श्रीनिवास रामानुजन यांची संपूर्ण माहिती Srinivasa Ramanujan Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Srinivasa Ramanujan Information In Marathi शाळेमध्ये आपण अनेकदा सुट्टी घेत असू, मात्र गणिताचा अभ्यास पूर्ण नाही किंवा गणित येत नाही या कारणाने सुट्टी घेणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असेल. गणित हा विषय प्रत्येकाला धडकी भरवणारा असला, तरी देखील वर्गामध्ये एक किंवा दोन विद्यार्थी असे देखील असायचे त्यांना गणित म्हणजे मनोरंजनाचा विषय वाटत असे.

Srinivasa Ramanujan Information In Marathi

श्रीनिवास रामानुजन यांची संपूर्ण माहिती Srinivasa Ramanujan Information In Marathi

गणित हा दैनंदिन वापरण्यात येणारा विषय असला, तरी देखील मोठ्या प्रमाणावर या गणिताला घाबरणारी विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असे. आज विद्यार्थ्यांना स्वतःचाच गणिताचा अभ्यास पूर्ण होत नाही, मात्र आपल्या देशामध्ये असा एक व्यक्ती होऊन गेला ज्यांनी शालेय जीवनामध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला होता.

आणि त्या व्यक्तीचे नाव म्हणजे श्रीनिवास रामानुजन होय. गणित विषयाची एक असाधरण देणगी लाभलेले हे गणित तज्ञ प्रसिद्ध विचारवंत देखील होते. केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असे. गणित क्षेत्रामध्ये अनेक स्वरूपात योगदान दिलेले हे श्रीनिवास रामानुजन ३३ व्या वर्षीच खूप प्रसिद्ध झाले होते.

जगभरामध्ये एक उत्कृष्ट गणित तज्ञ म्हणून ओळख असलेले श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्राबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत…

नावरामानुजन
संपूर्ण नावश्रीनिवास रामानुजन अय्यंगार
जन्म दिनांक२२ डिसेंबर १८८७
जन्मस्थळकोयंबतूर
पत्नीचे नावजानकी
ओळखप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ
धर्महिंदू
मृत्यु दिनांक२६ एप्रिल १९२०

कोयम्बतुर या शहरांमध्ये एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबामध्ये श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. तो दिनांक २२ डिसेंबर १८८७ हा होता. त्यांच्या वडिलांनी रामानुजन यांच्या जन्मानंतर अवघ्या एकच वर्षात कोयंबतूर सोडले, आणि दुसरीकडे स्थायिक होण्याचे ठरविले. त्यांचे वडील पेशाने अकाउंटंट होते.

रामानुजन हे लहानपणी वाढीच्या दृष्टीने अतिशय मंद स्वरूपाचे होते, अगदी तीन वर्षांपर्यंत ते बोलू देखील शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या वडिलांना फार चिंता वाटत होती. मात्र आपला मुलगा शिकून नक्कीच काहीतरी होईल, ही आशा त्यांच्या मनामध्ये जागृत होती. त्यामुळे त्यांनी रामानुजन यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना एका प्राथमिक शाळेमध्ये दाखल केले.

इतर विषयांमध्ये रामानुजन यांना रस वाटत नसला, तरी देखील गणित विषयांमध्ये त्यांची गती प्रचंड होती. त्यामुळे ते नेहमीच गणिताचा अभ्यास करण्यामध्ये आपला वेळ घालवत असत. त्यांनी शाळेच्या शिक्षणामध्ये कधीही फारसा रस दाखवला नाही. ज्यावेळी ते दहा वर्षांचे झाले, तेव्हा प्राथमिक शाळा अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये त्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले.

पुढे माध्यमिक शिक्षण मिळवण्याकरता त्यांनी टाऊन हायस्कूल या संस्थेमध्ये प्रवेश मिळविला. अतिशय सहानुभूती व दया भावना बाळगणारे रामानुजन नेहमी हसतमुख राहत असत. ते कधीही कोणावर रागवत नसत, त्यामुळे लवकरच ते सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या गळ्यातील ताईत झाले.

त्यांनी साहित्य क्षेत्रातील देखील अभ्यास केला होता. इंग्रजी भाषेमध्ये देखील त्यांचे प्रभुत्व चांगले होते. त्यामुळे त्यांना हायस्कूल परीक्षेमध्ये देखील गणित व इंग्रजी या विषयांमध्ये उच्च गुण मिळाले. परिणामी यादरम्यान त्यांना शिष्यवृत्ती देखील प्राप्त झाली. पुढे या शिष्यवृत्तीच्या जोरावर त्यांनी आपला महाविद्यालयीन अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. त्यांना गणितांचा जणू व्यासंगच लागला होता, त्यामुळे ते शाळेत ऐकतील तेवढाच अभ्यास त्यांचा इतर विषयांचा होत असे.

