सूर्यनमस्कार व्यायामची संपूर्ण माहिती Surya Namaskar Exercise Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Surya Namaskar Exercise Information In Marathi सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जण अगदी पैशांच्या मागे धावत आहे. त्यामुळे आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. मात्र ज्यावेळी कुठलातरी आजार मागे लागतो, तेव्हा व्यायामाचे महत्त्व प्रत्येकाला पटत असते. एक सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून ओळखला जाणारा सूर्यनमस्कार एक योगासनांचा प्रकार आहे.

Surya Namaskar Exercise Information In Marathi

सूर्यनमस्कार व्यायामची संपूर्ण माहिती Surya Namaskar Exercise Information In Marathi

या सूर्यनमस्काराचा सातत्यपूर्ण सराव केल्यामुळे व्यक्तीला चांगले लाभ मिळत असतात, व शरीर देखील सुदृढ व लवचिक राहण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या आजारांचा शिरकाव शरीरामध्ये होत नाही. अगदी तेजस्वी व निरोगी शरीर हवे असेल तर सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो. अगदी लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत महिला पुरुष कोणी देखील या सूर्याचा नमस्कार करून त्याचा फायदा घेऊ शकतो.

आजच्या भागामध्ये या सर्वांग सुंदर व्यायाम प्रकारचा अर्थ सूर्यनमस्काराची माहिती आपण बघणार आहोत…

नावसूर्यनमस्कार
प्रकारव्यायाम प्रकार
उपप्रकारयोग प्रकार
फायदेशारीरिक बळकटी आणि निरोगीपणा
दृश्य फायदेशरीरावर येणारे तेज
सूर्यनमस्काराची योग्य वेळसकाळी सूर्य उगवताना

सूर्यनमस्कार कोणत्या वेळी केली जावेत:

सूर्यनमस्कार या नावामध्येच सूर्य आल्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळी सूर्य उगवताना ही आसणे करणे फायद्याचे सांगितले जाते. मात्र तुम्हाला कामाच्या व्यापामुळे सकाळच्या वेळेला ही आसने करणे शक्य नसेल, तर तुम्ही संध्याकाळी देखील हे आसन करू शकता.

मात्र सर्वात जास्त प्रभाव हा सकाळी असतो. मात्र ज्याही वेळेला तुम्ही ही आसने कराल, त्या वेळेला तुमचे पोट रिकामे असले पाहिजे. त्याचबरोबर तुमचे मन देखील अतिशय शांत व प्रफुल्लित असणे गरजेचे असते. जेणेकरून या सूर्यनमस्कारांचा चांगला फायदा होण्यास मदत मिळेल.

सूर्यनमस्कारांचा शोध:

मित्रांनो, सूर्यनमस्कार हे १९२८ यावर्षी शोधले गेले आहेत, असे संदर्भ आढळून येतात. ज्यावेळी औंध संस्थानाचे राजे भगवानराव श्रीनिवास राव पंत प्रतिनिधी यांनी त्यांच्या द टेन पॉईंट वे टू हेल्थ या पुस्तकांमध्ये या सूर्यनमस्कार याबद्दल माहिती लिहून त्यांचे प्रोत्साहन केले होते.

त्यामुळे या सूर्यनमस्काराचा शोध लावण्याचे श्रेय पंत प्रतिनिधी राजा भगवानराव श्रीनिवास यांना दिले जाते. मात्र या भगवानराव श्रीनिवास यांच्या मते सूर्यनमस्कार हे पहिल्यापासूनच अस्तित्वात असलेली एक मराठी व्यापक परंपरा असून, मी केवळ त्याचे पुस्तकी रूपात संग्रहण केलेले आहे.

सूर्यनमस्कारामध्ये आढळणारी विविध आसणे:

सूर्यनमस्कार करताना पुढील आसने एका क्रमाने करणे आवश्यक असते. यांचा क्रम अभिवादन, हस्त उत्तनासन, उत्तनासन, हॉर्स पोज, चतुरंग, दंडासन, अष्टांग नमस्कार, कोब्रा पोज, पर्वतासन, आणि पुन्हा हॉर्स पोज, उत्तनासन, हस्त उत्तनासन आणि अभिवादन या क्रमाने असले पाहिजे.

सूर्यनमस्काराने मिळणारे फायदे:

सूर्यनमस्काराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यामध्ये उच्च रक्तदाब नियंत्रण, लठ्ठपणा कमी करणे, पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणे, स्नायू व सांधे मजबूत करणे, मासिक पाळी नियमित येणे, इत्यादी गोष्टी चे फायदे होत असतात.

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असेल, अशा लोकांनी सूर्यनमस्कार करणे हे फायद्याचे समजले जाते. कारण सूर्यनमस्कार करताना शरीरातील प्रत्येक अवयव तानला जातो, आणि शरीरामध्ये रक्तप्रवाह संचालित होण्यास मदत मिळत असते. त्याचा फायदा रक्तदाब नियंत्रणावर होत असतो. मात्र रक्तदाब वाढलेला असताना सूर्यनमस्कार करू नये असे सांगितले जाते.

सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीरातील चरबीचा वापर केला जातो, आणि अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते. परिणामी लठ्ठपणा आणि वजन वाढीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवून, शरीराला योग्य आकारामध्ये आणण्यास मदत होत असते.

