मंदिर विषयी संपूर्ण माहिती Temple Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Temple Information In Marathi विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मीय लोकांच्या प्रार्थना स्थळाला मंदिर या नावाने ओळखले जाते. मंदिर हा शब्दप्रयोग हिंदू धर्मासह जैन धर्मांच्या प्रार्थना स्थळासाठी सुद्धा केला जात असतो. मंदिर हा शब्द अगदी प्रार्थनास्थळापुरताच मर्यादित नसून, अनेक पवित्र ठिकाणांसाठी देखील या शब्दाचा वापर केला जात असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विद्यामंदिर किंवा विद्याचे मंदिर होय.

Temple Information In Marathi

मंदिर विषयी संपूर्ण माहिती Temple Information In Marathi

ज्या ठिकाणी देव वास्तव्य करतो, अशा ठिकाणाला मंदिर म्हणून संबोधन्याची पद्धत आहे. त्याच प्रकारे विद्या अर्थात माता सरस्वती ज्या ठिकाणी वास करते, त्या ठिकाणाला विद्येचे मंदिर म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये अनेक मंदिरे असून, अगदी अर्ध्या किलोमीटर अंतराच्या परिसरात एक मंदिर आढळून येते.

भारतामध्ये काही मंदिरे अतिशय प्रसिद्ध असून, या ठिकाणी भक्तगण दरवर्षी करोडो रुपयांचे दानधर्म करत असतात. यामध्ये तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा, सिद्धिविनायक मंदिरे, अष्टविनायक मंदिरे, यांसह विविध शक्तीपीठे, देवीचे साडेतीन शक्तीपीठे, बारा ज्योतिर्लिंग इत्यादी मंदिरांचा समावेश होतो.

मंदिर हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण असून, मंदिरामध्ये गेल्यानंतर मनःशांती लाभण्यास मदत मिळत असते. त्याचबरोबर मनातील सर्व विचार दूर होऊन अध्यात्मिक वलयात माणूस प्रवेश करत असतो. त्यामुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावर देखील चांगला परिणाम दिसून येत असतो. आजच्या भागामध्ये आपण मंदिर या घटका विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमंदिर
प्रकारप्रार्थनास्थळ
पूजकहिंदूधर्मीय
पूजा करणारापुजारी
देवमूर्ती स्वरूप
रचनाकळस प्रकार
वातावरणअध्यात्मिक

मंदिराचे स्वरूप:

मंदिरांचे स्वरूप हे हिंदू धर्मीय लोकांसाठी प्रार्थना स्थळ असून, या ठिकाणी सत्संगाचे देखील ठिकाण समजले जाते. अनेक पांथस्थ लोकांना किंवा वाटसरूंना विश्रांतीचे ठिकाण म्हणून देखील मंदिरांना ओळखले जाते. पूर्वीच्या काळी अनेक वाटकरी लोक मंदिरांच्या ठिकाणी आपली वास्तव्य करत असत, जेणेकरून त्यांना विश्रांती मिळण्याबरोबरच आजूबाजूचे लोक जेवणाची देखील सोय करत असत.

त्याच प्रकारे पूर्वीच्या काळी मंदिरांना धनसंपत्ती ठेवण्याचे ठिकाण म्हणून देखील ओळखले जात असे, कारण मंदिरामध्ये चोरी होण्याची शक्यता फार कमी असे. अनेक धार्मिक विधी करण्याचे ठिकाण म्हणून देखील मंदिरांना ओळखले जाते. अनेक मंदिरांच्या ठिकाणी ज्ञानदानाचे देखील कार्य केले जात असून, अनेक मंदिरांना विद्यापीठाचा देखील दर्जा प्राप्त झालेला आहे. अनेक मंदिरे शैक्षणिक संस्था देखील चालवतात.

मंदिरातील मूर्ती:

मंदिरामध्ये असणारी मूर्ती ही मंदिराची मुख्य असून, मंदिराचा आत्मा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रत्येक मंदिरामध्ये मूर्ती बसविली जाते, व तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये प्राण आणणे होय. अनेक विधिवत पूजेद्वारे मूर्तीमध्ये प्राण स्थापन केले जातात. ज्यामुळे मंदिराला एक वेगळेच नवचैतन्य प्राप्त होत असते. आणि प्राणप्रतिष्ठानंतर मूर्तीला देवाचे स्वरूप प्राप्त होत असते.

मंदिर उभारण्याचे इतिहास फार जुना असून, भारतातील भुवनेश्वर व काशी या मंदिरांना अतिशय प्राचीन मंदिरांमध्ये समाविष्ट केले जाते. काशी या एकाच क्षेत्रांमध्ये जवळपास १६५४ मंदिरांची संख्या असून, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळापासूनच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. या सर्व मंदिरांमधून सुमारे १८ प्रकारच्या ज्ञानाचे शिक्षण दिले जात असे, त्यामुळे मंदिरांना तत्कालीन काळामध्ये देखील फार महत्व प्राप्त झालेले होते.

मंदिरांची बांधकाम शैली:

आपण अनेक प्रकारचे मंदिरे बघितले असतील. त्यांच्या प्रत्येकाचे बांधकाम हे काही विशिष्ट स्वरूपाचे असते. या विविध मंदिरांच्या बांधकाम शैलीमुळे ते मंदिर प्रसिद्ध असून, मुख्यतः हेमाडपंथी, खजुराहो, कोणार्क, नागर, द्रविड यांसारख्या अनेक शैलींच्या आधारे भारतामध्ये मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यातील यादव काळामध्ये हेमाडपंती शैली मोठ्या प्रमाणावर वापरली जात असे.

