टिपू सुलतान यांची संपूर्ण माहिती Tipu Sultan Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Tipu Sultan Information In Marathi मित्रांनो, भारताला शूरवीरांच्या शूरतेचा प्रचंड मोठा दैदीप्यमान इतिहास लाभलेला आहे. रणांगणावर अनेक योद्धे लढत असतात, त्यातील फार कमी असतात ज्यांची इतिहास नोंद ठेवते. युद्ध करताना अनेक लोक जिंकतात, हरतात, मृत्युमुखी पडतात, मात्र देशासाठी लढणाऱ्या लोकांची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांमध्ये नोंद होत असते. आणि काळाचा पडदा कितीही गडद झाला, तरी देखील त्यांचे नाव सोन्याच्या तेजाप्रमाणे चमकत असते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रजा अशा शूरवीरांची आठवण काढत असते. असेच एक शूरवीर योद्धे म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे टिपू सुलताना मैसूर संस्थानाचे राजे होते. आजच्या भागामध्ये आपण या टिपू सुलतान बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

Tipu Sultan Information In Marathi

टिपू सुलतान यांची संपूर्ण माहिती Tipu Sultan Information In Marathi

नावटिपू सुलतान
संपूर्ण नावसुलतान सहित वाल शरीफ फतेह अलीखान बहादूरसाहेब टिपू
जन्मदिनांक२० नोव्हेंबर १७५०
जन्मस्थळबेंगलोर कर्नाटक तत्कालीन देवनहल्ली
ओळखम्हैसूर राज्याचे सम्राट
वडिलांचे नावहैदर अली
मृत्यु दिनांक४ मे १७९९
मृत्यू स्थळकर्नाटकातील श्रीरंगपटना

टिपू सुलतान चे प्रारंभिक आयुष्य व शैक्षणिक आयुष्य:

मैसूर संस्थानाचे संस्थापक असणाऱ्या हैदर अली यांच्या पोटी २० नोव्हेंबर १७५० या दिवशी टिपू सुलतान यांचा जन्म झाला होता. सध्याचे बंगलोर या ठिकाणी असणारे हे संस्थान एक राजधानीचे ठिकाण म्हणून देखील ओळखले जाते.

१७६१ या वर्षी हैदर अली सत्तेवर आला, आणि त्याने संपूर्ण म्हैसूर राज्याला नियंत्रणाखाली घेतले. हा हैदर अली अशिक्षित असला, तरी देखील त्यांनी टिपू सुलतान च्या शिक्षणासाठी जातीने लक्ष दिले होते.

या ठिकाणी टिपू सुलतान ला विविध भाषांचे शिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये अरबी, पर्शियन, उर्दू, कानडी, इस्लामिक, इत्यादी भाषांचे शिक्षण समाविष्ट होते. सोबतच घोडेसवारी, तलवारबाजी, नेमबाजी, यांसारख्या शिक्षणामध्ये देखील कुठलीही कसर ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे टिपू सुलतान राज्य सांभाळण्यासाठी सक्षम आहे हे निश्चित झाले होते.

सुरुवातीला टिपू सुलतान ला फार त्रास भोगावा लागला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना लष्करी शिक्षण देखील देण्यात आले. त्यांच्या वडिलांनी टिपू सुलतान च्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी टिपू सुलतानला एका युद्धामध्ये सहभागी होण्याचे सुचविले. ते वर्ष १७६६ होते. ही टिपू सुलतान ची पहिली लढाई असली, तरी देखील त्यामध्ये हैदरअलीच नियंत्रण करत होते.

हैदर अलीने सुरुवातीपासूनच ब्रिटिशांशी सलगीचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत टिपू सुलतानने देखील सुरुवातीला इंग्रजांच्या सोबत सलगी केली होती. मात्र आपल्या राज्यावर इंग्रज डोईजड होत आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संघर्ष सुरू केला होता. आणि त्यांच्या या इंग्रजांसोबतच्या युद्धांना प्रसिद्ध अँग्लो म्हैसूर युद्ध म्हणून ओळखले जाते. ही एकूण दोन युद्ध झाली असून, दुसऱ्या युद्धाला मंगळवारच्या तहाने पूर्णविराम मिळाला.

टिपू सुलतान च्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई:

आपल्या उभ्या आयुष्यामध्ये टिपू सुलतानने खूप लढाया केलेल्या आहेत. त्यांनी सर्वात पहिली लढाई वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लढली होती, मात्र इंग्रजांसोबत केलेले दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व मोठे युद्ध समजले जाते.

या ठिकाणी टिपू सुलतानने आपले सर्वस्व पणाला लावून फार मोठा संघर्ष केला होता. मात्र शेवटी इंग्रज वर्चस्व गाजवू लागले, आणि टिपू सुलतान पेक्षा वरचढ ठरले. त्यामुळे त्यांना मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करावी लागली, व इथेच म्हैसूर संस्थांना संपुष्टात आले. पुढे या युद्धानंतर टिपू सुलतान चा देखील मृत्यू झाला.