सूर्यनमस्कार घातल्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते, त्याचबरोबर त्या अन्नाचा शरीराला वापर देखील केला जातो. त्यामुळे पचन संस्थेच्या समस्या असलेल्या रुग्णांनी सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो.

ज्या मुली व महिलांना मासिक पाळीच्या समस्या जाणवत असतील, व नियमित नसतील, त्याचबरोबर यावेळी तीव्र वेदना होत असतील, अशा वेळी सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती देखील सुलभ होण्यास मदत मिळत असते.

ज्या लोकांना स्नायू आखडणे, संधिवात किंवा हाडांच्या संदर्भात काही समस्या जाणवत असतील, अशा लोकांनी सूर्यनमस्कार केल्यामुळे त्यांच्या हाडे व सांधे मजबूत होत असतात. त्याचबरोबर स्नायूंना देखील बळकटी येण्यास मदत मिळत असते.

रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये चिंता, विविध आजार, मधुमेह इत्यादी समस्यांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात होत असते. त्याचबरोबर चेहरा देखील काळवंडत असतो. मात्र दररोज सूर्यनमस्कार केल्यामुळे चेहरा टवटवीत होऊन चेहऱ्यावर एक विशिष्ट तेज येण्यास मदत होत असते. शिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होण्यास फायदेशीर ठरते.

निष्कर्ष:

जोपर्यंत शरीराला कुठल्याही समस्या किंवा त्रास जाणवत नाही, तोपर्यंत कोणीही शरीराकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र आजार मागे लागला की व्यायामाचा सहारा घेतला जातो. मात्र कुठलाही आजार किंवा त्रास होण्याआधी नियमितपणे व्यायाम केल्यास शरीर अगदी मरेपर्यंत सदृढ राहण्यास मदत होत असते.

त्यासाठी सूर्यनमस्कार हा देखील एकच चांगला पर्याय ठरू शकतो. आजच्या भागामध्ये आपण सूर्यनमस्काराबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे, ज्यामध्ये सूर्यनमस्कार कधी करावे, या सूर्यनमस्काराचा शोध कोणा द्वारे लावण्यात आला.

सूर्यनमस्कार मध्ये असणारी विविध आसने कोणती आहेत, सूर्यनमस्कार करण्याच्या विविध योग्य पद्धती, सूर्यनमस्कार पासून होणारे चांगले फायदे, त्याचबरोबर सूर्यनमस्कार करताना काय काळजी घ्यायला हवी, व त्यासाठी योग्य वेळ कोणती ठरवावी, तसेच सूर्यनमस्कार घालण्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे, इत्यादी प्रकारची माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघून तुमच्या शंकांचे निरसन देखील झालेले असेल…

FAQ

सूर्यनमस्कारामुळे कोणकोणते फायदे होत असतात?

सूर्य नमस्कार घालण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये उच्च रक्तदाब नियंत्रणात आणणे, लठ्ठपणा कमी करणे, मासिक पाळी मध्ये फायदेशीर ठरणे, पचनसंस्थेचे आरोग्य वाढविणे, स्नायू व सांधे यांच्यामधील शक्ती वाढविणे, आणि शरीरावर तेजस्विता आणून शरीराचा रंग उजळणे इत्यादी फायदे होत असतात.

सूर्यनमस्कार म्हणजे काय?

सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा प्रकार असून, योग्य प्रकारामध्ये त्याला वर्गीकृत केले जाते.

सूर्यनमस्कार का महत्वाचे आहेत?

सूर्यनमस्कारामुळे शरीरातील स्नायू व सांधे मजबूत होत असतात. त्याचबरोबर शरीरावर एक तेज येण्यास मदत होते. सोबतच वाढलेले वजन कमी करणे, रक्त प्रवाह सुधारणे, पचनक्रिया चांगली करणे, झोप चांगली येणे इत्यादी गोष्टींमध्ये देखील सूर्यनमस्काराचा फायदा होत असतो.

सूर्यनमस्काराचे किती प्रकार पडतात?

सूर्यनमस्काराचे एकूण बारा प्रकार असतात, ज्यातील आठ प्रकार हे मुख्य असतात. तर उर्वरित प्रकार हे पुन्हा सुरुवातीला व शेवटला रिपीट केले जातात.

सूर्यनमस्काराबद्दल काय माहिती सांगता येईल?

सूर्यनमस्कार हे आठ प्रकारच्या विविध १२ शारीरिक हालचालींचा समूह असून, एका विशिष्ट क्रमाने व लय मध्ये या सर्व हालचाली केल्या जातात. ही आसने सूर्य उगवण्याच्या वेळी करणे फायद्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना सूर्यनमस्कार असे म्हटले जाते. त्यामुळे शरीरातील सर्व हाडे व स्नायू बळकट होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर शरीरावर तेज येण्यास देखील मदत मिळत असते.

आजच्या भागामध्ये आपण सूर्यनमस्कार या योगप्रकाराविषयी संपूर्ण माहिती बघून, त्याबद्दल विविध गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुमच्याकडे अतिरिक्त माहिती असेल तर ती देखील कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा.

Leave a Comment