पोहण्याच्या व्यायाम विषयी संपूर्ण माहिती Swimming Exercise Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Swimming Exercise Information In Marathi शरीराला सुदृढ व निरोगी ठेवायचे असेल तर व्यायाम सांगितला जातो. मात्र संपूर्ण शरीराचा एकाच वेळी व्यायाम करायचा असेल, तर सर्वोत्तम पर्याय म्हणून पोहण्याकडे बघितले जाते. पाण्यामध्ये पोहल्यामुळे अगदी डोक्याच्या केसापासून पायाचा नखापर्यंत संपूर्ण शरीराची हालचाल होत असते, ज्यामुळे हाता पायांच्या स्नायूसह पाठ व छाती येथील स्नायू देखील बळकट होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर शरीरदुखी देखील कमी होण्यास मदत होते.

Swimming Exercise Information In Marathi

पोहण्याच्या व्यायाम विषयी संपूर्ण माहिती Swimming Exercise Information In Marathi

सोबतच पाण्यामध्ये व्यायाम असल्यामुळे कित्येक तास विना घाम येता व्यायाम केला जाऊ शकतो. त्यामुळे पोहणे हे एक मनोरंजनाचे साधन असण्याबरोबरच उत्तम व्यायाम प्रकार देखील आहे. अगदी कोणत्याही वयोगटातील लोकांद्वारे हा व्यायाम सहजरित्या केला जाऊ शकतो. आजच्या भागामध्ये आपण पोहण्याच्या व्यायामाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.…

नावपोहणे
इंग्रजी नावस्विमिंग
स्वरूपपाण्यामध्ये तरंगत प्रवास करणे
प्रकार खेळ, मनोरंजन, आणि व्यायाम
फायदास्नायूंची बळकटी

पोहण्याच्या व्यायामाचे विविध प्रकार:

पोहण्याचा व्यायाम कशाप्रकारे केला जात आहे, त्यानुसार याचे विविध प्रकार पडत असतात. ज्यामध्ये बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, साईड स्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्री स्टाईल इत्यादी प्रकार मुख्य म्हणून ओळखले जातात. ज्यावेळेस पोहणे खेळ म्हणून विचारात घेतले जाते, त्यावेळी या प्रकारांचा विचार केला जातो. या प्रत्येक प्रकारच्या पोहण्यामुळे शरीराला सारख्याच प्रकारच्या व्यायामाने सज्ज केले जाते.

पोहण्यामुळे होणारे फायदे:

व्यायामाचा मुख्य उद्देश हा शरीराला सुदृढ व निरोगी करणे हा असतो. पोहण्यामुळे देखील शरीर अतिशय सुदृढ होत असते. पोहण्याच्या व्यायामामध्ये शरीराचा प्रत्येक अवयव वापरला जात असतो, त्यामुळे या प्रत्येक अवयवांमध्ये असणाऱ्या स्नायूंना बळकटी प्रदान करण्याचे कार्य पोहोण्याच्या व्यायामामुळे होत असते.

पोहोल्यामुळे  श्वास घेण्याची क्रिया देखील जलदरीत्या होत असते, त्यामुळे फुफुसाचे आरोग्य सुधारण्याबरोबरच शरीराच्या संपूर्ण भागामध्ये रक्तपुरवठा चांगला होण्यास मदत मिळते. आणि या रक्तपुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मात्रा असल्यामुळे शरीर तजेलदार देखील होत असते.

त्याचबरोबर पोहताना सतत हालचाल सुरू असल्यामुळे, माणसाची कार्यक्षमता किंवा स्टॅमिना वाढण्यास देखील मदत मिळत असते. त्याचबरोबर शरीरातील विविध सांधे बळकट होतात, आणि हाडे देखील चांगली होण्यास मदत मिळते. पोहण्याच्या व्यायामामध्ये सतत कार्यक्षम असल्यामुळे चरबी किंवा कॅलरीज मोठ्या प्रमाणावर बर्न होत असतात, ज्यामुळे वजन घटविणे सहज शक्य होते.

