गव्हाची संपूर्ण माहिती Wheat Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Wheat Information In Marathi दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व अन्न खात असतो. या अन्नांमध्ये विविधता आढळून येत असली, तरी देखील या सर्व प्रकारच्या जेवणामध्ये एक घटक नेहमीच सारखा असतो. आणि तो म्हणजे चपात्या किंवा पोळ्या होय. या चपात्या किंवा पोळ्या मुख्यतः गव्हापासून बनवण्यात येत असतात, आपल्या दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट असणारा हा गहू प्रत्येकाच्या ओळखीचे पीक असून, अगदी उत्तर भारतामध्ये तर या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन त्याचे सेवन देखील केले जाते.

Wheat Information In Marathi

गव्हाची संपूर्ण माहिती Wheat Information In Marathi

गावाच्या उत्पादनामध्ये पंजाब राज्य आघाडीवर असून, अवघ्या चार महिन्यांमध्ये येणारे हे पीक अतिशय आरोग्यदायी देखील आहे. बेकरी पदार्थांमध्ये मुख्यतः मोठ्या प्रमाणावर या गव्हाचा वापर केला जात असतो. गव्हामध्ये अनेक प्रकारचे पोषणद्रव्य असले, तरी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लुटेन हा चिकट प्रकारचा घटक आढळून येतो, ज्यामुळे गव्हाच्या चपात्या अतिशय मऊ होण्यास मदत मिळत असते.

त्याचबरोबर शेवया सारख्या पदार्थांचे निर्मिती देखील सहज शक्य होते. यासोबतच कर्बोधकांनी युक्त असलेला हा गहू शरीराला दररोज आवश्यक असणारी ऊर्जा प्रदान करण्यास देखील खूपच गुणकारी असतो. आजच्या भागामध्ये आपण या गव्हाची थोडक्यात माहिती बघणार आहोत…

नावगहू
इंग्रजी नाव wheat
शास्त्रीय नावट्रीटिकम अष्टिवम
हंगामरब्बी
प्रकारतृण धान्यवर्गीय पिक
किंगडमप्लांटी
कुटुंब किंवा कुळग्रामीणी
सर्वाधिक उत्पादनपंजाब व मध्य प्रदेश
घटककर्बोदके व प्रथिने

गहू म्हणजे काय:

जवळपास ६० ते १५० सेमी उंच वाढणारा आणि पोकळ स्वरूपाचा गहू त्याच्या लांबट दाण्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण हंगाम हिरव्या रंगांमध्ये दिसणारे हे पिक परिपक्व झाल्यानंतर मात्र तपकिरी लाल दिसू लागते. यामध्ये रसदार दाणे भरत असतात.

या दाण्यांच्या समूहाला ओंबी म्हणून ओळखले जाते. परिपक्व झाल्यानंतर हे दाणे देखील लालसर तपकिरी रंगांमध्ये दिसून येत असतात. दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट असणारा हा गहू भारतामधील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये घेतला जातो, मात्र उत्तर भारतामध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर एकवटलेले आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्येच याचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जात असते.

गव्हाचे फायदे:

गहू हा थंडीच्या हंगामामध्ये उगवत असल्यामुळे वायुदोष आणि पित्तदोष शमविण्यासाठी अत्यंत प्रभावी समजला जातो. अतिशय मऊ असणारा हा गहू आयुर्वेदिक फायद्यांचा खजिनाच आहे असे म्हणता येईल. या गव्हाच्या सेवनामुळे मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक शरीराला मिळत असतात.

त्याचबरोबर शरीरातील विर्याची मात्रा वाढवण्यासाठी देखील गहू खूपच फायदेशीर असतो. त्याचबरोबर भूक वाढविणे, गुडघे दुखणे, छातीमध्ये कफ होणे, इत्यादी बाबतीमध्ये देखील गहू अतिशय फायदेशीर असतो. खोकल्याच्या उपचारांमध्ये देखील गव्हाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

याकरिता चिमूटभर गव्हाला दूध, मध, तसेच तुपामध्ये मिसळून त्याचे सेवन करावे. जेणेकरून खोकला कमी केला जाऊ शकतो, तसेच छातीमध्ये जमा झालेला कफ देखील कमी होत असतो. क्षयरोगासारख्या दुर्धर आजारांमध्ये देखील गव्हाच्या सेवनाने फायदा झाल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहेत. पित्त जाणवत असेल, तरीदेखील गव्हाच्या पिठाला दुधासोबत एकत्र करून त्याचे सेवन केल्यास फायदा दिसून येतो.

गव्हाचा कोंडा हा छाती दुखण्याच्या समस्येवर अतिशय रामबाण असून, हा कोंडा कोमट पाण्यामध्ये मिसळून छातीवर त्याचा लेप दिला असता खूपच फायदा दिसून आलेला आहे. हृदयरोग कमी करण्यासाठी तसेच त्यापासून निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी देखील गहू खूपच फायदेशीर असून, अर्जुन वनस्पतीची साल आणि गहू सारख्या प्रमाणात घेऊन त्याचे पीठ तयार करावे, त्यानंतर या मिश्रणामध्ये थोडेसे तेल, तूप आणि गूळ घालून त्याला योग्य पद्धतीने शिजवून घ्यावे.

