्ञ होण्यास मदत मिळाली.

न्यूटन यांचे शैक्षणिक आयुष्य:

आपल्या मूळ जन्मगावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथन स्कूलमध्ये न्यूटन यांनी प्रवेश मिळवला. या शाळेतील वातावरण न्यूटन यांना फारच आवडले. त्यांनी तिथे अनेक प्रयोग केले, ज्यामध्ये जिवंत उंदीर, सन डायल अंतर्गत चालणारी पवनचक्की, तरंगू शकणारा कंदील, यांसारख्या प्रयोगांचा समावेश होतो.

पुढे त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी भारतात १६६५ या वर्षी पदवी मिळवण्याकरिता त्रिनिटी या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला. त्यांना पदव्युत्तर पदवी देखील घ्यायची होती, मात्र त्याच वेळेस जागतिक महामारी आल्यामुळे त्यांना हा मानस रद्द करावा लागला.

पुढे त्यांनी अनेक स्वरूपाचे प्रयोग करून, नवनवीन शोध लावले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध जगप्रसिद्ध समजला जातो. न्यूटन गणित क्षेत्रामध्ये देखील फार हुशार होते. त्यामुळे त्यांना गणित शिकवणारे प्राध्यापक यांनी स्वतःच्या जागी त्यांची नियुक्ती करण्याचे घोषित केले. त्यामुळे अनेक वर्ष गणिताचे प्राध्यापक म्हणून देखील सर आयझॅक न्यूटन यांनी कार्य केलेले आहे.

न्यूटनचे मूलभूत शोध:

न्यूटन यांनी अनेक शोध लावलेले असूनही, यातील गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीही प्रसिद्ध समजला जातो. या शोधाबद्दल काही दंतकथा देखील सांगितले जातात. यामध्ये न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसले असताना त्यांच्या डोक्यावर पडलेल्या सफरचंदामुळे त्यांना या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला असे काही लोक सांगतात.

मात्र यामध्ये किती तथ्य आहे, त्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी विविध गतीविषयक नियम मांडलेले असून, एकूण तीन गतीविषयक नियम आहेत. यातील पहिला नियम हा जडत्वावर आधारित असून, कुठल्याही शांत वस्तुला वेग द्यायचा असेल किंवा वेगवान गोष्टीला थांबवायची असेल, तर शक्ती लावावी लागते असे सांगितले जाते.

त्याचबरोबर दुसरा नियम हा वस्तुमानावर आधारित असून, कुठलीही वस्तू थांबवायची असेल, तर त्याला लावण्यात येणारे बल वस्तूच्या वस्तुमानाच्या समानोपाती असावे लागते. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम देखील फार महत्वाचा असून, त्यामध्ये न्यूटन यांनी असे सांगितले आहे की, कधीही बल एकटे असत नाही.

तर त्याच्या विरुद्ध व समान दर्जाचे बल त्याच्या विरुद्ध बाजूने लागलेले असते. मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक शोध लावलेले असून, त्याचा सर्वसामान्यांना आज खूपच फायदा होत आहे.

निष्कर्ष:

अतिशय असाधारण बुद्धिमत्तेसाठी ओळखले जाणारे सर आयझॅक न्यूटन विज्ञान क्षेत्रातील देव म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी लावलेल्या शोधामुळे आज विज्ञानाने फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेले असून, त्यांच्या शोधाच्या आधारे अनेक शोध देखील लावण्यात आलेले आहेत.

त्यांच्या शोधाचे आज देखील वापर केले जात असून, अतिशय अचूक शोध लावण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक शोधाचे गणितीय भाषेमध्ये संकलन व मांडणी देखील केली होती. इंग्लंडमध्ये जन्मलेले सर आयझॅक न्यूटन यांचे लहानपण फारच त्रासामध्ये गेले होते. मात्र त्यांची असाधारण बुद्धी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती, त्यामुळे त्यांचे नेहमी काही ना काही तरी उद्योग चालू असत. यातून त्यांनी अनेक शोधांना जन्म दिलेला असून, त्यांच्याविषयी जेवढे सांगावे तेवढे कमीच ठरते.

आजच्या भागामध्ये आपण या सर आयझॅक न्यूटन यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघितली असून, त्यांच्या जन्म व बालपणासह त्यांच्या वर असणारे संस्कार, व शिक्षण याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. सोबतच शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द, त्यांनी लिहिलेली काही पुस्तके, त्यांना मिळालेले पुरस्कार, न्यूटन बद्दल असणारे काही वाद, न्यूटनने दिलेले विविध नियम, सिद्धांत इत्यादी बाबीं बद्दल सखोल माहिती बघितलेली आहे.

FAQ

सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म कोणत्या ठिकाणी व कोणत्या दिवशी झाला होता?

सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन या देशांमध्ये दिनांक ४ जानेवारी १६४० या दिवशी झाला होता.

सर आयझॅक न्यूटन यांना कोणत्या नावाने किंवा पदवीने ओळखले जाते?

सर आयझॅक न्यूटन यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी केली असल्यामुळे त्यांना आधुनिक काळातील अग्रणीय शास्त्रज्ञ या नावाने देखील ओळखले जाते.

सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेल्या विविध शोधांमध्ये महत्त्वाचे शोध कोणते समजले जातात?

सर आयझॅक न्यूटन यांनी विविध शोध लावलेले असून, त्यापैकी गुरुत्वाकर्षणाचा शोध किंवा सिद्धांत, त्याचबरोबर गतिविषयक तीन नियम, आणि त्यांची विविध समीकरणे या शोधासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते.

सर आयझॅक न्यूटन यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक स्वरूपाचे कार्य केलेले आहे?

सर आयझॅक न्यूटन यांनी बऱ्याच क्षेत्रांमध्ये कार्य केले असले, तरी देखील त्यामध्ये ध्वनी, प्रकाश, गणित, उष्णता, खगोलशास्त्र, गती इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

सर आयझॅक न्यूटन यांनी कोणते कार्य सर्वात प्रथम करून वेगळा इतिहास रचला होता?

सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वात पहिली प्रावर्तक स्वरूपाची दुर्बीण बनवण्याचे कार्य केले होते. त्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरातून ओळखले जाते.

Leave a Comment