या शैलीचा विकास हेमाडपंत यांनी केला होता असे सांगितले जाते. त्यामुळे यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांमध्ये तुम्हाला हेमाडपंती वास्तुशाली आढळून येईल. ज्यामध्ये घृष्णेश्वर मंदिर, गोंदेश्वर मंदिर, अंबरनाथ मंदिर, अंबाबाई मंदिर, अमृतेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, तुळजापूर मंदिर इत्यादी मंदिरांचा समावेश होतो. त्याच प्रकारे वरच्या दिशेला निमुळता होत जाणारा शिखराचा भाग असणाऱ्या शैलीला नागरशैली म्हणून ओळखले जाते.

या प्रकारची मंदिरे आजकाल मोठ्या प्रमाणावर बनवली जात आहेत. दक्षिण भारतामध्ये द्रविडी शैलीची मंदिरे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये सभा मंडपाची देखील निर्मिती केलेली असते. पश्चिम भारतामध्ये ताराकृती वेसर शैली आढळून येते, तर नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये भूमीज बांधकाम शैली आढळून येते.

निष्कर्ष:

मंदिरे ही हिंदू धर्माची मुख्य प्रार्थना स्थळे असण्याबरोबरच भारताचा मुख्य आत्मा देखील आहेत. या मंदिरांच्या ठिकाणी दरवर्षी लाखो रुपयांचा दानधर्म केला जातो. ज्यामुळे मंदिर प्रशासनासह देशाच्या विकासामध्ये देखील हातभार लागत असतो. मंदिरामुळे पर्यटन क्षेत्राचा देखील चांगला विकास झालेला असून, मंदिराच्या आसपास असणाऱ्या लोकांना चांगला व्यवसाय देखील मिळालेला आहे.

यामध्ये हॉटेल व्यवसाय, राहण्यासाठी जागा देण्याचा व्यवसाय, विविध पूजा सामग्री विकण्याचा व्यवसाय, यासह मोठमोठ्या मंदिरांच्या परिसरामध्ये अनेक व्यवसायांना चांगले स्वरूप प्राप्त झालेले असून, अनेक लोकांनी या अंतर्गत चांगला नफा देखील मिळवलेला आहे. देवावर असणाऱ्या श्रद्धेला दर्शवण्यासाठी मंदिरामध्ये लोक प्रवेश करत असतात. असे असले तरी देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील मंदिराचे अतिशय महत्त्व असून, मंदिर परिसरामध्ये आढळणाऱ्या शांततेमुळे माणूस शांत होण्यास देखील मदत मिळत असते.

त्याचबरोबर मंदिरामध्ये वाजवल्या जाणाऱ्या घंटेच्या आवाजाने माणसाच्या मानसिक आरोग्यावर देखील चांगला परिणाम होत असतो. त्यामुळे अनेक लोक मंदिरामध्ये जाणे पसंत करत असतात. सोबतच मंदिरामध्ये गेल्यानंतर मनातील संपूर्ण विचार बंद होतात, त्यामुळे मन अतिशय शांत होऊन मनाला विश्रांती देखील मिळत असते. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर दानधर्माचे कार्य देखील केले जाते. यामध्ये अन्नदान हे प्रमुख असते.

त्यामुळे अनेक गरीब लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय देखील होत असते. आजच्या भागामध्ये आपण मंदिराविषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, मंदिर म्हणजे काय, त्याची स्वरूप कसे असते, मंदिरामध्ये बसवल्या जाणाऱ्या मूर्तीची माहिती, मंदिरांचा इतिहास, मंदिराच्या बांधकाम शैली विषयी माहिती, यासह मंदिरांच्या वास्तूचे स्वरूप व रूपक याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर धरणामध्ये काही मंदिरे बुडाली आहेत, त्याबद्दल देखील माहिती घेतलेली असून, भारताच्या जुन्या मंदिरांनी बद्दल देखील ऐतिहासिक माहिती घेतलेली आहे.

FAQ

मंदिर म्हणजे काय?

मंदिर म्हणजे हिंदू धर्म लोकांसाठी प्रार्थना स्थळ असून, या ठिकाणी देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जात असते. अतिशय शांत वातावरणामध्ये बनवण्यात आलेल्या या ठिकाणाला मंदिर म्हणून ओळखले जाते.

मंदिर हे प्रार्थना स्थळ कोणकोणत्या धर्मीयांसाठी समजले जाते?

प्रत्येक धर्मीय लोकांचे प्रार्थना स्थळ वेगवेगळे असले, तरी देखील हिंदू धर्म, जैन धर्म, आणि बौद्ध धर्म यांच्यासाठी प्रार्थना स्थळ मंदिरात समजले जाते.

भारतामध्ये मंदिरे बनवताना मुख्यतः कोणकोणत्या बांधकाम शैलींचा वापर केला जातो?

भारतामध्ये मंदिरे बनवत असताना मुख्यतः हेमाडपंती, नागर शैली, द्रविड शैली, भूमी शैली, आणि वेसर शैली इत्यादी प्रकारच्या वास्तु शैलींचा वापर केला जातो.

मंदिरामध्ये भगवान स्वरूप कशाला पुजले जाते?

प्रत्येक धर्मीय लोक भगवान म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात पुजत असतात. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये भगवानांची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते, व त्याला पुजले जाते.

भारतामध्ये कोणकोणती प्रमुख मंदिरे आहेत?

भारतामध्ये अनेक मंदिरे असून, त्यामध्ये शिर्डी चे साईबाबा मंदिर, शनिशिंगणापूरचे शनी मंदिर, बालाजी मंदिर, विविध देवीचे शक्तिपीठे, आणि ज्योतिर्लिंगांची मंदिरे प्रमुख समजली जातात.

Leave a Comment