इतर सर्व वेळ ते गणिताच्या अभ्यासाकरता देत असत. परिणामी अकरावीच्या इयत्तेमध्ये गणित वगळता इतर सर्व विषयांमध्ये श्रीनिवास रामानुजन नापास झाले. आधीच आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, ते कसेबसे शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण पूर्ण करत असत. मात्र या इतर विषयातील नापास झाल्यामुळे त्यांचे शिष्यवृत्ती देखील बंद करण्यात आली. त्यामुळे त्यांना फार मोठ्या संकटातून मार्ग काढावा लागला.

त्यांनी अंकगणिताच्या शिकवण्या घेत बारावीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, मात्र येथे देखील गणित वगळता इतर सर्व विषयांमध्ये तीन नापास झाले. परिणामी त्यांनी आपले शालेय शिक्षण सोडून दिले. शाळेतून बाहेर पडल्यानंतर काही वर्ष त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागला, मात्र या परिस्थितीत देखील त्यांनी गणिताची आवड जोपासत अतिशय आव्हानात्मक परिस्थितीला तोंड दिले.

श्रीनिवास रामानुजन आणि रॉयल सोसायटी:

त्यांच्या अद्वितीय गणित कौशल्यामुळे श्रीनिवास रामानुजन यांना रॉयल सोसायटी येथील फेलो म्हणून निवडण्यात आले. येथील सर्वात लहान वयाचा व्यक्ती म्हणून त्यांना ठरविण्यात आले. येथे प्रवेश करत त्यांनी ट्रिनिटी कॉलेज ची फेलोशिप प्राप्त केली होती, मात्र या रॉयल सोसायटीमधील वास्तव्यादरम्यान हवामान मानवले नसल्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती.

परिणामी त्यांच्यावर उपचार करणे देखील कठीण होत चालले होते. प्रकृती साथ देत नसल्यामुळे डॉक्टरांनी देखील हात वर केले होते. आणि पुन्हा भारतीय हवामानामध्ये परतण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांचा सल्ला ऐकून ते भारतामध्ये परत आले, भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी गणित विषयात आपले संशोधन कार्य पूर्ण सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी मद्रास विद्यापीठांमध्ये देखील लेक्चरर किंवा व्याख्याता म्हणून कार्य करणे सुरू केले होते.

भारतामध्ये परतल्यानंतर काही दिवस बरे वाटले, तरी देखील त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. आणि शेवटी २६ एप्रिल १९२० या दिवशी त्यांनी आपला देह सोडला. अवघ्या ३३ वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी गणित क्षेत्राला फार मोठे योगदान दिले होते.

निष्कर्ष:

गणित हा विषय अनेकांना आवडीचा असला, तरी देखील गणित खूपच उत्कृष्ट व मनोरंजक स्वरूपाचा विषय आहे. केवळ या विषयाला समजून घेणे गरजेचे असते. एकदा गणित सोडवण्याची पद्धत उमगली, की गणित हवेहवेसे वाटू लागते. साधे उदाहरण बघायचे ठरले, तर ज्या वेळेला आपल्याला वर्गामध्ये गणित सोडवता येईल तेव्हा आपल्याला खूप आनंद वाटत असतो.

गणित सोडवल्यामुळे बुद्धी तल्लख होण्याबरोबरच व्यक्तीचा मानसिक विकास देखील घडून येत असतो. भारतामध्ये अनेक गणिततज्ञ झालेले आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाला गणितामधील अनेक तत्व शिकवलेले असून, गणित क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्यामध्ये श्रीनिवास रामानुजन यांचा देखील समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण या भारतीय गणितज्ञबद्दल माहिती बघितलेली असून, त्यांचे जीवन चरित्र जाणून घेण्याबरोबरच त्यांच्या प्रारंभिक आयुष्याबद्दल देखील माहिती बघितली आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची घेतली गेलेली दखल, रॉयल सोसायटी येथे त्यांनी घेतलेला सहभाग, इत्यादी माहिती देखील बघितलेली आहे. कमी वयामध्ये त्यांचा झालेला मृत्यू व त्याचे कारण इत्यादी बाबत माहिती घेताना त्यांच्याविषयी विविध तथ्य माहिती देखील बघितली आहे.

FAQ

भारतातील थोर गणिततज्ञ म्हणून ओळखले जाणारे रामानुजन यांचे संपूर्ण नाव काय होते?

भारतातील थोर गणिततज्ञ म्हणून ओळखले जाणाऱ्या रामानुजन यांचे संपूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार असे होते.

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिनांक २२ डिसेंबर १९८७ या दिवशी भारताच्या कोइंबतूर या शहरामध्ये झाला होता.

रामानुजन यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता?

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू दिनांक २६ एप्रिल १९२० या दिवशी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी झाला होता.

श्रीनिवास रामानुजन यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?

श्रीनिवास रामानुजन यांच्या आईचे नाव कोम्ममल अय्यंगार, तर वडिलांचे नाव श्रीनिवास अय्यंगार असे होते.

रामानुजन यांच्या जन्मानंतर अवघ्या एकच वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबाने कुठे स्थलांतर केले?

रामानुजन यांच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबाने अवघ्या एक वर्षांमध्ये कुंभकोणम या ठिकाणी वास्तव्य करण्याकरिता स्थलांतर केले.

Leave a Comment