माती विषयी संपूर्ण माहिती Soil Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Soil Information In Marathi पृथ्वीचा पृष्ठभाग हा अनेक घटकांनी बनलेला असतो, त्यामध्ये खडक, गवताळ प्रदेश, माती इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. माती म्हणजे खडकांची झीज होऊन त्याचे बारीक कानांमध्ये रूपांतर होते व त्यामध्ये विविध सेंद्रिय पदार्थांसह जैविक अजैविक घटकांचे मिश्रण तयार होते, त्याला माती म्हणून संबोधले जाते.

Soil Information In Marathi

माती विषयी संपूर्ण माहिती Soil Information In Marathi

ज्यावेळी मातीचा संपूर्ण थर भूपृष्ठभागावरून हटवला जातो त्यावेळी आपल्याला खडक दिसून येतो. काही माती ही खोल तर काही उतार स्वरूपाची असते त्यामुळे या खडकाचे अंतर पृष्ठभागापासून कमी जास्त होत असते. मातीविषयी अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मृदा विज्ञान किंवा पेडॉलॉजी या नावाने ओळखले जाते.

खरे तर ही एक भौगोलिक स्वरूपाची शाखा असून यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या मातीचा अभ्यास केला जातो. या अभ्यासामध्ये मातीची निर्मिती कशी झाली? कोण कोणत्या विभागांमध्ये या मातीचे वितरण आढळते? त्याचबरोबर या मातीची वैशिष्ट्ये काय आहेत? रासायनिक गुणधर्म, या मातीमध्ये येऊ शकणारी पिके, याबद्दल सखोल वैज्ञानिक स्वरूपाचा अभ्यास करून त्याबद्दल अहवाल बनवला जातो.

थोडक्यात सांगायचे झाले तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर लहान कण सेंद्रिय पदार्थ आणि जैविक तसेच अजैविक घटकांनी मिळून बनलेल्या बारीक स्वरूपाच्या घटकांना माती म्हणून ओळखले जाते. मातीही कोणत्याही प्रकारच्या पिकांच्या उगवणीसाठी प्राथमिक माध्यम म्हणून ओळखली जाते.

मातीही सर्वच गोष्टींमध्ये उपयुक्त असून मातीचे महत्त्व ओळखून हल्ली मृदा संवर्धन कार्यक्रम आखले जात आहेत, कारण मोठ्या प्रमाणावर मातीची होणारी धूप ही शेती क्षेत्रासाठी मोठा धोका ठरलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण मातीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत व मातीचे प्रकार देखील जाणून घेणार आहोत.

नावमाती
इंग्रजी नावसॉईल
अभ्यासणारे शास्त्रपेडोलॉजी
स्वरूपभुगा
घटकजैविक , अजैविक आणि सेंद्रिय पदार्थ.
साधारण रंगतपकिरी ते काळसर
मुख्य गुणधर्मउत्पादकता

मातीची उत्पत्ती कशी झाली?

पृथ्वीवर असणारा प्रत्येक घटक कधीतरी पहिल्या वेळेला तयार झालेला असेलच. पृथ्वीचा पृष्ठभाग या नावाने ओळखली जाणारी मृदा विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनातून तयार होत असते, त्यासाठी पाऊस, विविध रासायनिक प्रक्रिया, ऊन, वनस्पती व प्राणी कारणीभूत ठरत असतात. या खडकांपासून तयार झालेल्या मृदेमध्ये ज्यावेळी विविध जैविक व सेंद्रिय पदार्थ मिसळतात त्यावेळी तिला उत्तम स्वरूपाची म्हणून ओळखले जाते.

मातीचे महत्त्व:

मानवी जीवनामध्ये मातीचे फार महत्त्व विशद करण्यात आलेले आहे. मातीमुळे विविध स्वरूपाची पिके घेऊन त्याद्वारे अन्न मिळवले जाऊ शकते, त्याचबरोबर विविध कारखानदारी व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल या मातीद्वारे पुरवला जातो. मग ते शेतीमाल असो की खाणकाम व्यवसाय असो.

जमिनीची धूप:

ज्यावेळी माती तयार होते या मातीच्या कानाचा आकार अतिशय लहान असतो, त्यामुळे पाऊस, वारा यासारख्या विविध नैसर्गिक गोष्टींनी या मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होत असते. मातीची धूप म्हणजे मातीचे कण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन साचणे होय यामुळे मातीची उत्पादकता घटण्यास सुरुवात होत असते.

मातीचे  गुणधर्म:

मातीचे विविध गुणधर्म आहेत मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता, चिकटपणा, कणांचा आकार, घनता, यांसारख्या विविध गुणधर्मांचा समावेश होतो, त्याचबरोबर रासायनिक गुणधर्मामध्ये देखील अनेक गुणधर्म असून त्याच्या अंतर्गत खारटपणा, अमलता, विद्युत वाहकता, उपलब्ध खनिज द्रव्य इत्यादी गुणधर्मांचा समावेश होतो.