याकरिता शेळीचे दूध आणि गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेले तूप वापरल्यास खूपच फायदेशीर ठरते. या मिश्रणाला दुधामध्ये एकत्र करून, सेवन केल्यास हृदयरोगावर मात केली जाऊ शकते.

पोटाच्या संदर्भात असणाऱ्या समस्या देखील गव्हाच्या सेवनाने कमी केल्या जाऊ शकतात. गावामध्ये उपलब्ध असणारा कोंडा भूक वाढवण्याबरोबरच अपचन सारख्या समस्यांवर देखील फायदेशीर ठरत असतो. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त असते.

ज्या लोकांना मधुमेहाचा आजार जाणवत असेल, अशा लोकांनी अंकुरित गहू सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत मिळत असते.

आजकाल खराब पाण्याच्या सेवनामुळे अनेक लोकांना मुतखडा सारखी समस्या जाणवत आहे, अशावेळी गहू खूपच फायदेशीर ठरतो. आणि किडनीमध्ये असणाऱ्या मुतखड्याला विरघळवण्यास मदत करत असतो. त्याचबरोबर अंडकोष दुखणे, योनी मार्गाचे काही आजार, देखील या गावाच्या सेवनाने दूर केले जाऊ शकतात.

कोवळ्या गव्हाची पाने देखील कर्करोगावर अतिशय उत्तम उपाय म्हणून सिद्ध झालेली असून, गव्हाचे पाच ते सात पाने घेऊन त्यामध्ये ज्वारीच्या पानांचा देखील रस घालावा. या सर्व मिश्रणामध्ये कडुलिंबाच्या पानाचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून, सेवन करावा. यामुळे कर्करोगाच्या पेशी मध्ये होणाऱ्या अनियंत्रित वाढीला आळा घातला जाऊ शकतो.

निष्कर्ष:

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकाचं दिवसभरात एकदा तरी गव्हाचे सेवन करत असतो. बेकरी पदार्थांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हा गहू पदार्थ अनेक वाळवणाच्या पदार्थांमध्ये देखील वापरला जातो. यामध्ये शेवया, कुरडया यांच्यासारख्या पदार्थांचा समावेश होतो.

दररोज चपात्या देखील बनवताना गहूच वापरला जात असतो. गहू हा शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी खूपच फायदेशीर असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात. जी शरीराची ऊर्जा गरज भागवत असतात. त्याचबरोबर इतर इतर तृणधान्यांपासून वेगळी गोष्ट म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने देखील आढळून येतात.

याचे प्रमाण सुमारे १२ ते १४ टक्क्यांपर्यंत असते, त्यामुळे शरीराला एक योग्य आकार येण्यास देखील मदत मिळत असते. आजच्या भागामध्ये आपण या गव्हाच्या पिकाबद्दल आणि गव्हाच्या दाण्याबद्दल देखील संपूर्ण माहिती बघितलेली असून, गहू वापरामुळे होणारे विविध फायदे देखील जाणून घेतलेले आहेत.

त्याचबरोबर खोकला, छाती दुखी, हृदयरोग, पोटाच्या विविध समस्या, मधुमेह यांच्यासारख्या उपचारांमध्ये गव्हाचे महत्त्व जाणून घेतलेले आहे. सोबतच किडनी मध्ये झालेल्या मुतखड्याला विरघळण्यासाठी गहू कसा फायदेशीर ठरतो, हे बघताना अंडकोष, योनीमार्ग, हाडे, जखमा, आणि कर्करोग यांच्यासारख्या उपचारांमध्ये देखील गव्हाचे महत्त्व जाणून घेतलेले आहे.

FAQ

गहू या पिकाला इंग्रजी व शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या कोणत्या नावाने ओळखले जाते?

गहू या पिकाला इंग्रजी भाषेमध्ये wheat तर शास्त्रीय भाषांमध्ये ट्रीटिकम अष्टिवम या नावाने ओळखले जाते.

गहू हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? व ते कोणत्या हंगामामध्ये घेतले जाते?

गहू हे तृणधान्य वर्गीय प्रकारचे पीक असून, ते मुख्यतः रब्बी हंगामामध्ये घेतले जाते.

गव्हाच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त आघाडीवर असणारे कोणते दोन राज्य आहेत?

गव्हाच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त आघाडीवर असणाऱ्या दोन राज्यांमध्ये पंजाब व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा समावेश होतो.

गव्हामध्ये कोणते घटक सर्वाधिक प्रमाणात आढळून येतात, व त्यांचे प्रमाण किती असते?

गव्हामध्ये सर्वात जास्त प्रमाणावर कर्बोदके आणि प्रथिने आढळून येत असतात. व त्यांचे प्रमाण अनुक्रमे ६७ ते ६९ टक्के आणि १२ ते १४ टक्के इतके असते.

गहू पीक तयार होण्यासाठी साधारणपणे किती दिवसांचा कालावधी लागत असतो?

गहू हे एक हंगामी स्वरूपाचे पीक असून, मुख्यतः याची पेरणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये केली जाते. व मार्च एप्रिल महिन्यामध्ये याची काढणी केली जाते. सरासरी चार महिन्यांचा कालावधी या पिकाच्या परिपक्वतेसाठी लागत असतो.

Leave a Comment