ज्या रुग्णांना पोटाची चरबी जास्त प्रमाणात वाढली असेल त्यांनी व्यायाम केल्यास इतर कुठल्याही प्रकारापेक्षा जलद परिणाम दिसून येत असतात. त्याचबरोबर पोहण्याच्या व्यायामामुळे व्यक्ती चांगलाच दमत असतो, परिणामी भूकही चांगली लागते. त्यामुळे आहार योग्य घेतला जातो आणि शरीर बलवान होण्यास मदत मिळते. पोहण्याच्या व्यायामामुळे माणूस शांत होत असतो, त्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यामध्ये देखील मदत मिळत असते. त्याचबरोबर झोप देखील उत्तम येत असते, त्यामुळे शरीराला चांगला आराम देखील प्राप्त होतो.

पोहल्यामुळे हृदयाशी संबंधित तक्रारी देखील दूर केल्या जाऊ शकतात, त्याचबरोबर उच्च रक्तदाब, पक्षाघात, हृदयरोग, डायबिटीस, यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यामध्ये व्यायाम फारच महत्त्वपूर्ण समजला जातो.

अनेक लोकांना बळकट स्नायू व पिळदार शरीर हवे असते, त्याकरिता विविध प्रकारचे व्यायाम केले जातात. मात्र पोहण्याचा व्यायाम केल्यास शरीराच्या संपूर्ण स्नायूंचे बळकटीकरण होते.

पोहण्याच्या व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या व्यायाम प्रकारांमध्ये घाम येत नाही, त्यामुळे कितीही वेळ व्यक्तीला दमल्यासारखे भासत नाही. दुपारी मित्रमंडळी सोबत पोहत असतील तर किती वेळ झाला तरी देखील त्यांना घरी जावेसे वाटत नाही, त्याचबरोबर संपूर्ण शरीराला पाण्यामुळे थंडावा प्राप्त होत असतो.

याउलट हिवाळ्यामध्ये पोहोचल्यामुळे पाण्यातील उब शरीराला उष्णता देण्यास फायदेशीर असते. ज्या रुग्णांना घाम आल्यास कंटाळवाणे वाटते, किंवा वर्कआउट करण्याची इच्छा उरत नाही, अशा लोकांसाठी पोहण्याचा व्यायाम अतिशय उत्तम समजला जातो.

आजकाल कामाच्या व्यापामुळे अनेकांना निद्रानाश ही समस्या भेडसावत आहे, मात्र पोहण्याच्या व्यायामामुळे संपूर्ण शरीर रिलॅक्स होत असते. त्यामुळे योग्य रीतीने व चांगली झोप मिळण्यास मदत होत असते. जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय ताजीतवाने वाटते, आणि व्यक्ती आपल्या संपूर्ण क्षमतेने कार्य करू शकतो.

पोहल्यामुळे वजन घटवण्यात देखील मदत मिळत असते. एक तास पोहण्यामुळे एक व्यक्ती साधारणपणे ४०० ते ८०० कॅलरी वापरत असतो. या अतिरिक्त कॅलरी किंवा चरबी चा वापर झाल्यामुळे शरीर सुडौल होण्याबरोबरच, योग्य आकारामध्ये येण्यासही मदत मिळत असते.

व्यायामामुळे वापरल्या जाणाऱ्या कॅलरीज:

व्यक्ती परत्वे व्यायामामुळे वापरल्या जाणाऱ्या कॅलरींची संख्या वेगळी असली, तरी देखील अंदाजे ६० किलो वजनाच्या व्यक्ती अवघ्या एका तासात सुमारे ४१३ ते ५९० कॅलरी पर्यंत कॅलरी वापरू शकतो. तर ७० किलो वजनी व्यक्ती ४९३ ते ७०४ कॅलरी वापरत असतो.