टिपू सुलतान चा मृत्यू:

टिपू सुलतानने इंग्रजांसोबत चौथ्यांदा युद्ध केले होते, मात्र या युद्धामध्ये इंग्रजांनी धोक्याने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना फसवून युद्ध केले. यामध्ये पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला. मात्र यावेळी ब्रिटिशांनी अर्थात ईस्ट इंडिया कंपनीने टिपू सुलतान चा वध केला, आणि अशा रीतीने दिनांक ४ मे १७९९ या दिवशी टिपू सुलतान रणांगणामध्येच मृत्यू पावले. पुढे श्रीरंगपट्टणम या ठिकाणी त्यांची समाधी देखील तयार करण्यात आली.

टिपू सुलतान बद्दल काही महत्त्वाची तथ्य माहिती:

टिपू सुलतान ला टायगर ऑफ म्हैसूर किंवा मैसूर चा वाघ या नावाने देखील ओळखले जाते.

टिपू सुलतान पराक्रमी राजा असला, तरी देखील तो सहिष्णुता दाखवणारा नव्हता. त्यांनी इस्लामच्या प्रसारासाठी अनेक ख्रिश्चन व हिंदू लोकांना धर्म परिवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी या दरम्यान अनेक मंदिरे व चर्च देखील नष्ट केली होती.

टिपू सुलतान आपल्या वडिलांना फार मानत असे, त्यांच्या पावलावर पाऊल देतच त्यांनी राज्यविस्तार मोठ्या प्रमाणावर केला होता.

लहानपणापासूनच सैन्याचे आणि तलवारबाजीचे योग्य शिक्षण मिळाल्यामुळे टिपू सुलतानने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच आपल्या वडिलांसोबत युद्धामध्ये सहभाग घेणे सुरू केले होते.

टिपू सुलतान ची तलवार फार उत्तम प्रकारची होती, मात्र इंग्रजांनी टिपू सुलतान विरुद्ध जिंकलेल्या युद्धाचे प्रतीक म्हणून ही तलवार चोरून इंग्लंडला नेली, व तेथील संग्रहालयामध्ये ठेवली.

भारतामध्ये जन्मले असले तरी देखील टिपू सुलतान ला त्यांच्या धर्मामुळे पाकिस्तान मध्ये देखील एक नायक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये त्यांची पूजा देखील केली जाते.

निष्कर्ष:

ब्रिटिशांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली, आणि भारतातील अनेक संस्थांने इंग्रजांविरुद्ध एक झाली. तत्कालीन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत युद्ध करून प्रसिद्ध झालेले टिपू सुलतान त्यांच्या धाडसासाठी देखील सुप्रसिद्ध होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी मोठा लढा दिला होता, त्यामुळे त्यांना भारतातील प्रथम स्वातंत्र सैनिक या नावाने देखील ओळखले जाते.

ब्रिटिशांनी सर्वात प्रथम अँग्लो म्हैसूर युद्ध अंतर्गत या टिपू सुलतान च्या संस्थानाला संपवण्याचे कार्य केले होते. आणि यातीलच दुसऱ्या युद्धामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या मंगळूर  तहावर स्वाक्षरी करून या युद्धाला विराम दिला होता. १७८२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर, टिपू सुलतान ने आपल्या हातामध्ये राज्यकारभार घेतला होता.

त्यांनी आपल्या कालखंडात अनेक प्रशासकीय सुधारणा करण्याबरोबरच, ब्रिटिशांसोबत दोन हात करण्याचे देखील कार्य केले होते. आजच्या भागामध्ये आपण या टिपू सुलतान बद्दल माहिती बघितली असून, टिपू सुलतान बद्दल प्रारंभिक माहिती आणि शैक्षणिक माहिती, टिपू सुलतानचे राज्य, टिपू सुलतान ने केलेल्या विविध लढाया, त्यांचे वैयक्तिक जीवन, मृत्यू, यासोबतच त्यांच्याविषयीची काही महत्त्वाची मनोरंजक तथ्य माहिती देखील बघितली आहे.

FAQ

टिपू सुलतान यांचे संपूर्ण नाव काय होते?

टिपू सुलतान यांचे संपूर्ण नाव सुलतान सईद वाल शरीफ फतेह अलीखान बहादूर साहेब टिपू असे होते.

टिपू सुलतान यांचा जन्म कोणत्या ठिकाणी, व कोणत्या दिवशी झाला होता?

टिपू सुलतान यांचा जन्म कर्नाटक राज्यातील सध्याच्या मंगलोर या ठिकाणी झाला होता. त्याकाळी या ठिकाणाला देवनहल्ली या नावाने ओळखले जात असे. तो दिनांक २० नोव्हेंबर १७५० होता.

टिपू सुलतान च्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?

टिपू सुलतान यांच्या आईचे नाव फातिमा फकर ऊन निसा असे होते, तर वडिलांचे नाव हैदर अली असे होते.

टिपू सुलतान च्या पत्नीचे नाव काय होते?

टिपू सुलतान च्या पत्नीचे नाव सिंध सुलतान असे होते.

टिपू सुलतान यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी, व कोणाच्या दिवशी झाला होता?

टिपू सुलतान यांचा मृत्यू कर्नाटकच्या श्रीरंग पटना या ठिकाणी दिनांक ४ मे १७९९ या दिवशी झाला होता.

Leave a Comment