माती निर्मितीसाठी परिणामकारक ठरणारे घटक:

माती किती वेगाने तयार होईल किंवा या मातीचे गुणधर्म कसे असतील त्याचबरोबर पीक उत्पादनाकरिता या मातीचा कशा स्वरूपात वापर होईल या सर्वांसाठी काही घटक खूप कारणीभूत ठरत असतात ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून बेस रॉक ओळखला जातो, कारण यापासूनच माती तयार होत असते व याचेच गुणधर्म मातीमध्ये उतरत असतात, त्याचबरोबर माती तयार होण्याच्या वेगावर परिणाम करणारे स्थानिक हवामान देखील खूपच महत्त्वाचे असते, त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून असणारी उंची देखील मातीचे गुणधर्म ठरवत असते.

माती तयार होण्यासाठी किती कालावधी लागला यावर मातीचे गुणधर्म अवलंबून असले तरी देखील विविध गुणधर्मावर मात करण्याचे कौशल्य सेंद्रिय पदार्थांमध्ये असते, कारण या सेंद्रिय पदार्थांमुळे मातीचे भौतिक गुणधर्म बदलत असतात.

निष्कर्ष:

आपण रोज मातीवरून चालत असतो, मात्र ही माती किती महत्त्वाची आहे हे आपल्या कधी लक्षातही येत नाही आणि आपण त्याबद्दल कधी विचार देखील करत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने माती फार महत्त्वाची असते कारण मातीही कोणत्याही पिकांच्या उगवणीकरिता एक मुख्य माध्यम म्हणून ओळखली जाते. मातीच्या खोलीनुसार त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाची पिके घेतली जात असतात.

अखिल सजीवांसाठी वरदान ठरलेली ही माती शेतकऱ्यांकडून देवासमान पुजली जाते. मातीला आई मानणाऱ्या आपल्या या संस्कृतीमध्ये माती देखील आपल्याला भरभरून गोष्टी देत असते. अगदी तुमचे औद्योगिक क्षेत्र असो की प्राथमिक उद्योग असो, प्रत्येक ठिकाणी मातीची फार गरज भासत असते.

मातीमध्ये काही वेळेला विविध प्रकारचे खनिजे किंवा इंधन आढळून येते. अशा वेळेला ती माती औद्योगिक रूपाने देखील आर्थिक फायदाच देत असते. मातीमुळे अनेक लोकांचे जीवन समृद्ध होण्याबरोबरच माती ही प्रत्येकाला जगण्याचे माध्यम म्हणून उपलब्ध होत असते.

आजच्या भागामध्ये आपण या माती बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली असून त्यामध्ये माती म्हणजे काय हे जाणून घेतलेले आहे. सोबतच मातीची उत्पत्ती कशी झाली? मातीची धूप होणे म्हणजे काय? मातीचे भौगोलिक भौतिक व विविध रासायनिक गुणधर्म काय आहेत? माती तयार होत असते तर त्याची प्रक्रिया साधारणपणे कशी असते?

मातीच्या निर्मितीवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो जेणेकरून माती तयार होण्याच्या वेगामध्ये देखील बदल आढळतो. तर ते पदार्थ कोणते आहेत? मातीचे विविध प्रकार, जगभरात आढळणाऱ्या मातीचे कोणकोणते वर्ग पडतात? यासह मातीबद्दल काही मनोरंजक तथ्य माहिती देखील बघितली आहेत.

FAQ

मातीचा रंग कोणता असतो व तो कसा ठरत असतो?

वेगवेगळ्या स्वरूपाचे गुणधर्म दाखवणाऱ्या मातीचा रंग हा वेगवेगळा असतो. अगदी पांढऱ्या रंगापासून गडद काळया रंगापर्यंत मातीचा रंग आढळून येत असतो. या रंगासाठी मुख्यतः मातीचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कारणीभूत असतात त्यानुसार हे सर्व घडत असते.

मातीच्या सगळ्यात खाली कोणता थर आढळून येत असतो?

ज्यावेळी संपूर्ण माती संपते त्यावेळी खडकाचा थर आढळून येत असतो. हा खडक पेरेंट रॉक म्हणून ओळखला जातो कारण यापासूनच त्या मृदेची निर्मिती झालेली असते.

मातीमध्ये आढळणारे विविध रासायनिक गुणधर्म कशाच्या आधारे ठरत असतात?

माती तयार होत असताना ज्या पेरेंट रॉक पासून ही माती तयार झाली त्यातील सर्व रासायनिक गुणधर्म मातीमध्ये उतरत असतात आणि हेच पेरेंट रॉक मातीचे रासायनिक गुणधर्म ठरवण्यासाठी कारणीभूत असतात.

भारतामध्ये साधारणपणे मातीचे कोणते प्रकार आढळून येत असतात?

भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे मृदेचे प्रकार आढळून येत असतात ज्यामध्ये गाळाची मृदा, काळी किंवा रेगूर मृदा, तांबडी मृदा, जांभळी मृदा, पर्वतीय मृदा आणि वालुकामय मृदा इत्यादी प्रकारच्या मातींचा समावेश होत असतो.

भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणावर कोणत्या स्वरूपाची मृदा आढळून येते व त्याचे क्षेत्र किती आहे?

भारतामध्ये सर्व प्रकारच्या मृदा आढळत असल्या तरी देखील गाळाची मृदा भारतामध्ये सर्वात जास्त आढळून येत असते. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४३% क्षेत्रफळावर असणारी ही मृदा मुख्यतः नदी परिक्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपात आढळते. ही मृदा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयन प्रक्रियेने तयार होत असते.

Leave a Comment