८० व ९० किलो वजन असणाऱ्या व्यक्ती अनुक्रमे ५७२ ते ८१७ आणि ६५१ ते ९३१ इतक्या कॅलरी वापरत असतो. या कॅलरी अवघ्या एका तासाच्या पोहण्यामुळे बर्न होत असतात, तर नियमित पोहण्यामुळे किती फायदा होत असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

पोहताना घ्यावयाची काळजी:

पोहणे हा व्यायाम अतिशय उत्कृष्ट असला तरी देखील ज्या व्यक्तींना पोहण्याबद्दल कला अवगत नाही अशा व्यक्तींसाठी हा खेळ किंवा व्यायाम प्रकार अतिशय घातक देखील ठरु शकतो. ज्या व्यक्तींना पोहता येत नाही, ते पाण्यामध्ये बुडून अगदी मृत्यू देखील पाऊ शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे खूपच गरजेचे असते. स्विमिंग करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात उतरले, तर अतिशय फायदेशीर ठरत असते.

  • नवीन व्यक्तींनी सोबत कोणी असल्याशिवाय पाण्यामध्ये उतरू नये.
  • ज्या ठिकाणाच्या पाण्याचा अंदाज नसेल, अशा खोल पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये.
  • पोहायला उतरण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे, व काही काळ थांबल्यानंतर पाण्यामध्ये उतरावे.
  • लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींसोबतच पोहायला जावे.
  • पोहल्यामुळे अनेकांना ऍलर्जी जाणवू शकते, त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ला घेणेदेखील गरजेचे ठरते.

निष्कर्ष:

सर्वात उत्तम व्यायाम म्हणून पोहण्याकडे बघितले जाते. पूर्वीच्या काळी एक मनोरंजन म्हणून मुले दुपारच्या वेळी विहिरीमध्ये पोहायला जमत असत. त्यामुळे सकाळी काम करून आलेला थकवा दूर होण्यास मदत मिळत असे. त्याचबरोबर  हा एक उत्तम व्यायाम प्रकार असण्याबरोबरच मुलांना आनंद देखील मिळत असे.

आजकाल पोहण्याला खेळाचा स्वरूप देण्यात आलेले आहे, त्यामुळे या खेळाच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. व त्याचे विविध प्रकार देखील बघायला मिळतात. आजच्या भागामध्ये आपण स्विमिंग अर्थात पोहण्याबद्दल माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला विविध गोष्टी वाचायला मिळाल्या असतील, जसे की पोहण्याचे फायदे, पोहोल्यामुळे शरीराला होणारा व्यायाम, व शरीरातील कॅलरीज ची विल्हेवाट, पोहताना घ्यावयाची काळजी, इत्यादी गोष्टी वाचलेल्या आहेत.

FAQ

पोहण्याच्या क्रियेला इंग्रजी मध्ये काय म्हटले जाते?

पोहण्याच्या क्रियेला इंग्रजीमध्ये स्विमिंग असे म्हटले जाते.

पोहण्याचा व्यायाम केल्यामुळे कोणकोणते फायदे बघायला मिळतात?

पोहण्याचा व्यायाम केल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, शरीराच्या सर्व अवयवांचे स्नायू बळकट होतात, या व्यायाम प्रकारामध्ये शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता नसते. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यामध्ये आणि चांगली झोप लागण्यामध्ये पोहण्याचा मोठा वाटा आहे. वजन नियंत्रित करणे हे सुद्धा पोहण्याने केले जाते.

पोहण्याच्या व्यायामामुळे होणाऱ्या कॅलरीच्या वापराबद्दल काय सांगता येईल?

पोहण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॅलरी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, किंवा वितळली जाते. त्यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत मिळते. या कॅलरीच्या वापराचे प्रमाण व्यक्तीच्या वजना परत्वे वेगवेगळे असते.

धन्यवाद…!

Leave a Comment